चण्याचे सूप

Submitted by दिनेश. on 26 November, 2008 - 10:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक कप चणे, (काबुली नव्हेत ), एक मोठा का.न्दा, एक इ.न्च आले, चार सहा लसूण पाकळ्या, दोन लव.न्गा, एक इ.न्च दालचिनी, आठ दहा मिरीदाणे, चिमुटभर हि.न्ग आणि हळद, चवी प्रमाणे मीठ साखर व लि.न्बू, थोडेसे तूप

क्रमवार पाककृती: 

साधे चणे घेऊन ते शक्य असल्यास भिजवावेत. नाहीतर तसेच कूकरमधे शिजायला ठेवावेत. तूप आणि लि.न्बू सोडून बाकि सर्व मसाले घालावेत. प्रेशर देऊन दहा मिनिटे शिजवावेत.
झाकण उघडून थोडे चणे बाजुला ठेवुन बाकि सगळे ब्ले.न्ड करुन घ्यावे. परत उकळावे. जरुरीप्रमाणे पाणी घालुन पातळ करावे. उकळुन झाले कि वर तूप व लि.न्बु पिळुन प्यावे.

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा कप होईल
अधिक टिपा: 

खोकला आणि सर्दी झाल्यास हे सुप अवश्य करावे. खुप आराम वाटतो. हे सुप वैद्यकीय उपचाराना पर्याय म्हणुन नव्हे तर पुरक म्हणुन वापरावे.
भाताबरोबर पण घेता येते.

माहितीचा स्रोत: 
खुप वर्षा.न्पुर्वी वसुमति धुरु यानी काबुली चणे वापरुन असे एक सुप दिले होते. त्या कृतेवर मी केलेले इम्प्रोव्हायझेशन.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, छानच आहे!
वसुमती धुरुंनी ते 'कॉन्सोमे' म्हणून, रात्रभर मंदाग्नीवर शिजवायचे दिले होते तेच का?

हो हो तेच ते, तूला पण लक्षात आहे का ? त्याच लेखात त्यानी मश्रुमची भारतीय भाजी दिली होती.

माझ्या सासरी हिवाळ्यात हे नेहेमी करतात्...काले चणे वापरतात... ह्या पध्दतीने सुप करुन बाजुला काढ्लेल्या चण्याची आमटी / भा़जी / उसळ करतात... किंवा कधी तसेच नुसते खायला ठेवतात...