मुंबई मॅरेथॉन

Submitted by गजानन on 2 December, 2013 - 06:24

नमस्कार!

यावर्षीच्या मुंबई मॅरेथॉन (१९-जाने) मध्ये कोणी पळणार आहे का? मी रन-पवई-रन (५ जाने.) मध्ये पळणार आहे. याआधी मी २००६-०७ च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेताना तुम्ही टाईम्ड रनर असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मी यंदा पवई मॅरेथॉनमध्ये पळणार आहे.

आणखी कोणी आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा शाब्बास गजानन! मस्तच अचिवमेंट! लिहिलंयही अगदी थरारक. Happy शुभेच्छा.

>> आणि शेवटी एकदाचा अंतिम खच्चा गाठला! हुश्श्य करायची वेगळी गरजच पडली नाही. पण त्यानंतर असं भारी वाटलं की ज्या टेकडीवर उभा होतो तिथून थोडासा हात वर केला तर आभाळालाच टेकेल! >>>>> क्या बात है!

शाब्बास गजानन!
जरा गंमत...तुमचं नाव गजानन असल्यामुळे कदाचित धावगती मंद असू शकेल...मारुती असं नाव असतं तर कदाचित पहिले आला असता. Happy

वेल डन गजा ! शर्यत पुर्ण केलीस हे महत्त्वाचे.. अभिनंदन नि मस्त वृ. सराव नियमीत चालू राहूदे ही शुभेच्छा !

गजानन, भारीच की राव!

ड-दुकान ते साऊथ अव्हेन्यू चालत आलो तरी श्वास घ्यायला नाक पुरत नाही, तोंड उघडले जाते. तू एवढा पल्ला गाठलास हे खरच खूप कौतुकास्पद आहे.

देवा, सहीच!! अगदी मीच मॅरेथॉन पूर्ण केल्यागत वाटलं. सराव सुरु ठेव. पुढल्या वर्षी आणखी माबोकर असतील. (अशी आशा आहे Wink )

मामी, rmd, नंदिनी, प्रमोद, यो, अन्जू, पराग, मयेकर, साती, अमा, केश्वे, माधव, हर्पेन, इंद्रा, मिलिंदा, पौर्णिमा, झकास, धन्यवाद! Happy

प्रमोद, गजगतीला असे कमी लेखू नका बर्का! फास्टेस्ट अ‍ॅनिमल्सच्या पंगतीत त्याचंही स्थान आहे.

भ्रमरा, असा कंसाचा आधार घ्यू नये. 'मी तरी असणारच' असं धडधडीत म्हणावं. Proud

बायदीवे, आमचा निकाल इथे आला आहे: http://www.rotary-lakers.org/rpr/results.php
माझा रेसिंग नंबर/बिब ११२७.
धावण्यात माझा क्रमांक १३७८ वा आला!
७६ मिनिटे ०८ सेकंद.

१९ जानेवारीला संकष्टी असल्याने आम्ही फक्त ' गजाननाचा ' मॅरेथॉन जप करायचे ठरवले आहे Wink

अमोल केळकर

मुंबई मॅरॅथॉन मधे भाग घेणारे आहे का कोणी अजून?

मी पुर्ण मॅरॅथॉन विभागात भाग घेतलाय. अंतर ४२.१९५ किमी. पुर्ण मॅरॅथॉन मधे पहिल्यांदाच सहभाग घेतो आहे, तरी सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाची गरज आहे.

आम्ही पुणे मॅरॅथॉनर्स क्लबचे सदस्य, उद्या रात्रीच मुंबईत मुक्कम ठोकणार आहोत. रवीवारी स्पर्धेच्या दिवशी आमचा (बाहीवर तिरंगा असलेला) भगवा टीशर्ट्स घालून पळणार आहोत. योजना अशी आहे की ज्यांचा स्पीड एक असेल अशा ग्रुपने एकत्र गाणी-बिणी गात (प्लीज नोट, गाणी ऐकत नाही, गाणी गात) घोषणा देत अंतर काटायचे.

(गाणी आयत्यावेळी सुचतील ती कुठलीही, आणि आमच्या घोषणा आहेत खुशीईईईईई से भागते रहो, मेड इन इंडीया)

तरी समस्त मुंबईकर मायबोलीकरांना ही नम्र विनंती की सर्वच धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धामार्गावर जातीने उपस्थित रहाता आले तर जमवावे(च).

स्पर्धेचे अंतर ५ असो की ४२, त्यात भाग घेणार्‍या माणसांच्या कसोटीचाच दिवस... पण मार्गावर सर्वस्वी अनोळखी माणसांच्या प्रोत्साहनामुळे पळणार्‍यांना किती बळ मिळते ते धावणार्‍या आम्हालाच ठाऊक...

स्पर्धा मार्ग इथे बघता येईल Happy
http://procamrunning.in/scmm/event/race-route-maps/

हर्पेन, पूर्ण मॅरेथॉन!!!!! हॅट्सऑफ टू यु ऑल!

सही! तुम्हाला भरभरून शुभेच्छा!!! Happy

मी त्यावेळी प्रवासात करत असेन. पण मी आकाशमार्गे तुम्हाला प्रोत्साहन देत राहीन! Lol

Pages