क्रोशा कलाकृती

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 December, 2013 - 04:08

अवलच्या ऑनलाईन क्लास मध्ये नव्याने खालील प्रकार विणले.

१) अननसाच्या डिझाईनचा रुमाल.

२) खास पुतण्याच्या फर्माईशने बनवलेले हातमोजे.

३) चांदणी.

४) बाळाचे बुट (हे पायात घातल्यावर छान दिसतात)

५) स्कार्फ

अश्या अर्ध्या फोटोने क्रिकेटची बॅट वाटते. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू ही बहुतेक अवलच्या क्लासची टॉपर विद्यार्थिनी असावी... (बाकी कोणा विद्यार्थ्याने वाईट वाटून घेऊ नये - अवलने मागेच सांगितलंय - मेरे क्लासमे सभी नंबर वन है, सेकंड कोई आताच नही... Happy Wink )

कसले फास्ट शिकतीये सारे आणि किती कलात्मक आहे सारे ....

शशांकजी तुमच्या घरातली विद्यार्थिनी तर किती पुढे गेलेय. मला अजुन तिथपर्यंत पोहोचायचे बाकी आहे. Happy

पुरुषमंडळी अस क्रोशाच काम करताना दिसत नाहीत असे माझे निरिक्षण आहे. असली तर अगदी अपवादात्मक असतील. मी एसआरपी मधे असताना एक जवान लोकरीची मफलर करीत असे. त्याच्याकडे खिळ्यांची एक लाकडी पट्टी होती. त्याच्या आधारे फावल्या वेळात तो विणत असे. व्यसन करण्यापेक्षा हे केव्हाही चांगले असे त्याचे मत होते. माझी बायको क्रोशाच काही तरी करीत असते. ( क्रोशा म्हणजे लोकरीचे विणकाम हे ज्ञान मला हल्ली हल्ली मिळाले आहे)
पूर्वी मला एक प्रश्न पडत असे कि बाजारात या वस्तू मशीनवर केलेल्या मिळत असताना या बायका याच्यात फुकट वेळ का घालवतात.आता पडत नाही. निर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो हे समजायला लागले आहे.
जागू तुमच्या क्रोशाला शुभेच्छा ! Happy

मलाही हे विणकाम सूर करायचे आहे.

पन इंटर्नेट, फेसबूक, फोने ह्यापासून सुटक नाही. उगाच आपले टाईम्पास असतो हे वापरत.

त्यापेक्षा हे सूरु करावे.

Pages