Submitted by मुग्धमानसी on 22 October, 2013 - 06:12
तुटता तुटता आता मी
एवढी लहान झाले आहे
माझे मलाच कळते आहे...
मी ’महान’ झाले आहे!
मनात कुठलेच किंतू नाहीत
डोक्यात कसले जंतू नाहीत
आटून आटून आता मीच
माझी तहान झाले आहे!
आगीत अलगद विहरते मी
वादळात सहज तरंगते मी
अणू अणूंच्या दिव्यत्वाचे
मी विज्ञान झाले आहे!
अथांग सागर आणि धरती
मला कशाची कुठली गणती?
अंश अंश मी या विश्वाचा
इतकी सान झाले आहे!
आता तोडून दाखवा ना...
मला खोडून दाखवा ना...
माझे मिटणेच माझ्या मागे
माझे निशाण झाले आहे!
वितळत जाते भूगर्भात
अशी अनोखी माझी जात
हरवत गेल्या अवकाशाचे
मीच भान झाले आहे!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे मलाच कळते आहे... मी
माझे मलाच कळते आहे...
मी ’महान’ झाले आहे!
माझे मिटणेच माझ्या मागे
माझे निशाण झाले आहे!
>>>>
वाह वाह!
ती दुसरी काही कळालीच नाही. ही मस्त
अगदी मस्त
अगदी मस्त
मस्त.. मस्त
मस्त.. मस्त
आटून आटून आता मीच माझी तहान
आटून आटून आता मीच
माझी तहान झाले आहे! >> मस्तच!
छान आहे कविता!!
छान आहे कविता!!
गझलेच्या वळणाने जाते ही
गझलेच्या वळणाने जाते ही कविता. सुंदर रचना आहे. आवडली.
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
क्या बात है ! >>>माझे मिटणेच
क्या बात है ! >>>माझे मिटणेच माझ्या मागे
माझे निशाण झाले आहे <<< अप्रतिम सुंदर