युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेसन भाजून होत आले कि त्यात दूध टाकायचे ( किलोला अर्धा कप ) मिश्रण फसफसून वर येईल.
मग साखर मिसळली कि लाडू वळायच्या आधी बेसन, चपातीच्या कणकेसारखे खुप मळून घ्यायचे. मग लाडू मऊ होतात.

नाही, बेसन गॅसवरून उतरून जरा निवले कि पिठी साखर मिसळायची.. दूध मात्र बेसन गॅसवर असतानाच मिसळायचे. ( भांडे मोठे हवे कारण दूध टाकल्यावर बेसन फसफसून वर येते. )

सावरि२, दुसरा एक उपाय - कुठल्याही लाडवाला जमेल. लाडू मावेसेफ बोल मध्ये घेऊन अगदी थोडं साजुक तूप घालायचं अन ३० सेकंद ते मिनीटभर मावेत गरम करायचा. लहानच काय पण मोठे लोक पण मिटक्या मारत खातात. अप्रतीम चव येते. एकदा करून पहाच. बुंदी, बेसन लाडवांना तर तूपही तशी घालायची गरज नाही पडत.

वत्सला , हो नक्कीच कमी होईल साखर, तिखट, आंबट टाकलं असेल तर चव घेऊन हे अजून टाकव लागेल तसेच कोरडा वाटत असेल तर तेलही घालावं लागेल.

दिनेश बेसनाच्या लाडवात दूध? टिकतात का असे लाडू?
सई भरपूर तूप घालून मंद आचेवर बेसन भाजते. तिचे लाडू मऊ होतात मस्त.
(अ‍ॅक्चुली बसतात :फिदी:) पण चव... आहाहा स्वर्गिय. Happy

त्या गरम बेसनात दूध टाकले कि दूधातील पाण्याचा अंश निघून जातो. व्यवस्थित टिकतात असे लाडू.

योकुच्या पद्धतीने पेढे जर मावेत गरम करून घेतले ( खास करून कंदी पेढे ) तर अप्रतिम लागतात.

या दिवाळीला मायदेशातून आलेल्या फराळात कचोरी आणि बेसनलाडुचं घरी बनवलेलं पीठ या दोन जिन्नसांना मायक्रोवेव्हच्या मदतीने मार्गी लावलं.
कचोरी मावेला १० सेकंद गरम केली तर आतमधलं पुरण दुकानातल्या फ्रेश कचोरीसारखं यमी लागतं.
लाडूपीठात तूप घालून वळायची प्रेमळ सूचना होती. पण मावेला एक वाटीभर पीठ एखाद मिनिट गरम केलं तर थोड्ञा कोमट पीठाचे लाडू तूप न घालता वळले जातात.

मी यावेळेस बेसनात दुध टाकलेले माबोवर वाचुन. गरम दुध टाकलेले, बेसनही गरम होते तरी ते फसफसले नाही म्हणजे काहीतरी चुकले असेल. पण मला हे लाडू अजिबात नाही आवडले. माझे आधीचेच नुसत्या तुपातले बरे होते असे वाटले.

पास्तासाठी वगैरे टोमटो पेस्ट करुन घेते ती नेहमी आंबट होते. कितीही लालबुंद टोमेटो घेतले तरी आंबटपणा अजिबात जात नाही. सुप मध्येही नुसते टोमेटो घेतले तर आंबटपणा जाणवतो. साखर अजिबात न वापरता तो आंबटपणा कसा घालवावा हे सांगा.

सुपमधे एक बटाटा आणि थोडा भोपळा घातल्यावर आंबट अजिबात लागले नाही पण मग ते फक्त टोमेटो सुप रहात नाही ना...... कृ. साखर घालणे हा पर्याय सुचवु नका.

मी आत्ता भरतासाठी वांगी भाजली गॅसवर अन त्याचं तेल गळून गॅसबर्नर खराब झालंय. आता ते साफ कसं करू? पुढच्यावेळेस असं होऊ नये म्हणून काय करता येईल?

कोळाचे पोहे करून बघ धनुकली.
भन्नाट लागतात. इथे आहे पाकृ त्याची.

टो सू करताना बीट घालतेस का साधना कलरसाठी? त्याने थोडा आंबटपणाही आपोआप कमी होईल.

योक्या तेल? वांग्याला तेल चोपडून भाजतोस की काय वांगी?
की तुला वांग्याचा रस म्हणायचंय?
एक जाळी मिळते त्यावर ठेवून भाजल्यास बर्नर कमी खराब होईल.
फ्लेमचा भाग सोडून बाकी सगळीकडे अ‍ॅल्यु फॉइल लावून ठेव वांगे भाजताना म्हणजे ती काढून टाकली की काम झाले.

हो वाग्यांचा रस... फॉईलचा प्रयोग पाहीन नेक्स्ट टाईम. ती जाळी भांड्यांच्या दुकानात विचारावी लागेल. इथे दोन तीन दिवस झालेत मस्त भरताची वांगी दिसायला लागलीत.

साधना टोमॅटो सुपात खोबर्‍याचं दूध (इतका खटाटोप करण्याचा पेशन्स असल्यासच !!!!!!!!!) घालून बघ. मस्त चव येते. साखर घालायची गरज नाही.
सूपः थोड्या बटरवर किंवा लोण्यावर निर्लेपच्या कढईत टोमॅटोच्या मोठ्या फोडी झाकण ठेवून ३/४ मि. शिजवाव्यात. मिक्सीतून वाटून झाल्यावर नारळाचं दूध, हवं तेवढ्ं(म्हणजे जितकं पातळ हवं तेवढं) पाणी, जिरे पावडर मीठ घालून एक उकळी आणा. सूप तयार.

ती जाळी हायवेवरच्या फुड मॉल्समधे वैज्ञानिक वस्तू टाइपचे स्टॉल्स असतात ना तिथे मिळते नक्की. मी तिथूनच घेतलीये.
अरे हो आणि तू पुण्यात आहेस ना? मग तुबा आहे की लाख दुखोंकी एक दवा!! Happy

बीट घालते कधीमधी.

नारळाचे दुध नाही वापरले. करुन पाहते प्रयत्न.

खटाटोपाबद्दल - तसेही मी वेगळे दुध काढणार नाही, सरळ टोमॅटो मिक्सीमधुन काढताना थोडे खोबरेही घालेन आणि नंतर गाळून घेईन. टोमटोही मी नेहमी गाळून घेते, त्याच्या बिया मिक्सीत वाटल्या जात नहईत आणि मग दाताखाली येतात. (दुध काढण्याऐवजी सरळ खोबरेच वाटुन घ्याय्ची आयड्या नीच्या दोदोल रेसिपीमधुन साभार Happy )

पास्ता करतानाचा आंबटपणा कसा लपवू? मी रेडिमेड पास्ता सॉस वापरुन पास्ता केलाय आणि तो खुप चांगलाही झालाय. पण हे प्रकरण एकतर महाग कारण पास्ता सॉस ८० रुपये बाटली आणि एका वेळॅस अर्धी बाटली घातल्याशिवाय मजा येत नाही. शिवाय त्यात अजुन काय काय घातलेय माहित नाही. (मी आपली त्यातल्या त्यात शक्य तितके हेल्दी खाणे बनवण्याचा प्रयत्न करत असते). म्हणुन काल सॉस घरीच केला. पास्ता खुप छान झाला पण आंबट चव काही लपत नव्हती. थोडीशीच साखर घातली पण तरीही...

साधना माझी पास्ता सॉस फ्रॉम स्क्रॅचवाली रेस्पी देते तुला.
वरणातला पास्ता किंवा मंजूची विपु या ठिकाणी सापडेल कदाचित.

टोमॅटो बदल साधना.
टोमॅटोच्या काही जाती भयाण आंबट असतात. त्यांचा आंबटपणा त्यात दुनिया घातली तरी कमी होत नाही.
नारळाचं दुध (जास्त कॅलरी) वापरायचं नसेल टोमॅटोबरोबर कांदा-लसूण शिजव आणि एकत्र ब्लेंड कर. चार मोठ्या टोमॅटोंसाठी एक मोठा कांदा हे प्रमाण.

पास्ता सॉससाठी टोमॅटो वापरताना ओवनमधे भाजून घ्यायचे. गाजर, बेल पेपर, कांदा, लसूण ऑ. ऑ. परतायचे. बेसील, पार्सली, मीरे पूड वगैरे घालून सगळे ब्लेंडरमधून काढायचे.
बाकी बाहेरच्या पास्टा सॉस मधे बरीच साखर/ कॉर्न सिरप असते तेव्हा त्याच्याशी तुलना न करणेच चांगले.

मी अमेरिकेतल्या लोकांसाठी एक झटपट श्रीखंडाची युक्ती सांगू का? म्हणजे सुगरण लोकांना ती आधीच माहिती असेल पण तरी .. Happy
इंडो-पाक ग्रोसरीमध्ये(नुसत्या इंडियन ग्रोसरी मध्ये नाही मिळणार) लेबनी(lebani-kefir cheese) मिळतं. त्या डबाभर लेबनीत, अर्धी साखर घालून बाकी काय हवं ते(चारोळ्या, वेलची, जायफळ, केशर) नीट डावेने ढवळून फ्रीजमध्ये ठेवलं दुपारी २ च्या सुमारास आणि रात्रीच्या जेवणाला फर्स्ट्क्लास श्रीखंड तय्यार होतं.

मला असं वाटतय की ग्रीक स्ट्रेन्ड योगर्ट ने पण असच न टांगता झटपट श्रीखंड होइल.

शूम्पी आम्हीही गेली ३-४ वर्षं असंच इन्स्टंट श्रीखंड करतो. भारी लागतं.

बेसनाच्या लाडवाला बेसनात दूध टाकून फसफसवणं फार इम्पॉर्टंट स्टेप आहे! ते नाही केले तर मला बेला केल्यासारखं वाटणार नाही. Happy

Pages