पाक टीम कडून सचिनला शुभेच्छा !

Submitted by केदार on 11 November, 2013 - 04:04

पाक टीम कडून सचिनला २०० व्या कसोटीसाठी शुभेच्छा देणारा प्लेक्स आमच्या प्रतिनिधिच्या (म्हणजे माझ्या) आत्त्ताच हाती लागला आहे.

flex_2.JPG

पोस्टरची क्वालिटी श्री अजयशेट "मास्तर" गल्लेवाले आणि समीर"दादा" अ‍ॅडमिन ह्यांच्या कृपेमुळे कमी प्रतिची आहे, गोड मानून घेणे.

टीप : पोस्टर साठी वर्गणी फक्त चौघांनीच भरली आहे, त्यामुळे त्यांचेच फोटो छापले आहेत. उर्वरीत पाकी फोटो वर्गणी भरल्यावर छापण्यात येतील.
हुकुमावरून - चाचा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तु शोएब ला आधार स्थंभ मानतोस ?????? Happy

अक्रम, वकार, सकलेन. मुस्ताक अहमद

हे गोलंदाज होते

शोएब ने एकदाच सुरुवातीला त्रास दिला नंतर नाहीच देता आला

शोएब हा खूप चांगला बॉलर होता. फक्त तो चिडका असल्यामुळे वाया गेला. अन्यथा त्याला खूप काही केवळ पेस वर अचिव्ह करता आले असते असे मला वाटते.

रावळपिंडी डिरेल सचिनने केली म्हणून तो इथे. Happy

सेपरेट धागे काढून लावणे हा अत्तिशय फालतु पणा म्हणजे टू मच! आवराच! >> हो खरंय.

मी आवरतोच. पण नाक्यावरची पोस्टर चालतात तर इथे का नाही? इथे चालत नसतील तर नाक्यावर का? ह्याचाही विचार करा Wink

. त्या शोएबचा फोटो क्लास लावलाय. वकारचा जरा खुनाशी क्लोजप हवा होता. मजा आली असती.

हे आणि दुसरे पण पोस्टर भारी आहे. नाक्यानाक्यावर लावू. Happy

मा. रा. रा. श्री. केदारसाहेब यांस,

तुमच्या या मोर्चेबांधणीस आमच्या पार्टीचा सबळ पाठींबा आहे, कळावे.

आता मागे फिरू नका! होऊ दे धिंगाणा!

श्री अजयशेट
"मास्तर" गल्लेवाल्ले
आणि समिर"दादा अॅडमिन" >>>>> हे भारीच Lol Proud

गजानन +11111

मिळाले रावसाहेब. लंकेचे पण टाका आत्ता. जाळली लंका, वाजला डंका Wink

आणी ह्या फ्लेक्सवर कॉपीराईट टाक रे, उद्या मेल मधे फिरतील परत.

मामी Lol

टीप : पोस्टर साठी वर्गणी फक्त चौघांनीच भरली आहे, त्यामुळे त्यांचेच फोटो छापले आहेत. उर्वरीत पाकी फोटो वर्गणी भरल्यावर छापण्यात येतील.
<<
फटू तर ५ दिस्ताहेत. फुकटचंद कोण?
Wink
अन मुख्य मुद्दा म्हंजी पोस्टर लावणारे हुकुमचाचा नवखे दिसताहेत. मेन उच्छव मूर्ती सोताच्या पैक्यानं ती फ्लेक्सं छापत्यात. फोटू छापाया पर्वान्गी द्यायासाठी चिल्लर पार्टीच्या दाढ्या धराया लागत्याती.

Lol

Pages