दम आलू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 November, 2013 - 02:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो छोटे बटाटे
२ कांदे (किसुन)
पाऊण वाटी दही
२ टोमॅटो (गरम पाण्यात थोडा वेळ ठेउन साल काढून चिरून घ्या.)
२-३ तमालपत्रे
अर्धा चमचा जिरं
१ चमचा मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला
थोडी कोथिंबीर चिरुन
अर्धा चमचा हळद
चवीनुसार मिठ
गरजे नुसार तेल

क्रमवार पाककृती: 

बटाटे उकडून घ्या. अगदी लगदा होई पर्यंत उकडू नका. ते सोलून काट्याने त्याला हलक्या हाताने सर्व बाजूने टोचा.

हे बटाटे कढईत तेलातून तळून घ्या.

एका भांड्यात २ चमचे तेल गरम करुन त्यावर जिर, तमाल पत्र यांची फोडणी देऊन किसलेला कांदा खरपूस तळून घ्या.

आता ह्यात हळद, मसाला, गरम मसाला, मिठ, दही घालून ढवळून घ्या.

२-३ मिनीटांनी त्यात टोमॅटो व तळलेले बटाटे घाला. एक उकळी येऊ द्या.

उकळी आली की वरुन कोथिंबीर पेरा आणि गॅस बंद करा.

पेश आहे दम आलू.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाथी
अधिक टिपा: 

बटाटे मौ केलेत तर टोचताना तुटतात म्हणून बेताचेच शिजवा आणि तांबूस होई पर्यंत कढईत तळा.
दही अगदी आंबट नको. ताजे लावलेले असेल तर उत्तम.

माहितीचा स्रोत: 
पुस्तक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यो मी फक्त तिन दिवस मासे करते बाकिचे दिवस भाजीच असते. फक्त सगळ्या सरसकट रेसिपीज इथे दिल्या तर तुम्हीच कंटाळाल. Lol

लाजो चांगली आयडीया आहे मी पण करुन पाहेन.

सायो दही घालायचेय.

हमखास पाकसिद्धी पुस्तक.

सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

फोटो छान.
अर्धा किलो बटाट्यांना १ चमचा मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पूड १ चमचा गरम मसाला एवढाच मसाला?? तिखट कमी नाही वाटत का?

सस्मित त्यात गरम मसालाही आहे १ चमचा. आणि आपल्या आवडीनुसार तिखट घालू शकतो. आमच्या घरात तिखट कमी प्रमाणात लागते.

मी असे बरेच प्रकार बनवते. चायनिज तर चालूच असतात पण ते इथे आधी टाकलेले असतात त्यामुळे मी परत टाकत नाही. >>> जागु ( अरे !! मि कधि जागु बोलते तर कधि ताई ?? Wink ) आधी टाकलेले असले तरि तु टाकतजा ... फोटो बघ्रत बघत तुझी रेसिपि वाचायला मज्जा येते. .... Happy

Pages