पदार्थ -
कणिक (गव्हाचे पीठ)
उकडलेले बटाटे
साबूत धणे,जीर, बडीशेप, मोहरी, हिंग
कांदा
टमाटर
हिरवी मिरची
आलं लसुन पेस्ट
थोडा ठेचलेला लसुन
कढीपत्ता (आवडत असल्यास)
कोथिम्बिर
चिंचेचा कोळ, गुळ
तेल
तिखट, मीठ, हळद, धने-जिरं पूड, गोडा मसाला
(सगळे जिन्नस हवे तेवढे आणि आवडेल तेवढे वापरावे)
कृती :-
* कणिक मीठ आणि थोडं तेल घालून मळून घ्यावी आणि ओल्या कापडाने झाकून ठेवावी.
* उकडलेल्या बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे.
हि भाजी करतांना फोडणीत जिरं-मोहरी हिंग, साबूत धणे, बडी शेप घालावी
कांदा घालून गुलाबी परतून त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ठेचलेला लसुन सोडावा
थोडं परतवून झालं कि टमाटर टाकावेत.
नंतर हळद, धने जिरं पूड, मीठ आणि चवीला साखर टाकावी
उकडलेले बटाटे कुचकरुन घालावे आणि झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
उतरवतांना कोथिम्बिर पेरावी…
* पुन्हा पातेल्यात तेल गरम करावे
जिरं आणि आवडत असल्यास खडा गरम मसाला घालून त्यात चिरलेला बारीक कांदा घालावा
आलं-लसुन पेस्ट घालावी. तिखट, मीठ, हळद, धने-जिरं पूड, मीठ घालून परतवावे.
त्यानंतर चिंचेचा कोळ आणि गुळ आवडेल तेवढे घालून एक उकळी आली कि त्यात भरपूर पाणी सोडावे वरून गोडा मसाला टाकावा.
* पाण्याला उकळी येई पर्यंत पीठाचे गोळे करून लाटी बनवून घ्यावी.
त्यात बटाट्याच्या भाजीचे सारण भरून करंजीच्या किंवा आवडेल त्या आकाराचे डम्पलिंगस बनवून तयार ठेवावे.
* पाण्याला उकळी आली कि सगळे डम्पलिंग त्यात सोडावे
झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.
डम्पलिंग तयार झालेत कि वाढतांना वरून भरपूर कोथिंबीर पेरावी. (आवडत असल्यास बारीक शेव भुरभुरावी)
नोट :-
>या डम्पलिंगना पळीने फार परतवू नये एखाद दोनवेळा आणि हलक्या हाताने परतवावे.
>चिंच-गुळ न घालता वाटलेला गरम मसाला वापरून मसालेदार पाण्यातही हे डम्पलिंग बनवता येतात (ज्यांना जसे आवडते तसे फोडणीचे पाणी करून घ्यावे)
>पाण्याचे प्रमाण जास्त घ्यावे कारण पदार्थ तयार होता होता पांणी आटून पिठामुळे घट्ट होत जात आणि पाण्याच्या प्रमाणानुसार इतर मसाले वापरात आणावे अन्यथा पाण्याला चव राहणार नाही.
>हा पदार्थ आंबट गोड किंवा साध्याच फोडणीच्या वरणात देखील करता येतो.
>डम्पलिंग हे पूर्ण अन्न(च) आहे त्यामुळे या बरोबर काहीही नसले तरीही चालते.
नुसतेच थाळीत घेऊन खातांना ब्रम्हानंद टाळी लागली नाही तरच नवल.
मस्त वाटतोय पदार्थ ह्यालाच
मस्त वाटतोय पदार्थ
ह्यालाच वरणफ़ळ म्हणतात का
रेसिपी इंटरेस्टिंग वाटते आहे
रेसिपी इंटरेस्टिंग वाटते आहे (खटपट आहे जरा) ..
फोटो नाही का?
वरण फळाचाच प्रकार पण यात
वरण फळाचाच प्रकार पण यात बटाट्याची भाजी भरून करतात आणि वरणात करण्यापेक्षा ते आंबट गोड किंवा मसालेदार पाण्यातच चविष्ट लागतात.
हे खाउन संपल्यानंतर डोक्यात
हे खाउन संपल्यानंतर डोक्यात शिरले आणि लिहायचे सुचले. पुढल्यावेळी पुन्हा केलेत कि फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन
मस्त वाटतोय पदार्थ>>> खरंच,
मस्त वाटतोय पदार्थ>>> खरंच, मस्त.. नक्की करुन पाहिन...
ह्यालाच वरणफ़ळ म्हणतात का>> नाही जाई.. यात वरण कुठेय?
पण खरं म्हणजे, वरण फळात तरी फळ कुठे असतं?
वरण फळात लाटलेल्या पोळ्यांचे तुकडे चिंचगुळाच्या आमटीत टाकून शिजवतात..
इंटरेस्टिंग..
इंटरेस्टिंग..
(खटपट आहे जरा) >>>>>>>>सशल
(खटपट आहे जरा) >>>>>>>>सशल वरण भात चपात्या भाजी अस सगळं आपण करतोच ना जेवणात त्या ऐवजी हा एकच पदार्थ पूर्ण अन्न आणि बदल सुद्धा … परवडतो कि
यात वरण कुठेय? पण खरं
यात वरण कुठेय? पण खरं म्हणजे,
वरण फळात तरी फळ कुठे असतं? वरण फळात
लाटलेल्या पोळ्यांचे तुकडे
चिंचगुळाच्या आमटीत टाकून शिजवतात..>>> अस होय
ह्याची कृती थोडीफार वरणफ़्ळासारखी वाटली मला
म्हणून विचारल
वरण फळाचाच प्रकार पण
वरण फळाचाच प्रकार पण यात
बटाट्याची भाजी भरून करतात
आणि वरणात करण्यापेक्षा ते आंबट गोड
किंवा मसालेदार पाण्यातच चविष्ट
लागतात.>>>>> इंटरेस्टिंग आहे हे
करून पाहिन
धन्स
डंपलिंगचाच आणखी एक लहान
डंपलिंगचाच आणखी एक लहान मुलांना अतिशय आवडणारा नवा प्रकार परत कधीतरी लिहीन
हं.........छान आहे . नवीन
हं.........छान आहे . नवीन प्रकार.
छान प्रकार आहे.
छान प्रकार आहे.
खरच छान आहे. कमी तेलात वन डिश
खरच छान आहे. कमी तेलात वन डिश मील.
(No subject)
आवडेश. नुसत्या वरणफळाऐवजी हा
आवडेश. नुसत्या वरणफळाऐवजी हा प्रकार करुन बघायलाच हवा.
वेगळी रेसेपी. छान वाटतेय.
वेगळी रेसेपी. छान वाटतेय.
अल्पना हर्षा नक्की करुन बघा
अल्पना हर्षा नक्की करुन बघा अन आवडलं की कळवा
छान आहे . नवीन
छान आहे . नवीन प्रकार.............
वन मिल डिश मस्तच
वन मिल डिश मस्तच
साधारण किती मोठा आकार असतो ?
साधारण किती मोठा आकार असतो ?
.
.
इंटरेस्टिंग.
इंटरेस्टिंग.