संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

Submitted by संजिव पिल्ले on 9 November, 2013 - 09:09

भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.

http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India

भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.

मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब वाजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली.

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)

मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...

आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश

जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...

मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले.

पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली.

त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.

पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे?

मुघलांचे वाडे सरकारचे झाले.

शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत.

इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत.

पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही.

मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले? की, संस्थानिकांपासून आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालेच नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लगो बाई बराच रिकामा वेळ आहे बहुतेक तुमच्या हातात. नाही उत्खननाचे काम जोरात सुरु आहे म्हणुन म्हटले. Happy

लगो, १९७७ म्हणजे जनता पक्ष म्हणायचे आहे का? तो १९८० मधे फुटल्यानंतर पुढे जनता दल ई आले. जनता "दल" हे मूळच्या जनता पक्षातील काही लोक होते. बहुधा जनता पक्ष वजा भाजप= जनता दल.

लगो,

>> भाजपा ही इच्छाधारी नागिण आहे. १९६० सालापासुन ती सारखी रुप बदलत वळवळत फिरत आहे.

चरख्याची बैलजोडी झाली. तिचं गायवासरू झालं. पुढे त्याचा हाताचा पंजा झाला. मग काँग्रेसला चारतोंडी गांडूळ म्हणणार का?

आ.न.,
-गा.पै.

भाजपच्या कमळावर भ्रमदेव बसलेला असतो, तोच चारतोंडांचा आहे. कशाला दुसर्याची तोंड मोजताय Biggrin

<चरख्याची बैलजोडी झाली. तिचं गायवासरू झालं. पुढे त्याचा हाताचा पंजा झाला. मग काँग्रेसला चारतोंडी गांडूळ म्हणणार का?>
खिक्क....

Proud

इडलीवाला, त्याचं काये की ब्रह्मदेव वळवळ करत नाही. काँग्रेस जरा जास्तंच वळवळ करतंय. मरू घातलीये ना!
आ.न.,
-गा.पै.

विषय काय तर संस्थानिकांच्या गढ्यांचा, तर त्यावर बोला ना, सरस्व्तीला मुलं कशी झाली यासाठी दुसरा धागा विणा. हाकानाका.

लगो,

>> ब्रह्मदेव वळवळ करत नव्हता तर सरस्व्तीला मुलं कशी झाली?

बाप स्त्रीसंग करतांना दिसला नाही, तर मग तो आपला बाप कसा? अशा धर्तीचा तुमचा प्रश्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

कोणाच काय आणि लफड्यात पाय !!

काँग्रेस आणि आआपचा सुपडा साफ झाल्यावर विस्मरणात गेलेले धागे वर काढताहेत !!

ल गो, काळजी करु नका अच्छे दिन आ गये हैं !!

आता तरी जनतेची दिशा भुल करु नका !

...

4 खानांच्या नावाने भक्तलोक उगाचच बडबडत फिरत असतात.

त्यांचे भरपूर मिळवून झाले आहे , दोन चार पिक्चर पडले , करियर बंद झाले तरी काही फरक पडत नाही.

चौथा खान सैफ अली खान.

1947 साली सर्व संस्थानिक नवाब ह्यांना पेन्शन दिली गेली , तेंव्हा नबाब पतोडी ( ह्याचे अब्बू की त्यांचे अब्बू ) बोलले होते , किती भिकारडी पेन्शन आहे ही ! आम्ही नवाब होतो तेंव्हा आमच्या घोड्याच्या चाऱ्याचा खर्च ह्यापेक्षा जास्त होता !!
Proud

आमच्याही पुढच्या पिढीत असे मस्तवाल जन्माला येउदेत

Proud
Rofl

धाग्याच्या विषयाशी संबंधित न राहता आता २०२२ मधे देखील सातारा आणि कोल्हापूर गादीच्या वारसदाराच्यात एकी, सलोखा निर्माण झाला आहे का?
आमदार खासदार म्हणून निवडून येण्यात त्यांची सार्थकता असेल पण सामान्य जनतेच्या संदर्भात त्यांनी समाज कल्याणकारी योजना लागू करण्यात पुढाकार घेतला आहे का? असे विचार मनात येतात.

धागा वर आला म्हणून वाचला ( मी वाचन केले).
प्रतिसाद फक्त पहिल्या आणि शेवटच्या पानांवरचे वाचले.
१) पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.
- हे कुणी सांगितलं?

गढी/ वाडे याबद्दल -
२) राज्य म्हणजे काय? - तर प्रदेशातील शेती,घरे, व्यापाराकडून महसूल /कर वसूलीचे अधिकार आणि मालमत्ता हस्तांतरणात थोडी मलई मिळते त्याबदल्यात नोंद करून सही शिक्का पत्र दिले जाते. हे राज्य जिंकून येणाऱ्याकडे हे हक्क जातात.
ब्रिटिशांनी हे हक्क ताब्यात घेऊन बदल्यात तनखा/ पेन्शन देऊ केली.
ती पुढे विलिनीकरणापर्यंत भारत सरकारकडून चालू राहिली ती रद्द झाली.
राजाने थोडी जमीन घेऊन त्यावर वाडे/गढी बांधलेले असतात. जमीनी कसण्यासाठी दिलेल्या असतात त्या मालमत्ता त्यांच्या आणि वारसांच्या.

अजून बरेच आहे.

Proud

जमिनी स्वतः कसून पोट भरत होते

किती गरीब अन कष्टाळू होते.

आम्हाला सरकारी डॉकटरच्या पदावर कसण्यासाठी टेबल खुर्ची स्टेथोस्कोप कॉम्पुटर बीपी मशीन दिले आहे , मग आम्ही ते घरी घेऊन जायचे का ? की दवाखान्याचा सात बारा आमच्या नावावर करतात ?

काम केल्याबद्दल आर्थिक मोबदला देतात , पण साधन संपत्ती देशाची असते ना ?

यांचे पूर्वज तर राज्य त्यागून वनवासात जात होते म्हणे.

आणि मग हे असे कसे ?

सामान्य व्यक्ती स्वतः जमीन कसत नाहीत , हे कारण दाखवून त्यांच्या जमिनी कूळकायद्यात जप्त झाल्या, पण राजघराण्यातील जमिनी मात्र जप्त झाल्या नाहीत. ह्यांनी काय आधार कार्डवर नांगर घेतलेले फोटू लावले होते का कसण्याचा पुरावा म्हणून !??

एका राजाने दुसऱ्या राज्यावर हल्ला करून जिंकले की राज्यातली सर्व जमीनी राजाच्या मालकीच्या होत नसतात. जिंकलेल्या राजाचे वाडे आणि जमिनी नव्याकडे जातील.

डॉक्टरांचा मुद्दा समजला नाही.

युद्धात जिंकला की जिंकणारा राजा व त्याचे दोन चार चेले सगळे हडप करत.

आणि इतर शिपायाना काय ?

पूर्वीच्या काळी राणीने प्रसन्न होऊन दासावर गळ्यातला हार फेकला ( त्याने तो फोडून टाकला! नोटेवर मोदी दिसत नाहीत , गांधी दिसतात , असे म्हणून भक्त मोदीदास नोटा का फाडत नाहीत ?) , राजाने शिपायाला युद्धात पाय मोडल्याबद्दल प्रसन्न होऊन हातातील कडे बहाल केले , भिंतीवर लावायला ताम्रपत्र दिले.

हे बक्षीस !!!

आताची 4 वर्षे सैन्यात नोकरी हीदेखील राणीने शिपायावर हार फेकला आणि राजाने कडे फेकले अशाच स्वरूपाची आहे. सगळे राजा हडप करणार , शिपायाला नो पगारवाढ, नो पेन्शन , नो जहागिरी , नो ग्रॅच्युईटी

800 वर्षांनी दिल्ली सिंहासनाला हिंदू राजा मिळाला म्हणून नाचत होते !! घे राजा डोक्यावर बसवून !!!

Proud

Pages