'जिप्सी'च क्लिक-क्लिक झालं !

Submitted by Yo.Rocks on 17 November, 2013 - 12:10

एरवी इतरांना क्लिक करणारा आपला मायबोलीकर, 'प्रचि'कार, 'थीम'कार म्हणजेच जिप्सी याचा विवाहसोहळा आज "भव्य" क्लिकक्लिकाटात पार पडला ! 'जिप्सी'च 'क्लिक-क्लिक' झालं.. !

मायबोलीकरांकडून देण्यात आलेले पोस्टर Happy - :

"मायबोली परिवारकडून चि. योगेश (जिप्सी) यांस विवाह बाफ सुरु केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !!"

"बघतोस काय रागानं, क्लिक केलय जिप्सीनं"
- -

मायबोलीरांनी दिलेले शुभेच्छा संदेश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

abhinandan ...

जिप्सी,

हार्दिक अभिनंदन!

पक्षी फिरती टिपती दाणे |
जिप्सी टिपतो चित्र तराणे ||
तराण्यांस त्या मिळता जोडी |
जीवनातही नवीच गोडी ||

जिप्सीणीला >>>> !

श्री जिप्सी आणि सौ जिप्सी या दोघांचेही हार्दिक अभिनंदन !!!

गड किल्ले राने वने फिरा आता जोडीने
नवे फोटो उमेदीने कॅमेर्‍याच्या साथीने

फ्लॅशचा लखलखाट कॅमेर्‍याचा क्लिक्लिकाट
सनई चौघड्यांच्या सुरात सीतेने धरला योगेशचा हात

पुनश्च अभिनंदन!

तुला चिडवण्याचा योग काल हुकला.. पण नंतर भेटू तेंव्हा ही कमी पुरी केली जाईल! Wink

Pages