मुलांचे इतर लोकांकडे गेल्यावर बेशिस्त वागणे कसे सांभाळावे

Submitted by वेल on 2 January, 2014 - 00:21

हे आणि ते - १: पाहुणचार इथे बेफि यांनी मांडलेल्या मुद्द्याला पकडून हा धागा सुरू करत आहे.

आपण आपल्या मुलांना कोणाकडे घेऊन जातो तेव्हा ती काय काय गोंढळ धालतात, आपण तो कसा सांभाळतो किंवा आपल्याकडे कोणी येतं तेव्हा आपण पाहुण्या मुलांची मस्ती कशी सांभाळून घेतो त्यावेळी त्यांचे आई वडिल कसे वागतात. काही मुलं कशी गुणी असतात हे सगळे इथे लिहावे. ह्यातून आमच्यासारख्या पालकांना खूप काही शिकता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया >>>>बालमानसशास्त्र एक वेगळाच ताप आहे डोक्याला

असहमत.
बालमानसशास्त्र हा ही हल्ली सोयीने वापरायचा विषय झाला आहे !
असो.
चर्चा वाचतेय. प्रवासात आहे म्हणून तूर्त एवढेच !

लोकसत्तात काही वर्षापूर्वी मस्त लेख आला होता

. सासु व सुन सोसायटीमधल्या महिला मन्डळाच्या सभासद. त्याना पसन्त नसलेली एक सामाजीक कार्यकर्ती महिला सोसायटीच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष/ गेस्ट म्हणून बोलावली.( इतर महिला सदस्यानी). कार्यक्रमा आधी त्या दोघी घरात तिच्याविषयी कमे.न्टस करत होत्या. टवळीला कशाला बोलावले काय माहीत? महा भोचक आहे वगैरे. घरातील ज्युनीअर महिला सदस्याने ते ऐकले.( नावागावासकट)

. नेमके त्याच अध्यक्षा काही कामानिमीत्त त्यान्च्या घरी आल्या. दारात त्याना पाहुन ज्युनीअर मोस्ट महिला सदस्य उद्गारली. आज्जी, तू आणी आई ज्या टवळीबद्दल बोलत होत्या ना, तीच आलीय ग. सासु सुनान्चे चेहेरे पाहण्यालायक.

तात्पर्यः लहान मुलान्समोर काहीच गैर बोलु नये.( माझा स्वानुभव असुनही मी चुकतेच हे मान्य करते)

मस्ती करणार्‍या मुलांपेक्षा ती करु देणार्‍या किंवा त्यांना पाठीशी घालणार्‍या पालकांचा खूप राग येतो. आपल्या आई-वडिलांचा आपल्याला छुपा पाठिंबा आहे हे मुलांना बरोब्बर समजते.
काही मुलं उपजतच शांत, गुणी असतात. बाकीची नसतात. पण मुलं जेव्हा मस्ती करतात किंवा वेड्यासारखं बोलतात तेव्हा आई-वडील म्हणून तुम्ही त्यांना तिथल्यातिथे तसं वागण्यापासून परावृत्त करता की नाही हे फार महत्त्वाचे आहे. त्यानंतरही मुळातले मस्तीखोर मूल असेल तर लगेच शांत होणार नाही पण दुसर्‍याला उपद्रव होणार नाही इतकी काळजी पालकांना नक्कीच घेता येते.

माझ्या मुलाच्या अंगात वांड मस्ती नाही पण त्याचे टेंपर टँट्रम्स हाताळणे हे पालक म्हणून मला चॅलेंजिंग वाटत आलेले आहे. दुसरीकडे गेल्यावर नेहेमी मुलाला काही गोष्टी सांगते.
१. दुसर्‍यांकडे गेल्यावर एकावेळी एकच खेळणे घ्यायचे. दुसरे हवे असल्यास आधीचे जागेवर ठेवायचे आणि मग दुसरे घ्यायचे. हे अगदी काटेकोरपर्यंत शेवटपर्यंत पाळले जाईल असे नाही पण आपल्या मुलामुळे पाहुण्यांच्या घरात टॉर्नेडो येणार नाही एवढे नक्की.
२. पाहुण्यांकडून परत निघताना त्यांनी जी खेळणी काढून दिली असतील ती आवरुन ठेवायला मदत करणे. हे मुलाकडून करवून घेणे चांगलेच पण मूल झोपाळले असेल किंवा चिडचिडे झाले असेल तर आई-बाबापैकी कुणीतरी हे काम करायलाच हवे.
३. एकटे मूल तितकीशी मस्ती करत नाही पण दोन मुलं एकत्र जमली की मस्ती वाढते. उड्या मारणे वगैरे प्रकार सुरु होतात. स्वानुभव. अशावेळी सातत्याने मुलांच्या मागे राहावे लागते आणि त्यांना दुसर्‍या एखाद्या नॉनमस्ती अ‍ॅक्टिव्हिटीकडे वळवावे लागते. ह्याने आपल्या गप्पांमध्ये व्यत्यय येतो पण त्याला पर्याय नाही !
४. टेंपर टँट्रम झाला तर दुसर्‍या खोलीत नेऊन मुलाला समजावणे, शांत करुन बाहेर आणणे. सांगूनही मस्ती कमी होत नसेल तर घरी करतो तसे टाईम आऊट करणे, ठामपणे 'हे चालणार नाही' हे मुलांपर्यंत पोहोचवणे हे करत राहायला हवे.
५.last but not the least ... एका जागी बसून खायचे आणि मग खेळायला जायचे.
घरभर हातात पदार्थ घेऊन हिंडणारी, बेडवर बसून खाणारी मुलं ( त्याबद्दल त्यांना काहीही न बोलणारे पालक ) आणि मग कुठेही पायाखाली अन्नकण येत राहणे ही अतिशय इरिटेटिंग गोष्ट आहे.

रश्मी, तुमच्या या प्रतिसादावर जे फिदी वगैरे स्मायली देतील त्यांना तात्पुरते बेशिस्त पालक वगैरे म्हणता येईल.

हाय्ला!
शेपटावर पाय पडलेला दिसतोय की Wink

झक्कास!

>>
मुलं म्हण्जे कुत्री/ नोकर नाहीत ऊठ म्हंटले की ऊठायला आणि बस म्हंटले की बसायला.
<<

अशा शेफारलेल्या तुमच्या वाईल्ड टायगर, किंवा तुमच्या मालकांचा रुबाब तुमच्या घरी ठेवून येणे. तुमचे दिवटे कसे वागते ती तुमची जबाबदारी असते. तुमच्या घरात काय असेल ते असो, आमच्या घरी येऊन आम्हाला अपेक्षित तसे नीटच वागले पाहिजे. हे लोकांना का समजत नाही?

लहान मुलांचा थोडाफार बालिशपणा, दंगा सहन केलाच जातो, अनेकदा एका मर्यादेपर्यंत कौतुकानेही. पण त्यांना आईबापाचा धाक आहे की नाही, व मुख्य म्हणजे आई-बापाची मुलांना आवरायची इच्छा आहे की नाही, ते पहिल्या ५ मिनिटात समजते.

तेव्हा असे दिवटे पाहुण्यासोबत असेल माझ्याकडेतरी स्पष्ट शब्दांत समज दिली जाते. की आपल्या चिरंजीवांना/राजक्न्येला आवरा.असे पाहुणे पुन्हा आले नाहीत तर उत्तम. राग येऊन त्या क्षणी माझ्या घराबाहेर पडलेत तर अती उत्तम.

त्यावर कुणी मला बालमानसशास्त्र सांगायचा प्रयत्न केला, तर मग अरेरे.. बिच्चारा/री !

पण त्यांना आईबापाचा धाक आहे की नाही, व मुख्य म्हणजे आई-बापाची मुलांना आवरायची इच्छा आहे की नाही, ते पहिल्या ५ मिनिटात समजते.<<< +१

तेव्हा असे दिवटे पाहुण्यासोबत असेल माझ्याकडेतरी स्पष्ट शब्दांत समज दिली जाते. की आपल्या चिरंजीवांना/राजक्न्येला आवरा.असे पाहुणे पुन्हा आले नाहीत तर उत्तम. राग येऊन त्या क्षणी माझ्या घराबाहेर पडलेत तर अती उत्तम.<<< Happy

त्यावर कुणी मला बालमानसशास्त्र सांगायचा प्रयत्न केला, तर मग अरेरे.. बिच्चारा/री !<<< Happy

>>>अशा शेफारलेल्या तुमच्या वाईल्ड टायगर, किंवा तुमच्या मालकांचा रुबाब तुमच्या घरी ठेवून येणे. तुमचे दिवटे कसे वागते ती तुमची जबाबदारी असते. तुमच्या घरात काय असेल ते असो, आमच्या घरी येऊन आम्हाला अपेक्षित तसे नीटच वागले पाहिजे.<<< ह्यातील मूळ विचाराशी सहमत.

सॉरी! मला इथे 'बेशिस्त'मुलांपेक्षा 'असंस्क्रुत' पालकांची उदाहरणे दिसत आहेत The apple doesn't fall far from the tree. तो ह्या बीबीचा विषय नाही.
>>
माझ्यासाठी हाच मुद्दा आहे. लहान मुलांना काय कळतं? आई वडील संस्कार करत नाहीत आणि त्यांच्या चुकांना पाठीशी घालतात हाच तर मुद्दा आहे.

रिया, तो तिखटाचा मुद्दा. तिखटाचा डबा लहान मुलाच्या हाती लागेपर्यंत सगळी मोठी माणसं कायं करत होती? त्यात तू पण आलीस. ते मूल स्वयंपाकघरात गेल्यागेल्या आधी त्याच्या आईने आणि ती अदरवाईज बिझी असल्यास इतर मोठे का त्याच्या मागे-मागे गेले नाहीत?
>>
आमच्या घरात लाल तिखटाचा डब्बा शेल्फवर (मांडणीवर) असतो. तो मुलगा असं काही करेल याची आम्हाला काय कल्पना? नेहमी तिथेच असणारा तो डब्बा (आमच्या घरात कोणीही लहान मुल नाही) तो येणार म्हणून आधीच उचलून ठेवायला हवा हे आम्हाला काय माहीत? Uhoh
आणि तो घर भर बागडत होता तेंव्हा कुठे कुठे त्याच्या मागे फिरणार? आमच्या किचन शेजारी बेडरूम आहे आणि त्याला गॅलरी आहे आणि त्यात झोका आहे. तो त्या झोक्यावर बसत होता... किती वेळ त्याच्या मागे फिरणार ना? तेही वाईट दिसलं असतं.
किचन आणि हॉल एकमेकांना लागुन असल्याने काही सेकंदाच्या अवधीत.. काय होतय ते आम्हाला कळायच्या आत त्याने ती कृती केली. त्याच्या आईने त्याला आधीपासुनच 'मुक्या जीवांना असा त्रास देऊ नये' हे शिकवलं असतं तर असं झालं नसतं.

त्या माशांच पुढे काय झाल? ते जिवंत आहेत का? (प्रश्नाचे कारण मला मासे/फिश्तँक बद्दल काहिही महिती नाही. ते जिवंत राहिले नसल्यास तू त्या मुलाला धपाटा घातल्याने ते मासे परत येणार होते का?
>>>
माझे मेलेच कारण बाबा घरात नव्हते आणि आम्हाला काय करावं ते सुचलंच नाही. आम्ही माश्यांना पटकन बाहेर काढलं पण काहीही न सुचल्याने ते गेलेच Sad
आणि ते परत येणार नसले तरी त्याने जे केलय ते चूक केलय आणि आमच्या घरात येऊन पुन्हा असलं काही केलं तर काय भोगावं लागेल याची झलक म्हणुन मी त्याला फटके दिले. त्यावर त्याने आरडा ओरडा करुन हात पाय झाडुन मला मारलच पण त्या गोष्टीचा त्याच्या आईला राग आला आणि ती त्यानंतर काही मिनिटात आमच्या घरुन गेली. मला हेच हवं होतं Angry
ज्याअर्थी (एवढी महत्त्वाची गोष्ट होऊनही) तुझी आई त्या बाईशी गप्पा मारण्यात रमली त्याअर्थी ते मासे तितकेच महत्त्वाचे असणार नाहीतर ह्या बाबतीत घरांतल्या मोठ्यांनी नक्कीच पुढाकार घेतला नसता का?
>>>
माझी आई कशाला रमेल अहो? Uhoh
तुम्ही हे चित्रं व्ह्युजुअलाईज करा ना.
आई आणि त्याची आई गप्पा मारतायेत.
त्याने तिखट टाकलं आणि मी 'अरे काय हे ओरडले' त्यावर त्याच्या आईने 'काय हे केलस तू' टाईप वाक्य फेकली आणि माझ्या आईला 'तर मी काय म्हणत होते..' म्हणून पुढचं सांगायला सुरुवात केली.
लगेच गप्पा झाडत नाही बसले ते. आई उठलीच त्यानंतर आणि पहायला आली काय झालं माश्यांना ते!
त्यानंतर मी त्याला दोन धपाटे दिले आणि आई आणि मी माश्यांना बाहेर काढुन एका बादलीत टाकायला लागलो. तेवढ्या वेळात तिच्या सुपुत्राने मला दोन गुद्दे घातले आणि भोकाड पसरलं आणि त्याच्या आईने बाळाचे डोळे पुसण्याचं काम केलं. आणि थोड्या वेळ 'बरं झालं बाई मासे काढलेत तुम्ही. आता पाणी बदलल की झालं 'टाईप्स वाक्य टाकली आणि नंतर चालती झाली आमच्या घरातुन.

आजीला मारणारे मूल -- त्याच्या घरांतले मोठे असेच एकमेकांची मारहाण करत असणार, मुलं अनुकरणप्रिय असतात.
>>
मुळ्ळीच नाही. गरजेचं नाहीये. ते मी वरती एक उदाहरण दिलय ना? त्या टाईप्स आहे हे.

दुसर्‍या लहान मुलाला मारणारे मूल -- लहान मूलांचे खेळ मारामार्‍यांचेच असतात म्हणून मोठ्यांचे लक्ष असावे ते काय करतात त्याकडे म्हणजे गोष्टी हाताबाहेर जाणे टळ्ते.
>>>
ये पॉईंट बिलकुल सही है, आपल्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर आई-वडिलांचं लक्ष हवंच!
मी ज्या बद्दल लिहिलय तो मुलगा लहान बाळांचे हात पिरगाळतो, दाबतो आणि हे त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आणुन दिलं की ते उत्तर देतात, ' मऊ मऊ लागत असेल ना त्याला? Uhoh ' अरे ओरडाना त्याला एकदा.. बाळ आहे ते.. कळत नाही का कसं होतं असेल त्याला. आम्हाला काय सांगता मऊ लागत म्हणुन करतो तो Uhoh

लहान मुलांना एखादा धपाटा घालायचा अधिकार माझ्यामते तरी आई,वडिल, आजी, आजोबा आणि इतर मोठी माणस जी त्या लहान मुलाच्या day to day upbringing मध्ये सहभागी आहेत त्यांनाच आहे इतरांना नाही. मुळांत लहान मुलांना मारणे हेच phyical abuse and abuse of power मध्य मोडते (माझ्यामते).
>>>
असेल पण माझ्या घरात येऊन माझ्या वस्तुंना, घरातल्यांना त्रास देणार्‍या मुलांबाबत त्यांचे आई वडील काही करत नसतील तर तो मुलगा माझ्या घरात असल्याने, ती वस्तु माझी असल्याने त्याला दोन चार धपाटे घालायचा आधिकार मी माझ्याकडे ठेवलाय.
ते नको असेल तर तुमच्या मुलांना ही माझ्याकडे आणू नका आणि प्लिज तुम्हीही येऊ नका हे माझं स्पष्ट म्हणणं असतं.

मुळांत लहान मुलांना मारणे हेच phyical abuse and abuse of power मध्य मोडते
>>
याबाबत तर मला काहीच बोलायचं नाहीये. मला हे पटत नाही. जोपर्यंत मला याचा त्रास होत नाही तोपर्यंत मी दुसर्‍यांच्या पटण्याबाबत काही बोलणार नाही. जेंव्हा मला त्रास होईल तेंव्हा मी सहन करणार नाही.

बाकी माझ्या मते शिक्षा म्हणजे फक्त मारणं नाही. त्या वेळेला माझ्या हातात , डोळ्यासमोर तीच शिक्षा दिसली म्हणुन मी ते केलं आणि त्याचा आजिबात अफसोस नाही.

माझे बाबा एक संस्क्रुत वचन नेहमी सांगायचे -- पांच वर्षापर्यंत लाड, आठ वर्षांपर्यंत ताड्न (मारणे) आणि सोळा वर्षांचे मूल झाले की त्याला/ तिला मित्राप्रमाणे वागवावे. त्याची सत्यता आता मला पटते आहे.

>>> इथेही मारणं आलंच ना? त्याच मारण्याबाबत बोलतेय मी.

अगो तुझ्या पोस्टला करोडो मोदक!
अगदी हेच्च म्हणायचय!

इब्लिसदादा तुम्हालाही अनुमोदन!
माझंही सेम असच आहे!

मीतान, ती एक हतबलतेतुन आलेली प्रतिक्रिया होती ग!
खुप जण हे उत्तर देतात. आम्ही मुलांची मानसिकता सांभाळतो, त्याचा विचार करतो म्हणून आम्ही त्याला ओरडत नाही.
त्यावेळेला काय बोलावं कळत नाही Sad
म्हणून तसं म्हणाले मी

बेफिकीर.:फिदी: मी स्वतच हसते, घ्या.

वरील घटना हास्यास्पद असली तरी अती झाले आणी हसू आले या सदरातली आहे. हेच सान्गावे वाटते की आपणच आब राखुन वागलो तर मुले सुधरतीलच. पण वर रिया ने सान्गीतल्याप्रमाणे मुलान्च्या आयाच जर लाडे लाडे गटात असतील तर मुले तसलीच निपजणार.

काही मुले हायपर अ‍ॅक्टिव्ह असतात, ती एका जागी बसुच शकत नाहीत. अशाना सान्भाळणे हे एक दिव्य असते. मितान सारखे वाचक यावर सवडीने प्रकाश टाकतीलच.

बेशिस्त मुलं हि बेशरम आई वडीलांचा( बेफींकडून उधार) आरसा असतो.

आपल्या घरी घाण न करणारी मुलं दुसरीकडे गेलीत की चपलांसकट चढून सोप्यावर बस. शोकेसमधल्या कार्स टॉय काढ वगैरे करणे म्हणजे आई वडीलांनी दुसर्‍यचया वस्तु मागू नयेत हे शिकवले नाही हेच लक्षण आहे. मुल अजिबात मागणार नाही जर तशी समज दिलीत तर. ( स्वानुभव आहे एकदम).
तेव्हा प्रॉबलेम , आई वडीलांचा आहे.
तेवढं शिर्षकात, " बेशरम आई-वडीलांना मुलांसकट कसे फुटवायचे" असे पाहिजे. Proud

(नुकतच एका बेशिश्त आई वडीलांच्यअ मुलाने महागडा शोपीस फोडला हे लक्षात आलेच असेल हा प्रतिसाद पाहून).

झंपी, अगदी अगदी गं!!!!!

माझ्या मैत्रिणीची मुलगी (परी, जिचा उल्लेख मी अनेकदा करते) चप्पल घालून स्वयंपाक खोलीत आली की माझा पारा चढतो. आमच्या घराचे काही नियम आहेत. नाही पटत तर नाहीच पटत. सगळ्या गोष्टी सहन करण्या जोग्या नसतात.
यात परीचा काही दोष नाही. तिच्या आईसमोर एकदा 'परी चप्पल घालून स्वयंपाक घरात येऊ नकोस' हे सांगितलं की पुढच्या वेळेस ते तिच्या आईने सांगावं अशी अपेक्षा असते. आणि ते होत नाही.
बर ही मुलगी इतकी सुसाट आहे ना... ती नाहीच ऐकत (आजीचे अति लाड) मग मीच दोन फटके देते पायावर. तीन चार वेळा फटके खाल्ले की पुढचे सगळे दिवस ती चप्पल बाहेर काढुन आत येते.
यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तिच्या आईला याचा आजिबात राग येत नाही. ती माझं ऐकत नाही, तू तुझं तिला ऐकायला लाव.. तुला हवं तसं' हा तिच्या आईचा पवित्रा!
आणि परीलाही माहीत आहे की इथे आपले वाट्टेल तितके लाड होतील पण काही गोष्टी नाहीच चालवून घेतल्या जाणार!

अशी मुलं परवडतात.... ती खुप त्रास देते पण तिला कोणी पाठीशी घालत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे तिचा त्रास होत नाही.

बाकी लहान मुलं गोडच असतात. त्यांच्या एकेका अ‍ॅक्टिव्हिटीचं कौतुक करावं अशीच! फक्त त्यांना नीट हँडेल करणं त्यांच्या पालकांना जमलं पाहिजे.

मी माझा पहिला प्रतिसाद संपादित करते आहे. मुलं ही आई-वडिलांची प्राथमिक जबाबदारी आहेत. बर्‍याचदा मी असं बघितलं आहे; आई-वडिलांना स्वतःच्या मुलांमुळे ओशाळवाणं वाटत. त्याबद्द्ल हे वाक्य आहे.

तेवढं शिर्षकात, " बेशिस्त आई वडीलांना मुलांसकट कसे फुटवायचे" असे पाहिजे>> +१ अथवा 'असंस्क्रुत' पालकांच्या बेशिस्त मुलांचे किस्से"

गप्पा बीबीच्या विषयाला धरून नाहीत.

मी माझा पहिला प्रतिसाद संपादित करते आहे. मुलं ही आई-वडिलांची प्राथमिक जबाबदारी आहेत. बर्‍याचदा मी असं बघितलं आहे; आई-वडिलांना स्वतःच्या मुलांमुळे ओशाळवाणं वाटत. त्याबद्द्ल हे वाक्य आहे.
>>
राजसी, पण बर्‍याच आई-वडिलांना असं वाटत नाही आणि ते 'मुलं आहेत ती.. अशी वागणारच!..' टाईप्स स्पष्टिकरण देतात.
अशा मुलांना कसं हँडल करावं अशी ही चर्चा अपेक्षित आहे इथे (मला तरी)
तुमची मुलं या कॅटगिरीत येऊ नयेत म्हणून काय करावं अशी चर्चा इथे अपेक्षित आहे.
हे कोनाला सांगावंसं वाटलं तर प्लिज सांगा.. मदत होईल!

अगोची पोस्ट या साठी समर्पक आहे.

बेफिकिर, त्या राजश्रीला तुम्ही खाली मैदानांत खेळायला घेऊन गेला असतात तर मला हा लेख वाचावा लागला नसता. Happy ती इतर मुलांबरोबर खेळली असती आणि तुम्हाला फ्क्त देखरेखीच काम उरलं असतं (हा फुकटचा वरातीमागून घोडे सल्ला पण 'नाहितरी तुमच्यावरच तिला खेळवायची जबाबदारी होती म्हणून).

मला तरी भयंकर राग येतो तो ह्याचा की हे कसे कळते काही मुलांना , आपल्या घरी घाण करु नये,दुसर्‍यच्या घरी चालते. कारण, त्यांचे आई वडीलच.

एक साधी गोष्ट नाही सांगत की, 'चपला बूट काढा दुसर्‍यच्य घरी', 'त्यांच्या घरी वस्तु मागु नका/हात लावू नका' म्हणून हि चीड आणणारी गोष्ट आहे. तुमचं असेल एकुलतं एक मूल, आम्ही कशाला आमच्या महागड्या वस्तु द्यायच्या...

(माझी आई, दुसर्‍यांच्या घरी काही खायला दिले तर मी आई सांगे पर्यंत खायची नाही असे सांगायची मला लहानपणी. व मी आधी आईच्या चेहर्‍याकडे पहायची. Happy )

पालक नुसतेच बेशिस्त नाही तर आम्ही किती ग्रेट बाकी कसे तुच्छ असे अविर्भाव आणणारे असतील तर मुले तशीच निपजतील. असा अनूभव दुर्दैवाने घेतलाय, अगदी जवळच्या लोकातच.

दुसर्‍याचे उणे दुणे सतत काढणे, वाद घालणे, विनाकारण कुजके बोलुन दुसर्‍याची मने दुखावणे हे काही लोक नित्यनेमाने करीत असतात. अशा पालकान्ची पुढची पिढी तशीच निपजली तर आश्चर्य नाही.

राजसी म्हणतात की इथे चाललेली चर्चा धाग्याच्या शीर्षकाला धरून नाही.

पण वरची रश्मी.. यांची पोस्ट वाचली की लक्षात येईल, की जो 'एक्झॅक्ट' विषय आहे तो त्यांना बरोब्बर समजलेला आहे Wink

असो.

आतापर्यंतच्या चर्चेचा सारांश असा आहे,
की कुणी कितीही काहीही (कैच्याकै लेखःकाकाले) लिहून सांगितलं, की अमुक ठिकाणी आमचे होस्ट फारच मवाळ हो! आमच्या राजपुत्रांनी केलेला गोंधळ पोटात घातला. मग मी त्यांना नंतर बोललो की याने त्रासच दिला ना? तर ते म्हटले, 'अहो, कसचं कसचं..' वर ते म्हटले, 'अहो नका टेन्शन घेऊ,' मग मीही म्हटलो, मुलं ना! ऐकतच नाहीत Lol
तर,
कन्क्लुजन १: ते तुमचे हापिसातले नोकर/ज्युनिअर/जात्याच नेमस्त आहेत
कन्क्लुजन ३:
पालक्/बाप्/आई म्हणून माझी जबाबदारी आहे की माझे मूल इतर ठिकाणी गेल्यावर नीट वागेल.
डायपर बांधता नं त्याला? नको तिथे नको ते करू नये म्हणून?
बहुतेकदा 'ऑकेजन' साठी नेसलेली साडी / ड्रेस खराब होऊ नये हा हेतू अस्तो, पण सोबतच जिथे जातोय तिथल्या गाद्या / सतरंज्या / मांड्या खराब होऊ नयेत हा साईड इफेक्ट असतोच ना?
थोडे मोठे झाले की टॉयलेट ट्रेन केलेले असते?
मग याच चालीवर, 'बाळा, नको तिथे "घाण" करू नये' हे शिकवणे कितपत जड जाणारे?

रच्यकने. *एडीएचडी इत्यादी पोपटपंची करणार्‍यांनी आपल्या अपत्याच्या सायकिअ‍ॅट्रिस्टचे 'अंडरट्रीटमेंट सर्टिफिकेट' दाखवावे, मी त्यास वाट्टेल ती घाण करायला देईन. चाईल्ड-सायकॉलॉजीत "सेल्फट्रेण्ड" असणार्‍यांना एकतर शिकवणी घेण्यात येईल, अथवा फाट्यावर मारण्यात येईल.

तात्पर्यःउर्फ सारांशःराजसीताईंकरता.
अहो, आतापर्यंतची चर्चा, अशा वागण्याची जबाबदारी पालकांची आहे हे स्पष्ट करण्यावर खर्ची होतेय. fixing the responsibility.
हे एकदा टाळक्यात घुसलं, तर अन तरच पुढे उपाय सुचवता येतात. searching for solutions Wink
शीर्षकातला बदल फक्त 'कसे' ऐवजी 'कुणी' इतका पुरे.

तसेच,

'मुलंच ती! वागणारच तसं!!' असल्या लॉजिकला,
'म्हाताराच मी. वागणारच मी असा' असे म्हणत मी, 'घे रे बाळा तो खिळा. चल त्या सॉकेटमधे घुसतोय का पाहू बरे?' असा 'बुद्धी नाठी' उद्योग केला तर?

कन्क्लुजन २ काय ते विचारूनये.

माझे कंडिशनिंग असे असेल की मुलाने काय हवे ते स्वतःच्या पालकांना सांगावे व ते ऐकून व ते योग्य वाटल्यास पालकांनी वेटरला सांगावे >>>>. सहमतच.
रिया,
तुझे सर्व प्रतिसाद छानच ग! आज लिहिलेला मोठा प्रतिसाद तर माझ्या मनातील विचार जास्त सुंदररित्या तू मांडलेस.

सर्वसाधारणपणे मुले मस्ती करणारच् / ती करायलाही हवी.पण नाकातोंडात पाणी जाईपर्यंत नकोच.
माझ्याकडे १ तीन-साडेतीन वर्षांची मुलगी सकाळ-संध्याकाळ नेहमी यायची. तिची आई मजेत सोडायची.एकदा
ऑफिसला जाण्यापूर्वी मोत्याच्या नवीन केलेल्या कुड्या,वगैरे बेडवर काढून ठेवले होते. ही बया केव्हा आत आली आणि कुड्या चावून मोती निसटवले.मी भडकले होते,पण लोकांच्या मुलीला हात कसा लावू म्हणून तिच्या आईकडे तिला सोडले.माझा चेहरा बहुतेक बोलका झाला असावा किंवा मुलीने सांगितले माहीत नाही,पण तिची आई परत आली आणि म्हणाली 'तुम्ही तरी अशा कुड्या बाहेर कशा ठेवल्या'.आणि घरी गेली. २ सेकंद मी बोलूच शकले नाही.इथे या मुलीपेक्षाही आईचा राग आला.वास्तविक पहाता तिने दिलगिरी व्यक्त करायला हवी होती.त्यानंतर रिपेरिंगचा खर्च विचारायला हवा होता.(जो त्यावेळी फक्त २० रुपये आला)

आमच्या परिचयात एकजण आहेत. त्यांचा मुलगा प्रचंड मस्तीखोर आहे. सतत आरडा ओरडा, उड्या मारणे, वस्तुंना हात लाव इ. त्याला खाऊ घालताना सतत मागे मागे फिरावे लागते पण हा ऐकेलतर शप्पथ! वय वर्ष ६. त्याच्या आईने त्याला बॅक्टेरीयाची भीती घातली आहे. Uhoh ऐकलं नाही की आई- वडिल म्हणतात 'Dont touch, तिकडे मोठा बॅक्टेरिया आहे' मग हा ती वस्तु सोडून दुसरीला हात लावणार. पुन्हा बॅक्टेरिया प्रकरण सुरू.
हे म्हणजे काहीही आहे असे मला वाटते पण असते एकेकांची पद्धत!

कन्क्लुजन १: ते तुमचे हापिसातले नोकर/ज्युनिअर/जात्याच नेमस्त आहेत >>> जे ब्बात!

तुम्ही तरी अशा कुड्या बाहेर कशा ठेवल्या >> ह्या वाक्यावर नीट विचार करावा असं मला वाटतं.समाजा त्या साडे-तीन वर्षाच्या मुलीने ती कुडी किंवा त्यातले मोती गिळले असते आणि तिला काही गंभीर इजा झाली असती तर?
मुलांबरोबर खेळायला मजा येते, विरंगुळा मिळतो आपल्याला. पण मुलं (आपली किंवा दुसर्याची) घरात आली की त्यांची जबाबदारी ही येतेच. ती नको असेल तर मुलांना घरात येऊ न देणे हे बरं.

सोहा+१

कुड्या चावलेल्या दिसल्यावर सर्वप्रथम मुलीच्या सेफ्टीचा विचार मनात आला की कुड्यांच्या किंमतीचा? नवीन कुड्या तुटल्याचं वाईट वाटणं समजू शकते, पण प्रथम किंवा एकूणच तितकंच ज्यांच्या मनात येत असेल त्यांनी मुलांना खेळवायच्या वगैरे फंदात न पडलेलं बरं.

मी चाळीत वाढले. तिथे कोणाचंही मूल वावगं वागताना दिसलं तर त्याला ओरडायची वा प्रसंगी एखादा धपाटा घालायची मुभा चाळीतल्या सगळ्या मोठ्या माणसांना होती. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे चाळीतल्या कोणाचंही मूल अडचणीत/धोक्यात आहे असं कुठेही दिसून आलं तर आपल्या पोटच्या मुलाइतकीच आस्थेने आणि तातडीने त्याची काळजीही घेतली जात होती.

मूल वेड्यासारखं वागलं तर त्याला स्थलकालपरिस्थितीनुसार सामदामदंडभेद कुठल्याही उपायाने मार्गावर आणावंच, पण ते आणताना/आणून झाल्यावर ते मूल आहे हा विचार मनातून हद्दपार होऊ नये. मला इथल्या सगळ्या तक्रारीच्या पोस्टींमधे का कोण जाणे हा भाग मिसिंग दिसला.

एखाद्यातरी पोस्टमधे "मी तेव्हा त्याला/तिला (जितक्या हक्काने) धपाटा घातला, पण नंतर (तितक्याच आपलेपणाने) जवळ घेऊन समजावलं की 'बाळा, असं केलं तर तुला किंवा इतरांना त्याचा त्रास होतो, तेव्हा तू असं करत जाऊ नकोस.'" असं वाचायला मिळेल असं वाटलं होतं. असो.

अगोची पोस्ट आवडली.

समाजा त्या साडे-तीन वर्षाच्या मुलीने ती कुडी किंवा त्यातले मोती गिळले असते आणि तिला काही गंभीर इजा झाली असती तर?>>>>> दुसर्‍याच्या घरात सकाळीच आपली मुले सोडू नये.(तिची आई घरात असे.पण मुलीला आमच्याकडे यावेसे वाटे.मी बोलवायला जात नसे,पण दारात आलेल्या मुलीला तू घरी जा असेही म्हणायला येत नव्हते.)ऑफिसला जाताना माणूस, कपडे ,दागिने इ.तयारी करतो.अशावेळी मुलीने पलंगावर एका बाजूला ठेवलेली कुडी तोंडात धरून चावली.मी,मोती निसटवले असे म्हटले परंतु सगळे मोती त्याच तारेत होते.पण तार वेडीवाकडी केली होती.माझा मुलगा तिच्यापेक्षा ६-७ महिन्यांनी लहान होता.तसेही सर्व मुले एकसारखी नसतात हेही खरे.तरीही मुलांना दुसर्‍याच्या घरी जाऊन त्यांच्या वस्तूंना हात न लावण्याची शिकवण दिली तर ही वेळ येत नाही.
त्यापेक्षा आईने दिलगिरी व्यक्त न करणे हे डोक्यात जाणारे आहेच.

कुड्या चावलेल्या दिसल्यावर आधी मुलीच्या सेफ्टीचा विचार मनात आला >>>> मोती तारेतून निखळ्लेले नव्हते.पण जाग्यावरून सर्व विस्कटलेले दिसले त्यामुळे मुलीच्या सेफ्टीचा विचार मनात कसा येईल? उलट एखादे मूल असे दुसर्‍याच्या घरी वागू शकते हेच मुळी त्यावेळी तरी मला न समजणारे होते.

Pages