Submitted by डॉ अशोक on 13 December, 2013 - 11:12
शब्द-शब्द
जरी आसमंत सारा, हा स्तब्ध-स्तब्ध आहे
गुंजारव कानी करतो, तव शब्द-शब्द आहे
हे कसले चेटूक झाले, न कळे मजला काही
स्निग्ध तिच्या नजरेने, मी दग्ध-दग्ध आहे
मरणाचे सोडा आता, जगण्याने छळले आहे
श्वासाचीच भिती आता, मज अब्ज-अब्ज आहे
नशिब असे की मित्रांनी, लाजविले शत्रूंनाही
दोस्तांच्या या दोस्तीने, मी त्रस्त-त्रस्त आहे
लाख विनवण्या माझ्या, लाख "नको" झाले
पण एक तुझ्या "हो" ने, मी तृप्त-तृप्त आहे
ते पैलतीर दिसता, ऊरभेट तुझी व्हावी
ही एकच आस मनी, मज फक्त-फक्त आहे
-अशोक
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
लयच भारी..
लयच भारी..
धन्यवाद ! वैभव... काय झालं?
धन्यवाद !
वैभव...
काय झालं? लय, मात्रांचा हिशोब, खयाल कश्शा कशावर कॉमेंट नाही?
दुसरी द्वीपदी सर्वात विशेष
दुसरी द्वीपदी सर्वात विशेष वाटली.
ते पैलतीर दिसता, ऊरभेट तुझी
ते पैलतीर दिसता, ऊरभेट तुझी व्हावी
ही एकच आस मनी, मज फक्त-फक्त आहे<<< वा
वैभव...काय झालं? लय,
वैभव...काय झालं? लय, मात्रांचा हिशोब, खयाल कश्शा कशावर कॉमेंट नाही?<<<<<
गझल म्हणून पेश केली नाहीत म्हणून मी बोललो नाही पण गझल विभागात पेश केली नाहीत यावरूनच तुमचे तुम्हाला काय ते समजले आहे असे मी मानले काका
मस्त कविता !
मस्त कविता !
ऑ ? ऐसी बात है क्या वैभव-भाई
ऑ ? ऐसी बात है क्या वैभव-भाई !