जस्टप्रोमोडील्स.कॉम Justpromodeals.com वेबसाईटचे मायबोली वेबसमुहात हार्दिक स्वागत

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
1’

>जस्टप्रोमोडील्स.कॉम (www.justpromodeals.com) ही वेबसाईट नुकतीच मायबोली वेबसमुहात सामील झाली आहे. वेगवेगळ्या सेल बद्दल, मर्यादित कालावधीसाठी स्वस्तात मिळणार्‍या वस्तुंबद्दल, कुपन्स बद्दल माहिती देणारी ही वेबसाईट आहे. वेगवेगळ्या उत्पादकांचे सेल वर्गवारीनुसार पाहण्याची सोय, जरी रविवारचे वर्तमानपत्र घेत नसलात तरी उत्पादकांचे कुपन घरच्या घरी छापण्याचीही सोय इथे आहे.

Justpromodeals.com चा वाचकवर्ग मायबोलीच्या वाचकवर्गापेक्षा पूर्ण भिन्न आहे. किंवा त्यातल्या काहीनी मराठी/मायबोली हा शब्दही कधी ऐकला नसेल. ही वेबसाईट अमेरिकेच्या मुख्य प्रवाहातल्या वाचकवर्गासाठी( mainsteam US population) तयार केली गेली आहे. Coupons/Deals या अतिप्रचंड स्पर्धा असलेल्या उद्योगात (विशेषतः अमेरिकेत) शिरण्याचं शिवधनुष्य आपण उचलतो आहोत याची पूर्ण जाणीव ठेवून मायबोली हे धाडस करते आहे.

सध्यातरी या वेबसाईटवर मोठे बदल करण्याचा इरादा नाही. मायबोलीवरचं लॉगीन तिथे किंवा तिथलं इथे चालणार नाही. दोन्ही पूर्ण भिन्न राहतील. वाचकवर्ग भिन्न असेल. अनेक डील्स मायबोलीकरांना परके वाटतील. पण काही डील्स (Electronic, Grocery, Travel) फायद्याचे पण वाटतील.

पण या वेबसाईट मुळे, तिथे सध्या असलेल्या अनेक जाहिरातदार आणि उत्पादकांशी मायबोली वेबसमुहाचा परिचय व्हावा ( store-list) आणि भविष्यात मायबोलीकरांना विशेष डील मधून फायदा व्हावा आणि मायबोलीला आणखी जाहिरातदार मिळावेत या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. उदा. Justpromodeals.com असलेल्या लिंकवरून जाऊन मायबोलीकरांनी amazon.com वर काही विकत घेतलं तर त्या मायबोलीकरांना चांगली किंमतही मिळेल आणि मायबोलीला थोडे कमिशनही मिळेल. सध्या हे फक्त अमेरिकेतल्या रहिवाश्यांसाठी आहे. हे यशस्वी झालं आणि जाहिरातदारांची मागणी असेल तर इतर देशांसाठीसुधा ही सोय वाढवता येईल.

http://www.justpromodeals.com/ येलकम टू मायबोली !! जस्टप्रोमोडील्स.कॉम Maaybolivar swagat !!

प्रकार: 
शब्दखुणा: 

वा, मस्त.

Coupons/Deals या अतिप्रचंड स्पर्धा असलेल्या उद्योगात (विशेषतः अमेरिकेत) शिरण्याचं शिवधनुष्य आपण उचलतो आहोत याची पूर्ण जाणीव ठेवून मायबोली हे धाडस करते आहे.

मायबोलीला यात उदंड यश लाभो हीच मनोकामना. Happy

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!!!...लवकरात लवकर..इतर देशात पन याचा विस्तार व्हावा....

मस्त बातमी.. अभिनंदन आणि शुभेच्छा..

जस्टप्रोमोडील्सच्या प्रमोटर्सबद्दलपण थोडी माहिती देता येइल का इथे? (प्रमोटर मराठी तर नाहीत?)

मस्त. खुप शुभेच्छा. साईट चाळली. छान आहे. अमेझॉनवरुन माबो.करांना कसे कमी किंमतीत मिळेल हे कळले नाही. वेळ झाल्यास लिहाल.