'पितृऋण' - पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी काढलेली प्रकाशचित्रे

Submitted by हर्पेन on 7 December, 2013 - 07:53

पितृऋण या चित्रपटाचा पुण्यातील प्रथमखेळ, काल संध्याकाळी, कोथरूडच्या सिटीप्राईड सिनेमागृहात आयोजीत करण्यात आला होता.

या खेळास सौ. सुधा मुर्ती येणार असल्याची पुर्वसुचना मिळाली असल्याकारणाने, 'सिटीप्राईड' येथे जरा आधीच 'उत्सुकतेने मी पोहोचलो' Happy

अकु, स्निग्धा, इन्ना, मुग्धमानसी, मंगेश देशपांडे, साजीरा हे मायबोलीकर आलेले होते. एकमेकांशी ओळख-पाळख करून घेतली. अजूनही चित्रपटाशी संबंधित प्रसिद्ध चेहरा (आम्हाला माहीत असलेला) काही दिसेना, म्हणून मग आम्ही माबोकरांनी आपला(च) आपण(च) एक फोटो काढूया असे ठरवले.

१. तोच हा सुरुवातीचा फोटो

२. तितक्यात चित्रपटाचे दिग्दर्शक नितीश भारद्वाज ह्यांचे आगमन झाले. मग त्यांच्या सोबत फोटो घेतले.

मग हळूहळू एकेक माणसे येती झाली आणि आमचा कॅमेरा क्लिकक्लिकता झाला Happy

३. चित्रपटाच्या वेशभूषाकार गीता गोडबोले

४. चित्रपटाचे एक सह-निर्माते श्रीरंग गोडबोले

५. नितीश भारद्वाज

६. अकु आणि माधवी सोमण (माधवी सोमण यांनी चित्रपटात कजाग मामीची भुमिका अदा केली आहे.)

७.

८. आणि मग वरच्या मजल्यावर पोहोचताच दिसल्या सुधाताई, फोटो काढायसाठी विनंती केल्यावर त्यांनी लगेचच होकार भरला. त्यांच्याशी चार वाक्य बोलायची संधी, मी फोटो काढून झाल्यावर लगेचच साधून घेतली.

हा साजिर्‍याने काढलेला

आणि हा मी काढलेला

९. सुहास्यवदना सुधाताई

१०. मंगेश तेंडुलकर

<

११. आम्ही आत जात असतानाच सचीन खेडेकर यांचे आगमन झाले. (फॅशनेबली लेट) त्याकारणाने सचिन खेडेकर यांच्याबरोबर फोटो काढण्याची संधी माबोकरांना मिळालीच नाही.

१२.

चित्रपटासंबंधीत कलाकार व तंत्रज्ञ यांची ओळख करून देत असताना अथवा त्यांचे मनोगत व्यक्त करत असताना काढलेली काही क्षणचित्रे
१३.

१४.

१५.

<

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२. आणि हा अगदी शेवटी चित्रपटाचा खेळ संपल्यावर काढलेला, लास्ट बट नॉट लिस्ट, सौ. व श्री. कविता गाडगीळ यांच्या बरोबरचा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो मस्त आलेत, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे माझी भाची 'माधवी सोमण' (माझ्या मोठ्या नणंदेची मुलगी) हिने ह्या चित्रपटात भूमिका केली आहे आणि तिचे फोटो बघून छान वाटले त्यासाठी धन्यवाद.

सर्वच फोटो आवडले, सुधा मूर्ती किती गोड हसतातना. मायबोलीकरांचे अभिनंदन.

मस्त फोटो. लकी यू ऑल की तुम्हाला सुधा मुर्ती यांना भेटायची संधी मिळाली. खूप प्रसन्न व्यक्तिमत्व आहे त्यांचं.

सुरेख आहेत रे फोटो .....

प्र चि १९, २० - एकाच फोटोत सगळ्यांना न बसवता - २-३ स्नॅपमधे बसवायला हवे होते .... Happy

अरे वा! आले का फोटू? छान लिहिला आहेस वृत्तांत आणि क्लिकक्लिकाट पण मस्तच!
इन्नाच्या लेकानेही अध्येमध्ये हौशी फोटूग्राफी केली आहे. Happy

माझ्याकडचे इन-मीन फोटो इथेच अडकवते. Happy

१. नितीश भारद्वाज

nitish2.jpg

२.
a2.jpg

३. आपले मायबोलीकर्स

a3.jpg

४. सुधा मुर्तींबरोबर मुग्धमानसीच्या साबा आणि साजिर्‍याचे हात Happy

a4.jpg

५. श्री. मंगेश तेंडुलकर

a5.jpg

६. हर्पेन + मंगेश तेंडुलकर

a6.jpg

७. श्रीरंग गोडबोले

godbole copy2.jpg

अरे वा अकु, मस्त आहेत सर्व फोटो .....

साजिरा यांच्या हातावरुन - साजिरे जे हात त्यांना ...... असे उगीचच आठवले Happy Wink

प्रीमियरच्या अगोदर सर्व कलाकार व चित्रपटक्षेत्रातील मंडळींना ओळखताना किंवा त्यांची नावे आठवताना माझी चांगलीच त्रेधातिरपीट उडाली होती! Proud माधवी सोमणांच्या बाबतीतही असेच झाले. त्यांचा चेहरा नित्यपरिचयाचा असला तरी नाव कोठे आठवतेय? त्यांना फोटोची विनंती केल्यावर त्यांनी लगेच पोझ दिली. मग जरा संकोचतच हर्पेनने त्यांचे खरे नाव विचारले. त्याही मोकळेपणाने माझ्याशी व हर्पेनशी नावाच्या गोंधळावरून बोलत होत्या. टिव्हीतील मालिकांमधील नावावरूनच अनेक लोक त्यांना हाक मारतात हेही त्यांनी मजेमजेत सांगितले.

नितीश भारद्वाजांना फोटोग्राफ्ससाठी विनंती केल्यावर त्यांनीही लगेच होकार दिला. मी म्हणाले, ''आम्ही सर्व मायबोलीचे लोक आहोत.'' त्यावर त्यांनी लगेच ''मायबोली.कॉम का?'' असे विचारले.

सुधा मुर्ती यांचा वावर अतिशय सौजन्यपूर्ण, हसतमुख होता. त्यांच्याशीही चार शब्द बोलण्याची संधी मिळाली.

माझ्या शेजारी बसलेली व्यक्ती हा मायबोलीकर मंगेश देशपांडे आहे हे मला चित्रपटाच्या शेवटी समजले! Proud मंगेश, सॉरी हां, तुझ्याशी एक शब्दही न बोलल्याबद्दल किंवा तुला 'मायबोली'ची ओळख न दाखवल्याबद्दल!
स्निग्धाला मी पहिल्यांदाच भेटत होते. साजिरा, हर्पेन, इन्ना व मुग्धमानसीला ह्या अगोदर भेटले होते.

चित्रपट ८ च्या पुढे सुरु झाला. तो सुरु होण्याअगोदर नितीश भारद्वाजांनी जातीने उपस्थित सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते मंडळींची ओळख करून दिली. सर्वांविषयी ते कौतुकाने भरभरून बोलले. सुधा मुर्ती व अभिनेते सचिन खेडेकरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तनुजाची सर्व आमंत्रित प्रेक्षक मंडळी मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होती. परंतु त्या शेवटपर्यंत येऊ शकल्या नाहीत त्यामुळे काहीजणांचा अपेक्षाभंग झाला असणार आहे.
मात्र पडद्यावरच्या त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सारी कसर भरून निघाली. Happy

मी, माधवीला (सोमण) कळवले, तिने लगेच मला मायबोलीबद्दल विचारले, तिने फोटो बघितले, तिला ते आवडले, मी आताच तिच्याशी फोनवर बोलले, जमल्यास मायबोलीची सदस्य हो असे मी तिला सांगितले.

चैत्राली जरा उशीर झाला खरा पण म्हणणं ऐकलंय बरं Happy

अंजू, सामी, शशांक धन्यवाद

सामी - सुधाताई ह्यांना भेटायला मिळाल्याबद्दल आम्ही खरोखरच भाग्यवान. प्रसन्नवदना अशा त्या जेव्हा समोर दिसल्या आणि त्यांच्याशी चार शब्द बोललो तेव्हा आपल्याच घरा-कुटुंबातील कोणा ज्येष्ठ व्यक्तीबरोबर भेटत आहोत असेच वाटले.

अकु - तू काढलेले फोटो नीट येत नाहीत असे तुझे म्हणणे अत्यंत चूकीचे आहे. सगळेच फोटो छान आलेत की

हर्पेन, अकु, मस्त आलेत फोटो Happy सामी, आम्ही खरचं लकी, सुधा मुर्तींना इतक्या जवळून बघायची आणि भेटायची संधी आम्हाला मिळाली.

आणि इन्ना, अकु, साजिरा, हर्पेन, मुग्धमानसी,मंगेश या मायबोलीकरांना मी पहील्यांदाच भेटले पण सगळेच जण इतक्या मोकळेपणाने बोलत होते की अस वाटलच नाही मी यांना याआधी कधीच भेटले नाहीये.

मस्त आलेत फोटो!
पितृऋण - अत्यंत सुंदर सिनेमा. तनुजा, सचिन खेडेकर आणि सुहास जोशी यांच्या सशक्त अभिनयाने तसेच कौशल इनामदार यांच्या कर्णमधुर संगीताने नटलेला. नितीश भारद्वाज यांचा पहिलाच दिग्दर्शनाचा प्रयत्न असूनही 'काकस्पर्श' ची आठवण व तुलना अपरिहार्य वाटावी यातच त्यांचे यश दिसून येते. निसर्गरम्य परिसरातली सगळीच दृश्ये नजरेला थंडावा देऊन जातात. या सर्वांमुळेच की काय, चित्रपटाची लांबी अजून थोडी असावी अशी रुखरुख वाटली. Happy

माझ्या करता ज्याला आयसिंग ऑन केक म्हणतात ते म्हणजे कविताताईंशी झालेली ओळख-भेट...

ज्या कोणाला (जर का) ह्या कोण असा प्रश्न पडला असेल त्यांनी
http://www.youtube.com/watch?v=R74XRKHIbFk हा व्हिडीओ बघावा आणि

खालील वेबसाईट्ला भेट द्यावी.
http://www.jeetaerospace.org/

आणि इन्ना, अकु, साजिरा, हर्पेन, मुग्धमानसी,मंगेश या मायबोलीकरांना मी पहील्यांदाच भेटले पण सगळेच जण इतक्या मोकळेपणाने बोलत होते की अस वाटलच नाही मी यांना याआधी कधीच भेटले नाहीये.>>>>> हा "मायबोली"चाच परिणाम ....

सुधाताई ह्यांना भेटायला मिळाल्याबद्दल आम्ही खरोखरच भाग्यवान >>>> अग्दी अग्दी...
त्यांचे मराठी बोलणे कानाला मोठं गोड वाटतं ...... (टी व्ही वरील मुलाखतीत जे ऐकले ते.... Happy )

माझ्या करता ज्याला आयसिंग ऑन केक म्हणतात ते म्हणजे कविताताईंशी झालेली ओळख-भेट... +१
सुधा मुर्ती पण अत्यंत साध्या , काठापदराची साडी, केसात माललेली २ चाफ्याची फुलं . त्यांना बघूनच छान वाटलं , अगदी ह्यांच्याशी बोलायला जाव का नको , बोलतील का अशी शंकाही आली नाही .

मस्त आलेत फोटो! दोन दिवसांपासुन कामाच्या गडबडीत टायपायला वेळच मिळाला नाही.
हापीसातून निघतानाच झालेला उशीर, त्यात हडपसर ते कोथरूड असा दिव्य रस्ता. त्यामुळे ७:३०ला पोहोचताना धाकधूक होत होती पण भारतीय प्रमाण वेळेनुसार ७:२०चा चित्रपट बरोबर ८ वाजता सुरू झाला. माझा मुख्य प्रश्न होता साजिर्‍याला ओळखायचे कसे पण त्याचा माबोचा टीशर्ट पाहून मी त्याला 'तुच सजिरा का' विचारून घेतले.
माबोकरांचे फोटोसेशन आधीच झालेले होते. पण माबोकरांशी गप्पा मारायला व ओळख करून घ्यायला फारसा वेळ मिळाला नाही कारण सचिन खेडेकर येताच जराशी झुंबड उडाली व खेळ सुरू करणार म्हणून सर्व आत गेले.
नितीश भारद्वाज यांनी ओळख करून देताच चित्रपट सुरू झाला. स्निग्धा व अकूंचे नट्यांच्या मेकप विषयींचे कॉमेंट्स तर ओल्या भेळेवरच्या शेवेसारखे मस्त ("खेड्यातल्या तरूण तनूजाची मिसमॅचींग नेलपॉलिश" #गोल्ड्न)!
मस्त वाटला सिनेमा. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम. संगीत मला यथा तथाच वाटले. प्रिमीयरची संधी दिल्याबद्द्ल माबोचे आभार Happy

प्रिमियर पहाणे ह्याची मजा काही औरच असते. मी मुद्दाम माझ्या लेकाला घेउन आले होते. त्याच्या पिढीच मराठीशी मायबोली म्हणून बोट थोड सैल झालय अस मला वाटत म्हणून हा खटाटोप. त्यामुळे इथे त्याच्या बाजूनी अनुभव मांडतेय.
हरिश्चंद्राची फॅक्टरी पासून मराठी सिनेमा पहायला सुरवात झाली त्याची. सचिन खेडेकर 'मी शिवाजी राजे .." पासून ओळखीचे झालेले अन आवडलेले देखिल. तनुजा म्हणजे काजोल्ची आई ह्यापेक्षा जास्त माहीत नाही. सुधा मुर्तींची पुस्तकं इंग्लिश मधून वाचलेली. कॄष्ण काका पण ऐकून माहिती , सिरीयल पाहून नाही. (ही इज अ डूड !) ह्या पार्श्वभूमीवर पुढचा सवाल.. पितृ ॠण म्हणजे काय? मी सोइस्करपणे, सिनेमा पाहिल्यावर नाही कळल तर सांगेन असा पवित्रा घेतला Happy
इन्टर्नेट्वर ची ओळख असलेल्या (ज्याची खरी नावही माहीत नाहीत अशा) लोकांशी तू बिन्धास्त गप्पा कशी मारतेस पासून सुरवात झाली पण उत्साहात माबोकरांचे फोटो काढता काढता तोही सामावला. Happy
सिनेमा आवडला. आलवणातल्या आजींना बघून, हे अजून असत का? केव्हा बंद झाल ,मग त्यामागे ५० वर्ष म्हणजे हिरोहिरॉइन टाइप समुद्रावरची गाणी असतील का? (हा प्रश्न त्यानी अगदी ह्याच शब्दात विचारला) . पण तेवढा भाग सोडला तर सिनेमा त्याला आवडला . पटला. १००कोटीच्या जमान्यात वेगळा वाटला,आवडाला देखील.

बाकी सखेंशी जाउन मी तुमचा फॅन आहे सांगणे, कविता गाडगीळ यांच्याशी ओळख ,सुधा मुर्तींचा साधेपणा अनुभवणे हे बोनस. Happy
माध्यम प्रायोजक म्हणाजे नक्की काय करते मायबोली ह्याच उत्तर संबंधित त्याला देतील का?

स्निग्धा व मी चित्रपटातील प्रत्येक तांत्रिक चुकेसरशी किंवा एखादी गल्लत दिसली की एकमेकींशी कुचकुचत, फुसफुसत होतो ते मंगेशलाही ऐकू गेलेलं दिसतंय! Proud

मंगेश, तूही फोटो काढलेस ना? मोबाईलवर तू काहीतरी रेकॉर्ड करत होतास ते पाहिले.

इन्ना, तुझ्या लेकाने सर्व चित्रपट पाहिला, त्याबद्दल प्रश्न विचारले, जाणून घेतले ह्याबद्दल त्याचे कौतुक! Happy
मला त्याचा 'काजोल येणार नाही?' वगैरे संवाद चालू असतानाचा चेहरा आठवतोय.

साक्षात जिप्सी माझ्या फोटोंना मस्त म्हणतोय, कोणीतरी मला चिमटा काढा Happy

इन्ना मस्त पोस्ट,

आधीच सांगायला हवे होते की यातले काही फोटो साजिरा आणि इन्नाचा लेक क्षितीज यांनी काढले आहेत.... (अर्थात त्यामुळेच माझे फोटो देखिल आले आहेत)

अजून एक प्रीमियर ! मायबोलीच्या शिरपेचात अजून एक तुरा अजून एका अभिरुचीपूर्ण सिनेनिर्मितीचा. चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे.
मस्त फोटो हर्पेन! सुधा मूर्ती, सचिन, नितीशजी सर्वांचे फोटो प्रसन्न सुंदर आलेत.माबोकरांपैकी ओळखीचे/ अनोळखी चेहरे तर्क करत करत पाहिले Happy छानच आलेत.

धन्यवाद भारतीताई आणि मानुषीताई Happy

सिनेमा देखिल मस्त आहे, जमेल तेव्हा नक्की बघा.

गेले ४-५ दिवस फिरतीवर होते त्यामुळे या धाग्यावर यायला उशीर झाला. पण मस्त वाटलं आज फोटोज बघून! मायबोलीमुळे मला या समारंभात प्रत्यक्ष सहभागी होण्याचं आणि साक्षात सुधा मुर्तींना समोरासमोर भेटण्याचं भाग्य लाभलं त्यासाठी मी मायबोलीची शतश: आभारी आहे.
एखाद्या सिनेमाच्या प्रिमिअर शो ला जाण्याची माझी ही पहिलीच वेळ असल्याने भांबावून गेले होते. त्यातून एवढी मोठी मोठी लोकं माझ्या आजूबाजूला एवढ्या सहजगत्या वावरत होती... जणू आपल्यातलीच एक असावीत! एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास होत होता. माझ्यासाठी तो दिवस अविस्मरणीय ठरला.
माझ्याकडेही बरेच फोटोज आहेत. ते मी उद्या टाकते इथे.

वॉव....नितिश भरद्वाज काय हँडसम दिसतात ना???? तुम्हाला कदाचीत हसु येइल...पण महाभारत जेव्हा सुरु झाले तेव्हा मी ५-६ वर्षाची होते...आणि मला अजुनही सर्व आठवत आहे तेव्हा बघितलेलं...आणि मी मम्मी ला तेव्हा नेहमी बोलायची ( हे आठवत नाही पण मम्मी सांगते ) की मी तिला सांगायची की या कृष्णा चा पत्ता शोधुन काढ..आणि मी मोठी झाली की माझं लग्न याच्यासोबत करुन दे......मला नितीश अजुनही खुप म्हणजे खुपच आवडतात...... Happy

अकु, मीही, बहुधा अर्धवट सिनेमा सोडून क्रॉसवर्ड् ची धन होणार ह्या बेतानी आले होते. पण क्षितीजनी आवडीनी पाहिला . Happy
अनिष्का Happy डूड इज द वर्ड.

इन्ना - क्षितिज तुझ्याबरोबर आला, फोटो काढले, संपुर्ण सिनेमा पाहिला, प्रश्न पडले / विचारले....
क्षितिज मस्तच आहे गं.

डूड इज द वर्ड.>>> अगदी अगदी

मुग्धमानसी - फोटोंची वाट बघतो..

Pages