सगळे कसे अताशा.....

Submitted by डॉ अशोक on 4 November, 2013 - 05:12

*--------------------------------*
सगळे कसे अताशा.............
*--------------------------------*
सगळे कसे अताशा, छान चालले होते
जखमांना काळाचे, मलम लावले होते !
*
सूर जुळले नसतील, ताल बरोबर होता
मुखड्यातून तू मजला, सहज गाळले होते !
*
पेल्यातुन घेतो पण, नशा तसली नाही
घोट-घोट नजरेचे, व्यसन लागले होते !
*
भुतकाळाचा बटवा, उघडून बसलो असता
कप्प्यात सा-या अश्रू, सहज दाटले होते?
*
कट्टी करून जेंहा, दूर आपण झालो
गप्प रहायाचे मी, वचन पाळले होते.
*
-डॉ अशोक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खयाल खयाल म्हणून ठीक आहेत
मला लयच सपडली नाही (मात्रा मी कधीच मोजत बसत नाही बरोबर असतीलही माहीत नाही पण मला अत्तातरी तसे वाटत नाही आहे )
गझल नाही आवडली..महत्त्वाचे म्हणजे एकही शेर वाचून मनाला एकही हेलकावा बसला नाही माझ्यातरी
असो
पुढील लेखनास शुभेच्छा अशोक काका

धाड धाड करत वैयक्तीक मते व्यक्त करत सुटलो क्षमस्व चूक भूल द्यावी घ्यावी Happy

वैभव:
धन्यवाद !

पाश:
*
"एव्हढ्या रडव्या गझला लिहिण्यापेक्षा लिहूच नका ना!"
*
मार्गदर्शनासाठी आपली प्रोफाईल पाहिली. बघतो तो काय ! आपण काहीच लिहिलं नाही ! वैभवचं ठीक आहे हो ! त्यांनी ब-या वाईट कशा का असेनात पण गझला लिहिल्यात. आपलं काय ?

हम्म..... बर्‍या आणि वाईट ...म्हणजे चांगल्या नाहीतच असेच म्हणताय ना काका
हम्म Sad

(गम्मत करतोय बर्का :))

<<<<मार्गदर्शनासाठी आपली प्रोफाईल पाहिली. बघतो तो काय ! आपण काहीच लिहिलं नाही !>>>>>

काका आठवड्याभरातला जन्म आहे या आयडीचा आणि आव आणतायत गझल समिक्षकाचा Sad

दुर्लक्षून मारणच श्रेयस्कर ! असो !!

-सुप्रिया.