पंजा माझा
Submitted by चायवाला on 29 November, 2013 - 02:00
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा खूप भिववतो
वर्षानुवर्ष विश्वासलो ज्यावर
तोच हल्ली घाबरवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा खिसा कापतो
दोन भा़ज्या जास्त खातोस रे हावरटा
असे म्हणून धमकावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा चिडवतो
गाडी घेतलीस काय रे साल्या म्हणून
हळुच इंधनाचे दर वाढवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा हिणवतो
९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत
५०% वाल्याला डोक्यावर बसवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
विषय: