'जिप्सी'च क्लिक-क्लिक झालं !

Submitted by Yo.Rocks on 17 November, 2013 - 12:10

एरवी इतरांना क्लिक करणारा आपला मायबोलीकर, 'प्रचि'कार, 'थीम'कार म्हणजेच जिप्सी याचा विवाहसोहळा आज "भव्य" क्लिकक्लिकाटात पार पडला ! 'जिप्सी'च 'क्लिक-क्लिक' झालं.. !

मायबोलीकरांकडून देण्यात आलेले पोस्टर Happy - :

"मायबोली परिवारकडून चि. योगेश (जिप्सी) यांस विवाह बाफ सुरु केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !!"

"बघतोस काय रागानं, क्लिक केलय जिप्सीनं"
- -

मायबोलीरांनी दिलेले शुभेच्छा संदेश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin तिथे जाऊनही पिडलं वाटतं जिप्सीला.

मस्त आहेस सगळे शुभाशिर्वाद!

जिप्सी आणि सीता ... अभिनंदन आणि शुभेच्छा. Happy

हे मी काल जिप्स्याच्या रिसेप्शनला ३.१५ ल गेले कोणी माबोकर होते का? मी ज्यांना चेहर्‍याने ओळखते त्यातील कोणी नव्हते.

जिप्स्याला आणि जिप्शीणीला शुभेच्छा...
प्लन करुनही हळद मिसली आणि प्लन केलं नाही त्यामुळे लग्न....

लग्नाला गेलेल्यांपैकी कोणीतरी सविस्तर वृत्तांत आणि प्रकश चित्रे टाका...
बराच हल्लाबोल केला सगळ्यानी .....( इति what'sup reporter)

प्र.चि. पाहिली नाहीत का what'sup reporter ची ?????

एनीवेज्स, मस्त धम्म्माल आली काल. लग्नातले जेवण मस्त होते, आइसक्रिमही मस्त होते.. भाज्यांचे डेकोरेशन अगदी सुंदर. कार्ल्याची मगर तर एकदम मस्त जमलेली.

आधीच जेवलेल्या माबोकरांनी रिसेप्शनच्या रांगेत पहिला नंबर धरुन ठेवलेला, त्यामुळे नवरा नवरी आल्यावर त्यांच्यावर पहिला हल्ला माबोकरांचाच झाला.. इतका गोंधळ, इतका आवाज, इतकी गर्दी.. हरे राम... जिप्स्याच्या काकांचा अगदी अंत पाहिला माबोकरांनी. अजुन दोन मिनिटे स्टेजवर राहिले असते सगळे तर काकांनी हाताला धरुन एकेकाला खाली उतरवले असते Happy

सियावर रामचंद्रकी जय च्या गजराने जरी माबोकरांनी हॉल दणाणुन सोडला तरी जिप्स्याने तो "सियावर" झाल्यानंतरही "योगेश"च राहणार आहे हे आधीच क्लिअर केलेय.....

जागु, खुप माबोकर होते काल लग्नाला.
नील, इंद्रा, कविन, रोहित एक मावळा, यो रॉक्स, विनय भिडे, सुन्या (कि सुर्यकिरण?) सहकुटुंब
निलु, मुग्धानंद, मी, केश्विनि, ललिता-प्रिति, नचिकेत, आनंदमैत्री.... (अजुन कोण होतं???)
मला वाटलेलं कि तुझि भेट होइल म्हणुन....

Pages