दसरयाच्या शुभेच्छा ….!!!!!
साधारण चार वर्ष उलटली असतील अजूनही तशीच जशी पहिल्यांदा पहिली होती. तोच भरजरी काठ, तेच नाचरे मोर सात. अनेक साड्यांच्या गर्दीत आपले अस्थित्व जाणवून देणारी "पैठणी"
एकाच गोष्टीची खंत, सरत्या काळात वापर फक्त दोनदाच. एकूणच महिलावर्गाच गणित अजूनकाही पुरुषवर्गाला उलगडलेलं नाही. आईची हि पैठणी नवीन रूपाच्या प्रतीक्षेत असावी कदाचित ……………………
आज -कालच्या दुकानातल्या नवीन पैठण्या फारच सुंदर दिसतात, त्यावर केलेली बारीक कलाकुसर फारच भावली मला. मग ठरवलं आपण करून बघायचं. आईला न विचारता मी केलेला हा छोटासा प्रयत्न. पैठणी आणि जरदोसी असं नवीन काहीतरी. फक्त पदर (एक मिटर ) Neck बॉर्डर (दीड मीटर) design केली आहे.
लागलेला वेळ :- साधारण दोन आठवडे
अंदाजे खर्च :- ३०००/-(साडी वगळून)
सुरवात केली तेव्हा खूपच सोपी वाटणारी हि गंमत खरंच जरा कठीण आहे, म्हणूनच कदाचित किमती प्रचंड असतील. हळू हळू जसं काम पूर्ण होत गेलं तसं माझं मलाच खूप छान वाटू लागलं, माझा एकाच उद्देश आहे कि वापर अजून दोन-चार वेळा व्हावा म्हणून केलेला हा आटापिटा.
आईला आवडेल हि खात्री आहे, तुम्हालाहि आवडली ना ……. !!!!!
"पैठणी" - साडी मनातली
Submitted by salgaonkar.anup on 13 October, 2013 - 09:12
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वत्सला मेलला रिप्लाय केलेला
वत्सला मेलला रिप्लाय केलेला आहे.
यासाठी पैठणी वापरण्यापेक्षा
यासाठी पैठणी वापरण्यापेक्षा प्लेन साडी वापरा, तुमची कला अधिक उठून दिसेल, .अनुमोदन
तुमच्या कलेच कौतुक आहे फक्त नीट चॉईस करा.....
>>(मी तुमची आई असते तर माझ्या
>>(मी तुमची आई असते तर माझ्या पैठणीवर असे टिकल्या, खडे लावून केलेले प्रयोग मला आवडले नसते)>>>>
अनुमोदन .
३०००/ खर्च करून पैठणी चा असा 'अवतार' मी करू दिला नसता.
शिवाय जुन्या पैठणीला हे ओझे पेलेल का?
जॉर्जेट् , शिफॉन वरती अशी कलाकुसर चांगली दिसते.
>>पैठणी, चंदेरी, माहेश्वरी ह्या राजसी आणि खानदानी बाजाच्या साड्यांवर खडे, टिकल्या, कशिदाकारी इत्यादी अत्याचार "डिझायनर साडी" च्या नावाखाली झालेले पाहिले की जीव हळहळतो माझा. >> अनुमोदन
१. आई सोशिक आहे! २. 'विनाश
१. आई सोशिक आहे!
२. 'विनाश काले..... ' असे माझी आई मला म्हणाली असती मी जर असे काही माझ्या आईच्या पारंपारीक साडीचे वाटोळं केले असते तर... आणि मी तिच्या जागी असते तर बदडून काढले माझ्या मुलाला असते माझ्या देखण्या पैठणीचे असे काही केले असते तर.( माफ करा, स्पष्ट प्रतिक्रिया आहे)
या प्रतिक्रियांचा निषेध! पर्सनल बोलण्याचे काही कामच नाही असे माझे मत!
आवडली / आवडली नाही / पैठणीवर प्रयोग केलेले आवडत नाहीत इत्यादी मते पटू शकली.
मुग्धा केदार आणि सिंडरेलांचे मत (मैत्री होण्याची भीती असूनही) पटले.
दरवेळी असे काही प्रतिसाद वाचले की राग येतो. क्षमस्व!
(हे झाले अवांतर - मला सर्व प्रकाशचित्रे आवडली, कदाचित त्यातले काही फारसे समजतच नसेल म्हणूनही)
चु भु द्या घ्या
-'बेफिकीर'!
तुमच्या सगळ्यांच्या आंबट-गोड
तुमच्या सगळ्यांच्या आंबट-गोड प्रतिक्रियांसाठी मी खरच खूप आभारी आहे.
तुम्ही दिलेल्या सल्ल्यांचा मी नक्की विचार करीन. पण, या पूर्वीही मी पैठणी आणी इतर साड्या जरदोसी करून विकल्या आहेत. प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. शेवटी "ग्राहकम सुखाय …!!!!"
मला पैठणीच्या पदरापेक्षा १
मला पैठणीच्या पदरापेक्षा १ रंग पैठणीवर बुट्टीवर जरदोसी पॅचवर्क केलेलं आवडलं असतं... त्यामुळे फॅशन आणि पैठणीचा मूळ जीव पदर दोन्ही एकत्र नांदले असते.. हे मा वै म!
अनुप, पैठणी आवडली. वेगळा
अनुप, पैठणी आवडली. वेगळा प्रकार.... परवाच दादरला गेले होते. काही दुकानात असे प्रकार डिस्पेला लावलेले पाहीले. पैठणी प्रकारातले ड्रेस मटेरीयल मिळते, त्यावर ही असे काम शोभून दिसेल.
तुमच्या चिकाटीला दाद दिली पाहीजे.
Pages