मुलांचे इतर लोकांकडे गेल्यावर बेशिस्त वागणे कसे सांभाळावे

Submitted by वेल on 2 January, 2014 - 00:21

हे आणि ते - १: पाहुणचार इथे बेफि यांनी मांडलेल्या मुद्द्याला पकडून हा धागा सुरू करत आहे.

आपण आपल्या मुलांना कोणाकडे घेऊन जातो तेव्हा ती काय काय गोंढळ धालतात, आपण तो कसा सांभाळतो किंवा आपल्याकडे कोणी येतं तेव्हा आपण पाहुण्या मुलांची मस्ती कशी सांभाळून घेतो त्यावेळी त्यांचे आई वडिल कसे वागतात. काही मुलं कशी गुणी असतात हे सगळे इथे लिहावे. ह्यातून आमच्यासारख्या पालकांना खूप काही शिकता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पण मग आपल्या मुलाला नक्की कसं समजावून घ्यायचं, तो जर ओव्हर अ‍ॅक्टीव्ह, कमी अटेन्शन स्पॅन किंवा मस्तीखोर असेल तर कसं ट्रीट करायचं याबद्दल हे पालक कौन्सेलिंगही सिरियसली घेत नाहीत. <<

हाच तर मुद्दा असतो ना. पण काही उद्दाम व बेशरम पालकांना खंत व लाजच नसते. मतिमंदाची(मुलांची) गोष्टच वेगळी, त्यांचा दोषच नसतो.

>>
माझ्या धाकट्या मुलीच्या पाचव्या वाढदिवसाला एकदा घरी आलेल्या एका सहा-सात वर्षांच्या मुलाने आमच्या कडे मुलींना सांभाळायला आजी होत्या त्यांच्या अंगावर उगीचच जाऊन चुळ टाकली होती. यात जराही अतीशयोक्ती नाही. आणि यावर तो मुलगा आणि त्याची आई फिदी फिदी हसायला लागले. मी त्या आईला म्हटलं तुमच्या मुलाला आजींना सॉरी म्हणायला सांग. ती बाई मला म्हणाली असं डोक्यावर चढवू ठेवायचं नसतं 'मोलकरणींना'. त्यावर मी तिला म्हटलं की मी खूप मोठा इश्यू करीन या गोष्टीचा जर तू आत्ताच्या आता या शब्दाबद्दलही माफी मागीतली नाहीस. तिने धुसफुसर सॉरी म्हटले आणि मुलाला खेचत घेऊन गेली. आजतागायत ती बाई माझ्याशी बोलत नाही. <<
अती उत्तम. पर्फेक्ट केलेत तुम्ही.
असल्या मूर्खांशी संबंध तुटलेलेच चांगले.
*
रच्याकने:
अध्यात्म, पूर्वसंचित इ. बाबींबद्दल माझे नास्तिक मत इथे सर्वविदित आहे.
पण नं, मुलांशी, व मुलांसमोर आपण कसे वागतो, त्यावरून आपल्याला 'इथेच फेडावे लागते' ही उक्ती खरी ठरलेली अनेकदा पहिलेली आहे.
आपण मुलांसमोर जर आपल्या आई/वडिल्/सासू/सासरे इ. शी विनाकारण उद्धटपणा करीत असु, तर १००% लक्षात ठेवावे, की आपली वेळ आल्यावर आपली मुले त्याच वागणूकीची १० पट कडक उजळणी करणारेत...
ह्यूमन बिहेवियर Wink

होय इब्लीस, अगदी खरं. चारचौघात वाईट वागणारे मुल आपल्या आईवडीलांना वाईट तर्‍हेने एक्स्पोज करत असते. याचे भान आईवडिलांनी ठेवायला हवे.

अकु, शर्मिला उत्तम पोस्ट.

इथे भारताबाहेर मराठी मंडळांचे जे कार्यक्रम होतात त्यात बेशिस्तपणे धावणारी, गप्पा मारत कलाकारांना त्रास देणारी अनेक लहान मुले मी पाहिली आहेत. पालक डिंक लावून चिकटवल्यासारखे खुर्चीवर बसून असतात, आपलं मुल कुठे आहे हेही त्यांच्या गावी नसते. मोठमोठे कलाकार, गायक आपली कला मनोभावे सादर करत असतात. आणि ही सगळी बेशिस्त मुले सभागृहात पळापळी खेळून हैदोस आणतात. राग याचा येतो की पालकांना काहीच कळत नाही. बरेचदा मराठी मंडळाचे लोक जाहीर पणे सांगतात की आपले मोबाईल आणि आपली मुले सायलेंट झोन वर ठेवा पण लक्षात कोण घेतो!! Sad

अनेकदा मंडळ बेबीसीटिंगची सोय करते. ही सोय फुकट असेल तर ठीक असते पण तासाला जर अगदी $५ जरी असतील तरी काही चिक्कू पालक मुलांना तिथे ठेवत नाहीत आणि हट्टाने तिथेच बसवतात. जर कार्यक्रम मुलांना आवडणारा/कळणारा नसेल तर आणूच नये आणि एका पालकाने घरी थांबावे पण नाही, फक्त स्वतः चा विचार करतात. फार त्रास होतो या अ‍ॅटिट्युडचा. Angry
मधे एकदा दिलीप प्रभावळकर आले होते आणि त्यांचा अनुभवकथनाचा अतिशय सुंदर कार्यक्रम चालू होता. एका लहानग्याने अचानक पिपाणीच वाजवायला सुरुवात केली. काय रसभंग झाला श्रोत्यांचा. आणि बिचारे दिलीपजी. त्यांना काय वाटलं असेल कुणास ठाऊक. Sad

माझ्या पुतण्याला मी एक पोलीस सेट आणून दिला होता. त्यात मोटर, बाईक, हेलोकॉप्टर अशा बर्‍याच वस्तू होत्या, आमच्याकडे एक लहान मुलगा आल्यावर त्याने तो सेट काढला. रात्री उशीरापर्यंत दोघे खेळत होते. दोघेही झोपेला आल्यावर ते पाहुणे गेले. रात्री दीड वाजता आमचा फोन वाजला. दारात ते पाहुणे होते.
त्यांच्या मुलाने त्या सेटमधले हेलिकॉप्टर खिशात घालून नेले होते. घरी गेल्यावर ज्यावेळी त्याच्या आईबाबांच्या लक्षात आले त्यावेळी तसेच ते त्याला घेऊन परत आमच्याघरी आले. त्य मूलाला ते परत करायला लावून त्यालाच आपली चूक झाली, परत असे करणार नाही असे सांगायला लावले ( मारहाण, आरडाओरडा केला नाही. )

त्याच्या वाढदिवसाला आम्ही त्याला तसाच सेट भेट दिला आणि आज तो मुलगा त्याच्या क्षेत्रात यशस्वी झाला आहे. आजही ते पाहुणे आमचे कुटुंबमित्र आहेत आणि त्या घटनेचा आम्ही नंतर कधी उल्लेखही केला नाही.

वय २ महिने ते ६ महिने:
बाळाकडे जर जरी दुर्लक्श झालं तर बाळ रडणारच त्यामुळे गप्प - टप्पा सोडुन त्याच्याकडेच बघावं लागतं अथवा त्याल बघणारं माणुस नेमावं लागतं.

वय ६ महिने ते ८-१० वर्षः
या वयोग टतील मुलं नेहमी निवांत पाटील यांनी मनोगत मांडल्या प्रमाणेच विचार करतात.
त्यासठी:
१. पालकांनी आपण्हुन सुरुवातीची ५-१० मिनिटे यजमानांच्या मुलांबरोबर मैत्री करण्यात, खेळन्यात घालवावीत, जेणेकरुन आपल्या मुलांपर्यन्त हा मेसेज पोहोचेल की आइ-बाबा खेळत आहेत म्हणजे आपण पण यांच्या बरोबर खेळायला हरकत नाही. मग त्यांच्या गप्प, खेळ चालु रहातात.
२. हे शक्य नसेल तर आपल्या मुलांच्या आवडीची पुस्तके, खेळणी, कलर्स, पाटी पेन्सिल(काल्बाह्य झाली नसेल तर) आपल्या बरोबर ठेवावे. यात मुलं किमान काही वेळ रमु शकतात.. यात एखादा सरप्राइज खेळ / एखादं खूप जुनं झालेलं पण आवडतं खेळणं असलं तरी चालेल.

दोन्ही मुद्द्यंमध्ये सजग मोठ्या व्यक्तींची देखरेख हवीच.

ही देखरेख आळीपाळी ने ठेवता येउ शकते. (लिन्गनिरपेक्शता, यजमान-पाहुणे, नातं जवळ लांबचं इ. गोष्टी
बाजुला ठेवुन)

वय वर्षे १० ते १५:
या वयातील मुलं सांगुन ऐकणारी असतील तर उत्तम. (नसली तर तो कौटुंबिक जीन्स अन अप्ब्रिंगिंग चा भाग झाला).
या वयोगटामध्ये सांगण्याच्या पद्धती वेगळ्या असु शकतात( प्रेमाने सांगणे, जरबेने सांगणे इ.)..आणि महत्वाचे म्हणजे हे "सांगणे" पाहुणे म्हणुन कुणाकडे जायच्या आधी स्वतच्या घरी व्हावे, नाहीतर इतरांदेखत मुलांचा अपमान होउन न्युनगंड/हेकेखोर्पणा वाढु शकतो. त्यासाठी परस्परसंवाद अन पालकांमध्ये एकवाक्यता हवी..

वय वर्षे १५ अन पुढीलः
या वयोगटातील मु लांना माहित असतं आपण कुठे वेल्कम आहोत अन कुठे नाही, सो न आवडणार्या ठिकाणी ती येत नाहीत. आणि स्वखुशी ने आली तर बेशिस्तपणे वागत नाहीत Happy Wink

-------------------------------------------------------------------------------------------

मुळात मुलं बेशिस्त का वागतात? रादर ती बेशिस्त आहेत असं लेबल लावलं जाइपर्यन्त आपण झोपलो होतो का? (बेशिस्त ही रिलेटिव्ह टर्म मानली तरी त्याचीही काही कमाल/किमान मर्यादा असते).

शिस्त ही लहान वयापासून अंगी असावी लागते..
लहान सहान गोष्टींमधून मुलांना जाणीव करून द्यावी की ती कुठे चुकत आहेत का? सुधारणा कशी अपेक्शित आहे? ती पुढील वेळेस झाली तर काय प्रयश्चित्त्/शिक्शा?

आणि हे सगळं प्रभावीपणे फक्तं आणि फक्त आई-बाबा आणि प्राय्मरी केअर गिव्हर्स करु शकतात.

उद्या पाहुण्यंकडे जायचं आहे अन आज लेक्चर दिलं अन लागली शिस्त असं होत नाही नं!!!
Its a cumulative effect!
यासाठी मुळात पालकांचं वर्तन नीट हवं, सुसंस्कृत हवं.. जेणेकरून मुलं सुसंस्कृतपणे वागतील.. शेवटी मुलं पालकांचा आदर्श ठेवुन त्यांच्यासारखी वाग्तात..
पालक अन मुलांमध्ये चांगला संवाद हवा, एक्मेकंबद्दल विश्वास हवा अन एकमेकांना समजून घ्याय्ची क्षमता हवी.
--------------------------------------------------------------------

आपलं मूल काय पराक्रम गाजवु शकतं याची कल्पना पालकांना नक्कीच असते.. घरात शामळु असलेलं मूल अचानाक पाहुण्यंकडे जाउन तोड्फोड करेल हे पटत नाही ( अपवाद- अति धाकात असलेली अन अचानक फ्रीडम मिळालेली मुले असं करु शकतात)... त्यामुळे त्यावर देखरेख ठेवणे अन धोक्याची घंटा वाजली की आवर घालणे सहज शक्य आहे.
उदा. समजा रिया च्या किस्स्यातलं मुल ओट्यावर चढुन चालु शेगडी शी खेळत बसलं असतं तर त्याच्या आईच लक्ष गेलं नसतं का? फक्त मुलगा आत जाउन काही तरी घेउन आला, नजरे समोर आहे न मग ठिक आहे खेळू दे असा आळशी विचार त्या बाईन्ने केला असेल, अन क्षणार्धात त्याने तिखत फिश तॅन्क मध्ये टाकलं.
आपलं मूल सुरक्षित आहे हे बघणं जितकं महत्वाचं तेव्हढच आपल्या मुलामुळे दुसर्याना काही शारिरिक्/मानसिक्/आर्थिक नुकसान होत नाही नं हे पहाणे ही महत्वाचं !!
आणि ही "जाणीव" मुलांमध्ये करून देणं म्हणजेच शिस्त लावणं !

अरुंधती कुलकर्णी, शर्मिला फडके यांच्या पोस्ट्स ना अनुमोदन..

गीता_९ प्रतिसाद खूप आवडला. Happy

अर्थात शिस्त म्हणून धपाटे तेही दुसर्‍याच्या मुलांना नाहीच झेपत मला. स्वतःच्या मुलांच्या बाबतीत कधीतरी तोल सुटू शकतो. मान्य.. २४ तास एकत्र असेल तर होऊ शकते चिडचिड. पण दुसर्‍याच्या मुलांवर काय अधिकार आपला? मुलाने दुसर्या कोणावर हात उगारला तर ते त्याने तसं करू नये हे सांगण्यासाठी आपणही धपाटे घालणार असू तर काय अर्थ राहीला?
मुलांशी समजुतीने बोललं तर भलीभली वांड मुलं देखील ऐकतात.

आणि लोकांकडे गेल्यास गप्पा नाही झाल्या तरी चालतील पण बाहेर गेल्यावर मुलांनी बिहेव्ह करणं ही जबाबदारी दोघांची आहे, मूल व पालक. मुलाला भान येण्यासाठी कायमच शिकवण दिली पाहीजे तसंच आयत्या वेळेस काय होतंय याकडे पालकांचे लक्ष पाहीजेच पाहीजे. पिरिअड.

वर शिव्यांचा उल्लेख झाला आहे त्या अनुषंगाने.... (डिटेलवार लिहतोय म्हणजे अ‍ॅनालिसिसला बरे पडेल)
मी आणि माझा लेक एकदा मुंबैला जात होतो. माझ्या सिटच्या मागे आणि लेकाच्या सिटच्या पुढे माय लेकी बसल्या होत्या. एका लेडिज सिटच्या अ‍ॅडजेस्टमेंट साठी आम्ही वेगवेगळे बसलो होतो. पहिल्या ५ मि. त्या आइचा आवाज आख्या बसभर 'घुमत होता' अगदी घरातल्या बोलायच्या गोष्टी या बाइसाहेब चारचौघात त्यांच्या पतीदेवा पर्यंत मोठ्याने पोहचवत होत्या. वडिल माझ्या बाजुच्या पुढच्या सिटवर बसले होते. होता होइल तेवढे दुर्लक्ष करीत.

लगेच त्या मुलीचा आवाज आईसारखाच घुमला.
'जरा गप बसायला काय घेशिल... वटवट बंद कर जरा'
. काही सें एकदम शांतता आणि थोडीफार खस्खस.... आईने प्रत्युत्तर दिले.
'तुझी तु शांत बस, ज्यादा शानपना सांगु नको मला.'
मुलगी: भो$$$ लै बोल्लीस. आता गप नाहितर लै म्हंजे लै शिव्या देइन बघ. बसमध्ये सगळे चिडीचिप. पुढे २ मि. ती भची बाराखडी संपली. (आता पोरग्याने हे म्हणजे काय विचारले तर उत्तर काय द्यायचे याचेच टेंन्शन आले होते, अगदी खरोखर).

थोडा वेळ गेला. मग आईने बहुतेक तिच्या डोक्यावरुन हात फिरवला असावा. परत रेकॉर्ड सुरु. भो$$$$ तुला कितीवेळा सांगितलं कि माझ्या डोक्याला तेल लावु नकोस. म्हणे कल्याण होतं डोक्याला तेल लावल्यावर. तुझं स्वतः च काय कल्याण करुन घेतलीयस ते बघतेच आहे, माझं काय डो$$$$$ कल्याण करणार आहेस? उद्या शांपुची सगळी बाटली नाही संपवली तर नाव बदलुन ठेव माझं. (यात कोल्हापुरी / पुणेरी आणि गुजराथी वाक्य आणिटोन), सगळे सहकुटुंब अहमदाबाद्ला जात होते व्हाया मुबै)

मग आईने त्यामुलीच्या बाबांना सांगितले , ही मला शिव्या देतेय तिला पुढे बोलवा. बाबाचे टोटल इग्नोर. याच भागाची मुलगी झोपेपर्यंत आवर्तने सुरु राहिली. बाबा निवांत झोपला होता. (त्याच्या तटस्थ पणाची बाकि कमाल वाटली, कुठली शांती करुन घेतली होती नक्षत्र जाणे).

पुढचा भाग पुढच्या प्रतिसादात लिहतो.

वर दिलेल्या घटनेसंदर्भात मी आणि लेक बसमधुन उतरल्यावर चर्चा करु लागलो. (मुलीचे वय साधारणपणे १०-१२ वर्षे असावे). कि का असे ती शिव्या देत असेल? मग शिव्या दिल्यावर आई वडील गप्प कसे बसले ? घरी पण असेच करत असेल काय? महत्वाचे म्हणजे ती हे शिकली कुठे?

मुलाच्या मते : ती खुप वैताकलेली असणार. शिव्या द्यायला घरीच शिकली असणार. शाळेत काय असल्या शिव्या शिकवित नसणार. पण बाकिची मुले / मुली हिच बघुन / ऐकुन शिव्या द्यायला शिकु शकतात. घरच्यांना या शिव्या ऐकायची सवय झाली असणार म्हणुन ते काही बोलत नाहित.

माझ्या दृष्टीने यातला एकच भाग खुप धोकादायक आहे. वर बोल्ड केलेला. काही मुलांना यात थ्रिल वाटु शकते मग ते या गोष्टी करुन बघायचा प्रयत्न करतात (त्याच वेळी पालकांना प्रश्न पडतो कि हा आपलाच मुलगा आहे ना? आतापर्यंत तर ठिक होता. एकदमच असे काय केले.) अशा वेळी चुकुनसुधा किंचितसा कौतुकाचा स्वर घातक ठरु शकतो. भले ते कौतुक आई वडिल सोडुन शेजारी पाजारी / इतर कुटुंबिय कुणीही असो एण्ड रिझल्ट सेमच असतो. अगदी आई वडिलांनी रागवले पण बाकिचे कुणीतरी मधे मुलाची वकिली केली तरी हे प्रकरण नंतर खुप महागात पडु शकते.

चलो उरलेलं नंतर टायपतो.

निपा Lol (पहिला प्रतिसाद)

निपा खरंय तुमचं (दुसरा प्रतिसाद)

तुम्ही लेकाशी हे बोललात तेव्हा त्याचे वय काय होते?

गीता, शर्मिला, अकु अतिशय सुंदर आणि अगदी हेच हेच म्हणावं अशा पोस्टी Happy

बस्के, तू मला उद्देशुन लिहिलं नसशील असं वाटतय तरी मला उद्देशुन असेलच तर -
माझ्या देखत माझ्या घरचे मासे मेले Sad आम्ही आमच्या घरातले मासे, कासव यांना फार जपतो गं Sad
त्याने जे केलं ते इतकं हर्टींग होतं माझ्यासाठी. उदाहरण द्यायचं म्हणजे कोणी आपल्या देखत आपल्या घरातल्या बाळाच्या डोळ्यात तिखट टाकलं तर आपली प्रतिक्रिया कशी असेल? त्याच वेगाने माझ्याकडुन ती प्रतिक्रिया घडली.मला त्यात काहीच चुकीचं वाटत नाहीये. राग त्याच्या आईचा आहे. मुलाला हे वळण तिने फार आधी लावायला हवं होतं नाही तर आपलं मुलं काय आहे हे माहीत होतं तर किमान त्याची काळजी तरी घेणं जरुरी होतं.

तुमच्या मुलामुळे एखाद्याच्या घरात अमुल्य गोष्टींचं नुकसान झालं आणि मग त्या एखाद्याने तुमच्या मुलाला काही शिक्षा केली तर त्याला बोलायचा काहीच हक्क तुम्हाला पोहचत नाही.
आपलं मुलं असच आहे आणि असच रहाणार अशी तुमची भुमिका असेल तर स्वतःच्या घरात ठेवा त्याला Angry
दुसर्‍याने आपल्या मुलाचा अपमान (?) करू नये असं वाटत असेल तर दुसर्‍याच्य घरी कसं वागावं याचे धडे त्याला देऊन ठेवा Sad
बरोबर की नाही?

रिया.,

>> कोणी आपल्या देखत आपल्या घरातल्या बाळाच्या डोळ्यात तिखट टाकलं तर आपली प्रतिक्रिया कशी असेल?

अगदी अगदी! Sad मला वाटतं की त्या पोराचं मुंडकं तिखटाच्या पाण्यात बुचकळून काढायला हवं. म्हणजे समजेल त्याला आपण काय करून बसलो ते.

आ.न.,
-गा.पै.

रिया, मी तुझ्या जागी असते तर काय केले असते माहीत नाही. मोस्टली नुसते बोलले असते काहीतरी तेही पालकांना, किंवा काहीच नाही. माझा स्वभाव जरा इंट्रोवर्ट असल्याने असेल.
काहीही असले तरी दुसर्‍या कोणीतरी माझ्या मुलाला रागे भरतंय वा मारतंय ही कल्पना मी सहन नाही करू शकत.

तसे जर सहन होत नसेल तर आपल्या मुलाला शिस्त लावणे योग्य नाही का? सॉरी बस्के मला रियाचे म्हणणे पटतेय. लहानपणी माझ्या वडिलान्च्या मित्रान्च्या मुलानी आमच्या वेताच्या खुर्चीची तोडमोड केलेली आठवतेय. मुलान्चे आई बाप त्याना काहीच बोलले/ रागवले नाही.पण त्यान्च्या घरात कुठेच कुणी हात लावलेला चालत नव्हता, असे का? आपला तो बाब्या ही जनरीत जेव्हा बन्द होईल तेव्हाच समाज सुधारेल.

आणी मुलाना कॉन्सेलीन्ग करणे काही लोकाना एवढे अपमानास्पद का वाटते देव जाणे? सायकॉलीजीस्ट कडे जाणे म्हणजे वेड्याच्या दवाखान्यात जाणे नव्हे. काही लोक सायकॉलीजाचा सम्बन्ध वेडेपणाशी जोडतात, पण शरीराचे जसे रोग आहेत तसेच मनाचेही असु शकतात हे त्याना मान्यच नसते. घरात हिन्सक वागणारी मुले काही वेळेस बाहेर शिस्तीत वागतात, तर या उलटही होऊ शकते. लहान मुलेच ती, पण त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम आईबाप, आजी आजोबा, घरातील मोठी मन्डळी आणी शेजारी इत्यादी लोकान्चे असते. जर लाडाने मुल बिघडले तर दोष कुणाकडे मग?

शर्मिला तुम्हाला अनुमोदन. असाच परखडपणा पाहीजे.

बर्‍याच प्रतिक्रिया आल्या आहेत तेव्हा सगळं सावकाशीने वाचते.

त्यापूर्वी नुकताच घडलेला प्रसंग लिहायचा मोह आवरता येत नाही..
साबूंच्या आजारपणामुळे मुलाचा पहीला बर्थडे नीट साजरा करता आला नाही म्हणून त्याच्या पाळणाघरातील सहा सात मुलांना, त्यांच्या पालकांना आणि जवळच्या नातेवाईकांना बोलावून साजरा करायचा ठरला.

बर्थडे वर्कींग डे ला असल्याने पालक येऊ शकत नव्हते त्यामुळे पाळणाघराच्या संचालिका आपल्या कुटुंबियांसोबत त्या लहान मुलांना घेऊन आल्या होत्या. (सर्व मुले वयोगट वर्ष दीड ते सहा-सात वर्षे). त्यापैकी १ मुलगा फारच हूड आहे. त्याने आल्या आल्या सोफ्यावर चढून डेकोरेशन मधील १ फुगा ओरबाडून काढला.
(माझा नवरा उद्धट कॅटॅगरीतील असल्याने त्याला ही या लहान मुलांसोबत आवरावं लागत होतं. नाहीतर त्या मुलाने धपाटे खाऊन पूर्ण कार्यक्रमाचा विचका झाला असता.) कसंबसं समजावत त्याला बाजूला केलं... केक आयत्या वेळेस काढून ठेवला... लहान मुलांना लांब केलं.. मेणबत्ती पेटवणार तोच या पठ्ठ्याने पुन्हा सोफ्यावर उडी मारून आम्ही त्याला आवरेपर्यंत केकवर हात मारला... Sad

(इतक्या गर्दीत, सगळ्यांना आवरेआवरेपर्यंत कसं घडलं कळलंच नाही. इथे काही मुद्दे येऊ शकतील की त्याचा हात पोहोचेल अशा उंचीवर केक का ठेवला, हात मारेपर्यंत, सोफ्यावर चढेपर्यंत लक्ष का ठेवलं नाही...)
गर्दी इतकी आणि प्रत्येकाला अटेंड करणं, व्यवस्था चोख ठेवणं याबरोबरच मुलगा व पाहुणे कंटाळू नयेत याची काळजी घेणं ही त्रिवेणी कसरत सांभाळताना नाकी नऊ येतं. डोळ्याचं पातं लवतं नं लवतं तोच... म्हणजे काय ते त्यावेळेस समजलं... नवरा भयानक भडकला होता. पण माझ्या आईने आम्हाला दोघांना हळूच समजावलं उगाच कार्यक्रमाचा आणि इतरांच्या मूडचा विचका नको. रागावर कंट्रोल ठेवा. पटलं मला पण आमच्या दोघांचा मूड गेलाच. Sad

त्या मुलाच्या घरी इन्व्हाईट करताना त्याच्या आईने विचारलेलं कबतक फ्री करेंगे उसे? मुंबईसारख्या ठिकाणी, दुसर्‍या दिवशी कामावर जायचं असतं वगैरे सगळं मान्य करूनही अगदीच बेसलेस आणि उद्धट प्रश्न वाटला होता मला तो..

मला वाटतंय इथे बर्‍याच जणांनी पालकांना दोष दिला आहे... बर्‍याच अंशी आजी-आजोबांचे लाड, एकुलतं एक, पहीलं, किंवा बर्‍याच वर्षांनी झालेलं मूल म्हणूनही लाडावलं जातं तरीही मला असं आढळून आलंय की काही मुलं उपजतच गुणी कॅटॅगरीमधली असतात आणि काही उपजतच वाह्यात, वात्रट, डोकेदुखी प्रॉब्लेम चाईल्ड असतात. असं का ते बालमानसशास्त्र जाणणारे डॉक्टरच उत्तर देऊ शकतील.

काही जणांना उपजत समजूत असते ते शिकवावं लागत नाही. घरातल्यांचं अनुकरण करतात म्हणावं तर प्रत्येकवेळी ते अनुकरण करतीलच असं काही नाही. आईवडील ओरडूनही किंवा घरी सगळे छान वागूनही मुले आयत्यावेळी काय घोळ घालतील सांगू शकत नाही. बर्‍याच आईवडीलांना अगदी कानकोंडं होतं मुलाच्या अश्या लाज काढण्यामुळे! त्यामुळे सरसकट पालकांवरील आरोप अमान्य. (बरेच पालक असतात असे मुलांना लाडावून ठेवणारे पण तरीही असेही पालक बघीतले आहेत जे मुलांना दटावत असतात.) काही पालक मात्र स्वतः अल्लड असून मुलं त्यामानाने बरीच समजूतदार असतात. माझ्या नवर्‍याचा पुतण्या स्वतःहून पाणी आणून देणे, चौकशी करणे ही कामे वयाच्या चौथ्या वर्षापासून करायचा. बरं घरातल्यांचं अनुकरण करतो म्हणावं तर त्याची आई पाणी आणणं तर सोडा पण दारात आम्हाला बघून साधं हसल्याचंही आठवत नाही. कौतुक वाटे मला फार त्या मुलाचं.

त्यामुळे काही मुलं ही प्रॉब्लेम चाईल्ड्स का असतात हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. मितान बहुदा यावर छान सांगू शकेल.

मूल व्रात्य, खोडकर असणं मान्य... काही प्रमाणातील उद्धट आणि शिष्टपणाही समजावून सांगून जाऊ शकेल. पण दुसर्‍याला (मोठ्यांना आणि बरोबरीच्यांनासुद्धा) चावणे, मारणे, इजा करणे, अपशब्द वापरणे, नुकसान करणे यासाठी या प्रॉब्लेम चाईल्ड्सना बालमानसशास्त्रपारंगत डॉक्टरांची गरज असते हेच काही पालक मान्य करत नाहीत. लहान आहे, मूल आहे म्हणून दुर्लक्ष करतात. मुळात आपलं मूल चुकीचं वागतंय हेच बर्‍याच पालकांच्या लक्षात येत नाही आणि आलं तरी ते त्याकडे मूल आहे, एवढं काय त्यात म्हणून दुर्लक्ष करतात हे त्यांचं चुकतं. आपलं मूल इतकं चिडखोर का आहे, ते दुसर्‍याला इजा का पोहोचवतंय, असं करणं बरोबर नाही हे "योग्य प्रकारे" मुलांना समजून सांगणं बर्‍याच पालकांना शक्य होत नाही. पालकही मुलांबरोबर शिकत असतात संगोपन करायला. यासाठी मला वाटतंय मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन झालं पाहीजे. जसं अती लाडावून ठेवणं, चुकीच्या गोष्टींचं समर्थन देणं, चुकीच्या गोष्टींचं कौतूक करणं चूक तसेच रट्टे घालणं, मोठ्याने खेकसणं, चटके देणं, अद्वातद्वा बोलणंही चूक (हाच प्रयोग आपल्या स्वत:वर किंवा इतरांवरही उलटू शकतो).

बर्‍याच पालकांचा आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं कार्ट असाही सूर असतो. आपल्या मुलाला इतर कोणी हात लावला तरी कांगावा करतात पण त्याच वेळेस आपलं मूल किती व्रात्यपणा करतेय याकडे डोळेझाक करतात. असो... मी सुद्धा यातून जाते आहे. माझ्या नशीबाने माझं मूल समजूतदार आहे. फक्त त्याच्या समजूतदारपणाला आम्ही "गृहीत" धरत नाही आहोत ना हेच वारंवार तपासून पाहत राहावे लागते.
यातील उदाहरणावरून शिकायला मिळेल निश्चित.

हे आणि ते - १: पाहुणचार या धाग्यावरील प्रतिसादावरून हे लिहायचं होतंच पण धन्स नवीन धागा उघडल्याबद्दल.
प्लीज मितानला या धाग्यावर बोलवा. ती यावर व्यवस्थित सांगू शकेल.

ओहो मितान, आहेस होय या धाग्यावर... खूप प्रश्न आहेत तुला विचारायचे... सवडीने... तुझ्या आणि माझ्याही Happy

<इतक्या गर्दीत, सगळ्यांना आवरेआवरेपर्यंत कसं घडलं कळलंच नाही. इथे काही मुद्दे येऊ शकतील की त्याचा हात पोहोचेल अशा उंचीवर केक का ठेवला, हात मारेपर्यंत, सोफ्यावर चढेपर्यंत लक्ष का ठेवलं नाही...) : लहान मुलांना पाहुणे म्हणून बोलवण्याआधी व्हीआयपी लोकांच्या सुरक्षारक्षकांसाठीचे ट्रेनिंग घ्यायचे .

Proud मयेकर

स्वप्नसुंदरी,

हे वाक्य फार पटलं.

>>>मुळात आपलं मूल चुकीचं वागतंय हेच बर्‍याच पालकांच्या लक्षात येत नाही<<<

तरीही मला असं आढळून आलंय की काही मुलं उपजतच गुणी कॅटॅगरीमधली असतात आणि काही उपजतच वाह्यात, वात्रट, डोकेदुखी प्रॉब्लेम चाईल्ड असतात. असं का ते बालमानसशास्त्र जाणणारे डॉक्टरच उत्तर देऊ शकतील.>>>>>> तुला लाख/ करोडो/ अब्ज/ खर्व निखर्व/ पद्म महापद्म टक्के अनुमोदन.:फिदी:

आमच्या ओळखीच्या कुटुंबात एक मुलगा आहे. ६-७ वर्षे वय.

हा मुलगा स्वत:च्या घरी एकदम शांत असतो, सगळ्या वस्तू जागच्या जागी. उठ म्हटले की उठ, बस म्हटले की बस टाईप मुलगा

पण जेव्हा शेजारच्या घरी येतो, खाली खेळायला जातो तर एकदम धुमाकुळ घालतो. दुसर्‍या मुलांना मारतो त्यांची खेळणी हिसकावून घेतो नाहीतर मोडून टाकतो. त्याच्या घरी तक्रार करायला गेलो तर त्याचे आई बाबा सांगतात "आमचा मुलगा असा नाहीच म्हणून. तुम्हीच काहीतरी कळ काढली असणार"

काय म्हणणार या पुढे?

तरीही मला असं आढळून आलंय की काही मुलं उपजतच गुणी कॅटॅगरीमधली असतात आणि काही उपजतच वाह्यात, वात्रट, डोकेदुखी प्रॉब्लेम चाईल्ड असतात. असं का ते बालमानसशास्त्र जाणणारे डॉक्टरच उत्तर देऊ शकतील.
>>>>>>>>>>>>>>>
मी यातला काही तज्ञ नाही पण मला असे वाटते की बालक गर्भावस्थेत असताना आईची मानसिक अवस्था काही अंशी याला कारणीभूत असते. आपल्याकडे गर्भसंस्कारांबद्दल लिहीले आहे ते खरे आहे. आणि याची उदाहरणे मी आजूबाजूला पाहीलेली आहेत. गर्भावस्थेत धुसफुस, चिडणे किंवा कुढत बसणे, सासू-सासरे, नणंदा भावजयांशी वाद विवाद अगदीच काही नाही तरी हिंसक चित्रपट बघणे, हिंसक घटना याचा परिणाम कुठेतरी झिरपत त्या गर्भावर होतो.
आता काहींना हे मान्य होणार नाही कदाचित पण मला असे वाटते की बालक घडण्याची प्रक्रीया त्याच्या जन्मापूर्वीच सुरू होते.
अधिकारी व्यक्तींनी अधिक माहीती द्यावी.....

तरीही मला असं आढळून आलंय की काही मुलं उपजतच गुणी कॅटॅगरीमधली असतात आणि काही उपजतच वाह्यात, वात्रट, डोकेदुखी प्रॉब्लेम चाईल्ड असतात. असं का ते बालमानसशास्त्र जाणणारे डॉक्टरच उत्तर देऊ शकतील.
>>>>>>>>>>>>>>>
कोणतीही व्यक्ती एकसारखी नसते तसचं मुलांचे आहे... हीच मुले पुढे व्यक्ती होते ना... व्यक्ती तितक्या प्रकृती... काही मुलांचा स्वभाव भिडस्त असतो.. काहींमध्ये एनर्जी जास्त असते... काहींना लोकांचा सहवास आवडतो... काहींना अंगाला घरच्या बाहेरच्यांनी हात लावलेला आवडत नसतो... काही समजूतदार असतात.. काही किरकिर/ चिड चिड करणारे असतात.. हे सगळे गुण/ अवगुण नाहित.. हे स्वभावाचे कंगोरे आहेत.. ते बदलू शकत नाही...

त्यामुळे प्रत्येक मुलाला त्याचा स्वभावनुसार आवरावे लागते... ज्यांचात एनर्जी जास्त असते/ खोडकर स्वभाव आहे, त्यांना मैदानी खेळ, टीमवर्क शिकवा... जे शामल/ भिडस्त स्वभाव आहे त्यांना इतर मुंलामध्ये मिसळ्णे/ स्वतःचे विचार मांडणे शिकवणे...

पण आपण काय करतो... लहान मुल म्हटलं की सगळ्याना एकाच मापात मोजतो...

<<आईची मानसिक अवस्था >> असू शकेल.

असेही म्हणतात की बालकाच्या आत्म्यावरचे पूर्वजन्मीचे संस्कारही बालकाच्या व्बागण्याला कारणीभूत असतात. - खखोदेजा.

पण पालकांचे - ह्यात आई वडिल, आजी आजोबा इत्यादी सगळे - वागणे लाड करणे, एकाने ओरडल्यास दुसर्‍याने पाठीशी घालणे हे खूप जास्त प्रमाणात कारणीभूत आहे. कधी कधी घरात दुसरे मूल आले तर पहिले असे वागू शकते आणि मग ते वागणे वाढत जाते. कधी कधी मोठ्या मुलासोबत तुलना केल्याने लहान मूल असे वागू लागते.

आमच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगा आहे ५ वर्षाचा, त्याचे आई वडिल आजोबा त्याला भरपूर ओर॑डतात, फटकवतात फक्त आजी प्रचंड लाड करते. त्याची मस्ती, वांडपणा कमी होतच नाही. त्याला घरी बोलवायचं म्हटलं की धडकी भरते. त्याला समोर दिसलेली कोणतीही वस्तू खाऊन फस्त करतो. आजी म्हणते काय करणार असाच आहे तो. मध्यंतरी तो आला असताना असा वागला तेव्हा त्याच्या उंचीच्या पातळीला येण्यासाठी खाली बसून त्याचे दोन्ही हात घट्ट पकडून आणी त्याच्या डोळ्यात डोळे घालून एकच सांगितले की तुला खायला हवे असेल तर मागायचे, समोर ठेवलेले संपवायचे नाही. पुन्हा असे केलेस तर चालणार नाही तुला पुन्हा खेळायला घरी घेऊन येणार नाही. प्रथमच त्याला थोडंस भेदरलेलं पाहिलं. त्यानंतर तो आला नाही त्यामुळे त्याच्यात काही फरक पडला आहे की नाही मला माहित नाही.

आत्ता गेल्या आठवड्यात माझ्याच लेकाने थोडा न ऐकण्याचा प्रकार केला. एका स्नेह्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. त्यांची मुलगी आठ वर्शाची आहे. पूर्वी माझा मुलगा आणि ती एकत्र खेळत. पण ह्यावेळी तिची कोणतीही खेळणी घरी नव्हती. तिचे सॉफ्ट टॉयज फक्त होते पण तिला बरं नव्हतं म्हणून असेल किंवा तिचा मूड खराब होता ती थकली होती म्हणून असेल तिने मुलाला खेळायला काही दिले नाही. तो कंटाळला आणी खिडकीतून खाली पाहू लागला. नंतर त्याला सुचले की सोफ्यावर उचे राहिले तर खिडकीतून आणखी चांगले दिसेल. तीन चार वेळा सांगूनही तो सोफ्यावरून खाली नाही उतरला, म्हणून उचलूनच उतरववावे लागले. मग त्याने समोर असलेली तीन चाकी स्कूटर चालवायला सुरूवात केली. बराच वेळ नुसता बसून कंटळल्यामुळे त्याला जेवतानाही स्कूटर आणि नुकताच सुरू केलेला टीव्ही सोडायचा नव्हता. फार मुश्किलीने थोडं लोणी लावून थोडं ओरडून त्याला बसवलं जेवायला. त्यानंतर स्नेह्यांची मुलगी झोपायला गेली तेव्हा तो आणखी कंताळला आणि बॉलवर बसून उड्या मारू लागला. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. माझ्या घरी चालते त्याची ही मस्ती रात्री बारा वाजता सुद्धा. पण दुसर्‍याच्या घरी मला त्याला थांबवणे गरजेचे होते. मग त्याने मला प्रॉमिस केले की तो अगदी हळू उड्या मारेल. पण थोड्या वेळाने पुन्हा उड्यांची इंटेन्सिटि वाढली.

ह्या सगळ्यात मला त्याच्या वागण्याची लाज वाटली, मनात म्हटले देव जाणो ते स्नेही काय विचार करत असतील माझ्याबद्दल. पण हेही माहित होते की ह्याला मीच कारणीभूत आहे,. लहानपणी मी सगळीकडे त्याची खेळणी त्याच्यासाठी रंगीत खडू कागद घेऊन जयचे ज्यामुळे तो मस्त स्वतःत रमलेला असे. ह्यावेळी माझ्या ते लक्षात नाही आले, मी गृहित धरले तो आणि ती मुलगी खेळतील. चुकलेच माझे. शिवाय त्या स्नेह्यांनी सुद्धा त्याला खेळायला काही तरी द्यायला हवे होते. ...

<<कोणतीही व्यक्ती एकसारखी नसते तसचं मुलांचे आहे... हीच मुले पुढे व्यक्ती होते ना... व्यक्ती तितक्या प्रकृती... काही मुलांचा स्वभाव भिडस्त असतो.. काहींमध्ये एनर्जी जास्त असते... काहींना लोकांचा सहवास आवडतो... काहींना अंगाला घरच्या बाहेरच्यांनी हात लावलेला आवडत नसतो... काही समजूतदार असतात.. काही किरकिर/ चिड चिड करणारे असतात.. हे सगळे गुण/ अवगुण नाहित.. हे स्वभावाचे कंगोरे आहेत.. ते बदलू शकत नाही...

त्यामुळे प्रत्येक मुलाला त्याचा स्वभावनुसार आवरावे लागते... ज्यांचात एनर्जी जास्त असते/ खोडकर स्वभाव आहे, त्यांना मैदानी खेळ, टीमवर्क शिकवा... जे शामल/ भिडस्त स्वभाव आहे त्यांना इतर मुंलामध्ये मिसळ्णे/ स्वतःचे विचार मांडणे शिकवणे...>> - ह्याला पूर्ण अनुमोदन. तरीही सगळी मुलं प्रेमाने बदलतात, त्यांना महत्व दिलं की ऐकतात असे मला वाटते. मुलांच्या वागण्याबद्दल त्यांच्याशी स्पष्ट बोललं तर त्यांना ते समजतं अर्थात त्याबरोबर तुझं वागणं मला आवडत नाही ह्याचा अर्थ तू मला आवडत नाही असा नाही हेही तितक्याच स्पष्टपणे आणि प्रेमाने पोहोचलं पाहिजे मुलांपर्यंत.

पण रिया, शर्मिला, निपा, ड्रीमगर्ल ह्यांच्या उदाहरणातल्या मुलांचे घरातले वागणेही तसेच असणार आणि ते डोक्यावर बसवले गेले असणार. तुषार दळवी आणि सुप्रिया मतकरी ह्यांच्या सिनेमाची आठवण होते.

ड्रीमगर्ल - तुझ्यासारखाच वाढदिवसाच्या केकचा अनुभव मलाही आलाय. ह्या बाबतीत तू काहीही करू शकत नाहीस. वाढदिवसाचा केक आपण सगळ्या मुलांना दिसेल अशा उंचीवर ठेवतो. तिथे तू उंची वाढवू शकत नाहीस. आमच्या कडे गेली सलग तीन वर्षे केकला कापून होण्यापूर्वी हात लावणे चाखून पाहाणे हे एकच मुलगी करते आहे. वय पाच सहा आणि आता सात. मध्यमवर्गीय कुटुंब आणि तिची आई बरीच कडक आहे,. हेही कारण असू शकते. शिवाय लहान मुलांकडे संयम नसतो. याशिवाय ती मुले काही गोष्टींना deprived असू शकतात. जसे की त्यांच्या वाढदिवसाला कार्टून वगैरे चा केक मागवलेला नसतो किंवा एकदाच मागवलेला असतो. (शिवाय माझ्या घरात मुलांना खूप फ्रीडम आहे हे त्या मुलीला माहित आहे.) त्या तुलनेत अत्यंत गरीब कुटुंबात जिथे केक फक्त वाढदिवसाला येतो आणि तो सुद्धा कार्टूनवाला केक कधीच येत नाही त्या कुटुंबातल्या मुलांना ह्या केकला हात लावायचा नाही. केक कापला की सगळ्यांना मिळणार तुम्ही तुमच्या प्लेटमधल्या केकला हात लावा असे सांगितल्यावर त्या मुलांनी ऐकलं होतं.

सगळी मुलं प्रेमाने बदलतात, त्यांना महत्व दिलं की ऐकतात असे मला वाटते. मुलांच्या वागण्याबद्दल त्यांच्याशी स्पष्ट बोललं तर त्यांना ते समजतं अर्थात त्याबरोबर तुझं वागणं मला आवडत नाही ह्याचा अर्थ तू मला आवडत नाही असा नाही हेही तितक्याच स्पष्टपणे आणि प्रेमाने पोहोचलं पाहिजे मुलांपर्यंत.

>> ह्याला अनुमोदन. मी पाहिलेली ८ ते १२ वर्षांच्या वांड मुलांना त्यांच्या आईवडिलांनी एकतर बदडतांना पाहिलेय किंवा "खुप लहान आहे माझा शोनुला" अश्या मोडमध्ये पाहिलेय. पण लहान मुलांनाही स्वतःचे मानापमान, (थोडीशी का होईना) चांगल्या वाईटाची समज इ. असते. खरंच मुलांशी प्रेमाने बोलले, त्यांना "हे चांगले आणी हे वाईट वागणे" असं सांगुन कसं वागायचं ते त्यांचं त्यांच्यावर सोडलं तर मुलं नक्की चांगल्या वागण्याचा ऑप्शन निवडतात.

अर्थात 'वांड मुलांचे आईवडील त्यांच्याशी असा संवाद साधत असतील का?' हा प्रश्न पडलाय मला. कोणी सांगु शकेल का? जर याचं उत्तर नकारार्थी आलं तर "मुलांशी संवाद साधत राहिलं तर ती बेशिस्त वागत नाहित" ह्या निष्कर्षाप्रत आपण येऊ शकतो का?

<<"मुलांशी संवाद साधत राहिलं तर ती बेशिस्त वागत नाहित" ह्या निष्कर्षाप्रत आपण येऊ शकतो का?>> नक्कीच. म्हणजे मला तरे असे वाटते.

मुलांशी कसे वागावे ह्याचे काही नियम आपण पाळायला हवेत. मुळात मुलांना लहान लहान करून बावळवू नये तसेच त्यांच्याकडून फार जास्त अपेक्षा ठेवू नये. आपण आपल्या वयाच्या लोकांना जसा रिस्पेक्ट देतो तसा द्यावा. त्यांच्या चुका सांगताना चुकाच सांगाव्या, त्या चुका केल्याचे परिणाम काय ते समजावून सांगावे, त्याच गोष्टी त्यांच्यासोबत झाल्या तर त्यांना कसे वाटेल हेही विचारावे? त्या चुका सांगताना तू वाईटच आहेस असे सांगू नयेस. लेबल्स लावू नयेत. चूक समजल्यावर मूल रडत असेल तर त्याला रडू द्यावे, जवळ घ्यावे. ते जेव्हा पडतात त्यांना जमिनीला, उंबरठ्याला इत्यादी 'हात' करायला शिकवू नये.

लिस्ट खूप मोठी आहे, मी आत्त एवढच लिहू शकले.

Pages