Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 November, 2013 - 02:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
बटाटे उकडून घ्या. अगदी लगदा होई पर्यंत उकडू नका. ते सोलून काट्याने त्याला हलक्या हाताने सर्व बाजूने टोचा.
हे बटाटे कढईत तेलातून तळून घ्या.
एका भांड्यात २ चमचे तेल गरम करुन त्यावर जिर, तमाल पत्र यांची फोडणी देऊन किसलेला कांदा खरपूस तळून घ्या.
आता ह्यात हळद, मसाला, गरम मसाला, मिठ, दही घालून ढवळून घ्या.
२-३ मिनीटांनी त्यात टोमॅटो व तळलेले बटाटे घाला. एक उकळी येऊ द्या.
वाढणी/प्रमाण:
४ ते ५ जणांसाथी
अधिक टिपा:
बटाटे मौ केलेत तर टोचताना तुटतात म्हणून बेताचेच शिजवा आणि तांबूस होई पर्यंत कढईत तळा.
दही अगदी आंबट नको. ताजे लावलेले असेल तर उत्तम.
माहितीचा स्रोत:
पुस्तक
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला, रानभाज्या व्यतिरीक्त
हायला, रानभाज्या व्यतिरीक्त तुझी व्हेज पाकृ ? भारी !!
मस्तच!!! तोंपासु दिसतेय अगदी
मस्तच!!! तोंपासु दिसतेय अगदी
माधव किती ही मी भाज्यांबद्दल
माधव किती ही मी भाज्यांबद्दल कुप्रसिद्ध
मी असे बरेच प्रकार बनवते. चायनिज तर चालूच असतात पण ते इथे आधी टाकलेले असतात त्यामुळे मी परत टाकत नाही.
आदिती धन्स.
मस्त मस्ताड
मस्त मस्ताड झालेत........उद्या परवा कडे करुन बघणेत होईल......
मस्तच
मस्तच
मस्त !
मस्त !
तुझ्याकडुन मला चालेल अशी मस्त
तुझ्याकडुन मला चालेल अशी मस्त आलु दम ची रेसिपी..
मस्तच!
मस्तच!
जागु वाह! तोंपासु.. बटाटे डिप
जागु वाह! तोंपासु..
बटाटे डिप फ्राय करायचे का?
'दम' द्यायचा नाही का? मी करते
'दम' द्यायचा नाही का?
मी करते तेव्हा भांड्यावर झाकण ठेवून ते कणकेने सील करून दम देते. त्यामुळे, मसाला मस्त मुरतो बटाट्यांमध्ये. फोर्कने टोचलेले असतात, त्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो.
दक्षिणा, डिप फ्रायच करायचे बटाटे.
हो दक्षे डिप फ्राय. अनिश्का,
हो दक्षे डिप फ्राय.
अनिश्का, अविगा, अन्विता, अनुजा धन्स.
सुलेखाताई धन्स.
तुझ्याकडुन मला चालेल अशी मस्त
तुझ्याकडुन मला चालेल अशी मस्त आलु दम ची रेसिपी..>>>> +१
जागू, कधी येऊ?
वाह... तोंपासु......... मस्तच
वाह... तोंपासु......... मस्तच
एकदम डित्टेल वार पाकृ
एकदम डित्टेल वार पाकृ
तोंपासू
मस्त!!! तोंपासु
मस्त!!! तोंपासु
'दम' द्यायचा नाही का? >>> +१
'दम' द्यायचा नाही का?
>>> +१
जागू, बटाट्यांना दमात घे!
जागू, बटाट्यांना दमात घे!
मस्त पाकृ.
छानच ! आज आमच्याकडे पिकासाचा
छानच !
आज आमच्याकडे पिकासाचा प्रॉब्लेम आहे. फोटो दिसत नाहीत.
मस्त रेसिपी ! बटाटे
मस्त रेसिपी !
बटाटे उकडण्याआधीच टोचून मीठाच्या पाण्यात कांही वेळ बुडवून ठेवले तर ? तसं केल्यास << बटाटे मौ केलेत तर टोचताना तुटतात म्हणून बेताचेच शिजवा >> ही अडचण येणार नाही, असं वाटतं.
फोटो भारीच. आम्ही ग्रेव्ही
फोटो भारीच. आम्ही ग्रेव्ही जरा थिक करतो. कुठल्या पुस्तकातली आहे ही कृती?
ह्यात क्रिम वगैरे घालायचं
ह्यात क्रिम वगैरे घालायचं नाही का?
सही दिसतेय ग्रेव्ही. मी सेम
सही दिसतेय ग्रेव्ही. मी सेम ह्याच रेसिपीने करते. हॉकिन्सच्या भांड्याबरोबर ( बहुतेक हंडी) आलेल्या कुकबुक मधली आहे माझी रेसिपी.
अरे माझ्याकडे पण आहे ते
अरे माझ्याकडे पण आहे ते कुकबुक
एक्दम स्लर्प!! स्लर्प!!
एक्दम स्लर्प!! स्लर्प!! ...............
हायला जागुतै येकदम
हायला जागुतै येकदम बटाट्यांवर!!! मासे संपलेत का काय समुद्रात्ले!
झक्क पाकृ!
मस्त दिसताहेत दम आलू. कार्तिक
मस्त दिसताहेत दम आलू. कार्तिक मास चालू आहे म्हणून व्हेज स्पेशल का गं जागू
छान आहे रेसिपी <१ चमचा मसाला
छान आहे रेसिपी
<१ चमचा मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला>
हे दोन्ही मसाले वेगळे आहेत का ?
मी बटाटे तळून न घेता थोडा ऑइल
मी बटाटे तळून न घेता थोडा ऑइल स्प्रे मारून बेक करते... छान करपूस चव येते
.
.
जागुले........आर यू ऑलराइट?
जागुले........आर यू ऑलराइट? नाही म्हणजे एकदम बटाट्यांवर घसरलीस ती??????????
असो........ पाकृ भारीच!
Pages