संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

Submitted by संजिव पिल्ले on 9 November, 2013 - 09:09

भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.

http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India

भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.

मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब वाजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली.

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)

मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...

आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश

जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...

मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले.

पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली.

त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.

पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे?

मुघलांचे वाडे सरकारचे झाले.

शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत.

इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत.

पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही.

मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले? की, संस्थानिकांपासून आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालेच नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पगारे,
ह्या संस्थानिकांच्या गढ्यांबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे?

Vatican under global scrutiny after UN sex abuse report

VATICAN CITY: The UN's damning report on the Vatican's handling of child sex abuse cases has turned up the pressure on the Church to convince a sceptical international community it has adopted a zero-tolerance approach.

"The Vatican has taken some steps forward, but they have been largely symbolic: energetic words rather than actions. The UN is right to have spoken out so strongly," Vatican commentator Paolo Flores D'Arcais told AFP.

लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीप्रसादचे शॉर्ट फॉर्म आहे.>>> आणि त्यातील प्रसाद त्यांनी खाल्ल्यामुळे प्रत्यक्षात ते धार्मिक आहेत हे सिद्ध होते Happy

हायला, लोकांनी वाडे आणि पेन्शन गिळली , त्याचा विषय आहे, याना प्रसादाचे लागले आहे.

Happy

लगो - ओके ओके Happy जस्ट किडिंग. मूळ लेखावर पहिलीच प्रतिक्रिया आहे की Happy त्यात काय नवीन लिहीणार आता.

बाकी या लोकांचे एकेक अफलातून किस्से 'महाराजा' या पुस्तकात आहेत. लेखन दिवाण जर्मानी दास (स्पेलिंग वरून उच्चाराचा अंदाज हा आहे). अनेक एकसो एक नग होते. पण ते सगळे एकाच धर्माचे नव्हते. आणि काही चांगलेही होते.

लक्ष्मी गोडबोले,

>> हायला, लोकांनी वाडे आणि पेन्शन गिळली ,...

वाडे वडिलोपार्जित होते आणि पेन्शने नगण्य होती हो! खरी संपत्ती त्यांच्या खाजगी खजिन्यातच आहे, आजूनही! इंदिरा गांधींनी केला तो दिखाऊपणा होता. केवळ मते मिळवीत म्हणून केलेली युक्ती होती. खरंतर त्या वेळी १९६९ साली तशा अनेक युक्त्या त्यांनी केल्या. अधिकोशांचे (बँक) राष्ट्रीयीकरण अशीच एक मतमिळाऊ चाल होती. पुढे १९७१ चा गरिबी हटाव चा नारा वगैरे मस्का फासणे चालू राहिलेच. असो.

आ.न.,
-गा.पै.

लेखाचे नाव वाडे असे असले, तरी वाडे + जनतेच्या पैशातून निर्माण झालेली सर्व संपत्ती, दागदागिने, सोने, जवाहिर ... इ इ इ सर्वच जनतेला मिळणे अपेक्षित आहे, हे लेखकाने कुठेतरी स्पष्ट केलेले आहे.

धागा शतकी होत आला आहे.

Happy

इंदिरा गांधींनी केला तो दिखाऊपणा होता. केवळ मते मिळवीत म्हणून केलेली युक्ती होती.

संस्थानिकांची पेन्शन बंद करुन लोकांची मते मिळतात, याचा अर्थ लोकानाही तेच हवे आहे, हेच सिद्ध होते ना? Happy

मोदीनाही संस्थानिकांचे वाडे / पेन्शन जप्त करायला सांगा. लोक त्यान्नाही मते देतील.

पिल्ल्यांचा धागा मी थोडी भर घालून शतकाकडे नेला. त्यांचा आत्मा धन्य झाला असावा, ही अपेक्षा. Proud शतक बघण्याआधीच बिचार्‍यांनी डोळे मिटले होते. Rofl

पिल्लेंना प्यारेनॉईड जामोफ्रेनिया नावाचा अतिगंभीर मानसिक आजार झाला होता असे ऐकले होते, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

>>>> मोदीनाही संस्थानिकांचे वाडे / पेन्शन जप्त करायला सांगा. लोक त्यान्नाही मते देतील. <<<<<
ओके, सान्गतो की.
बायदिवे, निजामाच्या सम्पत्तीचे काय झाले?
अन तो हीरा, तोच हो, निजाम तो हीरा पेपरवेट सारखा वापरायचा, त्याचे काय झाले?

कोणता ? कोहिनूर का?

लिंबु, कोहिनुर हिरा म्हणजे महाभारत- भागवतातील स्यमंतक मणी . ज्याने कृष्णालाही त्रास झाला होता.. . हे खरे आहे का? तो हिरा जिथे गेला तो बर्बाद झाला. तो हिरा फक्त देव आणि स्त्री यानाच पावतो म्हणे. आणि अखेरीस तो इंग्ल्डाच्या राणीकडे गेला. ती स्त्री असल्याने तिला तो बाधला नाही. खरे आहे का हे?

बायदिवे, लिंब्या, कृष्णाला तो हिरा बाधला म्हणजे कृष्ण देव नव्हता का? Proud

आज पहाटेपासून थंडी अंमळ जास्तच जाणवू लागली आहे. अशा अचानक हवामानबदलाने सर्दी होऊ शकते.

लगो, कोहिनुरला मध्यात आणुन विषय बदलू नका (नैतर सर्दी होईल). निजामाकडे कधीच कोहीनुर नव्हता.

>>>> आणि अखेरीस तो इंग्ल्डाच्या राणीकडे गेला. ती स्त्री असल्याने तिला तो बाधला नाही. खरे आहे का हे? <<<<< राणीला नसेल, राणीच्या देशाला बाधलाच्च की!

हो. कोहिनूरचा इतिहास ' त्या' ११९४७ च्या निजामा आधीचा आहे. पण बहुदा निजामशाही तेंव्हा होतीच.

ती स्त्री असल्याने तिला तो बाधला नाही. खरे आहे का हे?
<<
जामोप्या,
राणीच्या डोळ्यासमोर अक्खं इंग्रजी साम्राज्य बुडालं की! वर गापै इंग्लंडात रहायला गेले. अजून काय - काय बाधायला हवं आहे?

>>>>> वर गापै इंग्लंडात रहायला गेले. अजून काय - काय बाधायला हवं आहे? <<<<<
तर तर इब्लिसा, किती अचूक निदान्/निरिक्षण नोन्दवतोस ! मी त्यात भर घालतो, गापैच्याही आधी विनायक दामोदर सावरकर देखिल इन्ग्लन्डात रहायला गेले होते. Proud

गापैच्याही आधी विनायक दामोदर सावरकर देखिल इन्ग्लन्डात रहायला गेले होते.
--------- स्वातत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणा राव....
लगो यान्ना याचि आयडी याचि डोळा द्विशतक बघायला मिळेल अशी आशा.

उदय, तुमचे बरोबर आहे, पण ते जेव्हा रहायला गेले तेव्हा त्यान्ना त्या पदवीने कुणी ओळखत नव्हते, म्हणून अधिक वास्तवता यावी म्हणून स्वातंत्र्यवीर हा उल्लेख टाळला, शिवाय कित्येकान्ची पोटदुखी ही वाढते या शब्दप्रयोगाने, त्यालाही आळा बसेल, नै का? Wink

Happy

राष्ट्रकाका जिना अंकलनी पाकिस्तानी संस्थानिकानाही पेन्शन आणि महाल दिलेत का?

( जिनाना राष्ट्रकाका ही पदवी कुणी दिली, हा वाद कृपया इथे घालू नये. )

indira.jpg

--

ती ढाल नाही.

सर्कशीत एक खेळ असतो. पेटती रिंग असते. त्यातून कुत्रा, वाघ उडी मारतात. तशी ती रिंग आहे. ती रिंगमास्तरच्या एका हातात असते. आणि दुसर्‍या हातात चाबूक असतो.

( असे मला वाटते.)

वरच्या लेखात भगवा हा उल्लेख अनेकाना झोम्बलेला आहे.

ईन्दिरा गान्धीना तनखा रद्द करण्याच्या निर्णयातुन मुख्य विरोधक गट होता . स्वतंत्र पक्ष . हा पक्ष जमीनदार व पदच्युत नामधारी राजे राजकुमार यान्चा होता. संस्थापक सी राजगोपालाचारी.१९५९

पुढे हा पक्ष विलीन झाला . १९७४मध्ये भारतीय क्रान्ती दलात.

१९७७ साली हा पक्ष जनता पार्टीत विलीन झाला. त्यात कान्ग्रेस ओ , भारतीय लोक दल आणि जनसन्घ हेही सामील होतेच.

आणि अखेर१९८० साली जनता पार्टी फुटुन त्यातून उपजलेलं सर्वात मोठं बाळ म्हणजे भाजपा

भाजपा ही इच्छाधारी नागिण आहे. १९६० सालापासुन ती सारखी रुप बदलत वळवळत फिरत आहे.

आणि आता हा भाजपा सरदार पटेलान्चा पुतळा उभा करणार आहे. Happy

Pages