दिवाळी अंक २०१३

Submitted by नंदिनी on 17 October, 2013 - 00:34

२०१३ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ फोटोग्राफीचा मधे माझी मैत्रीण सीया खारकर चा इंटरव्ह्यु आहे :), माझ्या घराच्या जवळ आहे तिचा स्टुडीओ , मस्तं आहे स्टुडीओ आणि कामही छान आहे तिचं !

सर्व मायबोलीकर लेखक ,लेखीकांचे अभिनंदन!! आपल्या मायबोलीकरांची ही कामगिरी पाहुन खुप आनंद झाला.
नलिनी तुला खुप खुप धन्यवाद! तुझ्यामुळेच ही माहिती मिळाली.

हा धागा काढल्याबद्दल आभार्स Happy
मायबोलीकर लेखक, लेखिका, संपादक, सहसंपादक सगळ्यांचं मनापासून अभिनंदन..
फ फोटोग्राफीचा आणि सप्तसूर या अंकांबद्दल विशेष उत्सुकता आहे.
सावली, फ फोटोग्राफीचा- ह्याची प्रिंटेड प्रत कुठे मिळू शकेल?

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्व मायबोलीकर लेखक ,लेखीकांचे अभिनंदन!!
आपल्या मायबोलीकरांची ही कामगिरी पाहुन खुप आनंद झाला. >> +१

तनिष्काच्या दिवाळी अंकात नंदिनीचा "दक्षिणरंग" छान आहे.
त्याच अंकात माझाही :फ्रॅन्कफर्ट टु वॉशिन्ग्टन डीसी " हाही एक लेख आहे.

मुशाफिरी वाचायला घेतला आज. नंदिनी आणी ललिता दोघींचेही लेख छान आहेत. बाकीचा अंक चाळला. ईंटरेस्टिंग वाटतोय. छपाई आणी एकूण प्रेझेंटेशन पण छान.

हितगुज दिवाळी अंक कुठे आहे? गेली दहा मिनिटे शोध शोध शोधतेय मायबोलीवर? की काही ग्रूपवगैरे आहे जो जॉइन केल्यावरच अंक दिसेल?

वाह सगळ्यांचे अभिनंदन.
'पुरुष उवाच' या दिवाळी अंकात माझी एक कविता आहे. Happy कोणी वाचली तर जरूर कळवा.

दिवाळी अंक पाडव्याला येणार.>> ओके. थॅन्क्स. अशी घोषणा कुठे केली आहे नेमकी? मला ती सुद्धा दिसली नाही. म्हणजे तशी करायलाच हवी असं नसेलही कदाचित, फक्त दिवाळीच्या पहिल्या दिवशी मायबोलीवरचा अंक वाचायची उत्सुकता, सवय आहे म्हणून.

शर्मिला, मी संपादकांच्या विपुत विचारपूस करायला गेले होते, तिथून उल्हास भिडे यांच्या विपुमधे ठेवलेला निरोप दिसला,

अंक उशीरा आल्याने अगदी चुकल्या चुकल्यासारखं झालं पण. इतर जालीय (:फिदी:) अंकद्देखील वाचून झाले, पण मायबोलीचा अंक आल्याशिवाय दिवाळी होत नाही ना!!!!

मानुषी, तनिष्कामधील लेखाचे कळवल्याबद्दल आभार. तो अंक आला की नाही तेच मला समजलं नव्हतं.

शर्मिला फडके | 3 November, 2013 - 01:11 नवीन
दिवाळी अंक पाडव्याला येणार.>> ओके. थॅन्क्स. अशी घोषणा कुठे केली आहे नेमकी? मला ती सुद्धा दिसली नाही. म्हणजे तशी करायलाच हवी असं नसेलही कदाचित, फक्त दिवाळीच्या पहिल्या दिवशी मायबोलीवरचा अंक वाचायची उत्सुकता, सवय आहे म्हणून.
>>>>>>

घोषणा, किंवा दिवाळी अंक कधी येणार याचे एखादे टीझर यायला पाहीजे होते. मुख्यत्वेकरून नेहेमीसारखा पहिल्या दिवशी दिवाळी अंक येणार नसेल तर नक्कीच..

मी २३६० वेळा हा धागा पाहिला, मायबोली दिवाळी अंक आला का बघावा म्हणून बघताना..
निषेढ! म्हणे नावात काय आहे!!?? Uhoh :दिवाळी:

----------------------------

वर लिहीलेल्या लिंक्स पाहिल्या. उत्साह जोरदार आहे मायबोलीकरांचा.
सावली तर अगदी जोरात! सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

थँक्यु लोक्स Happy

सीया खारकर चा इंटरव्ह्यु आहे >> दिपांजली, तीचे काम खरच छान आहे. मला वाटलंच होतं की कोणी ना कोणी मायबोलीकर तीला नक्की ओळखत असणार.

आयपॅड वर नीट सगळं पान दिसत नाहीये. >> ओके नक्कीच बघते. इथे आमच्या कोणाकडेच आयपॅड नाहीये. दुसर्‍या टॅबवर बघते. काही बदल केला तर तुला सांगेन म्हणजे तुला पुन्हा एकदा चेक करता येईल.

फ फोटोग्राफीचा- ह्याची प्रिंटेड प्रत कुठे मिळू शकेल? >> हा अंक फक्त ऑनलाईन माध्यमातच उपलब्ध आहे.

घोषणा, किंवा दिवाळी अंक कधी येणार याचे एखादे टीझर यायला पाहीजे होते. मुख्यत्वेकरून नेहेमीसारखा पहिल्या दिवशी दिवाळी अंक येणार नसेल तर नक्कीच>>, बस्के +१

मला भारतातून काही दिवाळी अंक मागवायचे आहेत.
सध्या वेगवेगळ्या रेकमेंडेशननुसार माहेर, मौज, मुशाफिरी आणि अंतर्नाद हे आणायला सांगितले आहेत. इतर चांगल्या अंकांची नावं सुचवाल का? मटा, सकाळ इत्यादी हे नेहेमीचे यशस्वी कसे आहेत ह्यावेळी?
मुलांकरता असलेला अंक मागवायचा असतील तर किशोर, ठकठक, चंपक, चांदोबा वगैरेंचे अंक कोंणी चाळले आहेत का?
बाकीही तुम्हाला चांगले वाटलेले काही अंक असल्यास कृपया सुचवा.

मला पण मो सारखाच प्रश्न पडला आहे Happy छंदांविषयी(हॉबी) काही अंक निघतो का?चांगला आहे का?
अनुभव,लोकमत दिपावली हे अंक कसे आहेत?

Aaple chhanda asa anka nighto.
Loksatta, mouj, akshar, ityadee, muktashabda he anka uttam aahet.
Maayboli chya kharedi vibhagat upalabdha ahet.

Pages