गजल

Submitted by दुसरबीडकर on 30 November, 2013 - 03:56

कोठुनी शिकले असे हेे विस्तवाने?
आतल्या आतून जळते मन पहाने..!!

ताठ मानेने जरा जगण्यास गेलो,
मोडले मज 'ताठ' पाहूनी जगाने..!!

गंध आयुष्या तुझा कळल्यावरी मग,
सोडला हेका कसा बघ अत्तराने..!!

प्रेम नुसते वाटण्याची गोष्ट नाही..
जाणले तर स्वर्ग आहे,बघ मनाने..!!

वायदा दुःखासवे कुठलाच नाही..
पण तरी हा सोबती असतो सुखाने..!!

भावनाही स्वस्त झाल्या फार आता
माणसांनी काढले बघ कारखाने..!!

दूर गेली फार तू कुठल्या कलेने?
तोडणे अवघड मला अंतर शहाणे..

श्री 'गणेशा' तोच माझ्या जिंदगीचा,
घेतला बघ श्वास जेव्हा काळजाने..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोठुनी शिकले असे हेे विस्तवाने?
आतल्या आतून जळते मन पहाने..!! "पहाणे" हवे

ताठ मानेने जरा जगण्यास गेलो,
मोडले मज 'ताठ' पाहूनी जगाने..!! द्वीपदी आवडली!

गंध आयुष्या तुझा कळल्यावरी मग,
सोडला हेका कसा बघ अत्तराने..!! द्वीपदी आवडली!

प्रेम नुसते वाटण्याची गोष्ट नाही..
जाणले तर स्वर्ग आहे,बघ मनाने..!! द्वीपदी खूप आवडली!

वायदा कुठलाच नाही ह्या दुखाशी,
पण तरी हा सोबती असतो सुखाने..!! 'दुखाशी हा शब्द खटकतो.

Happy

धन्यवाद शरदजी,अमुल्य प्रतिसादासाठी...'पहाणे त थोडा कन्फ्युज होतो..
'दुखाशी मध्ये दुः अस टाकल असता लगावलीत अडचण..
बाकी ..शिकतो आहे..गजल माझी उण्यापुर्या सहा महिन्याची मैत्रिण...त्यामुळे मैत्री घट्ट व्हायला वेळ लागेल थोडा..धन्यवाद..असचं प्रेम असु द्यावं... Happy

gooD