'पितृऋण' - पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी काढलेली प्रकाशचित्रे

Submitted by हर्पेन on 7 December, 2013 - 07:53

पितृऋण या चित्रपटाचा पुण्यातील प्रथमखेळ, काल संध्याकाळी, कोथरूडच्या सिटीप्राईड सिनेमागृहात आयोजीत करण्यात आला होता.

या खेळास सौ. सुधा मुर्ती येणार असल्याची पुर्वसुचना मिळाली असल्याकारणाने, 'सिटीप्राईड' येथे जरा आधीच 'उत्सुकतेने मी पोहोचलो' Happy

अकु, स्निग्धा, इन्ना, मुग्धमानसी, मंगेश देशपांडे, साजीरा हे मायबोलीकर आलेले होते. एकमेकांशी ओळख-पाळख करून घेतली. अजूनही चित्रपटाशी संबंधित प्रसिद्ध चेहरा (आम्हाला माहीत असलेला) काही दिसेना, म्हणून मग आम्ही माबोकरांनी आपला(च) आपण(च) एक फोटो काढूया असे ठरवले.

१. तोच हा सुरुवातीचा फोटो

२. तितक्यात चित्रपटाचे दिग्दर्शक नितीश भारद्वाज ह्यांचे आगमन झाले. मग त्यांच्या सोबत फोटो घेतले.

मग हळूहळू एकेक माणसे येती झाली आणि आमचा कॅमेरा क्लिकक्लिकता झाला Happy

३. चित्रपटाच्या वेशभूषाकार गीता गोडबोले

४. चित्रपटाचे एक सह-निर्माते श्रीरंग गोडबोले

५. नितीश भारद्वाज

६. अकु आणि माधवी सोमण (माधवी सोमण यांनी चित्रपटात कजाग मामीची भुमिका अदा केली आहे.)

७.

८. आणि मग वरच्या मजल्यावर पोहोचताच दिसल्या सुधाताई, फोटो काढायसाठी विनंती केल्यावर त्यांनी लगेचच होकार भरला. त्यांच्याशी चार वाक्य बोलायची संधी, मी फोटो काढून झाल्यावर लगेचच साधून घेतली.

हा साजिर्‍याने काढलेला

आणि हा मी काढलेला

९. सुहास्यवदना सुधाताई

१०. मंगेश तेंडुलकर

<

११. आम्ही आत जात असतानाच सचीन खेडेकर यांचे आगमन झाले. (फॅशनेबली लेट) त्याकारणाने सचिन खेडेकर यांच्याबरोबर फोटो काढण्याची संधी माबोकरांना मिळालीच नाही.

१२.

चित्रपटासंबंधीत कलाकार व तंत्रज्ञ यांची ओळख करून देत असताना अथवा त्यांचे मनोगत व्यक्त करत असताना काढलेली काही क्षणचित्रे
१३.

१४.

१५.

<

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२. आणि हा अगदी शेवटी चित्रपटाचा खेळ संपल्यावर काढलेला, लास्ट बट नॉट लिस्ट, सौ. व श्री. कविता गाडगीळ यांच्या बरोबरचा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुधाताईंचा फोटो बघून सारखे वाटत होते यांना आपण भेटलोय.. नंतर लक्षात आले त्यांच्यात मला मृणाल गोरे यांचा भास होत होता. ( त्यांना मी भेटलोय )

छान फोटो. सगळी आवडती माणसं !

नशीबवान माबोकर्स!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुधा मूर्ती.... आईग्ग्ग्ग!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सह्ही आलेत बरका फोटो!!

vinayakparanjpe समजून घ्यायचे, नाहीतर उलगडून सांगायचे, 'मी काढलेले फोटो' असे लिहा म्हणून

धन्यवाद मुग्धमानसी इथे फोटो टाकल्याबद्दल Happy

@ विनायकः माझे म्हणजे माझ्याकडचे असे म्हणायचे होते मला.

पितृॠण या सिनेमासंबंधी थोडेसे.
'सुधा मुर्ती' यांनी लिहिलेल्या अनेक उत्कृष्ठ कादंबर्‍यांपैकी एका उत्तम कादंबरीवर आधारीत हा चित्रपट. सुधा मुर्ती यांची कादंबरी मी आधीच वाचलेली होती त्यामुळे हा सिनेमा पाहण्याची खूप उत्सूकता लागून राहिलेली होती.

संपूर्ण कादंबरी एका तीन तासांच्या कथानकात बसवायची असल्यामुळे कराव्या लागणार्‍या अपरिहार्य तडजोडी समजून घेतल्या तरी कादंबरीच्या मूळ कथानकाला सिनेमात अजिबात धक्का लागलेला नाही हे पाहून आनंद वाटला. सर्वांचे अभिनय छान झालेत. तनुजा तर अर्थातच उत्तम. मराठी अगदी अस्सल बोलायचा प्रयत्न तनुजाने मनापासून केल्याचे जाणवते. सुहास जोशींनीही उत्तम काम केले आहे.

कोकणातला निसर्ग आणि वातावरण छान टिपले आहे. काही ठिकाणी उत्तम चित्रिकरण झाले आहे. मात्र आलवण वगैरे नेसण्याच्या त्या जुन्या जमान्यात कोकणातल्या एका खेडेगावात नविन लग्न झालेल्या जोडप्याने समुद्रकाठी उघड रोमान्स करत गाणी-बिणी म्हणणे फार खटकते. काही दृष्य दाखवताना त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचे भान विसरले गेल्यासारखे वाटते हे खरेच.

मात्र काही दृष्य फारच छान जमली आहेत. उदा. भागिरथीचा भाऊ सेतूरावांना शोधत पुण्यात येतो तेंव्हा एका टांग्यातून जाणार्‍या माणसाजवळच्या रेडिओमधून डेक्कन क्वीनच्या अपघातात दगावलेल्यांची यादी कानात प्राण आणून ऐकण्यासाठी टांग्यासोबत धावतो आणि त्यात सेतूरावांचे नाव ऐकून कोसळतो... तो सीन अगदी अप्रतिम जमलाय. त्याचप्रमाणे शहरातला व्यंकटेश त्याच्या वडिलांची अंगठी घेऊन भागिरथीसमोर येतो तेंव्हा ती अंगठी ओळखूनदेखील ती ओळख व्यंकटेशला कळू न देण्यासाठी भागिरथी खोटं बोलते... या सीनमधला तनुजाने नजरेतूनच केलेला अभिनय... निव्वळ अप्रतिम!

मला हा चित्रपट आवडला. काही त्रुटी असल्या तरी एकूण परिणाम साधला गेला असे वाटले. मात्र कथानकाद्वारे अजून उंच भावनिक पातळी गाठता आली असती असे वाटून गेले.

आणि हो... माझ्या साबांना तर हा सिनेमा फार म्हणजे फारच आवडला बरं का!!! Happy

मस्त फोटोज् मित्रा. मुख्य म्हणजे सुधा ताईंशी भेट झाली. लकी आहेस यार.
आणि सुधा ताईंच्या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट म्हणजे पाहिलाच पाहिजे.

Pages