झटपट लाडु

Submitted by प्रीति on 18 November, 2013 - 10:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ डबा कंडेंस्ड मिल्क/मिल्कमेड
सधारण २ कप डेसिकेटेड कोकोनट
अर्धा चमचा तुप
खायचा रंग

क्रमवार पाककृती: 

एका पातेल्यात तुप वितळऊन, मिल्कलेड घाला. मिल्कलेड जरा गरम झाले की डेसिकेटेड कोकोनट घालुन व्यवस्थित मिसळुन घ्या. जरा गोळा होईपर्यंत डेसिकेटेड कोकोनट घालायचं. रंग टाकुन नीट मिसळुन, गॅस बंद करा. जरा गार झाल्यावर लाडु वळा.

वाढणी/प्रमाण: 
साधारण छोटे ३० लाडु
अधिक टिपा: 

ह्यात वेगवेगळे व्हेरीएशन करता येतील. आटवलेला आंब्याचा रस, पिस्ता पावडर, गुलकंद घालुन त्याप्रमाणे रंग घालवे. रंगीबेरंगी लाडु मस्त दिसतील.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत असताना देवळात जो महाप्रसाद असतो त्यावेळेस खाल्ले आहेत .चवीला छान असतात, दिसतात पण छान आणि करायला अगदी सोपे.