'आप'कडे धाव कशासाठी?

Submitted by विजय देशमुख on 9 January, 2014 - 21:22

वर्षाच्या सुरुवातीला 'आप' पक्षाने पुन्हा एकदा आपचे कार्यकर्ता व्हा म्हणत नोंदणी सुरु केली आहे. या नोंदणीला आता केवळ दिल्लीतच नव्हे तर इतरत्रही चांगला प्रतिसाद मिळतोय. मोठमोठ्या पदावरुन राजीनामा देऊन काही लोकं आप पक्षात प्रवेश करत आहेत. इतर पक्षातले {नाराज, किंवा तिकिट मिळणारच नाही, असं गृहित धरलेले किंवा संधीच मिळत नाही म्हणणारे} राजकीय नेतेही आप कडे वाट करु लागले आहेत.
नेमकं काय होतय? ज्या लोकांना राजकीय क्षेत्रात जायचं आहे (आणि कुठल्यातरी पदावर काम करायचं आहे) असे लोकं आप कडे जातात, हे एकवेळ समजण्यासारखं आहे, पण ज्यांना केवळ आप आवडतो, म्हणुन या पक्षाचा कार्यकर्ता होण्यात काय इंटरेस्ट असेल?
आप एक राजकीय पक्ष असला तरी जिथे आप सत्तेत नाही तिथे केवळ आंदोलनं, यावरच आप चा भर आहे का/ राहिल का? आप च्या स्वराज्य पुस्तकात बरेचशी उदाहरणे आहेत, जी स्थानिक लोकांनी {ज्यात आपचा सहभाग नव्हता}, छोट्या गावात केलेल्या प्रगतीविषयी आहे. तसं काही आपच्या माध्यमातुन महाराष्ट्रात {राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं} एक वेगळं उदाहरण आहे का? किंवा तसा प्रयत्न कोणी करतय का? की केवळ RTI च्या माध्यमातुन भ्रष्टाचार उकरुन काढणे, इतक्याच एक उदिष्टांत आप गुंतली आहे?
खरं तर प्रत्येक राजकीय आणि सामाजिक संघटनेची पुस्तके, वेबसाईट्स चांगल्याच असतात. विचार चांगलेच असतात, पण लोकं कोणत्या पक्षाकडे/ सामाजिक संघटनेकडे आकर्षित होतात, त्याची वेगवेगळी कारणे असु शकतात. राम-मंदीर मोहिमेच्या वेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या संखेत वाढ झाली (असावी), तस काहीसं आप च्या बाबतीत होतय का? यापुर्वी असे अनेक पक्ष स्थापन झाले, त्यांची आजची परिस्थिती केवळ कार्यालय, इतकीच बाकी आहे.
अर्थातच कोणत्याही चळवळीला हिणवणे, हा माझा उद्देश नाही, पण चळवळ सुरु करणे आणि सातत्याने पुढे चालू ठेवणे यातला फरक लक्षात घेउन आप काम करत आहे का?
उदाहरणादाखल द्यायचे झाले, तर आजपर्यंतची पिढी ५ वर्षातुन एकदा मतदान करणे आणि क्वचित प्रसंगी सही मोहिमेत भाग घेणे यापलिकडे जाऊन कधी प्रत्यक्ष लोकशाहीत सहभागी झाली नाही. आज अनेक तरूणांना ही संधी वाटू शकते, पण काही काळानंतर पुन्हा एकदा केवळ पॅसिव्ह (मराठी?) सहभाग असं होईल का?
मी स्वतः कोणत्याही संघटनेचा सदस्य न होता, शक्य तितकं काम करण्याचा प्रयत्न केलाय, पण एक विशिष्ट साच्यात लोकांना बसवणे, आणि एका व्यवस्थापकीय उतरंडीला (managerial hirarchy) सर्व हक्क देउन ते म्हणतील तसं काही करणं, यामुळे प्रत्येक ठिकाणी निराशाच झाली. आपल्या मताला काही किंमतच नाही, असं प्रत्येक जागी वाटत गेलं. कदाचित ती माझ्या समजण्यातली चुक असेल किंवा अनुभवाची कमतरता, पण त्या आणि इतर अनेक संघटना अजुनही एका परिघाच्या बाहेर (जसं गाव, तालुका किंवा फार फार तर जिल्हा) वाढू शकल्या नाही.
नेमकं आप कडुन लोकांना काय अपेक्षित असावं/ आहे, याचा मी वेध घेण्याच्या प्रयत्न करणार आहे {वागळे स्टाईल Happy }
तुम्हाला काय वाटतं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंगळुरात आपचा बराच जोर आहे असे दिसते. जनलोकपालला तिथे मोठा पाठिंबा होताच. बंगळुरातले मायबोलीकर याचा चाचपणी करून लिहू शकतील.

अगदी थोडक्यात सांगायचे, तर "वाहत्या गन्गेत हात धुवून घेणे" किन्वा "वारा येईल तशी पाठ फिरवणे" किन्वा "जिकडे सरशी तिकडे पार्शी" असा काहीसा स्थायीभाव असतो. त्याप्रमाणेच घडते आहे. Happy

रष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाल्यास पुढे 'आप'ही इतर पक्षांसारखाच होईल की नाही यापेक्षां 'आप'ने प्रामाणिकपणा व पारदर्शकता याना दिलेल्या अग्रक्रमाला मिळालेला जनतेचा प्रचंड कौल [अर्थात, तो दिल्लीपुरता दृश्य असला तरीही] इतर पक्षांवर व राजकारणावर किती हितकारक परिणाम घडवतो, हें पहाणं अधिक महत्वाचं असावं.

दिल्ली युनिव्हसिटीच्या १२ कॉलेजात जिथे सर्व प्रदेशातील विद्यार्थी शिक्षण घेतात. तिथे ९०% आरक्षण फक्त दिल्लीवासीना मिळावे. असं इतर पक्षांप्रमाणे "आप" लाही वाटते. किंबहुणा ते लवकरच हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

http://www.financialexpress.com/news/90-quota-for-delhi-students-not-on-...

http://www.firstpost.com/india/why-sisodias-delhi-for-delhiites-plan-is-...

हे तर प्रांतीय धोरण झालं. दिल्लीतील लोकप्रियता (पक्षाची) आणखी वाढेल. लोकसभा निवडणुकांच काय?

काहीसा स्थायीभाव असतो. >> विधानसभेला आपटल्यावर येड्डीला कशी उपरती झाली आणि भाजपानेदेखिल त्याला आपलेसे करुन घेतले तसेच !! Wink

प्रत्येक प्रांतासाठी हेच धोरण राबवु शकतात की ते.>>>>>.
दिल्लीत आजुबाजुच्या प्रांतातून जसे लखनऊ वै. तून लोकं येतात. सध्या त्यांना दिल्लीच्या बजेट, जे कि भलं मोठ्ठ आहे त्यात अजून अतिरिक्त कॉलेज बांधणं शक्य नाही तर इतर प्रांतात ..... हेच धोरण कसे राबवणार ?

भाऊ +१
कदाचित हाच पारदर्शीपणा RTI सारखा त्यांच्याच गळ्यात अडकेल, या भितीने का होईना, पक्ष पारदर्शी राहिला, तर उत्तमच. Happy

आताशा लखनऊ आणि पुर्व-उत्तर प्रदेशात अनेक कॉलेजेस उघडत आहे, त्यामुळे सध्या जी गर्दी दिल्ली (बहुदा नोईडाबद्दल लिहिलं असावं), ती कमी होईल. जशी काही वर्षांपुर्वी युपी-बिहारचे तरूण महाराष्ट्रात इंजिनिअरिंग आणि बीपीएड साठी यायचे तसच.

आपने दिल्लीत असे केले तर चालते आणि इतर राज्यांमधे जर कोणी असे केले तर त्याला लगेच प्रांतियतेचा आरोप करणार, वा रे लोकशाही !

दुर्दैवाने "आप" चा हेतु चांगला असला तरी त्याचा फटका "काँग्रेस" पेक्षा जास्त "भाजप" ला बसणार आहे.

काँग्रेसला न मिळणारी मते भाजप आणि "आप" मधे विभागुन जाणार आहेत. मला वाटते लोकांना कदाचित "दिल्ली" मॉडेल हे "केंद्रातही" येइल म्हणजे.."आप" लोकसभेत बहुमत नाही तरी जरी ५०-६० जागा जिंकले तरी "अल्पसंख्य" सरकार स्थापु शकेल असे सगळ्याना वाटत असावे आणि त्यामुळे या "संधी"चा फायदा घ्यायला ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे असे लोक पुढे सरसावले आहेत.

काही हरकत नाही..जर चांगला कारभार करणार असतील तर कोणाचेही स्वागतच आहे.

आप चा फटका भाजपला बसणार म्हणून ते दुर्दैवी हे महान लॉजिक आहे. आप ने एक पर्यायी राजकारणाचे मॉडेल दिले आहे, लोक त्याला साथ देण्याच्या मूडमध्ये आहेत. त्याचा फटका माझ्या लाडक्याला बसतो म्हणून आपचा हेतू शंकास्पद इ इ. हे जे रडगाणे भगवे गात आहेत तो दुटप्पीपणाचा अस्सल नमुना आहे. (अर्थात हे त्यांचे नेहमीचेच आहे- इतर जिंकले की उद्योगपतींच्या पैशाचा वापर; आम्ही करतो ते कॉर्पोरटायझेशन!)
आपने मोदीमज्जेत 'रंग में भंग' केल्याने सगळा पोटशूळ उठला आहे

दुर्दैवाने "आप" चा हेतु चांगला असला तरी त्याचा फटका "काँग्रेस" पेक्षा जास्त "भाजप" ला बसणार आहे. काँग्रेसला न मिळणारी मते भाजप आणि "आप" मधे विभागुन जाणार आहेत. >>>>>>>>>

दिल्लिवरुन विश्लेषण केलं तर फटका काँग्रेसला बसला ना? की भाजपाला ४ जागा कमी पडल्या, हा फटका म्हणताय?
महेश +१ => पण मुद्दा तोच असला तरी डोकेफोडी नाही हे महत्त्वाचे. असो, परदेशात राहुन स्थानिकांना डावलावे की नाही याबद्दल बोलणे म्हणजे मार खाणे, तेन्व्हा नकोच. Happy
असो सेनेने किंवा मनसेने भरिव कामे केली असती तर आप चा महाराष्ट्रात प्रवेशही झाला नसता. काल (परवा?) मुंबई विद्यापीठाचं प्रकरण आप ने उचलुन धरलं, अन हे अजुन ब्लु-प्रिंट देतच आहे. लोकांना किमान काही गोष्टींत त्वरित रिझल्ट हवे असतात, तेही सुरुवातीला. ते केजरीवालांनी काही प्रमाणात केलं, तरी अजुन बरेच कामं बाकी आहेत, तरी. त्या मानाने सेना-मनसेला बरच काही करता आलं असतं.
नाशिककर आहेत ना, प्रत्यक्ष अनुभ्व लिहितीलच. Happy

बाकी मिडिया फोकस मोदींवरुन आपवर गेल्याने अस्वस्थता असावी.
ताजी बातमी :- आयबीएन७ चे वृत्तनिवेदक आशुतोष आप मध्ये. Wink

>>बाकी मिडिया फोकस मोदींवरुन आपवर गेल्याने अस्वस्थता असावी.
असावी नाही आहेच. खरेतर आत्ता भाजपला सिद्ध करून देण्यासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण झालेली होती,
आपने मधेच येऊन कमी काळात कमी श्रमात फार मोठा राजकीय फायदा उपटला आहे.
आणि त्यामुळे भाजपची (आणि इतर सर्वच पक्षांची) अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे.

लोकांना एक पर्याय हवा आहे. लोक प्रस्थापित राजकीय पक्षांना पुरेसे कंटाळले आहेत; एक पोकळी आहे.
तो पर्याय "आप" आहे की नाही, "आप" ही पोकळी भरुन काढेल की त्या व्यवस्थेचाच एक भाग होऊन जाईल - हे लवकरच कळेल.

तिथे ९०% आरक्षण फक्त दिल्लीवासीना मिळावे. असं इतर पक्षांप्रमाणे "आप" लाही वाटते.
नुसते वाटतेच आहे ना? अजून कायदा तर केला नाही ना? जर विद्यापीठातल्या लोकांना हा मुद्दा पटला तर आपसूकच तसे करतील, कायदा कशाला?

आतिवास,

>> "आप" ही पोकळी भरुन काढेल की त्या व्यवस्थेचाच एक भाग होऊन जाईल - हे लवकरच कळेल.

आआप हे अमेरिकेच्या तालावर नाचणारे काँग्रेसचे पिल्लू आहे. पप्पूला शिकवणी देणारा योगेंद्र यादव हा इसम आआपच्या कार्यकारी समितीवर कशास बसला आहे? प्रशांत भूषणची काश्मीरविषयी मुक्ताफळे सर्वांनी ऐकली आहेत.

मोदी यांना मिळणारी मते फिरवणे इतकेच आआपचे या घडीला उद्दिष्ट आहे. अधिक माहितीकरता चलच्चित्र : http://www.youtube.com/watch?v=J5vH5VZX6XI

आ.न.,
-गा.पै.

आआप हे अमेरिकेच्या तालावर नाचणारे
काँग्रेसचे पिल्लू आहे.>>>>>> हे नवीन आहे
म्हणजे कांग्रेसचे पिल्लू वगैरे ऐकले वाचले आहे
पण अमेरिकेच्या तालावर ???

गा पै ही माहिती कुठून मिळाली ???

आआप हे अमेरिकेच्या तालावर नाचणारे काँग्रेसचे पिल्लू आहे. >>> Rofl गापै तुम्ही बहुतेक विनोद बीबीवरचा विनोद चुकुन इकडे टाकलात.

जाई, श्री - हे वाचा म्हणजे कळेल गापै असे का म्हणत आहेत. खरे की खोटे हा भाग वेगळा. पण निदान असे असू शकते का पहा विचार करून.

http://www.aadhiabadi.com/society/politics/867-who-is-arvind-kejriwal-in...

जाई.,

>> गा पै ही माहिती कुठून मिळाली ???

"aap party" आणि "ford foundation" ह्या दोन गोष्टी एकत्र टाकून गूगल शोध घ्या.

आ.न.,
-गा.पै.

किती हा मुर्खपना , तुम्ही हिरवे नायतर निळे असाल नाय? >>>> हे वाक्य माझ्यासाठी असेल, तर मी मल्टीकलर आहे Biggrin

consparacy theory बनवणे कठीण नाही. सध्यातरी लोकांना जे हवय ते आप करतय. एका स्टींग ऑपरेशन मध्ये एका भ्रष्टाचारी माणसाला पकडलय. असो.
लोकांना शिक्षित व जागरुक करणे हे काँग्रेसचे (भाजपाचेही) ध्येय नव्हते. किंबहुना असं होऊ नये म्हणुनच आतापर्यंत ते आटापीटा करत होते. आप ते करतेय हे उत्तम. जर पुढे जाउन आप ही तशीच वागायला लागली, तर आप ला पर्याय उभा व्हायला जास्त वेळ लागणार नाही, हे नक्की.

बाकी अमेरिकेच्या तालावर नाचणारे पिल्लू..... हा या शतकातला मोठा विनोद असावा, किमान भारतात तरी...
दिल्लीवासी माबोकर काय म्हणताय या मुद्द्यावर....?

तो बुद्धिभेद करण्याच्या प्रकारांतला आणखी एक प्रयोग आहे. हे (इथे कोणत्याही मायबोलीकराकडे अंगुलीनिर्देश केलेला नाही) लोक विनोद बिनोद कधी करत नाहीत.

https://www.facebook.com/photo.php?fbid=652553964788014&set=a.2424282124...

दिल्लीत तोंडचा घास पळवला या दणक्यातून अजून हे वर यायला तयारच नाहीत. आपच्या उदयाने काँग्रेसच्या राजकारणाला फक्त मोदीच पर्याय या लॉजिकमधली हवाच निघून गेली आहे.
मयेकर म्हणतात तसले बुद्धीभेद करण्यात हे महाबेरकी आहेत, आणि वर पुन्हा 'ही चाणक्यनिती आहे' वगैरे बाष्कळपणा असतोच.

भाजपच्या नेत्यांना आप चा राग येणे समजू शकतो. सर्वसामान्य माणसाला भ्रष्टाचार भाजपने बंद केला काय किंवा आप ने, काय फरक पडतो.

आप च्या फंडिंग बद्दल बरेच किस्से ऐकलेले आहेत. ते अगदी खरे मानले तरी जोपर्यंत ते चांगली कामे करत आहेत तोपर्यंत बेनेफिट ऑफ डाउट द्यायला काय हरकत आहे. आणि असे फंडिंग कोण का देत आहेत ते कोणी थोडक्यात सांगेल का? त्या आधी आबादी वरचे आर्टिकल वाचायला क्लिष्ट हिन्दी आहे. त्यात तेथे बाजूला "नयनाभिराम" मधल्या हीरॉइन्स, खालती ओशो व त्याखालती "फोरम" मधले अचाट प्रश्न याकडेच जास्त लक्ष जाते (गरजूंनी चेक करा) Happy

बाकी भाजपच्या मेहनतीचा यांना फुकटचा फायदा मिळतोय हे ही खरे नाही. फारतर अण्णा हजार्‍यांच्या मेहनतीचा मिळतोय असे म्हणता येइल. भाजपबद्दल पूर्वी सहानुभूती असलेल्या अनेक लोकांचे मत आता तितकेसे चांगले नाही. त्यांच्याही भ्रष्टाचाराच्या कथा आहेतच की.

Pages