जीवांची मुंबई - चित्रप्रदर्शन

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आमचे मुंबई या विषया वरचे "जीवांची मुंबई" हे समुहचित्र प्रदर्शन ७ ते १३ जानेवारी २०१४ दरम्यान नेहरु सेंटर कलादालन , मुंबई येथे प्रदर्शीत होत आहे , मायबोलीकरानी या प्रदर्शनाला भेट द्यावी ही विनंती.

1_1.jpg2_1.jpg
सहभागी चित्रकार
किशोर नादावडेकर,आनंद महाजनी,विक्रांत शितोळे, शरद तावडे, अजय पाटील्,पंकज बावडेकर्,साहेबराव हारे, अमोल पवार , डॅनिअल तळेगावकर, सुनिल पुजारी, उदय पळ्सुलेदेसाई,उमेश कवळे , श्रीकांत कशेळकर, कैलास अन्याल
या प्रदर्शनात माननीय श्री वासुदेव कामथ, श्री सुहास बहुळकर आणि श्री विजय आचरेकर हे सुद्धा पाहुणे चित्रकार म्हणुन सहभागी होणार आहेत्.त्यांचे प्रत्येकी एक चित्र प्रदर्शनात असेल.
1484026_10151788931916254_1291262287_o.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

या प्रदर्शनात मुंबईशी माझा चित्र विषय " मुंबईतील स्वातंत्र्य लढ्याशी, त्यातल्या नेत्यांशी, स्वदेशी चळवळीशी, त्यावेळी सुरु झालेल्या भारतीय उद्योग" यांच्याशी निगडीत आहे.

मुंबईत स्वातंत्र्यपुर्व काळातील अनेक नेत्यांचे वास्तव्य होते. यातल्या कित्येक जागांच्या आता खुणाही सापडणार नाहित किंवा काही जागांचे चित्र करणे अस्थेटिकली शक्य नव्हते. उदा. शिवाजी पार्क भागातील सावरकरांचे निवासस्थान आता अगदी टीपीकल चौकोनी इमारत झाली आहे, धनंजय किरांनी लिहलेल्या चरित्रात अनेक जागांचा उल्लेख आहे मात्र त्या जागा आता शिल्लक नाहित.
नेताजींशी संबधीत बटाटावाला चाळ मला सापडली नाही.
मात्र बाबासाहेब आंबेड्करांचे निवास्स्थान "राजगृह", लोकमान्य टिळक जिथे राहिले , केसरीचे मुंबई कार्यालय तो "सरदारगृह" लॉज आणि गांधीजी जेथे अनेक वर्ष राहीले ते "मणीभवन" सुस्थीतीत आहेत. त्यांची चित्र मी केली.
ऑगस्ट क्रांती मैदान ,चौपाटी (जिथे कॅप्टन भगिनींनी दांडी यात्रेवेळेस मिठाचा सत्याग्रह केला , टिळकांचे अंतिम संस्कार झाले), गेटवे ऑफ ईंडीया जेथुन इंग्रजांची शेवटची तुकडी १९४८ मधे भारताबाहेर गेली अशा अनेक जागाही मी चित्रीत केल्या.
स्वदेशी चळवळीशी निगडीत जागांचा मागोवा घेताना पहिल्यांदा विदेशी कापडाची होळी (१९२०?) केली ती एलफिन्स्टन मिल डोळ्या समोर्र आली , मात्र तेथे काही शिल्लक नाही. मग नंतर आताचे "बॉम्बे स्टोर" म्हणजे टिळकानी स्थापन केलेले " बॉम्बे स्वदेशी स्टोर" डोक्यात आले.
तसेच "हॉर्नीमन सर्कल" जिथल्या वडाखाली आशीया खंडातले पहीले स्टॉक एक्स्चेंज (आजचे BSE) सुरु झाले, किंवा वॉटसन हॉटेल जिथे भारतात पहिल्यांदा सिनेमा दाखवला गेला, तसेच तीथे प्रवेश नाकारला म्हणुन टाटांनी ताज हॉटेल बांधले असे सांगीतले जाते अशा अनेक जागा सापडल्या.
अर्थात जागे अभावी प्रदर्शनात सगळीच चित्र मांडता येणार नाहीत मात्र, या रेफरंसेसनी चित्र पाहिलीत तर त्याला अधिक अर्थ लाभेल. भेटुच

माझ्या चित्रांच्या विषया संबंधीत माहिती असलेला एक दुवा आज सर्च करताना साप्डला तो इथे डकवतोय , धन्यवाद
http://travel.cnn.com/mumbai/play/independence-day-mumbai-freedom-trail-...

या प्रदर्शनातली चित्रं इथे पोस्ट करण्याबद्दल काही मायबोलीकरांनी लिअहले होते. लोकप्रभाच्या ताज्या अंकात या प्रदर्शनावर एक चार पानी लेख आहे .त्यात काही चित्रांचा सामावेश आहे. त्या अंकाची वेब लिंक http://issuu.com/lokprabha/docs/10_january_2014_issue_for_web पान ७१ पासुन हा लेख आहे

छान

प्रदर्शन आज पासुन सुरू होतेय, मी ११:०० वाजल्या पासुन गॅलरीत असेन. उद्घाटन जरी ५:०० वाजता असले तरी जे मायबोलीकर येणार आहेत ते थोडं लवकर आले तर व्यवस्थीत बोलता , भेटता येईल.
तुमची उपस्थीती प्रार्थनिय.
अजय

उद्गाट्नाला आलेल्या सर्व मायबोलिकरांचे आभार.
भाऊ नमसकर यांनी सकाळी लवकर येऊन दिलेल्या प्रोत्साहना बद्दल आभार.
सानी, इंद्र्धनुष्य - शनीवारी दुपार नंतर येण्याचा प्रयत्न करेन , मात्र रविवारी पुर्ण दिवस मी तेथे असेन.
प्रदर्शना च्या उद्घाटना नंतर , मा.राजसाहेब ठाकरे , मा.वासुदेव कामथ, मा. सुहास बहुळ्कर , मा. विजय आचरेकर याच्या सोबत सहभागी चित्रकार
1_2.jpg2_2.jpg

प्रत्येकानं अवश्य पहावं असं देखणं प्रदर्शन ! पाटीलांच्या जलरंगातील चित्रांचा तर मीं फॅन आहेच. काल प्रत्यक्ष भेटून त्याना माझा सलाम रुजूं करतां आला हा माझ्यासाठी बोनसच !

असामी, भाऊ धन्यवाद
आजच्या मुंबई सकाळ मध्ये हे प्रदर्शन कव्हर केले आहे. माझ्या कडे नेट एडिशन उघड्त नाहीये पण त्यातही हा लेख असावा.

Pages