नारळाचे सार.

Submitted by सुलेखा on 9 November, 2013 - 01:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अगदी कोवळा नारळ.
२ काश्मिरी लाल सुक्या मिरच्या .अर्धी वाटी पाण्यात १० ते१५ मिनिटे भिजवुन ठेवा.
१ टी स्पून जिरे .१ टी स्पून धणे..
१ चमचाभर तांदुळ.
१ मोठा टोमॅटो चिरलेला.
मीठ चवीपुरते.
पाणी लागेल तसे.साधारण दिड ग्लास-सार किती दाट ठेवायचे त्याअंदाजाने.
फोडणीसाठी थोडेसे तेल-जिरे व हिंग.
कोथिंबीर.
साराबरोबर खायला गरम भात तसेच राईस रोटी

क्रमवार पाककृती: 

naaraLaache saar-bhat.JPG
हे सार करायला अगदी सोपे व पटकन होते.चवीला खुप मसालेदार/तिखट नसले तरी उत्तम आहे.टोमॅटो व काश्मिरी मिरचीमुळे रंग छान येतो .
.नारळाचे तुकडे,जिरे,धणे,तांदुळ,पाण्यात भिजवलेल्या मिरच्या टोमॅटोच्या फोडी व लागेल तसे थोडेसे पाणी घालुन अगदी बारीक पेस्ट करा.मिश्रण छान बारीक वाटले कि एका पॅन मधे काढुन लागेल तसे पाणी घालुन छान उकळवा.चवीपुरते मीठ घाला .आता वरुन तेल-जिरे-हिंग घालुन फोडणी द्या.वरुन चिरलेली कोथिंबीर घाला..
या साराबरोबर गरम भात छान लगतो.तसेच राईस रोटी बरोबर्ही खाता येईल
rice roti..JPG
.ही राईस रोटी केरळी/मलबारी दुकानात मिळते.खरेतर राईस रोटी म्हणजे चौकोनी कडक पण "कुरकुरीत चौकोनी ,टिकाऊ दोसाच" आहे.चौकोनी आकारात पॅक केलेले दोसे मिळतात.सामिष -मासे-चिकन-बरोबर खातात.तसेच पायसम,रस्सम बरोबरही खातात.

माहितीचा स्रोत: 
नारळाचे सार--माझी वहिनी.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, छानच आहे की गं हे... सोपं पण. साहित्यही नेहमीचंच आहे सगळं. वाफाळत्या तुप-भाताशी झकासच लागेल. आजच करून बघते.

मुद्दाम कोकणाबाहेरची माणसं नारळाचे सार कसे करतात ते बघायला आलो. छान आहे.
या रोटीला, कोरी रोटी पण म्हणतात ना ?

छान आणि सोप्पे आहे. जिरे,धणे तसेच बारीक वाटले जातात का? कि मिरच्यांप्रमाणे तेही पाण्यात भिजत घालावेत?
कोवळा नारळ मिळाला नाही तर नेहमीचा नारळ चालेल का?

विद्याक,धणे-जिरे थोडे परतुन घेतले कि बारीक वाटले जातात.नेहमीचा नारळ चालेल.मिश्रण थोडे जास्त वेळ मिक्सरमधे वाटायचे ..चव बदलायला थोडासा कांदा व एखादीच लसुण पाकळीही टाकता येईल.

केलं, छानच झालं आणि भरपूर प्यायलो Happy अनायासे आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बरं वाटलं सिप करताना. तुला खुप खुप थँक्स सुलेखा!
मी काही बदल केले. पूर्ण नारळाचं सार कदाचित जास्त झालं असतं म्हणुन मी अर्धाच नारळ घेतला. दोन छोट्याच लाल मिरच्या घेतल्या आणि त्याही भिजवायला विसरले म्हणुन तशाच वाटल्या. एका उकळीनंतर चव घेतल्यावर तिखट वाटलं म्हणुन चमचाभर गुळ घातला. धणे घरी नव्हते म्हणुन नाही घातले. नेहमीच्या सवयीने फोडणीही तुपाची दिली गेली. या सगळ्या बदलांसकटही चव मात्र सुरेख आली होती.

संध्याकाळी पातळ पोह्यांचा चिवडा तोंडात टाकत होते, वाटीत त्यावर सार ओतून घेतलं... 'माझे आवडते पदार्थ मला असे खायला आवडतात' मध्ये लिहावं की काय असं वाटलं Happy

मॅगी ची coconut powder आहे घरात, ती वापरली तर चालेल का?
आमच्या इथे एक केरळी दुकान आहे तिथे वरील डोसे मिळतात का पाहते

पिन्कि,कोकोनट पावडर थोडावेळ -१० मिनिटे-दुधात किंवा पाण्यात भिजवुन ठेव.
सई,धन्यवाद.धनेपुड-जिरेपुड वापरली तरी चालेल आणि न घालता केले तरी चालेल.तसेच उकळताना चक्रीफुल्/जायपत्र्री चा लहानसा तुकडा घालुन पहा.प्रत्येक वेळेस वेगळी चव येते.
दक्षिणा,सई कडुन शिक जरा...