'सच' तो यही है!

Submitted by योग on 12 November, 2013 - 04:03

सचिन रमेश तेंडुलकर, बस नाम ही काफी है!

तरी देखिल सचिन, उर्फ साहेब, उर्फ तेंडल्या बद्दल गेली दोन दशके भरभरून लिहीले व बोलले गेले आहे आणि सचिन च्या शेवटच्या कसोटी सामन्या नंतर देखिल त्याचा संदर्भ वारंवार दिला जाईल यात शंका नाही. अगदी अलिकडे, सचिन च्या निवृत्तीवरून शंखनाद करणारे माझ्यासारखे त्याचे असंख्य चाहते देखिल आता सचिन खरोखरच निवृत्त होत आहे या जाणिवेने निश्चीतच थोडे गलबलले असतील. कारण तो आता मैदानावर खरोखरीचा पुन्हा दिसणार नाही हे कटू सत्य मात्र स्विकारावे लागेल. कपिल, सुनील ही दैवते माझ्या पिढीसाठी आधीच देव्हार्‍यात विराजमान झालेली असताना एक नविन देव असा साक्षात समोर घडताना बघणे आणि आयुष्याच्या सोनेरी कालावधीतील अनेक क्षण त्याच्या खेळीने अधिक ऊजळलेले अनुभवण्याचा याची देही याची डोळा साक्षीदार असल्याचा आनंद शब्दातीत आहे. ईतका की, अगदी टॉनी ग्रेग च्या शब्दकोशातील शब्द देखिल कमी पडतात.

घटना, तपशील, विक्रम, आकडेवारी, अशा अनेक परिमितीतून सचिन नावाच्या सूर्याची दैदीप्यमान कारकीर्द तपासली गेली असली तरी आजच्या पिढीतील सर्वार्थाने संपूर्ण अशा खेळाडूचा गौरव करताना निव्वळ खेळ, आकडेवारी, विक्रम यापलिकडे जाऊन काही गोष्टी नोंदवाव्याश्या वाटतात.

१. सर्वप्रथम एक ऊत्तम माणूसः मला वाटते सचिन ची ही ओळख सर्वात अधिक श्रेष्ट आहे. मुलगा, विद्यार्थी, पती, वडील, मित्र, अशा अनेक भूमिका साकारताना कधी कुठेही त्याच्या बाबतीत अशोभनीय ऐकले व बोलले गेलेले नाही. जवळ जवळ २५ वर्षाच्या कारकीर्दीत तेही भारतासारख्या क्रिकेट्वेड्या व प्रसार माध्यमांचा २४ तास दबाव असणार्‍या देशात ही गोष्ट जवळ जवळ लाखात एक आहे. कुटूंबवत्सल संस्कृती ही आजही भारतीय संस्कृतीचा प्रमुख आधार व ओळख मानली जाते. सचिन चे नाव त्याही बाबतीत आदरानेच घेतले जाते.

२. शिस्त, कार्यनिष्ठा, निगर्वीपणा: कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करणे व ते टिकवून ठेवणे यासाठी या तिनही गुणांची आवश्यकता असतेच. आचरेकर सरांचा एक आदर्श विद्यार्थी ते क्रिकेट चा एक जागतिक आदर्श Brand Ambassador या प्रवासात सचिन ने या तिनही गुंणांची कास सोडलेली नाही हे दिसून येते. १२ तास त्याच्या नेट सरावाच्या कहाण्या असोत; की एखाद्या विशीष्ट मालिके आधी वा प्रतीस्पर्धी गोलंदाजाविरुध्द तयारी करण्याचे किस्से असोत; किंवा वेळोवेळी ईतर ज्येष्ट खेळाडूंकडून सल्ला वा मार्गदर्शन घेणे असो; किंवा घरगुती अडी अडचणी वा दुखापतींवर मात करून पुन्हा मैदानावर भारतासाठी खेळण्याची व विजय मिळवून देण्याची धडपड असो. या प्रत्येक गोष्टीत सचिन ची कार्यनिष्ठा व खेळाबद्दल असलेले अपार प्रेम आणि आदर या बाबींचा कायम हेवा वाटतो.

३. मैदान व मैदानाबाहेरील वर्तणूकः खरे तर क्रिकेट चा खेळ हा आता 'जेंटलमन गेम' राहिलेला नाही. बदलत्या कालानुसार सर्वच संघांच्या व खेळाडूंच्या मैदानावरील वर्तणूकीत आक्रमक बदल झालेले दिसून येतात. त्यातही तुफान गोलंदाजी बरोबरच शिवीगाळीचे तुफान माजवणार्‍या काही विशीष्ट संघांनी या आगीत तेल ओतण्याचे काम निश्चीत केले. अशा माजलेल्या संघांच्या "अरे ला कारे" म्हणण्याची हिंमत व धडाडी दाखवणार्‍या गांगुली उर्फ दादा च्या भारतीय संघावर खूष असलेला तोच क्रिकेटवेडा भारतीय प्रेक्षक मात्र सचिन च्या निव्वळ बॅट कडूनच ती अपेक्षा करत असे यातच सर्व काही आले. त्या अनुशंगाने, मैदानावर अशा गोष्टींमध्ये मात्र सचिन फारच क्वचित वेळा सहभागी झालेला आहे. त्याच्या सर्व भावना या त्याच्या बॅट मधूनच व्यक्त झालेल्या आहेत. मग ते शोएब अख्तर ला २००३ च्या क्रिकेट कप मध्ये षटकार मारणे असो; शारजाह वाळवंटातील १९९८ च्या त्या फेमस "डेझर्ट स्टॉर्म" सामन्यात वॉर्न, फ्लेमिंग, कास्परॉविझ कंपनीला ठरवून बदडून काढणे असो; वा एखाद्या गोलंदाजाला जाणिवपूर्वक ठोकणे असो. मैदानाबाहेर शेन वॉर्न सकट जवळ जवळ सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंनी सचिन एक ऊत्तम मित्र व सौहार्दपूर्वक वागणारा नम्र मनुष्य आहे असे वेळोवेळी नमूद केले आहे. अन्यथा, पैसा, प्रसिध्दी, यश, या गोष्टी अक्षरशः पायाशी लोळण घेत असताना डोके जागेवर ठेवून व पाय घट्ट जमिनीवर ठेवून राहणे आणि आपल्या मूळ संस्कार व संस्कृतिशी असलेली नाळ कायम ठेवणे हे भल्या भल्यांना देखिल जमलेले नाही.

४. ध्यास आणि अभ्यासः आपण भारतीय मुळात दैववादी आहोत. लताबाईंचा जन्म हा गाण्यासाठीच, किंवा झाकीर हुसैन चा जन्म तबल्यासाठीच, बाबा आमटेंचा जन्म समाजकार्यासाठीच, याच दृष्टीकोनातून आपण अनेक नामवंत व किर्तीवान कलाकार वा आदी समाज प्रभृती यांकडे पाहत असतो. बरेच वेळा या लोकांनी ऊपसलेले कष्ट, त्यांची जीवापाड मेहेनत, ध्येयपूर्तीसाठी केलेले त्याग, ई. सर्वाचा आपल्याला विसर पडत असतो. निव्वळ यश आणि अपयश याच दोन तागड्यांच्या तराजूत आपण त्यांचे मोजमाप करत असतो. पण क्रिकेट हाच निव्वळ ध्यास, हेच एक वेड, आणि त्याच्या ध्येयपूर्ती साठी जे जे आवश्यक ते ते सर्वदा करण्याची सचिन ची वृत्ती त्याच्या ईतर समकालीन क्रिकेट्पटूंपेक्षा निश्चीतच अधिक ठळकपणे समोर येते. अन्यथा मैदानाबाहेरील जाहिराती, समारंभ, रंगीबेरंगी आयुष्य, संधी, आमिषे, ई. च्या गदारोळात अनेक गुणवान व पारंगत खेळाडूंच्या कारकीर्दीचा धुव्वा ऊडालेला आपण पाहिलेला आहे. सचिन चा जन्म क्रिकेटसाठीच हे जितकं खरं आहे तितकच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक खरं आहे ते सचिन च्या २४ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीमागील त्याचा निरंतर ध्यास आणि सतत अभ्यास.

५. देशप्रेम आणि संघभावना: क्रिकेट हा खेळ ११ खेळाडूंचा आहे. संघभावना नसेल तर तर ब्रायन लारा सारखा देव देखिल विंडीज चे पानिपत वाचवू शकत नाही हा इतीहास आहे. संघाचा विजय आणि देशाचा विजय याच दोन गोष्टींना सचिन ने कायम मह्त्व दिले आहे. वैयक्तीक हेवेदावे, राजकारण, पूर्वग्रहदूषीत वागणूक अशा अनेक गोष्टि आपण मैदानावर व मैदानाबाहेर बघत असतो. यास भारतीय संघाचे अनेक कर्णधार देखिल अपवाद नाहीत. पण या सर्वात, सर्व संघ सहकार्‍यांकडून सारखाच आदर, प्रेम, व मित्रत्व लाभलेल्या सचिन चे संघातील स्थान म्हणूनच विशेष वेगळे ठरते. आणि अत्यंत प्रतीकूल परिस्थितीत देशाच्या सीमेवर ऊभे राहून देशाचे रक्षण करणे म्हणजेच केवळ देशप्रेम व देशनिष्टा एव्हडीच मर्यादीत व्याख्या असेल तर करोडोंच्या देशात मूठभरच देशप्रेमी ठरतील. किंबहुना, आपल्या दैनंदीन व्यवहारातील वर्तणूक सुध्दा आपल्या देशप्रेमाची व निष्टेची साक्ष व निकष ठरू शकते हा दृष्टीकोन ठेवला तर स्वताबरोबरच अखिल समाजाचे व पर्यायाने देशाचे कल्याण होण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा, सचिन चा मैदानावरील खेळ, त्याची वागणूक, हे सर्व "आधी देश, आधी संघ" मग ईतर सर्व याची साक्ष पटवणारा आहे यात दूमत नसावे.

क्रिकेट नंतर चरीतार्थासाठी काय? असले कूट प्रश्ण त्याला पडण्याची शक्यता कमी असल्याने त्याचे रूपांतर पैशापासरी समालोचक वा समीक्षक यात होणार नाही हे निश्चीत. क्रिकेट जगतातील सर्वात बलाढय व धनाढ्य क्रिकेट मंडळाची तळी ऊचलून धरण्याची देखिल त्याला व्यावहारीक गरज नसल्याने एकंदरीतच क्रिकेट च्या बाबतीत आजतागायत त्याने राखलेला संतुलीत व आदरयुक्त दृष्टीकोन याही पुढे तो कायम ठेवल अशी आशा ठेवायला भरपूर वाव आहे. खासदारकीचा मंच व क्रिकेट जगतात कमावलेले स्थान याचा वापर करून खरे तर भारताच्या क्रिकेट च्या भविष्यासाठी (खेळाडू, खेळ, समिती, ईत्यादी) सचिन ईतरांपेक्षा निश्चीतच खूप काही अधिक करू शकतो.

सचिन च्या कारकिर्दीचा सूर्य आता लौकीक अर्थाने मावळतीस लागला आहे हे खरेच. मात्र त्याच्या कारकिर्दीतील अनेक क्षण, अनेक घटना, हे पुढील अनेक दशके कायम तेजस्वी राहतील यातही शंका नाही. शेवटी सचिन हा आपल्या सारखाच हाडा मासाचा जिवंत मनुष्य आहे. घर, संसार, व्यावसायीक अशा सर्व क्षेत्रातील अडी अडचणी, चढ, ऊतार हे सर्व त्यालाही चुकलेले नाही. खरे तर शाब्दीक टीका, निंदा, आरोप, हे सर्व ईतर सर्वांपेक्षा अनेक पटींनी त्याच्या वाटयाला क्वचित अधिक आले आहे. करोडो क्रिकेटवेड्या भारतीयांच्या देशात सदैव अपेक्षा व आकांक्षांचे ओझे पाठीवर घेऊन मैदानात ऊतरणार्‍या सचिन ला चूक आणि बरोबर याच कायम नाण्याच्या दोन बाजूंच्या निकालास सामोरे जावे लागले आहे. आजही व भविष्यात देखिल त्याची फेरारी, खासदारकी, प्रशस्त बंगला, ई. अशा अनेक विषयांवरून त्याच्यावर टीका केली जाईल हेही खरे.

पण २४ वर्षांनंतरही सचिन चे नाणे आजही तितकेच खणखणीत आहे आणि मुंबईतील शेवटच्या टॉस चा निकाल कुणाच्याही बाजूने लागला तरी The Head has always been in the same place..!

परवा अजून एक पर्व संपेल, अजून एक देव देव्हार्‍यात कायमचा ठेवला जाईल, एका नव्या देवाच्या प्रतीक्षेत! कारण आम्हाला देव लागतो.

हा मान, सन्मान, ई. सर्व आधीच्या ईतर क्रिकेट्पटूस मिळायाला ह्वे होते का, वगैरे या असल्या वादात मला वैयक्तीक स्वारस्य नाही. तूर्तास, हा एक शेवटचा सामना सचिन ने स्वताच्या आनंदासाठी, खेळाच्या ऊत्सवासाठी खेळावा आणि जमलेच तर अजून एक शतक ठोकावे अशी एक शेवटची अपेक्षा त्याचा चाहता म्हणून नोंदवतो. साहेबांच्या खेळातील खरा "साहेब" हा भारताचा आहे ही भावना व हे सत्य आजच्या व येणार्‍या अनेक पिढ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असेल ईतके मोठे कार्य सचिन ने केले आहे. त्यासाठी वैयक्तीक मी व आमची पिढी त्याचे सदैव ऋणी असू.

क्रिकेट खेळाच्या अवकाशात सचिन हा आता अढळ धृव तारा आहे, राहील.. बस यही एक सच है!

सचिन च्या शेवटच्या सामन्यासाठी व आगामी सुखी, समाधानी व निरोगी आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा देवुयात.
http://www.espncricinfo.com/sachinfarewell/content/site/sachin_farewell/...

खेरीज खास मायबोलीकरीता सचिन ची एखादी मुलाखत घ्यायला, किमान ऐकायला वा वाचायला मिळेल अशी आशा करूयात.

ता.क. अलिकडेच लंडनस्थित जागतिक कंपनीमधील महत्वाच्या कामाचा कार्यभार स्विकारताना प्रेरणा व व्यावसायातील 'ईनोव्हेशन' म्हणून ऊपस्थित साहेब लोकांना सचिन चे ऊदाहरण दिले.
Yes Sir! They obliged. :).. `सर' सचिन रमेश तेंडुलकर!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
16 Nov 2013 @1.00 pm:

आणि तो क्षण आलाच...
सचिनचे आजचे आभार प्रदर्शनाचे भाषण हे या अध्यायाचा कळसच म्हणायला हवे. एक सचिन घडवण्यात गेले २४ वर्षे अधिक काय आणि किती होतं याचं सार त्याच्या शब्दात होतं. त्यातला प्रत्येक शब्द, भावना, 'सच' होते. त्या शब्दांना आपल्या मातीचा गंध होता, देशाभिमानची झळाळी होती, सगे सोयर्‍यांची ओल होती, कर्तव्यनिष्टेची जाण होती, विनम्रतेची साक्ष होती आणि सर्वात शेवटी ज्या खेळपट्टीने त्याला घडवले त्या खेळपट्टीला, कर्मभूमीला अतीशय भावपूर्ण व आदरयुक्त नमस्कार करून सचिन ने 'संस्काराचा' कायमचा धडा सर्वांच्या मनात कोरला आहे. क्रिकेट च्या देवाचं ते रूप कायम स्मरणात राहील.
साहेब आज 'शब्दांनी' तोडलत.

असा पुत्र, असा खेळाडू, असा सचिन पुन्हा न होणे.

त्रिवार मुजरा...!!

सचिन आणि क्रिकेट या एकाच नाण्याच्या दोन बाजू. सचिन च्या आभार भाषणापूर्वी मात्र सचिन ची पत्नी सौ. अंजली हीने एका वाक्यात या दोन बाजूंचा ठळक फरक दाखवून दिला.
"I can imagine cricket without Sachin but I can't imagine Sachin without cricket..! "
निशःब्द केलं. २५ वर्षे सचिन च्या प्रवासाची साक्ष व जोडीदार असलेल्या अंजलीच्या या शब्दाने अक्षरशः झोपेतून जागं केलं! जेव्हा 'ईतर बाकी' वेगळ्याच चिंतेत असतात तेव्हा आपलं माणूस मात्र आपल्याच चिंतेत असतं. अफाट..!!!
To me these words will forever remain as the best words ever spoken about Sachin and the Cricket. Kudos !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज सचिनची कदाचित शेवटची खेळी........ डोळे मन हृदय आठ्वणी सारे काही भरून आलेय.. आणि अशी स्थिती होण्यास त्याचा निव्वळ खेळ नाही तर वर उल्लेखलेले गुण प्रामुख्याने कारणीभूत आहेत !

'ऑक्सिजन' या लोकमतच्या पुरवणीत सचिनवर पूर्ण अंक आहे.. त्याला देव न बनवता तो माणूस असूनही किती आणि कशामुळे मोठा आहे , हे त्या लेखांमध्ये लिहीले आहे. आवर्जून वाचावे असे हे लेख. http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/OxygenEdit...

खेळामुळे खेळाडुला ओळख मिळते

आज सचिन त्या पलिकडे पोहचला ....

आज क्रिकेट कडे बघताना सचिन खेळतो तो खेळ असे म्हणतात

खरे तर त्याची आजची खेळी पाहता तो रिटायर का होतोय असा प्रश्ण सर्वच जण विचारत असतील. त्याचं तंत्र, चपळता, सर्वच अजूनही तितकच अचूक वाटलं, रिफ्लेक्स थोडे मंद झालेत नक्की.
Not withstanding that this is perhaps the weakest Windies attack to date, it still looked like same old, Vintage Sachin... just missed that 100, was for taking there. Just couldn't ask for more... memorable for ever!

Lets hope he does some magic with his bowling.

India will sure win this, question is whether Sachin can take few wickest as well on the pitch which actually suits his style of bowling or whether Gayle, Bravo play to their full potential and put up fight and make India bat again. In that case Sachin can come out to Open and score winning runs. Happy

I have a feeling, everyone is praying for the second scenario, to see the master blaster in action one last time..!!!

सचिनने आज आपले बहुतेक सर्व शैलीदार फटके खास मुंबईकराना पुनःप्रत्ययाचा आनंद देण्यासाठी दाखवले. फक्त, लेग-स्टंपच्या बाहेरच्या चेंडूसाठी त्याने स्वतः शोधून विकसित केलेला 'पॅडल' शॉट मात्र आज पहायला मिळला नाही.
<< Sachin can take few wickest as well on the pitch which actually suits his style of bowling >> मला वाटतं स्वतः सचिनही फिरकी गोलंदाजी करताना खूप आनंदी दिसतो. उद्यां धोनी त्याला हा आनंद दिल्याशिवाय रहाणार नाही; सचिन एक चांगलाच फसवा लेग-स्पीनर आहे असं मला नेहमीच वाटत आलं आहे.

..

आज देवामधलं माणूसपण दिसलं खर्‍या अर्थाने!!!

माझ्या आठवणीत तरी पहिल्यांदाच मैदानावर सचिनच्या डोळ्यांमधे अश्रू पाहिले.

ऑफिस मधुन "तो" क्षण आल्याचे कळाले आणि पोटात खड्डाच पडल्या सारखे वाटले..

अश्रु अनावर झाले..

खुप सुंदर आठवणींसाठी ... धन्यवाद सचिन ..

सचिन.. सचिन..

I want to thank my fans from the bottom of my heart. "Sachin, Sachin" will reverberate in my ears till I stop breathing." - खल्लास...

"All my friends settle down…let me talk. I will get more and more emotional! My life between 22 yards for 24 years, it's hard to believe that the wonderful journey is coming to an end. But I would like to take this opportunity to thank people who have played an important role in my life. Also for the first time I am carrying a list to remember all the names in case I forget someone I hope you understand. It is getting little difficult but I will manage.

The most important person in my life and I have missed him a lot since 1999 when he passed away…my father. Without his guidance I don’t think I would be standing in front of you. He gave me freedom at the age of 11 and told me that 'chase your dreams but make you don’t find shortcuts. The path will be difficult but don’t give up.' And I have simply followed his instructions. Above all he told me to be a nice human being which I have continued to do so…I have tired my best. Everytime I have done something special whenever I have shown my bat it was for my father, so I miss him today.

My mother, I don't know how she deal with a naughty child like me, I was not easy to manage, she must have been extremely patient. For the mother the most important thing is her child remains safe and healthy and fit and that is what she was most bothered about and worried about. She took good care of me for the last 24 years I have played for India but even before that she started praying for me. The day I started playing cricket, she just prayed and prayed and I think her prayers and blessings have me given me the strength to go out and perform.

For four years I stayed with my uncle and aunt when in school, they treated me like their own son. My eldest brother Nitin doesn't like to talk ,much but he said, whatever you do, I know you will give 100%. My first cricket bat was presented to me by my sister Savita. She still continues to fast while I bat. Ajit my brother -- we have lived this dream together, he sacrificed his career for me, he took me to Achrekar sir first. Even last night he called me to discuss my dismissal. Even when I'm not playing we will still be discussing technique. If that hadn't happened, I would have been a lesser cricketer.

The most beautiful thing happened to me when I met Anjali in 1990. I know that being a doctor there was a big career in front of her. But she decides that I should continue playing and she took care of the children. Thanks for bearing with me for all the nonsense I've said (Anjali wipes tears). Then the two precious diamonds of my life Sara and Arjun. I've missed out on several birthdays, holidays. I know for 14-16 years I've not spent enough time with you. But I promise you I will spend the next 16.

My in-laws..I've discussed several things with them. The most important thing they did was allow me to marry Anjali. In the last 24 years my friends have made terrific contributions. They have been with me while I was stressed. They have been with me even at 3am when I was injured. Thanks for being there for me.

"My career started when I was 11. I was extremely delighted to see Achrekar sir in the stands. I used to ride on his scooter and play two matches a day. Sir took me along to make sure I played. On a lighter note, Sir never said 'well played' because he didn't want me to be complacent. You can push your luck now, Sir, since I'm not playing cricket anymore.

"I started my career here in Mumbai. I remember landing from NZ at 4am and playing a Ranji game the next day. The BCCI was fantastic from my debut. Thanks to the selectors. You were right with me making sure my treatment was taken care of.

"Thanks to all the senior cricketers who have played with me. We see on the screen Rahul, VVS, Sourav, Anil who is not here. All the coaches. I know when MS presented the 200th Test cap, I had a message to the team - I said we are all so proud to be representing the nation. I hope to continue to serve the nation with dignity. I have full faith that you will serve the country in the right spirit.

"I will be failing in my duty if I didn't thank the doctors who have kept me fit. Given the injuries I have suffered. They have treated me in odd hours.

"My dear friend the late Mark Mascarenhas. I miss him. My current management team WSG, for continuing what Mark has done. Someone who has worked closely with me for 14 years is my friend Vinay Nayudu.

"The media has backed me a lot, since my school days. Even today. Thank you. Thanks to the photographers for capturing those moments.

"I know my speech has become long. I want to thank people who have flown in from different parts of the world. I want to thank my fans from the bottom of my heart. "Sachin, Sachin" will reverberate in my years till I stop breathing."

शेवटचा खेळपट्टीला केलेला नमस्कार आणि मैदान सोडून जातानाचे त्याचे पाणावलेले डोळे "क्रिकेट हा माझा ऑक्सिजन आहे" या त्याच्या वाक्याच Practical होत .

सई,
काळजी नसावी.. मला वाटतं येणारे काही दिवस प्रत्येक चॅनल वरून त्याचे शेवटचे भाषण, क्षण, शब्द पुन्हा पुन्हा दाखवत राहतील..! Happy

Saee.. Happy

मी देखिल ऑफीसात असल्याने सचिन चे भाषण ऐका/पहायला न मिळालेल्यांच्यातलाच आहे पण ते भाषण आणि सचिनचे डोळे पाणावले हे वाचून देखिल भावनाविवश व्ह्यायला झाले. आता घरी गेल्यावर बघेनच...

आज सचिन गेला, १०-१५ मिनिटांचे शेवटचे भाषण, मन भरून आले तेवढ्यात, त्याच्या डोळ्यातले पाणी बघून आपलेही डोळे पाणावले, शेवटचा निरोप देताना त्याने खेळपट्टीला हात लाऊन क्रिकेटला एक शेवटचा अलविदा केला तेव्हा आपल्याही अंगावर शहारा आला, आणि हिच खरी त्याची कमाई आहे.

courtesy: cricinfo.com:
So here are the Test figures - 200 Tests, 329 innings, 15,921 runs, 51 centuries, 68 fifties. Beat that? Forget it. This is set in stone

१०-१५ मिनिटांचे शेवटचे भाषण, मन भरून आले तेवढ्यात, त्याच्या डोळ्यातले पाणी बघून आपलेही डोळे पाणावले, शेवटचा निरोप देताना त्याने खेळपट्टीला हात लाऊन क्रिकेटला एक शेवटचा अलविदा केला तेव्हा आपल्याही अंगावर शहारा आला, आणि हिच खरी त्याची कमाई आहे. >> +१

Pages