सर्व पीठांचे शक्तीपीठ : बेसन पीठ ( बेसन पीठ फॅन क्लब)

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 4 January, 2014 - 01:04

सर्व पीठांचे शक्तीपीठ : बेसन पीठ ( बेसन पीठ फॅन क्लब)

सध्या एक भांडे, एक गॅस आणि एक पालाभाजी यावर दिवस सुरु आहेत. कंटाळा आला म्हणून अर्धा किलो बेसन पीठ आणलं आणि भाज्या त्याच अस्य्नही रोज नव्या नव्या वाटू लागल्या.

मग जाणवलं की बेसन पीठ हे स्वयपाकघरातील बहुगुणी पीठ आहे.

भजी, वडा असे स्वतंत्र पदार्थ बेसनची खासियत आहेच.

पालेभाज्या इतर भाज्या करता येतात.

पिठलं ते झुणका , गट्टे की सब्जी असे विविध प्रकार करता येतात.

लाडू, म्हैसूर पाक, वड्या ... अशा गोड पदार्थातही बेसनच.

नुसता कांदा जास्त तेलात परतून थोडे पीठ लावले तर मस्त पदार्थ तयार होतो. व्हेज आम्लेट करता येते.

हा धागा बेसन पिठाचे पदार्थ आवडणार्‍यांसाठी आहे.

नव्या जुन्या पाककृती थोडक्यात द्याव्यात. जुने धागे असतील तर लिंका द्याव्यात.

बेसन पीठ कुठून आणावे, कसे साठवावे .. अमेरिकेत कुठे मिळते, पिठात प्रोटीन किती, वात किती, पित्त किती .... कश्यकश्यालाही या धाग्यावर बंदी नाही.

besan_0.JPG

फोटो गुगल इमेजवरुन घेतले आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत तयार बेसन कुठल्या ब्रॅन्डचे घ्यावे? आत्तापर्यंत इंडियावारीतच बेसन आणत असे पुण्याहून पण आता संपलंय सो..

वेदिका दीप ब्रँड चांगला वाटतो. मी नेहेमी तेच वापरते.
हल्लीच इकडे संजीवन ऑर्गेनिक ब्रॅंड आलाय तो वापरतेय.

छान शीर्षक.
बेसन नसतं तर काय झालं असतं !

हं

बेसन, तिखट , मीठ , कालवून त्याचे बारीक गोळे बनवून गवारीच्या भाजीत टाकायचे, मस्त लागतात.

जरा मोठे गोळे करून आमटीत टाकायचे

<<बेसन पीठ भी बोलते क्या?>>
कारण बेसन काही साधंसुधं पीठ नव्हे. तर एक शक्तीपीठ आहे, त्या अर्थाने पीठ.

गोळ्याची आमटी

गोळे आधी तळले आहेत, आमटीतही किंचित बेसन आहे,
आमटी बनवताना बेसन + कणिक भाजून त्याचीही आमटी करतात

henken ashi.png

आधी न तळताही करतात

काही पाककृतीत उदा भाजीत मुटकुळे करून घालणे , भाजलेले बेसन लागते.

आयत्यावेळी बेसन भाजून वापरायचे तर त्याला जास्त वेळ लागतो.

बेसन भाजून साठवून ठेवता येते का, त्यासाठी ते तेलात भाजतात की तसेच ? फ्रीजबाहेर साठवले तर चालते का ? तिखट पदार्थासाठी तेलात आणि गोडासाठी तुपात , असे काही व्हेरिएशन असते का ?

बेसन भाजून साठवून ठेवता येते का, त्यासाठी ते तेलात भाजतात की तसेच ? फ्रीजबाहेर साठवले तर चालते का ? तिखट पदार्थासाठी तेलात आणि गोडासाठी तुपात , असे काही व्हेरिएशन असते का ?>>>>>> बेसन ठरावीक भाज्यांकरता भाजतात. मधुराज रेसेपीवाल्या मधुराने तसा मसाला दिलाय. ते थोडक्यात लिहीते.

एक डाव बेसन कोरडे ( तेल न घालता ) भाजुन घ्यावे. ते ताटात काढुन त्याच कढई मध्ये कच्चे शेंगदाणे, धुवुन वाळवलेला कढीपत्ता, लसुणाच्या ७-८ पाकळ्या असे एकत्र भाजावे. गार झाले की मिक्सर मध्ये बेसना सकट सर्व भाजलेले जिन्नस एकत्र बारीक करावे. वाटतानांच त्यात घरचा काळा/ गरम मसाला मिक्स करावा. आणी हे मग कोरड्या एअर टाइट डब्यात भरावे. हा मसाला परतुन केलेल्या भाज्या म्हणजे सिमला मिर्ची, वांगी, दुधी वगैरे साठी वापरावा. पाहीजे तर फेसबुक वा मधुराच्या रेसेपीज वर पाहुन मग करुन ठेवा.

मी घरी हरबरा डाळ कोरडी भाजुन मग गार करुन दळते, म्हणजे बेसन बरेच दिवस रहाते/ टिकते. त्याला जाळे अळ्या वगैरे लागत नाहीत. हरभरा डाळ कच्ची दळली तर पावसाळ्यात वगैरे किड होते.

मी घरी हरबरा डाळ कोरडी भाजुन मग गार करुन दळते, म्हणजे बेसन बरेच दिवस रहाते/ टिकते....... +१.फक्त गिरणीतून दळून आणते.

Pages