सल्ला हवा आहे

Submitted by याज्ञी on 3 October, 2013 - 04:15

नमस्कार!
मी इथ खुप दिवसान्पासुन फक्त वाचन करत होते. हे कुठे टाकाव कळल नाही. खर तर सल्ला हवा आहे. मायबोलीवर चान्गले सल्ले मिळतात, हे माही त होत.
माझ्या नात्यातली एक मुलगी तिच्या १२ वर्षाच्या मुलासहीत माहेरी पुण्यात रहाते.विधवा आहे. नोकरी करते. महिना १८००० पगारात काटुनकुटुन १४००० हाती पडतात.
दोन भाऊ. भावान्ची लग्न झालेली. तिचे वडील रिटायर्ड झाले तेव्हा रिटायरमेन्टच्या पैशात त्यान्नी एक पावणेदोन गुन्ठ्याचा प्लॉट घेतला. मागच्या काही अनुभवावरुन पुढे काही वाट्या-हिश्श्यावरुन भानगडी होउ नयेत म्हणुन प्लॉट मोठ्या मुलाच्या नावावर घेतला. नन्तर त्यान्नी मिळालेल्या फन्डाच्या पैशात खाली ८०० स्क्वे.फु. (४ रुम्स) बान्धकाम केल. साधारणतः १९९९ मधे ते सगळे तिथे रहायला गेले. नन्तर ज्या भावाच्या नावावर प्लॉट होता त्याच्याकडे पैसे जमले म्हणुन वडीलान्नी त्या पैशान्नी वरतीही ४०० स्क्वे.फु (१ बी एच के) बान्धकाम केल. आर्कीटेक्ट कडुन प्लॅन काढला होता.त्यान्च्या म्हणण्याप्रमाणे जी +१ बान्धकामाचा आराखडा तयार करुन बान्धकाम केल.
हिच्या मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर काही काळानन्तर तो (वरच्या घरासाठी पैसे त्याने दिले असल्याने) वरच्या मजल्यावर राहु लागला. खालच्या घरात लहान भाऊ जो लग्नाचा होता तो, ही , हीचा मुलगा, आई-वडील रहात होते. २०१० मधे तिचे वडील वारले. २ वर्षानन्तर तिच्या लहान भावाचे लग्न झाले.

आता तिच्यापुढे २ प्रश्न आहेत. हिचा मुलगा मोठा होतोय म्हणुन तिला स्वतःच घर असण जरुरीच आहे. मुलाच्या शिक्षणाला पैसा लागणारच आहे. म्हणुन दुसरीकडे १५-२० लाख खर्चण्याऐवजी ती तिथेच वरती ३रा मजल्यावर बान्धकाम करायच म्हण्तेय. याला मोठ्या भावाने परवानगी सुद्धा दिली आहे (घर त्याच्या नावावर आहे).
तिचा प्रश्न आहे. की हे घर तिच्या नावावर राहिल आणि पुढे मोठा भाऊ किन्वा त्याची मुल त्यावर हक्क सान्गगणार नाही यासाठी डीड कसे करुन घ्यावे? स्टॅम्पपेपरवर तिच्या भावाची सही घेउन तिचा मार्ग मोकळा होईल का? मागे तिच्या वडीलान्नी २-३ वकीलान्कडे कितीतरी चकरा टाकल्या आणि सल्ले घेतले. तेव्हा वकीलाने घराच्या मजल्याची विभागणी करता येत नसल्याचे स्पष्ट सान्गीतले. म्हणजे खालचा मजला तिच्या लहान भावाला, वरचा मजला मोठ्याचा अस करता येणार नाही. त्यान्च्या म्हणण्याप्रमाणे जमिनीची विभागणी करावी लागेल. मग अर्धा भाग एकाला, अर्धा दुसर्याला अस केल तर मग हिच काय? आणी बान्धलेल्या घराची पुन्हा तोडफोड करावी लागेल ते वेगळच.
बर परत तिच्या आईच्या नावावर करुन मग तिघान्चे हिस्से केले तर आता पुन्न्हा घराची सध्याची किम्मत काढुन तेवढ्या किमतीच्या काही टक्के 'नावावर करण्यासाठी' भरावे लागतात अस त्यान्ना कुणीतरी सागितल. म्हणजे पुन्हा झन्झटच आहे. कुणाच्या ओळखीत पुण्यातील खात्रीशीर स्त्री वकील असेल तर सान्गाल का?

दुसरा प्रश्न असा की घर आर सी सी आहे. जी +१ (ग्राउन्ड +१) बान्धकामाल परवानगी आहे. तेवढ बान्धकाम झालेल आहे. एफ एस आय शिल्लक नाही. मग ही वरती जे बान्धकाम करेल ते अनधिकृत नाही का होणार? बर समजा तेही झाल तरीकमित कमी खर्चात व खालच्या मजल्यावर कमीत कमी लोड येइल असे बान्धकाम करण्यासाठी काय करावे?

याबद्द्ल कृपया जाणकारान्नी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<जर तसे असेल तर +१ वर जी उर्वरीत ४०० चौफू जागा आहे त्यात २ रूम्स निघू शकत नाहित का?<< नाही.तिच्या मोठ्या भावाच्या १ बी एच के च्या पुढची मोकळी जागा आहे ती. या खालच्या घराच्या वरच मागच्या तीन रुमच्या अगदी वर (हॉल सोडुन) ते बान्धल आहे. ती जागा त्यान्ना वापरायला हवीये.

तस तिला लहान भावाच्यात रहायला पण ३-४ वर्ष प्रॉब्लेम होणार नाही. आई आहे तोपर्यन्त सगळ सुरळीत असेल. पण शेवटी डिपेन्डन्सी तरी किती करायची? प्रत्येक वेळेस त्यान्च्यापुढे हात पसरावे लागणार. एकदा त्याचेही मुल्-बाळ झाल्यावर तो ही त्यान्च्यात अडकणार.

<<पण G+2 ची परवानगी नसावी (ही देखिल चौकशी तिथेच... अर्थात ही चौकशी झालेली असावी<<
माझ्या माहितीप्रमाणे, तिच्या बाबान्नी जी +१ चा आराखड्याप्रमाणेच बान्धल आणि नन्तर गुन्ठेवारी पद्धतीने रेग्युलराईज करुन घेतलय.
म्हणुनच मी वरती म्हणाले होते की खालच्या मजल्यान्वर लोड न येता बान्धकाम करता येइल का? अगदी कौल/ पत्रासुद्धा टाकायला तयार आहे ती.
पुढे मागे हे पण रेग्युलराएज करुन घेता एइल. सेफ्टी पॉईन्ट ऑफ व्ह्यु ने मलाही तीने वरती रहाव हे बरोबर वाटतय.

माझ्या माहितीप्रमाणे, तिच्या बाबान्नी जी +१ चा आराखड्याप्रमाणेच बान्धल आणि नन्तर गुन्ठेवारी पद्धतीने रेग्युलराईज करुन घेतलय.
>>>>
म्हणजे ? तो २ गुंठ्यांचा प्लॉट अ‍ॅग्रीकल्चरल होत की काय? आणि बांधकामानंतर गुंठेवारी केली आहे का? तसे असेल तर कदाचित FSI पूर्ण २००० चौफू वर मिळणार नाही. please clarify this.

बांधकाम RCC असेल तर ३र्‍या मजल्याचा लोड येणार नाही (concrete स्लॅब सहित). लोड बेअरिंग असेल तर खालच्या मजल्याची भिंत असेल त्यावरच (शक्यतो) वरच्य मजल्याची भींत बांधतात, मी अश्या बांधकामांत २ मजले सर्रास बघितले आहेत, तिसरा मजला बघितल्याचे आठवत नाही. १९९९ चे बांधकाम म्हणजे शक्यतो RCC मध्येच असेल. खरे तर या प्रश्नाचे उत्तर ते घर बघून एखादा civil engineer आरामात देऊ शकेल.

प्लॉट एनए होते. या लोकान्नी फक्त आर्कीटेक्टकडुन प्लॅन काढला पण तो म. न्.पा. कडुन पास नव्हता केला त्यावेळेस. त्या एरियातली बहुतेक बान्धकामे सुरवातीला तशीच होती. काही प्रमाणात दण्ड भरुन नन्तर रेग्युलराएज केली गेली.

plan r.c.c. ch aahe.

मग माझ्यामते तरी १. FSI आहे का (आणि तो असेल असे वाटते) आणि २. G+2 ची परवानगी आहे का हेच प्रश्न उरतात.

पुढे तिला अजुन काय शिकता येइल? आणि आता मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमवायचे की स्वतःवरच लावायचे? >> ह्या प्रश्नाचे उत्तर गणित मांडून तिचे तिलाच करता येईल. उदा: भारतात रिटायर होण्याचे वय ६० आहे. अजून सुमारे १५ वर्षे ती काम करू शकते. हा मोठा काल आहे - २ वर्षे एम.बी.ए. किंवा प्लेसमेंट चांगली असेल असा कुठलाही कोर्स (किंवा कुठलेही इतर अर्थार्जन करू शकेल असे कौशल्य) शिकण्यात घालवली तरी नंतर जर दरमहा ४०००० ची नोकरी लागली तर आत्ता पेक्षा सुमारे २६००० दरमहा जास्त तिचे उत्पन्न राहील. म्हणजे वयाच्या ६०व्या वर्षी सुमारे ४०,००,००० रक्कम शिल्लक असेल, बहिणीच्या नवऱ्याचे-भावांचे कुणाचेहि हातापाया न पडता. ह्या मार्गाने तिने जायचे ठरवले तर मायबोलीवर अनेक महिला आयुष्यात उशिरा वर्कफोर्स मध्ये आलेल्या आहेत. त्या ह्या बाबतीत जास्त सल्ला देऊ शकतील. अर्थात तिची हिम्मत आणि कष्टाची तयारी हवी. नसेल तर ती शोधतीये तो सोसायटी कर्ज-म्युनिसिपाल्टी-भाऊ-मुलगा हा मार्ग हि काही वाईट नाहीये. तिला मनापासून शुभेच्छा!!

Your friend can put her son in the hostel or school with a hostel facility. That is also one of the option available.

Happy I think your friend should just join 'Sanyukta' on Maayboli Wink It's interesting to see that 3 IDs (me, Ashwinimami and now Arundhati) respond to an issue in similar manner. Sanyukta was the only factor we had in common. Happy

मला तरी सिमन्तीनी चा एम बी ए वाला पर्याय व्यवहार्य वाटत नाहीये. तिने लिहिलेय तसे उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ दोन्ही या बाईला परवडू शकेल असे वाटत नाही. त्यातून असे शिकूनही लगेच कोणाला ४०००० ची नोकरी लागत नाही. तशा नोकरीसाठी अगदी टॉपच्या कॉलेजमधे अ‍ॅडमिशन मिळवायला हवी जसे की आय आय एम किन्वा पुणे युनि. किन्वा सिम्बॉयसिस ई. कोणत्याही अलतू फालतू कॉलेजमधून एमबी ए किन्वा इतर कोणतेही प्रोफेशनल कोर्सेस केले तर फार खास नोकरी लगेच मिळत नाही.
मला वाटते , आहे ही नोकरी चालू ठेवूनच इतर काही साईड बीझीनेस करण्याचा प्रयत्न करावा. किन्वा आवडत्या व्यवसायाभिमुख असे पार्ट टाईम (नोकरी संभाळून)शिक्षण घ्यावे. ज्यायोगे थोडे अधिक पैसे कमवता येतील.

डेलिया +१
प्रॅक्टीकली पॉसिबल वाटत नाही तो एमबीए वाला ऑप्शन कितीही कष्टाची तयारी ठेवली तरी .. असे माझे मत आहे!

इथे सगळे जण सल्ले देताहेत तिने MBA शिक्षण घ्यावं, मुलाला हॉस्टेल ठेवा वगैरे.
पण कोणी हा विचार करतय का, १५००० कूठले चांगले हॉस्टेल आहे व शिक्षणाचा खर्च पुरेल?

१. उत्पन्न वाढवा. तसे केल्यास सध्याच्या राहत्या घराजवळ भाडोत्री तत्त्वावर एखादी छोटी खोली घेता येऊ शकेल. माहेरचे घर बेस म्हणून ठेवले तरी अशा प्रकारे थोडी प्रायवसी मिळेल, मुलाला निवांतपणा मिळेल.

२. बेकायदेशीर बांधकाम करण्याच्या फंदात न पडणे कधीही इष्ट! तसे केल्यास ते पाडले जाण्याची व त्यापायी भुर्दंड सोसण्याची तयारी असू द्यावी, किंवा मग ते मान्यताप्राप्त करून घेण्यासाठी करावी लागणारी सतरा लचांडे.

१. उत्पन्न वाढवा. तसे केल्यास सध्याच्या राहत्या घराजवळ भाडोत्री तत्त्वावर एखादी छोटी खोली घेता येऊ शकेल. माहेरचे घर बेस म्हणून ठेवले तरी अशा प्रकारे थोडी प्रायवसी मिळेल, मुलाला निवांतपणा मिळेल.

२. बेकायदेशीर बांधकाम फंदात न पडणे कधीही इष्ट! तसे केल्यास ते पाडले जाण्याची व त्यापायी भुर्दंड सोसण्याची करण्याच्या तयारी असू द्यावी, किंवा मग ते मान्यताप्राप्त करून घेण्यासाठी करावी लागणारी सतरा लचांडे.
+१

आराखड्यात जी खालची बाल्कनी दाखविली आहे ती थोडी वाढवुन (अर्थात कायदेशीर बाबी सांभाळुन) मुलाला आणि तिला एखादी रुम करणे शक्य आहे का? थोडासा FSI असेल तर असा वापरता येइल का?

Pages