Submitted by वेल on 2 January, 2014 - 00:21
हे आणि ते - १: पाहुणचार इथे बेफि यांनी मांडलेल्या मुद्द्याला पकडून हा धागा सुरू करत आहे.
आपण आपल्या मुलांना कोणाकडे घेऊन जातो तेव्हा ती काय काय गोंढळ धालतात, आपण तो कसा सांभाळतो किंवा आपल्याकडे कोणी येतं तेव्हा आपण पाहुण्या मुलांची मस्ती कशी सांभाळून घेतो त्यावेळी त्यांचे आई वडिल कसे वागतात. काही मुलं कशी गुणी असतात हे सगळे इथे लिहावे. ह्यातून आमच्यासारख्या पालकांना खूप काही शिकता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असो!
असो!
अश्विनीमामी सर्वच प्रतिसाद
अश्विनीमामी सर्वच प्रतिसाद अगदी अगदीच पटले. रिया तुझा लेटेस्ट प्रतिसाद पूर्ण पटला.
पब्लीक प्लेसेस मध्ये मोबाईलवर्/आपापसात जोरजोरात बोलणे... मोठमोठ्याने गाणी ऐकणे खरंच खूप इरिटेटींग असते.
सोसायटीमध्ये बेबंदपणे धावणारी, पळणारी, सायकली चालवणारी मुले आणि त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून येण्यार्याजाणार्यांवर कमेंट करत आपापसात गॉसीप करणार्या आया हे त्रासदायक प्रकरण असतं बर्याचदा...
असंच एकदा मुलाला पाळणाघरातून घरी आणताना समोरून धावत येणार्या मुलाने माझ्या मुलाच्या पोटावर जोरात मारलं... कारण असंच त्याला मारावसं वाटलं... दोन कानाखाली ठेऊन द्याव्याश्या वाटत होत्या... पण मुलाला जवळ घेऊन लागलंय, दुखलंय का पाहणं त्यावेळी गरजेचं वाटलं... नंतर त्याच्या गप्पांत रंगलेल्या आईला उद्देशून म्हणाले, माझ्या मुलाच्या आसपास जरी तुझा मुलगा यापुढे दिसला तर आधी त्याचं थोबाड फोडेन मग तुला येऊन सांगेन... त्यानंतर त्याच काय इतर मुलांच्या आयांनीही आपल्या मुलांना माझ्या मुलाच्या आसपास फिरकू दिलं नाही. तेव्हा झंपीच्या प्रतिसादातील संस्कार हा मुद्दा खूपच पटला.
आपल्या मुलाचं चुकतं तेव्हा त्याला योग्य रितीने समजावणं जितकं गरजेचं आहे तेव्हा आपल्या मुलाला त्रास होत असेल तर समोरच्यालाही तेव्हा योग्य रितीने समजावणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं... नाहीतर आपल्याला त्रास होत असतानाही आई आपली बाजू घेत नाही अशी असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हे स्वानुभवावरून सांगते. मी आधी इतर मुले मारत धक्के देत तर माझ्याच मुलाला समजावत राहायचे आणि त्या मारणार्या पोरांच्या आया ढिम्म!! हल्ली कळायला लागल्यापासून अर्णव आतल्या आत घुसमटतो. अचानक गप्प बसतो. हे लक्षात आल्यापासून सगळा संकोच गुंडाळून ठेवला. म्हटलं माझं मूल तुमच्या मुलाला मारणार नाही याची मी काळजी घेईनच. मारलंच तर मी त्याला समजावून प्रसंगी फटके देऊन सांगेन की तू चुकीचं वागतो आहेस. हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. नपेक्षा मला माझ्या मुलाला कसं प्रोटेक्ट करायचं माहीतेय.
ड्रीमगर्ल - पटलं. खूप छान
ड्रीमगर्ल - पटलं. खूप छान केलस.
आगाऊ - तुमचा आयडी आगाऊ असा
आगाऊ - तुमचा आयडी आगाऊ असा असला तरी ह्या धाग्यावर तुम्ही धाग्याला योग्य कॉन्ट्रिब्युशन करावी हे चांगले. बाकी कोण काय करतो आहे ह्यावर बाष्कळ प्रतिसाद देऊन इथला प्रवाह खंडित करू नये.
रिया, तुझा हॉटेलमधला हात
रिया, तुझा हॉटेलमधला हात धुण्याचा अनुभव छानच हं
सर्व रंगाचे ते मार्कर माझ्या टेबलवर असतात अन ही कार्टी त्याची टोपणे उघडून कुठेही खसाखसा रेघोट्या मारीत अस्तात, आईबाप मजेत अस्तात, अन माझा जीव वरखाली होत अस्तो कारण चार रन्गान्ची चार पेन्स म्हणजे शम्भर रुपयाला चूना लागताना नुस्ते बघावे लागते!
दरवेळेस असे चूने लागणे परवडते का? असो.
पण आमच्या नशिबात असे नाही.
माझ्याकडे पोरेटोरे आली की पहिली धाड पडते ती व्हाईटबोर्ड मार्करवर!
बर लहान पोरान्पासून गोष्टी वर वर दूर उचलुन तरी किती ठेवाव्यात? अन आमची पोरे नै का त्याच व्यवस्थेत कशाला हात न लावता वाढली (वाढवली म्हणा हव तर)?
आयला, चोरांपासून जशा गोष्टी जपू ना आपण, अगदी तस्से या कार्ट्यांपासून जपावे लागते!
ड्रीमगर्ल, अगदी बरोबर पोस्ट
ड्रीमगर्ल, अगदी बरोबर पोस्ट वरची!
>>>> म्हणून त्या व्रात्य
>>>> म्हणून त्या व्रात्य मुलाच्या पालकांनाच नंतर बदडलं पाहिजे शब्दांनी. <<<<
मी अन लिम्बी, दोघेही जण तो शेवटचा शब्द "शब्दानी" वापरणार नाही शिवाय "(कुणितरी) बदडलं पाहिजे" वगैरे नाही, आम्हीच बदडूच याची बाकीच्या पालकांना खात्री असायची/असते!
लिंबुदा, अगदी अगदी आई बाप
लिंबुदा, अगदी अगदी
आई बाप मजेत असतात इथेच सगळा प्रॉब्लेम आहे
लिंबुदा, अगदी
लिंबुदा, अगदी अगदी+++
ह्यापेक्षा वाईट म्हणजे परमनंनट मार्कर व्हाईट बोर्ड वर वापरणे. सगळा बोर्ड वाया.
इथेच विचारते. माझ्या एका
इथेच विचारते.
माझ्या एका कलीगची मुलगी गेला २० दिवसांपासुन शाळेत जायला नाही म्हणते. सुरुवातीला तो सांगायचा तेव्हा आम्ही त्याला 'अरे जाईल. येतो मुलांना कंटाळा एखाद दिवस' असे सल्ले दिले. पण नंतर रोजच असं व्हायला लागलं. अक्षरशः तिला फटके देण्यापर्यंत झालं. पण रोज सकाळी पुन्हा तेच. तो त्याची बायको दोन वेळा शाळेत जाउन क्लास टीचर आणि प्रिंचिपलला ही भेटुन आले. पण त्यांच्या मते शी इज फाइन. शाळेत व्यवस्थित असते. अॅक्टीव असते. काही प्रॉब्लेम नाहीये. पण रोज सकाळी घरी तमाशा. हरप्रकारे विचारुन / समजावुन झालय. काय करावं?? कोणी सुचवेल का? मी एखाद्या कन्सल्ट्ंट ला भेटा असं सुचवलं. सो असं कुणी कन्सल्ट्ंट सुचवु शकता का? मुंबई-ठाणे मधे.
सस्मित, किरकोळीत घेण्याचा हा
सस्मित,
किरकोळीत घेण्याचा हा प्रकार समजू नये कृपया. मुलांच्या भावविश्वावर घातक परिणाम करणार्या घटना घडूनही मुले बुजरी असल्याने बोलत नाहीत. माफ करा, पण असे होण्याचे कारण 'अतिशय किरकोळपासून ते गंभीर' यातील काहीही असू शकते. त्यात पुन्हा ती मुलगी असल्याने इतरही काही अँगल असू शकतो. तेव्हा अतिशय हळुवारपणे तिला विश्वासात घेणे हे पालकांनी करायला हवे असे मला तरी वाटत आहे.
हो बेफी आम्ही उघडपणे ते ही
हो बेफी आम्ही उघडपणे ते ही सुचवलं त्याला. आणि त्याची बायको मुलीशी बोलली तसंही. पण काहीच रीझल्ट नाही.
मग त्या मुलीच्या नकळत
मग त्या मुलीच्या नकळत तिच्यावर शाळेत लक्ष ठेवायला हवे (अर्थात शाळेत जायला तयार झाली तर). तिच्या मैत्रिणी कोण आहेत, तिला कोण सतत भेटत होते, ती काय करायची ह्याचा तपास करायला हवा.
(अर्थात, हे सगळे ह्या धाग्यावर अवांतर आहे, ह्याबद्दल क्षमस्व)
हो बेफी. अवांतर आहेच. म्हणुन
हो बेफी. अवांतर आहेच.
म्हणुन योग्य जागी (ती ही योग्य जागा नाहीच वाटते. तरीही) प्रश्न टाकलाय.
भूषणदादा +१
भूषणदादा +१
बस भैया, डायवर बद्दल नक्की
बस भैया, डायवर बद्दल नक्की चौकशी करायला सांगावे. आपल्याहून शक्तीने/ वयाने लहान अजाणत्या मनुष्यावर हात उगारणे हे शक्यतो समीकरणातून वगळता आले तर बरे होईल. मुले जेव्हा आपल्या मनासारखी वागत नाहीत तेव्हाच त्यांना आपल्या आधाराची, समजून घेण्याची सर्वात जास्त गरज असते.
त्या मुलीस खेळता खेळता चित्रे काढायला सांगा. मुले चित्रातून व्यक्त होतात.
आपल्याहून शक्तीने/ वयाने लहान
आपल्याहून शक्तीने/ वयाने लहान अजाणत्या मनुष्यावर हात उगारणे हे शक्यतो समीकरणातून वगळता आले तर बरे होईल. मुले जेव्हा आपल्या मनासारखी वागत नाहीत तेव्हाच त्यांना आपल्या आधाराची, समजून घेण्याची सर्वात जास्त गरज असते.
>>>>>>>>>>>>>>> मारणे ई. नकोच...
सॉरी पण खुप विषयांतर होते
सॉरी पण खुप विषयांतर होते आहे. सस्मित तुम्ही हा प्रश्न/ प्रॉब्लेम मायबोलीवरच्या मितान या आयडीशी बोलु शकता. माझ्या मते त्या ह्या क्षेत्रातल्या तज्ञ आहेत.
हो बेफी आम्ही उघडपणे ते ही
हो बेफी आम्ही उघडपणे ते ही सुचवलं त्याला. आणि त्याची बायको मुलीशी बोलली तसंही. पण काहीच रीझल्ट नाही. >>> ती जास्त कोणाला क्लोज आहे त्या व्यक्तीला विचारायला सांगा, स्वानुभव आमचे कन्या रत्न सुद्धा असेच करत होते (वय ३ वर्षे ) खुपदा आईने विचारून झाले मी सुद्धा ,१/२ वेळा विचारलं पण काहीच उत्तर नाही, पण चोकलेट पेस्ट्री चे आमिष दाखवलं तेव्हा खर कारण कळल स्कूल बस मधली मुले तिला चिडवायची की आज आजी तुला न्यायला येणार नाही किवा इतर गोष्टी वरून, पण लेकीला समजाऊन सांगितल्यावर आणि बसमधल्या मुलांना खोट खोट रागावल्यावर गाडी सुरळीत चालू आहे. सध्या काहीच तक्रार नाहीये
धन्यवाद लोकहो. मी खरंतर इथे
धन्यवाद लोकहो.
मी खरंतर इथे अवांतर आणि विषयांतर होतंय म्हणुन हीच समस्या लहान मुलांच्या हट्टीपणाच्या धाग्यावर लिहीली होती. असो.
बघुया काय करतात ते.
सस्मित, काही काल्पनिक किन्वा
सस्मित, काही काल्पनिक किन्वा खर्याखुर्या भितीपोटी मुले शाळेत जाण्याचे टाळू लागतात. हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे की ती तशी कोणकोणत्या कारणांमुळे वागू लागतात. पण वरवर पहाता, येता जाताची संगत, शाळेतील संगत, मानसिक रॅगिन्ग (जसे की टॉयलेट/विशिष्ट जागे बद्दल भिती भरवुन देणे/चिडवणे/वाळीत टाकणे/कुत्सित शेरे, जेवताना किळस येईल असे बोलणे इत्यादी, व वाढील वयात भिन्नलिन्गी व्यक्तिबरोबर नाव जोडून त्याची सामुहिक चर्चा करीत शेरेबाजी करणे [हे हल्लीचे गेल्या दहावीस वर्षात वाढेलेले फ्याड आहे]), शारिरिक रॅगिन्ग (जसे की डबा दुसर्यान्नीच संपवणे/सांडवणे/नासाडी करणे/खाऊ न देणे, येता जाता टपली मारणे वगैरे खोड्याळपणा) शिक्षकांची भिती, होमवर्क/अन्य बाबी न केल्याबद्दल शिक्षकांकडून अवाजवी शिक्षेची भिती घालणे, इत्यादी अनेक बाबी शाळेत जाण्यापासून मुलांस परावृत्त करू शकतात. त्याव्यतिरिक्त, लैन्गिक अत्याचार/जोरजबरदस्ती हे कारणही नाकारता येत नाही. मुलांस नीट विश्वासात घेऊनच हे कोडं उकलायला लागत, त्याव्यतिरिक्त, शाळेमधे केव्हाही जाऊन धडकणे व वर्गापर्यंत जाऊन तपासणी करणे आवश्यक ठरते.
याही आगोदर, आपण काही सांगितले तर पालक ते ऐकुन घेतात व योग्य उपाय करतात हा विश्वास मुलाचे मनात निर्माण केलेला असेल, तर वरील प्रश्नच (न जाणे सारखे) उद्द्भवत नाही.
त्या मुलिचे अभिष्ट चिंतीतो.
विषयांतर होत असेल कदाचित, पण
विषयांतर होत असेल कदाचित, पण तरी उत्तर इथेच देते.
शाळेत जात नाही ह्याकरता मारायला नको हो. केदार आणी लिंबूजी म्हणतात हे अगदी खरं आहे. मनि म्हणून एक आयडी आहे तिला विचारून पाहा. शिवाय शाळेत ज्या बसने / वाहनाने तिथे लक्ष ठेवून पाहा. शाळेत तिच्या वर्गातली कोणी मैत्रिण असेल तर तिच्याशी बोलून पाहायला साम्गा.
ह्याशिवाय ती शाळेत गेल्यामुले घरातल्यांना मिस करते आहे का हे ही विचारा. असं होतं कधी कधी. घरातल्यांची खूप आठवण येत असते म्हणूनही शाळेत जायचं नसतं.
मला वाटतं ती शाळेत बसने जात
मला वाटतं ती शाळेत बसने जात नसेल कारण तिची आई घरी असते. बहुतेक. नक्की माहीत नाही. बघु आता तो काय निर्णय घेतो ते कांउन्सिलिंग बद्दल. मला अगदीच रहवलं नाही म्हणुन इथे शेअर केलं. धन्यवाद लोक्स.
आपल्याहून शक्तीने/ वयाने लहान
आपल्याहून शक्तीने/ वयाने लहान अजाणत्या मनुष्यावर हात उगारणे हे शक्यतो समीकरणातून वगळता आले तर बरे होईल. मुले जेव्हा आपल्या मनासारखी वागत नाहीत तेव्हाच त्यांना आपल्या आधाराची, समजून घेण्याची सर्वात जास्त गरज असते.
त्या मुलीस खेळता खेळता चित्रे काढायला सांगा. मुले चित्रातून व्यक्त होतात.या मुलीस खेळता खेळता चित्रे काढायला सांगा. मुले चित्रातून व्यक्त होतात.>>> अनुमोदन!
तिला थोडा वेळ द्या.शाळेत काही दिवस नाही गेली तरी हरकत नाही,पण खरच कांउन्सिलिंग करायला लागेल.कधीतरी मुले आईवडिलांपेक्षा परक्या लोकांकडे मोकळी होतात.आता तिची भिती/नावड याचे रुपांतर कोणत्याही मनोकायिक (psycho-somatic) विकारात न होवो ही मनापासून इच्छा!
ते जेव्हा पडतात त्यांना
ते जेव्हा पडतात त्यांना जमिनीला, उंबरठ्याला इत्यादी 'हात' करायला शिकवू नये. >>>
वेल, सहमत. आम्ही राजवीला 'हात' करायला न शिकवता, तू पडलीस मग बाऊ झाला, तसाच फरशीला/ दाराला झालाय.. मग आता नको पडु.. लक्ष दे असं शिकवलय.. त्याचा फायदा असा की.. आपन पद्लोय यावरुन तिच लक्ष उडतं आणि आपल्यामुळेही दुसर्यांना इजा होऊ शकते हेही जाणवतं. त्यामुळे ती जागरुक रहाते आणि तरी पडलीच तर स्वतःच उठुन परत खेळत बसते
Hyaअ mulaaMnaa pahileet
Hyaअ mulaaMnaa pahileet gelyaavar sajeev -nirjiv madhalaa pharak kaLaayalaa traas nako hou de mhaNaje miLavila ..
Pages