अ‍ॅन्ड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर (शतशब्दकथा)

Submitted by कविन on 9 December, 2013 - 03:14

ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
ह्या वाक्यापाशी संपते "त्यांची" कहाणी.

सुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.
घरात लग्नाची बहिण आहे, समाज काय म्हणेल? पासून
"हाच तुझा निर्णय असेल तर आ‌ईबाप मेले समज"
इतपर्यंत विरोध करुन पाहिला दोघांच्याही घरच्यांनी

पण ही दोघे ठाम होती स्वत:च्या निर्णयावर.

तडजोडीशिवाय आयुष्य नाही हे त्यांनाही माहित होतं पण,
आयुष्यभर् मुखवटा चढवून नात्याला फसवत जगण्यासारखं दुसरं दु:खं नाही हे ही पटलं होतं.

इन्डीविज्युअल म्हणून चांगले असलो तरी एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही हे लक्षात आलं,
तेव्हा निभावून् नेण्याचं नाटक करायचं नाकारत ते वेळीच वेगळे झाले

म्हणूनच लिहिलं

ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
ह्या वाक्यापाशी संपते "त्यांची" कहाणी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लली, शैलजा Happy

सुरुवातीला

"इन्डीविज्युअल म्हणून चांगले असलो तरी एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही हे लक्षात आलं,
तेव्हा निभावून् नेण्याचं नाटक करायचं नाकारत ते वेळीच वेगळे झाले"...

ह्या दोन ओळी नव्हत्या लिहील्या. त्या ऐवजी इंडायरेक्टली संबंध लागेल अशा अर्थाच्या ओळी होत्या. त्यामुळे कदाचित तेव्हा वाचणार्‍यांचा थोडा गोंधळ उडला असावा.

आधी काय लिहिलं होतंस? पण पहिल्यांदा आत्ता मी वाचलं (प्रतिसाद न वाचता) तेह्वा "आयुष्यभर् मुखवटा चढवून नात्याला फसवत जगण्यासारखं दुसरं दु:खं नाही हे ही पटलं होतं" ह्या ओळीपाशी आल्यावरच अंदाज आला, आणि मग ते पुढे स्पष्ट झालं.

सुस्पष्ट ़कथा.

काही वाक्यांना वापरून वापरून त्यांचे संदर्भ पार धोपट झाले आहेत..
त्यामुळेच शेवटची कलाटणी भाव खाऊन जातेय

Nice job, Kave Happy

काही वाक्यांना वापरून वापरून त्यांचे संदर्भ पार धोपट झाले आहेत..
त्यामुळेच शेवटची कलाटणी भाव खाऊन जातेय

Nice job, Kave स्मित

>>>>>>>>>>>>>>

+७८६

अरे वा, फारच छान प्रकार आहे हा.
काही प्रतिसादांमधे "घटस्फोटाबद्दल" लिहिले आहे.
पण मला वाटते लग्नाआधीच असे ठरवले असावे की आपण या बंधनात पडायलाच नको.

प्रेम कोणी करेना का अशी फिर्याद खोटी
प्रेम लाभे प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी

Pages