'आप'कडे धाव कशासाठी?

Submitted by विजय देशमुख on 9 January, 2014 - 21:22

वर्षाच्या सुरुवातीला 'आप' पक्षाने पुन्हा एकदा आपचे कार्यकर्ता व्हा म्हणत नोंदणी सुरु केली आहे. या नोंदणीला आता केवळ दिल्लीतच नव्हे तर इतरत्रही चांगला प्रतिसाद मिळतोय. मोठमोठ्या पदावरुन राजीनामा देऊन काही लोकं आप पक्षात प्रवेश करत आहेत. इतर पक्षातले {नाराज, किंवा तिकिट मिळणारच नाही, असं गृहित धरलेले किंवा संधीच मिळत नाही म्हणणारे} राजकीय नेतेही आप कडे वाट करु लागले आहेत.
नेमकं काय होतय? ज्या लोकांना राजकीय क्षेत्रात जायचं आहे (आणि कुठल्यातरी पदावर काम करायचं आहे) असे लोकं आप कडे जातात, हे एकवेळ समजण्यासारखं आहे, पण ज्यांना केवळ आप आवडतो, म्हणुन या पक्षाचा कार्यकर्ता होण्यात काय इंटरेस्ट असेल?
आप एक राजकीय पक्ष असला तरी जिथे आप सत्तेत नाही तिथे केवळ आंदोलनं, यावरच आप चा भर आहे का/ राहिल का? आप च्या स्वराज्य पुस्तकात बरेचशी उदाहरणे आहेत, जी स्थानिक लोकांनी {ज्यात आपचा सहभाग नव्हता}, छोट्या गावात केलेल्या प्रगतीविषयी आहे. तसं काही आपच्या माध्यमातुन महाराष्ट्रात {राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं} एक वेगळं उदाहरण आहे का? किंवा तसा प्रयत्न कोणी करतय का? की केवळ RTI च्या माध्यमातुन भ्रष्टाचार उकरुन काढणे, इतक्याच एक उदिष्टांत आप गुंतली आहे?
खरं तर प्रत्येक राजकीय आणि सामाजिक संघटनेची पुस्तके, वेबसाईट्स चांगल्याच असतात. विचार चांगलेच असतात, पण लोकं कोणत्या पक्षाकडे/ सामाजिक संघटनेकडे आकर्षित होतात, त्याची वेगवेगळी कारणे असु शकतात. राम-मंदीर मोहिमेच्या वेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या संखेत वाढ झाली (असावी), तस काहीसं आप च्या बाबतीत होतय का? यापुर्वी असे अनेक पक्ष स्थापन झाले, त्यांची आजची परिस्थिती केवळ कार्यालय, इतकीच बाकी आहे.
अर्थातच कोणत्याही चळवळीला हिणवणे, हा माझा उद्देश नाही, पण चळवळ सुरु करणे आणि सातत्याने पुढे चालू ठेवणे यातला फरक लक्षात घेउन आप काम करत आहे का?
उदाहरणादाखल द्यायचे झाले, तर आजपर्यंतची पिढी ५ वर्षातुन एकदा मतदान करणे आणि क्वचित प्रसंगी सही मोहिमेत भाग घेणे यापलिकडे जाऊन कधी प्रत्यक्ष लोकशाहीत सहभागी झाली नाही. आज अनेक तरूणांना ही संधी वाटू शकते, पण काही काळानंतर पुन्हा एकदा केवळ पॅसिव्ह (मराठी?) सहभाग असं होईल का?
मी स्वतः कोणत्याही संघटनेचा सदस्य न होता, शक्य तितकं काम करण्याचा प्रयत्न केलाय, पण एक विशिष्ट साच्यात लोकांना बसवणे, आणि एका व्यवस्थापकीय उतरंडीला (managerial hirarchy) सर्व हक्क देउन ते म्हणतील तसं काही करणं, यामुळे प्रत्येक ठिकाणी निराशाच झाली. आपल्या मताला काही किंमतच नाही, असं प्रत्येक जागी वाटत गेलं. कदाचित ती माझ्या समजण्यातली चुक असेल किंवा अनुभवाची कमतरता, पण त्या आणि इतर अनेक संघटना अजुनही एका परिघाच्या बाहेर (जसं गाव, तालुका किंवा फार फार तर जिल्हा) वाढू शकल्या नाही.
नेमकं आप कडुन लोकांना काय अपेक्षित असावं/ आहे, याचा मी वेध घेण्याच्या प्रयत्न करणार आहे {वागळे स्टाईल Happy }
तुम्हाला काय वाटतं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल, खुपच छान काम करताय तुम्ही.

बाकी महाराष्ट्र (किंवा इतर कोणत्याही) सरकारकडुन काहीच अपेक्षा नाही. असो. पोपटराव करतील काहितरी अशी अपेक्षा आहे, मात्र. ही माहिती नव्हती मला, त्यासाठी विशेष आभार.

असं काही वाचलं की वाटतं, अरे काय करतोय आपण. उगाच चार रुपड्यांसाठी इथे कुठेतरी येउन बसलोय. मन तिथे अन शरीर इथे अशी परिस्थिती आहे. पण लौकरच सक्रीय सहभागास येइन, ही खात्रीही आहे. असो...

अर्थात हे उंटावरुन शेळ्या हाकणे होईल, पण राहवत नाही म्हणुन लिहितोय.
(बहुदा) लोकांना एक स्टार्ट हवा असतो. पुढे स्थानिक नेतृत्वाला पुढे करुन कामे सुरु ठेवली तर अधिक गावांपर्यंत पोहचणे शक्य होईल. दुसरं म्हणजे गावातील शाळांत शिक्षकांची कमतरता, ही नेहमीची बाब आहे, त्यासाठी शहरातील/ जवळपासचे कॉलेजचे विद्यार्थी जर प्रत्येकी महिन्यातुन एक दिवस, जरी मदत करु शकले, तरी गावातील विद्यार्थ्यांना खुप मदत होईल. अर्थात हे प्रत्यक्ष कितपत शक्य आहे, हे तुम्हाला आणि तिथे राहणार्‍या लोकांना चांगलं माहिती असेल. प्रत्येक पिढीतल्या तरुणांना काहितरी करुन दाखवायची इच्छा असते, पण त्याला मार्ग मिळत नाही. तो या माध्यमातुन मिळाला, तर गुणांचा गुणाकार व्हायला मदत होईल.

अनेकानेक शुभेच्छा. फोटो/ व्हिडीओ असल्यास कृपया लिंक पाठवा (विपू /इमेल) किंवा शेअर करा.

लोकांना एक स्टार्ट हवा असतो >> खरं आहे, आम्हालाहि जाणवलं.

पुढे स्थानिक नेतृत्वाला पुढे करुन कामे सुरु ठेवली तर अधिक गावांपर्यंत पोहचणे शक्य होईल -- >> अगदी अगदी तसच करतोय. निदान त्याच गावात जरी काम सुरु राहिल तरी गंगेत घोडे न्हाले.

त्यासाठी शहरातील/ जवळपासचे कॉलेजचे विद्यार्थी जर प्रत्येकी महिन्यातुन एक दिवस, जरी मदत करु शकले, तरी गावातील विद्यार्थ्यांना खुप मदत होईल >> तुमची कल्पना आवडली. बघतो आम्ही काही करता येतंय का यावर. आणि बाकीच्या गावांन्नाहि ह्याचा फायदा होऊ शकतो.

खाली facebook वरच्या लिंक देत आहे.(login करून दुसऱ्या tab मध्ये ह्या लिंक paste करा -तुम्हाला माहित असेलच.)

धन्यवाद.

https://www.facebook.com/profile.php?id=100004693261259&sk=photos&collec... >> गावातील काम.

https://www.facebook.com/photo.php?fbid=231257120374062&set=a.2312614670... >> हिवरे बाजार येथील सहल.

कविवर्य विंदा करंदीकर यांनी भारताच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी लिहिलेली ही (सब घोडे बारा टक्के)मार्मिक कविता. आजही स्थिती अशीच आहे:

जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;

.... बी.
कविता खूपच आवडली...
सामान्य माणूस वास्तवाला नेहमीच त्रासलेला असतो .... कारण त्याच्या सामान्य गरजा ह्या कधीच पूर्ण होत नाहीत .... तरी तो बाजारात काहीतरी नवीन आलं की त्याकडे लगेच आकर्षित होतो .... कारण त्यात वास्तव कमी आणि प्रचाराच जास्त असतो.... आणि चांगल्या प्रचारापासून बरचं काही साध्य होतं.... तेव्हा बोलणं सोपे - कुती अवघड.

दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की केजरीवाल ह्यांना फक्त हुतात्मा होवून लोकसभे मध्ये जास्त जागा मिळवण्यासाठी असे सगळे केले. सगळ्यात चाणाक्ष राजकारणी निघाला पण किती फायदा होईल ह्याचा हां प्रश्न आहे

100

मोठ मोठ्या अवास्तव बाता मारून मते मिळवली. कोंग्रेसच्या साथीने का होईना सरकार बनवले मात्र सत्तेवर आल्यावर कामे करता येइनात. रस्त्यावर आंदोलने करणे आणि सरकार मध्ये येवून जबाबदारीने काम करणे यात मोठे अंतर असते. रोज उठून एक तमाशा. काम करणे जमत नाही, फक्त तमाशा जमतो म्हणून लोकसभेला कुठल्या तोंडाने लोकांसमोर जायचे म्हणून हा पळपुटे पणा केला. मुख्यमंत्र्याला किती तरी अधिकार असतात. कायद्याच्या चौकटीत राहून किती तरी लोकोपयोगी कामे करता आले असते. मात्र हे न करता असैविधानिक मार्गाने बिल सभागृहात मांडायला गेले आणि सफल झाले नाही म्हणून राजीनामा दिला. लोकांनी यासाठी मते दिली होती का ? लोकांना मुर्खात काढले . हे सगळे लोकसभेला सामोरे जाण्यासाठी केले.

>>>>> शेवटी आपचा गेम केलाच. <<<<< माफ करा पण या विधानाशी सहमत नाही.
गेम त्यान्चा त्यान्नी स्वतः केलाय, स्वतःचे "हसे" करुन घेतलय, व काल लोकसभेत खासदारान्नी केलेल्या गोन्धळाइतकेच हे राजीनामानाट्य देखिल हास्यास्पद आहे.

दिवास्वप्ने बघत मोठमोठ्या बाता मारुन प्रतिपक्षावर बिनबुडाचे आरोप करुन अतिसामान्य मतदारान्ना भुलविणे ही बाब वेगळी, अन प्रत्यक्ष राज्यकारभार निश्चित केलेल्या धोरणे/नियमानुसार सर्वान्ना सामावुन घेत चालविणे वेगळे!
असे "नायक" केवळ हिन्दी सिनेमातल्या स्वप्नाळू भुमिकातच शोभुन दिसतात, व्यवहारात नाही, अन राज्यकारभारात तर त्याहुन नाही.
नशिब आमचे की दिल्लीला लागुन एखादे शत्रुराष्ट्र/परदेश नाहीये / दुसर्‍या शब्द्दात या औटघटकेच्या राज्याला "परराष्ट्रव्यवहारसंबंधी" काही आचरट उचापती करणे शक्य होणार नव्हते.

गेम त्यान्चा त्यान्नी स्वतः केलाय, स्वतःचे "हसे" करुन घेतलय, व काल लोकसभेत खासदारान्नी केलेल्या गोन्धळाइतकेच हे राजीनामानाट्य देखिल हास्यास्पद आहे. <<< सहमत आहे.

मौजे तक्रारवाडी च्या सरपंचाने ग्रामपंचायतीमधे जनलोकपाल मांडण्याचा इशारा दिला आहे.बिल मांडू दिलं नाही तर राजीनामा देऊन उपोषण करणार असं जाहीर केलं आहे.

मौजे तक्रारवाडीहून मी शकील पाघळे आणि गलका धपकन , दर पंधरा मिनिटाला देत राहू ताजी बातमी
पाहत रहा. पालथा बाणा, उलटे मत.
आईच्यान रोकमत

आता पुर्ण सत्ता .. पुर्ण स्वच्छ झाडू ..!

चांगले झाले. आधीच्या झाडूमध्ये चार सडक्या कांड्या जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे घर झाडायला म्हणून ती फिरवली तरी पुन्हा नव्याने काही घाण सुटतच होती. आता त्या चार कांड्या बाजूला सारून एक नवी स्वच्छ झाडू मिळेल अशी आशा.. बोलो आमीन !!

गेम त्यान्चा त्यान्नी स्वतः केलाय, स्वतःचे "हसे" करुन घेतलय, व काल लोकसभेत खासदारान्नी केलेल्या गोन्धळाइतकेच हे राजीनामानाट्य देखिल हास्यास्पद आहे. <<< सहमत आहे. रोज नया ड्रामा देखके जीव कंटाल गया था. प्रत्येक काम मीडिया ग्लेअर मध्येच केले पाहिजे का? असे वाटू लागले होते.
सुवर्ण संधी मिळाली होती. वाया घालवली. प्रत्येक सर्विस प्रोव्हायडर जसे बिजली पानी, गॅस, पोलीस इत्यादी, सलोखा प्रस्थापित करून त्यांचे प्र श्न आणि राज्य करण्याची प्रोसेस समजावून घेउन चांगली सोल्युशन्स इंप्लेमेंट करणे शक्य होते.

इथे दिल्लीचे कोणी होते ना.........

कृपया जानेवारी महिन्याचे ......पाण्याचे आणि वीजे चे बील किती आले .........सांगु शकाल का ?

काही बदल जाणवला का बिलांमधे ...... जसे ७०० लिटर पाणी फ्री होते असे काही फायदा मिळाला का

जानेवारीचं पाण्याचं बील आलंच नाहीये अजून. तसंही आमच्या भागात पाण्याच्या मीटरचं रिडींग घ्यायला येत नाहीत. अंदाजे साअसरी बील पाठवायचे सहा सहा महिन्यांचं एकत्र. शक्यतो २००-२५० रुपये महिना असतं पाण्याचं बील आमचं.
जर ७०० लीटर फ्री पाणी याप्रमाणे मीटरवर रिडींग घेवून बील पाठवलं तर किमान आमचं तरी शुन्य रुपये बील येइल. (कारण आमच्या घरी फक्त ५०० लीटर पाण्याच्या साठवणूकीची सोय आहे) Happy

वीजेचं बील नेहेमीइतकंच २००० च्या आसपास आलंय. (पण बहूतेक वापर कमी असेल तरच वीजेच्या सबसिडीचा फरक होणार होता)

एक मात्र मानला केजरीवालला, आर या पार ची लढाई, भ्रष्टाचार उखडायचाच आहे तर त्याचे समूळ उच्चाटन नाही तर मीच पडतो रिंगणातून बाहेर. भ्रष्टाचार्‍यांनीच घालून दिलेली बंधने पाळत लढण्यात अर्थ नाही, अश्याने देश आणखी ५० वर्षे सुधारतच राहील.. एखादी सामाजिक क्रांतीचीच गरज आहे, प्रश्न असा आहे की देशभरात एकाच वेळी ती होऊ शकते का.. केजरीवाल वा त्यांनी स्थापलेला पक्ष तिचे नेत्रुत्व करू शकतो का..

पेट थेरपी,

>> सुवर्ण संधी मिळाली होती. वाया घालवली. प्रत्येक सर्विस प्रोव्हायडर जसे बिजली पानी, गॅस, पोलीस इत्यादी,
>> सलोखा प्रस्थापित करून त्यांचे प्र श्न आणि राज्य करण्याची प्रोसेस समजावून घेउन चांगली सोल्युशन्स इंप्लेमेंट
>> करणे शक्य होते.

असहमत. तुम्ही ज्याला सुवर्णसंधी म्हणतात ते त्याच्या दृष्टीने गळ्यातलं लोढणं आहे.

केजरीवाल हा प्रशासकीय पार्श्वभूमीचा माणूस आहे. सरकार कसं चालतं ते त्याला छानपैकी ठाऊक आहे. तरीही तो आक्रस्ताळेपणा का करतो? मुख्यमंत्री म्हणजे कोणी आलतूफालतू पद आहे का? काहीच समज कशी नाही?

त्याची कोणाबरोबर उठबस आहे? त्याला पैसा कुठून मिळतो? तो कोणत्या अशासकीय संस्था (NGO) चालवतो? या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना माहीती आहेत.

त्याला मोदींची मतं खायची आहेत. यापलीकडे मलातरी काही कारण दिसत नाही त्याला पुढे आणण्याचं! येन केन प्रकारेण उजळ माथ्याने लोकसभा निवडणुकींत उतरायचं आहे त्याला. तेव्हा जर दिल्ली विधानसभेत झालेली त्याची हालत लोकांना दिसली तर मोदींची मते कशी खाता येणार? हुतात्मा बनायला नको का त्याने? साधा हिशोब आहे.

आ.न.,
-गा.पै.

एक विनोद वाचला.....

माँ, मुझे खाने के लिये छिपकली दो ना. मुझे चाहिये,चाहिये, अभी के अभी चाहिये.....नही बेटे छिपकली कोई खाने की चीज नही..... मुझे छिपकली चाहिये,चाहिये, अभी के अभी चाहिये...... जिद मत करो बेटे ....छिपकली ,छिपकली खाने के लिये चाहिये, अभी के अभी चाहिये..... रुको तुम्हारे टीचर को ही बताती हू वे तुम्हे समझायेंगे...... ठीचर, मुझे छिपकली चाहिये,चाहिये, अभी के अभी चाहिये........अच्छा? ठीक है , ये लो..... नही, ऐसे नही मुझे छिपकली फ्राय करके चाहिये... अच्छा ठीक है... ये लो फ्राय करके लाया.... नही मै तो सिर्फ आधी खाउंगा....... ठीक है ये लो आधी खाओ.... नही पहले आप खाओ.... ठीक है , ये लो मैने खा ली अब तुम खाओ.... नही मुझे वो पूंछ वाला हिस्सा चाहिये था तुमने वो क्यों खाया?.......... ........... शायद आप अब तक समझ ही गये होंगे वो बच्चा बडा बनके केजरीवाल बना!!

राजीनामा दिल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोश केला. Sad
बाकी आपवाले मोठमोठ्या नेत्यांच्या विरोधात लढुन त्यांना पाडतील {शीला दिक्षितांसारखं} असं आप-समर्थकांचं म्हणणं आहे. सध्या काँग्रेसविरोधी वातावरणात कदाचित फायदाही होऊ शकेल त्यांना.
काही सर्वेक्षण दिल्लीत आपला ३६+ जागा मिळतील असं दाखवताहेत, तर काही त्यांचा सफाया. Happy जो जे वांछिल तो ते दाखवे, असं दिसतय.
बाकी पहिल्या यादीत तरी विधानसभा लढवलेले कोणी लोकसभेत लढणार नाही असं दिसतय.
लोकसभेत ४०-५० जागा मिळवल्या तर आप च्या (असंवैधानिक?) लढ्याला कसे मोदी/राहुल तोंड देतील, याची कल्पना करवत नाही. Happy

Pages