एक इमारत सोळा मजली

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2013 - 13:56

एक इमारत सोळा मजली
एक फ्लॅट विकला गेलेला
मजूर पाणी मारत आहे
नग्न बायको नाहत आहे
मूल शेण ना माती समजे
चहा विके तो जाती समजे

पृथ्वी वेश्या झाल्यावरती
सुवासिनी परकर सावरती
योनीमध्ये रस पाझरतो
जेव्हा मी पदके अंथरतो
त्याच विटेला भेगा पडल्या
जिच्यामुळे भेगा सापडल्या

आहे ते, जे नाही आहे
नाही तेही काही आहे
कविता रोखा, सरिता होते
सरिता रोखा कविता होते
घाम तुझा गंधाळत आहे
नको तिथे मी भाळत आहे

तुझ्या स्तनांना हात लाव तू
ओठ स्वतःचे स्वतः चाव तू
पण पुरुषाचे कुरूपसे धड
ओबडधोबड मिळणे अवघड
हे कविते जर कवीच नसला
तर कवितेचा जन्मच कसला

ओहो कवयित्री सापडली
दारूलाही दारू चढली
उतरायाचे कारण नाही
परंपरेला कुंपण नाही
मग त्यांना कंटाळा आला
तेव्हा माझा चाळा झाला

पर्वतावरी सूर्य बुडाला
भीती नाही अंधाराची
एकच गिरकी घे वसुंधरा
दिसते आभा दिवाकराची

'बेफिकीर' उपलब्ध असावा
किंवा मी उपलब्ध नसावे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बी कळ्ळं नाय........

पुन्हा वाचून बघतो, थोड्या वेळाने.

ही कविता वाचून इतकंच म्हणावंसं वाटलं -

ऊंची है बिल्डींग
लिफ्ट तेरी बंद है
कैसे मैं आऊं
दिल रजामंद है

बाब्बो! दिमाग का दही हो गया. कसं काय सुचलं असेल बुवा? लई हाय क्लास आयटम आहे ह्यो कवी महाराज!
यमाचा रेडा बी म्हणू शकणार नाही ही सोळा मजली कविता(????)

पुण्यात काही दिवसापूर्वी गे, लिस्बेयनचा मोर्चा निघाला होता, त्याला अनुसरुन ही कविता असण्याची शक्यता आहे.

गामा साहेब,

काही प्रमाणात तशीच आहे.

सोळा शृंगार करून कवीची वाट पाहणारी कविता कवीला वेश्या वाटत आहे आणि शेवटी एकदाचा कवी येतो तेव्हा वाट पाहून कंटाळून कवितेने गिरकी घेतलेली असल्याने तिला नवाच सूर्य दिसू लागला आहे.

कालपासून विचार करत होते आत्ता उलगडली काही अंशी रसग्रहणासाठी गंभिर समिक्षकांना पाचारण करायला हवे.

-सुप्रिया.

माझ्या अल्पमतिला आणि अत्यल्प आकलनशक्तीला ही कविता सोसवत नाही; भावत नाही, समजत नाही, उलगडत नाही, पेलवत नाही! क्षमस्वः Sad

बेफिकीर,
पर्वतावरी सूर्य बुडाला
भीती नाही अंधाराची
एकच गिरकी घे वसुंधरा
दिसते आभा दिवाकराची

व्वा...

*** एकच गिरकी घे वसुंधरा ः- याचा अर्थ वसुंधरा एकच गिरकी घेत आहे असाच घ्यायचा आहे ना कि हे वसुंधरा, तू एकच गिरकी घे... असे म्हणायचे आहे.....

घेत आहे...साठी -घे- बरोबर वाटत नाही असे मला वाटते. असो.

मी वर उल्लेखिलेल्या चार ओळी आणि त्यावरील कवितेच्या ओळी यांमध्ये खूपच फरक जाणवला. वरच्या ओळी आणि त्यातील उल्लेख मला बोल्ड म्हणण्यापेक्षा हिडीस वाटले. वेगळ्या पद्धतीनेही लिहीता आले असते. अर्थात, शेवटी हे माझे मत आहे. तुम्ही काय लिहावे यावर मी काय बोलू....

शेवटी निर्णय कवीचा.