'आप'कडे धाव कशासाठी?

Submitted by विजय देशमुख on 9 January, 2014 - 21:22

वर्षाच्या सुरुवातीला 'आप' पक्षाने पुन्हा एकदा आपचे कार्यकर्ता व्हा म्हणत नोंदणी सुरु केली आहे. या नोंदणीला आता केवळ दिल्लीतच नव्हे तर इतरत्रही चांगला प्रतिसाद मिळतोय. मोठमोठ्या पदावरुन राजीनामा देऊन काही लोकं आप पक्षात प्रवेश करत आहेत. इतर पक्षातले {नाराज, किंवा तिकिट मिळणारच नाही, असं गृहित धरलेले किंवा संधीच मिळत नाही म्हणणारे} राजकीय नेतेही आप कडे वाट करु लागले आहेत.
नेमकं काय होतय? ज्या लोकांना राजकीय क्षेत्रात जायचं आहे (आणि कुठल्यातरी पदावर काम करायचं आहे) असे लोकं आप कडे जातात, हे एकवेळ समजण्यासारखं आहे, पण ज्यांना केवळ आप आवडतो, म्हणुन या पक्षाचा कार्यकर्ता होण्यात काय इंटरेस्ट असेल?
आप एक राजकीय पक्ष असला तरी जिथे आप सत्तेत नाही तिथे केवळ आंदोलनं, यावरच आप चा भर आहे का/ राहिल का? आप च्या स्वराज्य पुस्तकात बरेचशी उदाहरणे आहेत, जी स्थानिक लोकांनी {ज्यात आपचा सहभाग नव्हता}, छोट्या गावात केलेल्या प्रगतीविषयी आहे. तसं काही आपच्या माध्यमातुन महाराष्ट्रात {राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं} एक वेगळं उदाहरण आहे का? किंवा तसा प्रयत्न कोणी करतय का? की केवळ RTI च्या माध्यमातुन भ्रष्टाचार उकरुन काढणे, इतक्याच एक उदिष्टांत आप गुंतली आहे?
खरं तर प्रत्येक राजकीय आणि सामाजिक संघटनेची पुस्तके, वेबसाईट्स चांगल्याच असतात. विचार चांगलेच असतात, पण लोकं कोणत्या पक्षाकडे/ सामाजिक संघटनेकडे आकर्षित होतात, त्याची वेगवेगळी कारणे असु शकतात. राम-मंदीर मोहिमेच्या वेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या संखेत वाढ झाली (असावी), तस काहीसं आप च्या बाबतीत होतय का? यापुर्वी असे अनेक पक्ष स्थापन झाले, त्यांची आजची परिस्थिती केवळ कार्यालय, इतकीच बाकी आहे.
अर्थातच कोणत्याही चळवळीला हिणवणे, हा माझा उद्देश नाही, पण चळवळ सुरु करणे आणि सातत्याने पुढे चालू ठेवणे यातला फरक लक्षात घेउन आप काम करत आहे का?
उदाहरणादाखल द्यायचे झाले, तर आजपर्यंतची पिढी ५ वर्षातुन एकदा मतदान करणे आणि क्वचित प्रसंगी सही मोहिमेत भाग घेणे यापलिकडे जाऊन कधी प्रत्यक्ष लोकशाहीत सहभागी झाली नाही. आज अनेक तरूणांना ही संधी वाटू शकते, पण काही काळानंतर पुन्हा एकदा केवळ पॅसिव्ह (मराठी?) सहभाग असं होईल का?
मी स्वतः कोणत्याही संघटनेचा सदस्य न होता, शक्य तितकं काम करण्याचा प्रयत्न केलाय, पण एक विशिष्ट साच्यात लोकांना बसवणे, आणि एका व्यवस्थापकीय उतरंडीला (managerial hirarchy) सर्व हक्क देउन ते म्हणतील तसं काही करणं, यामुळे प्रत्येक ठिकाणी निराशाच झाली. आपल्या मताला काही किंमतच नाही, असं प्रत्येक जागी वाटत गेलं. कदाचित ती माझ्या समजण्यातली चुक असेल किंवा अनुभवाची कमतरता, पण त्या आणि इतर अनेक संघटना अजुनही एका परिघाच्या बाहेर (जसं गाव, तालुका किंवा फार फार तर जिल्हा) वाढू शकल्या नाही.
नेमकं आप कडुन लोकांना काय अपेक्षित असावं/ आहे, याचा मी वेध घेण्याच्या प्रयत्न करणार आहे {वागळे स्टाईल Happy }
तुम्हाला काय वाटतं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएण्ड पुन्हा एकदा +१.
भाजपाला वाटले काँग्रेसने पाठींबा दिला तरी आप घेणार नाही. तिथे गणित चुकलं. बेदींच्या माध्यमातुन पाठींबा द्यायचही ठरवलं होतं, पण तीही खेळी फुकट गेली. 'जोडतोड की राजनीती नही करेंगे' असा हास्यास्पद पवित्रा घेउन अडकले. आप प्रचारात 'काँग्रेसने समर्थन दिले, पण आम्ही समर्थन मागीतले नव्हते' हाच सूर आळवणार हे नक्की. नाहीतर राहुल च्या विरोधात अमेठीतुन लढण्यासाठी कुमार विश्वास आतापासुन तयारीला लागले असते का?
जर भाजपाचा पाठींबा घेउन आपने सरकार बनवले असते, तर हे संघाचे पिल्लू म्हटले असते, यात काही शंकाच नाही.
खैर, केजरीवाल आणि कंपनी धुतल्या तांदळाची नसेल, नाहीतर आतापर्यंत जिवंतही ठेवले नसते कदाचित. पण काँग्रेसवर निशाना साधत भाजपा/संघाचे समर्थन आधी मिळवले, आणि नंतर भाजपावरही टिका केली, यात काँग्रेस भाजपाचा एकतर मुर्खपणा आहे किंवा आपचा धुर्तपणा. तसा असेल तर आप राजकारणी आहेत, हे बरेच आहे.
बाकी २० कोटींच्या निधीवरुन इतकं वादळ, अन १००० पैकी ९०० कोटी भाजपाचे आणि २००० पैकी १९०० कोटी काँग्रेसचे कुठुन आले, ते यांनाच पत्ता नाही. मजेदार आहे Happy

भाजपाने दिल्लीत काँग्रेसविरोधी मतदारांना गृहीत धरले होते, पण ते आप कडे गेले. तसच काहीसं महाराष्ट्रात आणि इतरत्र होवू शकेल. आप निवडुन येईल असं नाही, पण भाजपाला निवडुन येतांना दम लागू शकतो. आणि आघाडी सरकारात मोदी कितपत चांगलं काम करु शकतील ते सांगणे कठीण आहे.

फारएण्ड,

>> हे तर काँग्रेस, भाजप - कोणाबद्दलही म्हणता येइल.

म्हणूनच भारतातील एका मोठ्या वर्गाचा पंप्रसाठी मोदींना पाठींबा आहे. कोण्या राजकीय पक्षाला नाही. नेमकी हीच मते फोडून इतरत्र वळवण्यासाठी खेचरीवाल यांना पुढे आणले गेले आहे. त्यांनी दिल्लीचं सरकार चालवण्यासाठी काँग्रेसचा पाठींबा घेतलाय का भाजपचा याच्याशी सामान्य माणसाला देणंघेणं नाही. सरकार धडपणे चालवा म्हणजे झालं.

अण्णा हजार्‍यांच्या नावे काढलेल्या लघुसंदेशपत्राच्या (एसेमेस कार्ड) विक्रीतून मिळालेल्या १०० कोटी रुपयांचे खेचरीवाल यांनी काय केले?

आ.न.,
-गा.पै.

म्हणूनच भारतातील एका मोठ्या वर्गाचा पंप्रसाठी मोदींना पाठींबा आहे. कोण्या राजकीय पक्षाला नाही.

तो तसा असला (!) तरीही निरर्थक आहे. आदरणीय दिग्विजय सिंग जी म्हणतात त्याप्रमाणे भारतात संसदीय लोकशाही आहे आणी पंप्र खासदार निवडतात. मोदी पंप्र झाले तर ते भाजपचे मंत्रीमंडळ असेल. मोदींना आपले मंत्री भाजपतूनच निवडावे लागतील. ते सरकार शेवटी भाजप सरकार असेल. येडुईरप्पांना आडवाणींच्या कठोर भुमीकेमुळे जावे लागले होते. आता ते मोदिंचे फ्लेक्स लावून परत आले आहेत. विश्वामित्राने कुत्र्याची तंगडी खाल्ली होती हे उदाहरण द्यालच तुम्ही.

त्या एस एम एस कार्ड मधून शंभर कोटींपेक्षा बरीच कमी रक्कम मिळालेली आहे.

भाजप आणी कॉंग्रेस पक्षानी आप वर इतर मुद्यावर (अननुभव, राष्ट्रीय प्रश्नावर भूमीका नसणे ई ) जरूर टीका करावी. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मात्र नको. काचेच्या घरात रहाणार्‍यांनी आंघोळ करू नये ही जुनी म्हण आठवली.

आदरणीय दिग्विजय सिंग जी म्हणतात त्याप्रमाणे भारतात संसदीय लोकशाही आहे आणी पंप्र खासदार निवडतात. >>> बरोबर आहे पण हे फक्त भाजप आणि इतर पक्षांना लागु पडेल , काँग्रेसमध्ये तर सोनियाजीच ठरवतात पंतप्रधान कोण आणि राष्ट्रपती कोण ? उद्या सोनियांजींनी गाढवाला पंतप्रधान बनवलं तरी काँग्रेसी त्यालाही डोक्यावर घेतील, कारण लाचारी नसानसांत भिनली आहे.

भाजपाचा नेता संघ ठरवतो.......उद्या संघाने सुध्दा गाढवाला पंतप्रधान बनवले तर भाजपाई त्याला सुध्दा डोक्यावर घेतील जसा आता घेत आहेत......कारण बिनडोक आणि लाचारी नसानसात भिनली आहे येडपटांच्या ..

अण्णा हजार्‍यांच्या नावे काढलेल्या लघुसंदेशपत्राच्या (एसेमेस कार्ड) विक्रीतून मिळालेल्या १०० कोटी रुपयांचे खेचरीवाल यांनी काय केले? >>> गापै ह्या विधानाची सत्यता देऊ शकाल का ?

AAP has nothing to do with Anna cards. It says the cards had been issued in Februrary 2012 during the Jan Lokpal movement,after Hazare’s permission. Kejriwal’s letter reads,“The funds collected by selling the cards has been mentioned clearly in the audit reports of Public Cause Research Foundation. Long before the party was formed,the sale of Anna cards had been stopped. We had refunded the money to those who had unused cards.” >>> गापै हे पण तिथेच लिहिलेलं आहे म्हणजे तो फंड Public Cause Research Foundation ला गेलेला आहे आपला नाही.

खेचून ताणून पैलवानोत्पत्ती. आप्लं, व्युत्पत्ती.

गापै,
अहो शिवी द्यायची, तर नुसती भेट दिल्यासारखी द्यायची नसते.
शिवी, हासडायची असते.
ती देखिल, अशी, की समोरच्याला ४ दिवस झोप लागली नै पाहिजे.
तुम्ही उगच 'खेचरीवाल' तर म्हणायचं, मग 'मते खेचतो तो खेचरी' अशी मल्लीनाथी करायची, असले 'अहो, हाडा बरे' स्टाईलने का बोलताहात?

गामा पैलवान
हा वीडियो बघा ..आणि आप कॉंग्रेस चे पिल्लू आहे का ते सांगा..आणि कृपया ह्या धाग्यावर वर तरी आप कॉंग्रेस चे पिल्लू आहे असे बोलू नका..
http://www.youtube.com/watch?v=s6Kp6g9Ksug

आणि हा अजुन एक वीडियो..आप कडे धाव कशा साठी...ह्यातले त्यानी सर्व पूर्ण नाही केले तरी चालेल पण प्रामाणिक प्रयत्न केला तरी पुष्कळ आहे..
http://www.youtube.com/watch?v=8ONzVAaVYsI

श्री,

Public Cause Research Foundation चे एक प्रणेते केजरीवाल आहेत. तुम्ही दिलेली माहीती Public Cause Research Foundation संकेतस्थळी सापडायला हवी. निदान अण्णांना काही आक्षेप नाही इतकं तरी सांगितलं असतं तरी चाललं असतं.

पैसा गोळा करण्यात काही गैर नाही. पण संशयाला वाव राहू नये अशी अपेक्षा आहे.

आ.न.,
-गा.पै.

हळूहळू गापैंचे मत परिवर्तन होत आहे.

१ अण्णा हजार्‍यांच्या नावे काढलेल्या लघुसंदेशपत्राच्या (एसेमेस कार्ड) विक्रीतून मिळालेल्या १०० कोटी रुपयांचे खेचरीवाल यांनी काय केले?

२ १०० कोटी रुपये (अंदाजे) नक्की कोणाला मिळाले हा प्रश्न आहे ( अंदाजे हा नवा शब्द ! )

३ पैसा गोळा करण्यात काही गैर नाही. पण संशयाला वाव राहू नये अशी अपेक्षा आहे.

शंभर कोटी खाल्ले! या सनसनाटी बातमीचा डोंगर पोखरून उंदीर काय निघाला तर वेबसाईटवर द्यायला हवं होतं. आप कडून इतक्या काटेकोर हिशेबाची अपेक्षा करणारे येडियुरप्पांबाबत मात्र मौन बाळगतात.

केजरीवालांच्या स्टींगच्या घोषणेने, 'खुफिया कैमैरे' तेजीत. Happy कोणाचं नशीब कसं बदलेल काही सांगता येत नाही. यावरुन कळतं की लोकं भ्रष्टाचाराला किती कंटाळले आहेत.
http://khabar.ibnlive.in.com/news/114658/12/4?google_editors_picks=true

vijaykulkarni,

>> शंभर कोटी खाल्ले! या सनसनाटी बातमीचा डोंगर पोखरून उंदीर काय निघाला तर वेबसाईटवर द्यायला
>> हवं होतं.

पैसे गोळा केले तर हिशोब द्यायला काय हरकत आहे?

आ.न.,
-गा.पै.

पैसे गोळा केले तर हिशोब द्यायला काय हरकत आहे? >>>>>>> हे कोण बोलत आहे.. ?? Uhoh

राम मंदिर च्या वेळेस गोळा केलेल्या पैश्यांचा हिशोब दिला आहे का ????? दुसर्यासाठी कसे बोलत आहात ?

काही दिवसांपुर्वी.. पाण्याची मिटर लावले गेले .. ते मीटर तेच होते जे जंतर मंतर वर केजरीवाले जगाला दाखवलेले..

आणि याबद्दल केजरीवाल ला विचारले तर म्हणतो " ये बात का पता ही नही.. ये तो मुझे अखबार से पता चला.. ये गलत है .. मे खुद मिटींग बुलाके इसे वापस लुंगा"

जलबोर्ड यांच्याकडे आहे.. वर हे मुख्यमंत्री आहे.........आता याला पेपरातुन कळत आहे की "बुडाखाली आग लागली आहे " Biggrin

कसल ध्यान आहे हे Happy

उदयन..... कदाचित सवय व्हायची वाट पहात असेल. बहुदा त्यांच्या जाहिरनाम्याने घोळ केलाय. कमीतकमी दिवसात निर्णय आणि अंमलबजावणी. माझ्या मते त्यांनी १ महिना मागायलाच हवा होता, सगळ्या गोष्टींसाठी.

सतत जनता, काँग्रेस, भाजपा, चॅनेलवाले, कोणाच्यातरी दबावाखाली असतो का हा माणुस. आणि बाकी यांचे आमदार काय कराताहेत देव जाणे. एक एक काम वाटुन का देत नाही हा ?

अरे .............इंजिनिअर आहे ......वर आयटी कमिशनर आहे..... मग दबावात काम करायची सवय आहेच ना..

असे कसे म्हणता राव... ? Uhoh

धन्यवाद विजय देशमुख ह्या पोस्टसाठी. आपण खरे कुठल्या बाजूने आहात हे खरच कळत नाही. आपण हे लिखाण खूप तटस्थपणे लिहिलंय.
मी आपचा कार्यकर्ता आहे, आणि हे सांगायला मला अभिमानच वाटतो.
आपल्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न आहे.(माझ्यापरीने)

पण ज्यांना केवळ आप आवडतो, म्हणुन या पक्षाचा कार्यकर्ता होण्यात काय इंटरेस्ट असेल?>> उद्याचा चांगला भारत/महाराष्ट्र घडवण्यासाठी. (केवळ हीच एक आशा आहे.)

तसं काही आपच्या माध्यमातुन महाराष्ट्रात {राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं} एक वेगळं उदाहरण आहे का? किंवा तसा प्रयत्न कोणी करतय का? >> हो, आम्ही करतोय परभणी जिल्ह्यात बोरवंड नावाचं एक गाव आहे तिथे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यात आतापर्यंत तरी यश मिळालं आहे.(साधारण ३ महिन्यापूर्वी सुरुवात केली होती.), आणि त्या गावाचे बघून आजूबाजूचे गाव देखील आमच्या पण गावात मार्गदर्शन करायला या असं म्हणतायत.

इतर पक्षातले {नाराज, किंवा तिकिट मिळणारच नाही, असं गृहित धरलेले किंवा संधीच मिळत नाही म्हणणारे} राजकीय नेतेही आप कडे वाट करु लागले आहेत.>> खरं आहे. पण त्यांच्यातले निवूडून चांगले घेण्याची एक प्रोसेस आहे. जस कि आपची तिकीट देण्याची प्रोसेस.(ह्याच्यावर बरंच लिहिता येईल, पण थोडक्यात एवढंच म्हणेन.)

आणि यामध्ये मीतरी एक गोष्ट नमूद केलीकि आप मुळे बरेच सामाजिक कार्यकर्ते, चांगले चरित्र्याचे लोक, काही RTI activist यां सगळ्या वेगवेगळ्या स्थरावर काम करणाऱ्या लोकांचं संघठण होतंय आणि हि चांगलीच गोष्ट आहे, नाही का?

>>आणि यामध्ये मीतरी एक गोष्ट नमूद केलीकि आप मुळे बरेच सामाजिक कार्यकर्ते, चांगले चरित्र्याचे लोक, काही RTI activist यां सगळ्या वेगवेगळ्या स्थरावर काम करणाऱ्या लोकांचं संघठण होतंय आणि हि चांगलीच गोष्ट आहे, नाही का?

>>जस कि आपची तिकीट देण्याची प्रोसेस.(ह्याच्यावर बरंच लिहिता येईल

अहो लिहा की मग, मी तेवढ्यासाठी दिल्लीतल्या ऑफिसला फोन पण केला होता.

विशाल, सर्वप्रथम अभिनंदन. तुम्ही खरच चांगलं काम करत आहात. त्याविषयी अधिक जाणुन घ्यायला आवडेल.

मी आपचा कार्यकर्ता नाही, पण काही अंशी समर्थक आहे. आता तुमची पोस्ट वाचुन खरच मनापासुन आनंद झाला.
वैयक्तिकदॄष्ट्या मला कोणत्या संघटनेशी नातं जोडायचं असेल, तर मी आधी मी आधी त्या संघटनेत काम करतो, पण कार्यकर्ता म्हणुन नव्हे. जर पटलं तरच नातं जोडतो.
बर्‍याच संघटनात, आपण नेमकं काय करतोय, ते कार्यकर्त्यांना माहिती नसते, किंवा का करायचं हेच ठाउक नसते. वरुन आदेश आला की करायचं, अश्या संघटना काही काळाने कल्ट्च होतात. त्यामानाने 'आप'च्या स्वराज्य पुस्तकात मांडलेली कल्पना चांगली वाटली. पण केवळ राजकीय पक्ष म्हणुनच आप सिमित राहू नये म्हणुन मी आपच्या सामाजिक कार्याबद्दल विचारलं होतं.

तसं काही आपच्या माध्यमातुन महाराष्ट्रात {राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं} एक वेगळं उदाहरण आहे का? किंवा तसा प्रयत्न कोणी करतय का? >> हो, आम्ही करतोय परभणी जिल्ह्यात बोरवंड नावाचं एक गाव आहे तिथे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यात आतापर्यंत तरी यश मिळालं आहे.(साधारण ३ महिन्यापूर्वी सुरुवात केली होती.), आणि त्या गावाचे बघून आजूबाजूचे गाव देखील आमच्या पण गावात मार्गदर्शन करायला या असं म्हणतायत.

नेमकं काय करत आहात, हे जाणुन घ्यायला आवडेल. फेसबुक्/युट्युबवर लिंक असेल तर उत्तम.
इथे एक गोष्ट खास करुन नमुद करु इच्छितो, चांगलं काम सतत वाढवत न्या, उगाच एकाच जागी (स्वतः) टिकुन राहणे, हे किमान आजतरी देशाला परवडण्यासारखं नाही. बहुदा कुठेरती वाचलं होतं, की पोपटराव पवार किंवा डॉ. आमटे, इत्यादी लोकं एकाच जागी का अडकुन बसतात, त्याचं विश्लेषण करुन कामांचा गुणाकार व्हावा हीच सदिच्छा.

तुम्हाला तुमच्या कामात आमची (मायबोलीकरांची) मदत हवी असेल तर नक्की लिहा. शक्य ती मदत करुच.

शुभेच्छा..

कायदे मंत्र्यांचं, कायद्याचे रखवालदार ऐकत नाही, बाकी लोकांचं काय ऐकणार?
http://www.amarujala.com/feature/samachar/national/aap-ministers-on-late...
तर ४०,००० कॉलपैकी केवळ २ भ्रष्टाचारी बाबू पकडले. Sad

कमीतकमी वेळात जास्तीत जास्त (ऑन कॅमेरा) काम करुन ६ महिन्यात होणार्‍या निवडणुकांत निवडुन येणे, हा उद्देश समोर असेल, तर कठीण आहे.
अगदी २-४ च कामं केलि तरी चालतील, पण योग्य पद्दतीने, प्रशासनाचा योग्य वापर करुन करणे अधिक बरे ..... ५०-६० वर्ष मुरलेली सवय तोडणे इतकही सोपं नसावं.

धन्यवाद विजय,
आप ने अगदी सुरवातीलाच प्रत्येक जिल्ह्यात एक गाव निवडून त्याला मॉडेल व्हीलेज करायचं अशी एक कल्पना मांडली होती आणि त्यावर यशस्वीरित्या कामहि सुरु केलं गेलं (काही भागांमध्ये) . त्याचं दरम्यान साधारण आम्हाला ह्या(वरील) गावातून काही तरुणांन्नी अप्प्रोच केलं आणि आम्ही त्या गावात काम सुरु केलं.
गावातल्या इच्छुक हौशी तरुणांची एक मीटिंग घेऊन, त्यांच्या समस्या विचारात घेऊन त्यांना ह्या सगळ्यांवर काय उपाय करता येतील ह्या सर्व गोष्टींची माहिती दिली. (काम सुरु करण्यापूर्वी आम्ही हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी मधून माहिती गोळा केली होती)
त्यांच्या बहुतेक समस्या ह्या सगळ्या गावांसारख्याच होत्या. जसं कि अस्वच्छता, हागणदारी चा प्रॉब्लेम, गावातले तंटे वगैरे.
त्या गावात आज पर्यंत एकही ग्रामसभा झाली नव्हती. त्यांना ग्रामसभेच महत्व पटवून देणं, गावकऱ्यांचा सहभाग कसा वाढेल याची उपाययोजना करणं हे सगळं करावं लागलं. मीटिंग च्या दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांनी कामाला सुरुवात केली आणि ५, ६ दिवसामध्ये एक १०० जनांनी मिळून(त्यात आमची टीमही होती) २०, २१ ट्रक्टर कचरा पूर्ण गावातून बाहेर काढला. (ह्यात नाल्या साफसफाई सुद्धा होती).
ह्यानंतर गावकरी सार्वजनिक ठिकाणी कचरा करत नाहीयेत असं दिसून आलंय. ज्यांच्या नाल्यांच पाणी रस्त्यावर वगैरे यायचं त्यांनी त्याचा बंदोबस्त केला. असं सगळं positive घडतंय.

पुढे जाऊन आम्ही गावकर्यांची एक सहल हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी ला आणायची असं ठरवलं. तर तब्बल ६ गाड्या(cruiser) करून जवळ पास ८० जन आले होते.(मला स्वतः ला फक्त ८,१० लोकांची आशा होती. Happy ). सहलीमुळे त्यांच्यातला उत्साह आणि इर्षा अजूनच वाढली हे सांगणे न लगे.
सध्या दोन कामे चालू आहेत एक तर गावातल्या आरोग्य केंद्राचं सुशोभीकरण करायचं आहे आणि पूर्ण गावामध्ये (लोक्संख्या साधारण ३०००) कचरा कुंड्या बसवण्याचा गावकऱ्यांचा विचार आहे (आणि विशेष म्हणजे गावकरी आमच्या कडून पैश्यांची मदत घ्यायला नाही म्हणतात, ते म्हणतात तुम्हाला किती त्रास द्यायचा) आणि तो लवकरच पूर्ण करू अशी खात्री हि आहे.
आणि ह्या गावाचं बघून त्याच्या जवळच्याच एका गावाने पण आम्हाला आप्रोच केलं आहे.(दोन तीन दिवसापूर्वीच) बघूया तिथे काय होतंय?
आणि माझ्या माहिती नुसार असच काहींसं काम जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातहि चालू आहे.(गावांची नाव आठवत नाहीत आत्ता).

तुमच्या मदतीबद्दल मनापासून धन्यवाद, मी मला ह्या कामात काहीही मदत लागली कि जरूर तुम्हाला हाक मारेन.

बहुदा कुठेरती वाचलं होतं, की पोपटराव पवार किंवा डॉ. आमटे, इत्यादी लोकं एकाच जागी का अडकुन बसतात>> बाकी तुमचं हे खरंच आहे. तरीही एक गोष्ट, पोपटराव पवार सध्या महाराष्ट्र सरकारच्या समृद्ध ग्राम योजनेत कार्याध्यक्ष(का काहीतरी) आहेत. ज्यात सरकार १०० गाव निवडून त्यांचा विकास करणार अशी ती योजना आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल म्हणून सांगितलं. (असल्यास हलकं घ्या).

आणि सर्वात महत्वाची गोष्ट, संदीप वासलेकर(जे कि बऱ्याच देशांचे सल्लागार आहेत (भारत सोडून) ) यांनी त्यांच्या "एका दिशेचा शोध" ह्या पुस्तकात उद्याचा विकसित भारत घडवण्यासाठी गरजेच्या गोष्टी किंवा काही वर्ष्यापुर्वी जे मागास राष्ट्र होती त्यांनी काय केलं हे सांगितलं आहे. त्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला स्वराज्य ह्या पुस्तकात दिसतील. वाचलेले नसल्यास जरूर, अवश्य, वाचा( must read).

Pages