विराट कोहली

Submitted by बेफ़िकीर on 31 October, 2013 - 05:43

"इट्स टू अर्ली"

"लूक अ‍ॅट द स्टॅट्स"

"आणि फिटनेसचे काय??"

या सर्व प्रतिक्रिया येतील हे गृहीत धरूनही असे म्हणावेसे वाटत आहे की विराट कोहलीने फलंदाजीत प्रदर्शीत केलेले सातत्य आणि संघाच्या विजयास कारणीभूत होण्याची वारंवारता या निकषांनुसार तो भारताचा 'ऑल टाईम्स ग्रेट' फलंदाज बनत आहे. ही प्रक्रिया सध्या चालू आहे, त्याने फिटनेस राखून संघातील स्थान अजुन अनेक वर्षे अबाधित ठेवले तर ती प्रक्रिया पूर्ण होईल. सांख्यिकी माहितीनुसार तेंडुलकर वय वर्षे पंचवीस व विराट कोहली वय वर्षे पंचवीस ही तुलना केली तर विराटच्या धावांचे, सरासरीचे, शतकांचे, सातत्याचे व विजयास कारणीभूत ठरण्याचे टेबल अधिक दिमाखात झळकत आहे. याशिवाय तीन गुण प्रखरपणे दिसतात ते जिगरबाज खेळ, धावसंख्येचा पाठलाग करण्यातील सातत्य व भरवश्यास पात्र ठरणे! (एकप्रकारे हे सगळे एकाच गुणाचे तीन कोन आहेत असेही म्हणता येईल).

एक गंमत किंवा आवड म्हणून अ‍ॅनलाईझ करायचे ठरवले तर काही दिग्गजांच्या विशिष्ट गुणांचे मिश्रण त्याच्या व्यक्तिमत्वात आढळते.

जावेद मियाँदाद - जिगर
व्हिव्हियन रिचर्ड्स - धडाकेबाज फलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघावर अ‍ॅबसोल्यूट दहशत
अ‍ॅटिट्यूड - गांगुली
सातत्य - अ‍ॅडम गिलख्रिस्ट

क्रिकेटमध्ये सहसा न शोभणारा शीघ्रकोपी स्वभावही बहुतेक त्याच्यात असावा असे दिसते.

पण एकुण कॅरॅक्टर म्हंटले तर आपल्यासारख्या कधीही कुठेही नांगी टाकणार्‍या संघाच्या स्पिरिटसाठी अत्यावश्यकच आहे. विशेषतः गांजा प्यायल्याप्रमाणे गोलंदाजी करणारे गोलंदाज संघात असताना असा फलंदाज असणे ही एक किमान गरज म्हणावी लागेल.

बाकी अजुन भारतीयांना, माध्यमांना, समालोचकांना वगैरे तेंडुलकरच्या निवृत्तीतच समाधी अवस्था लाभत आहे म्हणा!

आपल्या देशात आणखी एक घडते. जो उत्तम खेळतो तोच उत्तम कर्णधारही ठरेल असे गृहीतक ठेवून काहीजण वावरतात. प्रत्यक्षात ती जबाबदारी आल्यावर त्या खेळाडूचा मूळ खेळही प्रभावित होऊन बसतो. पुढेमागे विराटवर ही वेळ आणली जाऊ नये अशी इच्छा!

बहुधा आपण सगळे (आणखीन) एका (किंवा खर्‍याखुर्‍या) सार्वकालीन महान खेळाडूच्या मेकिंगचे साक्षीदार आहोत. Happy

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंड़या भाऊ
मला वाटतं विराट विषयीची तुमची मत हे पूर्वग्रह दुषित आहेत.
पण तुमच्या सारख्या ठिसूळ लोकांच्या फडतुस प्रतिक्रियांचा आम्हा विराट प्रेमीवर काहिच परीणाम होणार नाही

विराटकडे अत्युच्च शिखरावर पोचण्याची कुवत आहे , हें निर्विवाद. पण त्या शिखरावर अगदींच चिंचोळी जागा आहे असं मानून विराटला तिथं विराजमान करण्यासाठी तिथल्या कुणाला तरी खालीं खेचण्याची गरज आहे असं मात्र वाटत नाहीं. किंबहुना, तिथल्या दिग्गज मंडळीकडून शिखरावर झालेलं त्याचं स्वागतच विराटला अत्युच्च समाधान देणारं असेल !

दुसरं, मला अतिशय आवडणारे बरेच खेळाडू त्या शिखराच्या आसपासही पोचलेले नाहीत. मला - व कदाचित त्यानाही- त्यामुळे कांहींहीं फरक पडत नाहीं !!

विराटमध्ये क्षमता आहे! भरपूर वेळही आहे!
तो दिल्लीचाही आहे... तरी अभी दिल्ली बहुत दूर है!

खूप मोठा पल्ला गाठायचाय! त्या साठी क्षमता, सहनशिलता, एकग्रता, एकनिष्ठता इत्यादी बर्‍याच गोष्टींचा कमालीचा कस लागतो! ते काळच ठरवेल!

ऑल द बेस्ट विराट कोहली!!!!

हा लेख ऑक्टोबर २०१३ मध्ये लिहिलेला होता. आता पावणे तीन वर्षे होत आली आणि विराटने आधीपेक्षा अधिकच जबरदस्त प्रदर्शन केलेले आहे फलंदाजीचे! आता तरी अंधप्रेमाने कोणातरी दुसर्‍याची भजने गाण्यापेक्षा विराटच्या विराटपणाला सलाम ठोकूयात.

<< अंधप्रेमाने कोणातरी दुसर्‍याची भजने गाण्यापेक्षा विराटच्या विराटपणाला सलाम ठोकूयात.>> अंधप्रेमाने कीं डोसळपणे व रसिकतेने हें खेळाकडे पहाण्याच्या प्रत्येकाच्या वृत्तीवर व खेळाची त्याची जाण कितपत प्रगल्भ आहे, यावरच सोपवलेलं बरं !!

<< प्रतिसाद आपल्याला उद्देशून नव्हता. >> कोणालाही उद्देशून असला तरी आपला प्रतिसाद या चर्चेतला होता व त्यावरील माझी प्रतिक्रिया रांगडी असली तरी चर्चेला अनुसरूनच व प्रामाणिक आहे ! Wink

Pages