पावसाळा

Submitted by बागेश्री on 6 October, 2013 - 06:32

घनघोर दाटलेले मेघ
रिते न होता घोंघावत राहतात

रस्त्याच्या कडेला,
अर्धवट जगलेले क्षण फेर धरतात
आठवणी भिरभिरतात,
मोडक्या स्वप्नांचे कपटे,
वाळून भुरभूरीत झालेल्या आशा
धूळ होऊन पिंगा घालतात,

वावटळ उठते!

जमिनीपासून उठाव घेते...
सगळं गरागरा फिरवते..
थोडी पलीकडे जाते...

स्थिरावते..

तिथेच कुठेशी.. मी त्रयस्थ...
डोळ्यांच्या पापण्यांवर,
हाता-पाया, कपड्यांवर.. फक्त धूळ घेऊन उभी...!!

निजलेली वावटळ पाहून ढगांचं बेमालूम पांगणं...

आजही पावसाने कोसळणं टाळलं

हल्ली सोशिक झालाय फार..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली

रस्त्याच्या कडेला,
अर्धवट जगलेले क्षण फेर धरतात
आठवणी भिरभिरतात,
मोडक्या स्वप्नांचे कपटे,
वाळून भुरभूरीत झालेल्या आशा
धूळ होऊन पिंगा घालतात,

निजलेली वावटळ पाहून ढगांचं बेमालूम पांगणं...

बहोत खूब.............. एवढंच सुचतंय.............. Happy
खूप वेडं आहे असं सुचणं !!!! वचकाला खुळावणारं !!!!