मुंबई मॅरेथॉन

Submitted by गजानन on 2 December, 2013 - 06:24

नमस्कार!

यावर्षीच्या मुंबई मॅरेथॉन (१९-जाने) मध्ये कोणी पळणार आहे का? मी रन-पवई-रन (५ जाने.) मध्ये पळणार आहे. याआधी मी २००६-०७ च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेताना तुम्ही टाईम्ड रनर असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मी यंदा पवई मॅरेथॉनमध्ये पळणार आहे.

आणखी कोणी आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजानन, बरे झाले सांगीतलेस आता एकदम आकाशातून पुष्पवृष्टी झाली तर घाबरणार नाही Wink
धन्यवाद आडो, किशोर आणि पराग.. फोटो माहित नाही (पळताना कसे काढू?) पण वृत्तांत टाकेन नक्की... Happy

धन्यवाद भरत, मी पण गेले ४-५ महिने नियमितपणे सराव करूनच उतरतो आहे, माझ्यामते हा लेख छापायची योग्य वेळ सहा महिन्यांपुर्वीची होती.

मला वाटले होते की ऐनवेळची काय काय तयारी / खबरदारी घ्यायची त्याबद्दल असेल हा लेख...

आणि शुभेच्छा राहिल्याच की वो Wink

पाच तास __/\__ !!

गजानन, तुझा वृ पण मस्त... पळणार्‍या पायांचा फोटो सही आलाय!
ते जीव बुक्ककन बाहेर येण्याबद्दल लिहिलंयस, अगदी तसंच मला प्रबळगड चढताना झालं होतं.. Proud

मी सर्वसामान्य लोकांसाठी ५ वाजून ४० मिनिटांनी चालू झालेल्या स्पर्धेत भाग घेतला होता. माझा स्पर्धक क्रमांक होता ६०३३, निकाल इथे बघू शकता Happy

http://www.timingindia.com/results_page.php

धन्यवाद कविन, ललिता-प्रीती

आणि ५ तास तर ठीक आहे पुढची ३५ मिनीटे विसरून कसे चालेल तीच अचाट भारी असतात. Happy

वा वा फार भारी !
मनःपूर्वक अभिनंदन हर्पेन.. डिटेल वृत्तांत येऊ दे आता..
ह्यावर्षीची मुंबई मॅरेथॉन खूप छान झाली असं ऐकलं.

वा वा भारी, हर्पेन! अभिनंदन!
रच्याकने , पुण्या त हाफ मॅरेथॉन पळाल्यावर सायकल आली, आता तर पुर्ण मॅरॅथॉन झाली, काय बक्षिस दिलय ? (स्वतःलाच Happy )

अभिनंदन हर्पेन.

मुंबई मॅरेथॉनचं नियोजन/आयोजन कसं होतं ते ही वाचायला आवडेल.

वृत्तांत लिहायचा प्रयत्न करतो (इतके काही आहे सांगा/लिहायचे की कुठून कशी सुरुवात करू हेच कळत नाही)

मुंबई मॅरॅथॉनचे आयोजन चांगले असते असे नेहेमीच ऐकले होते, असे आधीच ऐकले की नाही म्हटले तरी अपेक्षा उंचावतात आणि मग थोडा तरी अपेक्षाभंग होतो, पण काल असे काहीच झाले नाही. आयोजन अत्यंत अप्रतीमच होते. Happy

आणि हो, सगळ्यांचे अनेकानेक धन्यवाद Happy
इन्ना - बक्षिस अजून ठरवले नाहीये... माबोकर मंडळी सुचवा बरे काहीतरी

हर्पेन, अभिनंदन!

आता मला पुढच्या वर्षी २१ किमीच्या अर्ध-मॅरेथॉनमध्ये पळायचा चेव यायला लागलाय. Happy

मी दुपारी टाकलेला अभिनंदनाचा प्रतिसाद कुठे गेला? की सर्वरच्या लहरीपणामुळे पोस्टच झाला नाही?

असो.... हर्पेन, अभिनंदन.

आमच्या ऑफिसचे लोक्स हाफ मॅरेथॉन पळाले.

Pages