हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा खूप भिववतो
वर्षानुवर्ष विश्वासलो ज्यावर
तोच हल्ली घाबरवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा खिसा कापतो
दोन भा़ज्या जास्त खातोस रे हावरटा
असे म्हणून धमकावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा चिडवतो
गाडी घेतलीस काय रे साल्या म्हणून
हळुच इंधनाचे दर वाढवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा हिणवतो
९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत
५०% वाल्याला डोक्यावर बसवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा गंध पुसू पाहतो
नारळ फोडतोस का रे भाड्या म्हणत
लगेच अंधश्रद्धेचे लेबल लावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा गळफास लावतो
कधी शेतावर तर कधी शहरात
आत्महत्या करायला लावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा वस्त्र फेडतो
दिवस-रात्र-जात-धर्म निरपेक्ष
अब्रूहीन जगायला लावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा फितुर होतो
कधी स्वकीयांवर अत्याचार
तर कधी परक्यांना 'आधार' देतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा माझा इतिहास पुसतो
माझी तलवार म्यान करुन
इतरांची दाढी कुरवाळतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा धमकावतो
ताई माई अक्का म्हणत म्हणत
दर पाच वर्षांनी फसवतो
---------------------------------------------------
पण आता नाही घाबरणार
पंजाला नाही जुमानणार
निरुपयोगी अन् त्रासदायक अपेंडिक्ससारखे
त्याला कापून काढणार
---------------------------------------------------
- गप्पिष्ठ
कार्तिक कृ. ११
शके १९३५
अगदी चांगलीच आहे कविता.
अगदी चांगलीच आहे कविता. हुबेहुब आलय वास्तव. सुरेख!!! अभिनंदन!
धन्यवाद ह.बा. आपण उत्तम लेखक
धन्यवाद ह.बा. आपण उत्तम लेखक तसेच कवी आहात असे ऐकीवात आहे. आपली प्रतिक्रिया महत्वाची आहे.
उत्तम
उत्तम
कमळाला उपटायला "पंजाच"
कमळाला उपटायला "पंजाच" लागतो.....
पंजाची भीती वाटतेय म्हणून
पंजाची भीती वाटतेय म्हणून कापून काढणार तर काढ. शुभेच्छा तुला. पण नंतर तुझी अवस्था शोलेतल्या ठाकूरपेक्षाही वाईट होईल. ठाकूरकडे रामलाल तरी होता, तुझ्याकडं कोण आहे याचा विचार कर आधी. पंजा कापून काढण्यापेक्षा पुसायला कमळाचा वापर कर. भीतीही वाटणार नाही आणि कामही होईल. भारतीय जनता तेच करते.
छान
छान
छान कविता . कवी कमळसुतांचे
छान कविता .
कवी कमळसुतांचे अभिनंदन
कवी कमळसुतांचे अभिनंदन<<<
कवी कमळसुतांचे अभिनंदन<<<
Bharatiya, get well soon
Bharatiya, get well soon
पंजा स्वतःचा. स्वतःच तोडणार
पंजा स्वतःचा. स्वतःच तोडणार ...स्वतःलाच सांगतोयस.

गेट रामलाल सून
रामलाल म्हातारा होऊन मेला
रामलाल म्हातारा होऊन मेला सुद्धा. त्यापेक्षा तुम्हीच येता का? अनुभवी आहात म्हणून म्हटलं
झाली शाब्दिक चकमकींना सुरुवात
झाली शाब्दिक चकमकींना सुरुवात झाली
चष्मा न लावता शीर्षक वाचलं
चष्मा न लावता शीर्षक वाचलं तेव्हा "पंचा माझा" असं दिसलं... म्हणुन जास्तच उत्सुकतेने वाचु लागलो. पुढे कळलं नक्की काय ते. चांगली आहे.
मला आवडली कविता.
मला आवडली कविता.
"पंचा माझा" >>
"पंचा माझा" >>
अरे वा ! म्हणजे पंजाविना अडचण
अरे वा ! म्हणजे पंजाविना अडचण होणार हे आता तरी लक्षात आलं तुझ्या. तुला माणूसच पाहीजे ना ? तो जरा अर्धवट्, जरा मंदसा आणि जरा बधीर पाहीजे. म्हणजे क्षणात कविता लिहीणारा आणि कविता लिहीता लिहीताच शेवटी हात तोडावेसे वाटणारा असाच बघ.. आता असा नमुना (आणखी ) कुठं मिळणार नै का ? तरी तुला म्हटलं होतं कमळाचा वापर कर
आणि परवडत असेल तर हे ऑप्शन पण आहेत बघ. तुझं बजेट आणि निर्णय ठरलं कि हात खाली होईल..

(No subject)
सतत प्रतिसाद देऊन कविता वर
सतत प्रतिसाद देऊन कविता वर आणल्याबद्दल धन्यवाद.
कविता अन चर्चा अफलातून .
याला "चर्चा" म्हणतात तुमच्यात
याला "चर्चा" म्हणतात तुमच्यात ?
बराच सकारात्मक दृष्टीकोन आहे आपला
आवडली
आवडली
तो वरचा फोटो खरा आहे की
तो वरचा फोटो खरा आहे की कुठल्या सिनेमातला आहे?:अओ: बरेच झिंज्यापकाडे दिसतात त्यात. मला क्षणभर तो तो हात वर केलेला अमिर खान वाटला, म्हणजे फोटोशॉप वापरुन अमिरच्या जागी भलताच कुणी आलाय असे वाटले.:अओ:
कविता मात्र वास्तववादी आहे. बाकी भाष्य इथे नको. पद्यात गद्य कशाला.
रश्मी इतकं माहित नाही तुला?
रश्मी


इतकं माहित नाही तुला?
चेन्नई अई अई अई अई अई अई चेन्नई एक्सप्रेस मधला आहे तो पिक!
अगं रीया सॉरी पण मला खरच
अगं रीया सॉरी पण मला खरच आठवेना हा सीन. आम्ही गावाकडे चे. एक्सप्रेस बघीतला.मध्ये मध्ये लाईट गेल्याने जाम बेरंग झाला.काही सीन बघायला मिळाले नाही आणी टिव्हीवर बघायला अजीबात वेळ मिळत नाही.:अरेरे: टॉकीजमध्येच निवांत बघावा लागेल.
नेट बंद असल्याने व दौर्यावर
नेट बंद असल्याने व दौर्यावर गेल्यामुळे कविता आज वाचली
कवितेती सर्वच ओळींशी सहमत आहे.
नविन कमळ उमलत असेल तर आनंदच आहे. परंतु तेथेही चाललेली चढाओढ पुढे पंजाला उपयोगी ठरु शकते.
शुभेच्छा !
(No subject)
पंजा माझा अर्धा गाळात
पंजा माझा अर्धा गाळात गेला
२०१४ च्या तयारीतच त्याचा जीव गेला
थेट लिहिलेत कशाल्लाही न
थेट लिहिलेत कशाल्लाही न जुमानता वा
आवडली कविता
काही ओळी अनावश्यकरित्या रिपीट झाल्यात मात्र ते तसे केल्याने कविता पाल्हाळ लावते ते जे फार चांगले मानले जात नाही
(No subject)
Pages