गज़ल - प्यालो नसेन आज मी (बदलून)

Submitted by शरद on 15 December, 2013 - 23:39

धागा संपादित केला आहे! धागा संपादित केला आहे! धागा संपादित केला आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होणार तेच होतसे, चुकले नसे कधी..
करतो कशास काळजी, रोजच्याप्रमाणे?

ठाऊक हे असे मला नसणार इथे तू..
आलो फिरत उगाच मी, रोजच्याप्रमाणे!

हे दोन सर्वात विशेष वाटले.

काल्पनिक आविष्कार

कविता वास्तवापासून कोस दूर असणे ही गंभीर समस्या आहे.
अनुभूतीचा स्पर्श नसलेली रचना वाचकांना अनुभव देऊन जाइल ही अपेक्षाही फोल ठरावी.
कबीराचे भाष्य मैं बोलू आखनदेखी समजून घ्यायला हवे.
पाहिलेलेच लिहायचे असा आग्रह नसला तरी त्याचा समज असण्याचा आग्रह गैर नसावा.

ठाऊक हे असे मला नसणार इथे तू..
आलो फिरत उगाच मी, रोजच्याप्रमाणे!

शेर आवडला.

रचनेविषयी म्हणायचे तर अप्सरा, नयनबाण घुसणे, उरातल्या जखमा वगैरे भडक वाटते.
गझल निश्चितच आवडली नाही.

समीर चव्हाण

अनुभूतीचा स्पर्श नसलेली रचना वाचकांना अनुभव देऊन जाइल ही अपेक्षाही फोल ठरावी.

गज़ल का दोन ओळींच्या कवितांचा गुच्छ असतो हे आपण जाणताच! त्या प्रत्येक दोन ओळींचा वेगळा अनुभव फक्त शब्दांमधूनच घ्यावा लागतो. या माध्यमात आपल्याला प्रतिक्रिया किंवा अवांतर भाष्य करायला आणि पहायला मिळते; त्याचा परिणाम कवितेचा आस्वाद घेण्यावर व्हायला नको. अनेक प्रतिसादकांप्रमाणे आपण ही अगोदरच्या प्रतिसादांचा परिणाम कवितेच्या रसग्रहणावर होऊ देत आहात.

कविता आणि कवी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेही आपण जाणता. प्रत्येक शब्द हा अनुभवातूनच आला असला पाहिजे असे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे. नाहीतर मग कल्पनाशक्तीला अर्थच राहिला नसता!

अप्सरा आणि नयनबाण या द्वीपदी भडक आहेत, जरुरीपेक्षा जास्त नाट्यमय आहेत. किंबुहना तेच त्यांचे सौंदर्यस्थळ आहे.

बाकी वैयक्तिक मतांतरे असतातच! Happy

समीरशी सहमत आहे.

शरदजी, प्रत्येक शब्द अनुभवा तूनच यावा असे समीर म्हणत नाही आहेत या कडे आपण लक्ष द्यावे. परकायाप्रवेश ही बाब सुद्धा लक्षात घावी.

भटसाहेबान्च्या स्त्री भुमिकेतून लिहिलेल्या गझल आणि गीते अद्वितीय ठरली आहेतच की.

असो....आपल्या याहून उत्तम गझल वाचल्या असल्याने या गझलेत काही मजा नाही आला राव....

ठाऊक हे असे मला नसणार इथे तू..
आलो फिरत उगाच मी, रोजच्याप्रमाणे!

जखमा उरातल्या पुर्‍या, झाल्या 'शरद' बर्‍या..
गेली भिजून का उशी, रोजच्याप्रमाणे?<<< वा

असो....आपल्या याहून उत्तम गझल वाचल्या असल्याने या गझलेत काही मजा नाही आला राव....>>> +१

कोनोलीची अस्सल गझल येऊद्या गाववाले! Happy