'जिप्सी'च क्लिक-क्लिक झालं !

Submitted by Yo.Rocks on 17 November, 2013 - 12:10

एरवी इतरांना क्लिक करणारा आपला मायबोलीकर, 'प्रचि'कार, 'थीम'कार म्हणजेच जिप्सी याचा विवाहसोहळा आज "भव्य" क्लिकक्लिकाटात पार पडला ! 'जिप्सी'च 'क्लिक-क्लिक' झालं.. !

मायबोलीकरांकडून देण्यात आलेले पोस्टर Happy - :

"मायबोली परिवारकडून चि. योगेश (जिप्सी) यांस विवाह बाफ सुरु केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !!"

"बघतोस काय रागानं, क्लिक केलय जिप्सीनं"
- -

मायबोलीरांनी दिलेले शुभेच्छा संदेश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी आणि सौ जिप्सी - अभिनंदन.
जिप्सी - तू कालच्या गटगला अनुपस्थित असल्याने आमचा एकही फोटो चांगला नाही आला, तरी बरे देव काकांनी त्यावर प्रकाश टाकून पाठवला. पण तुझे फोटो ते तुझेच फोटो. आता तू तुझ्या हायबरनेशन मधून (मी वनवास नाही म्हणत आहे बरं) कधी बाहेर येणार सांग पुन्हा एक गटग करू. खास तुझ्याकडून फोटो काढून घेण्यासाठी.

इतके दिवस आपण सर्वांनी निसर्ग आणी त्याच्या किमया पाहिल्या जिप्सीच्या नजरेतुन. आता त्या पाहुया सौ. जिप्सींच्या नजरेतुन. अभिनंदन जिप्सी आणी सौ. जिप्सी. नांदा सौख्यभरे.:स्मित:

ग्रेट न्युज!!!

श्री व सौ जिप्सी यांचे हार्दिक अभिनंदन!!! Happy
सुखी आणि आनंदी सहजीवनासाठी अनेकानेक शुभेच्छा आणि उत्तमोत्तम आशिर्वाद !!! Happy

जिप्सी अभिनंदन. तु आठवणीने बोलावलस. पण घरात अडचण होती रे !!!!

तुझ्या पुढल्या आयुष्या साठी शुभेच्छा....

शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!! (आम्हा दोघांकडुन ;-)).

होऊ दे खर्च" बोलून बोलून बेरक्या माबोकरांनी बिचार्या जिप्स्याला पार धुतला.>>>>:हहगलो:

मायबोलीकरांच्या याच धम्मालमस्तीमुळे मी माझा "लग्नसोहळा" एन्जॉय करू शकलो. Happy

ते रंगरंगोटीपासून स्टेजपर्यंत जाण्याचा प्रवास कायमचा लक्षात राहणार आहे. Wink Wink Proud

Pages