सल्ला हवा आहे

Submitted by याज्ञी on 3 October, 2013 - 04:15

नमस्कार!
मी इथ खुप दिवसान्पासुन फक्त वाचन करत होते. हे कुठे टाकाव कळल नाही. खर तर सल्ला हवा आहे. मायबोलीवर चान्गले सल्ले मिळतात, हे माही त होत.
माझ्या नात्यातली एक मुलगी तिच्या १२ वर्षाच्या मुलासहीत माहेरी पुण्यात रहाते.विधवा आहे. नोकरी करते. महिना १८००० पगारात काटुनकुटुन १४००० हाती पडतात.
दोन भाऊ. भावान्ची लग्न झालेली. तिचे वडील रिटायर्ड झाले तेव्हा रिटायरमेन्टच्या पैशात त्यान्नी एक पावणेदोन गुन्ठ्याचा प्लॉट घेतला. मागच्या काही अनुभवावरुन पुढे काही वाट्या-हिश्श्यावरुन भानगडी होउ नयेत म्हणुन प्लॉट मोठ्या मुलाच्या नावावर घेतला. नन्तर त्यान्नी मिळालेल्या फन्डाच्या पैशात खाली ८०० स्क्वे.फु. (४ रुम्स) बान्धकाम केल. साधारणतः १९९९ मधे ते सगळे तिथे रहायला गेले. नन्तर ज्या भावाच्या नावावर प्लॉट होता त्याच्याकडे पैसे जमले म्हणुन वडीलान्नी त्या पैशान्नी वरतीही ४०० स्क्वे.फु (१ बी एच के) बान्धकाम केल. आर्कीटेक्ट कडुन प्लॅन काढला होता.त्यान्च्या म्हणण्याप्रमाणे जी +१ बान्धकामाचा आराखडा तयार करुन बान्धकाम केल.
हिच्या मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर काही काळानन्तर तो (वरच्या घरासाठी पैसे त्याने दिले असल्याने) वरच्या मजल्यावर राहु लागला. खालच्या घरात लहान भाऊ जो लग्नाचा होता तो, ही , हीचा मुलगा, आई-वडील रहात होते. २०१० मधे तिचे वडील वारले. २ वर्षानन्तर तिच्या लहान भावाचे लग्न झाले.

आता तिच्यापुढे २ प्रश्न आहेत. हिचा मुलगा मोठा होतोय म्हणुन तिला स्वतःच घर असण जरुरीच आहे. मुलाच्या शिक्षणाला पैसा लागणारच आहे. म्हणुन दुसरीकडे १५-२० लाख खर्चण्याऐवजी ती तिथेच वरती ३रा मजल्यावर बान्धकाम करायच म्हण्तेय. याला मोठ्या भावाने परवानगी सुद्धा दिली आहे (घर त्याच्या नावावर आहे).
तिचा प्रश्न आहे. की हे घर तिच्या नावावर राहिल आणि पुढे मोठा भाऊ किन्वा त्याची मुल त्यावर हक्क सान्गगणार नाही यासाठी डीड कसे करुन घ्यावे? स्टॅम्पपेपरवर तिच्या भावाची सही घेउन तिचा मार्ग मोकळा होईल का? मागे तिच्या वडीलान्नी २-३ वकीलान्कडे कितीतरी चकरा टाकल्या आणि सल्ले घेतले. तेव्हा वकीलाने घराच्या मजल्याची विभागणी करता येत नसल्याचे स्पष्ट सान्गीतले. म्हणजे खालचा मजला तिच्या लहान भावाला, वरचा मजला मोठ्याचा अस करता येणार नाही. त्यान्च्या म्हणण्याप्रमाणे जमिनीची विभागणी करावी लागेल. मग अर्धा भाग एकाला, अर्धा दुसर्याला अस केल तर मग हिच काय? आणी बान्धलेल्या घराची पुन्हा तोडफोड करावी लागेल ते वेगळच.
बर परत तिच्या आईच्या नावावर करुन मग तिघान्चे हिस्से केले तर आता पुन्न्हा घराची सध्याची किम्मत काढुन तेवढ्या किमतीच्या काही टक्के 'नावावर करण्यासाठी' भरावे लागतात अस त्यान्ना कुणीतरी सागितल. म्हणजे पुन्हा झन्झटच आहे. कुणाच्या ओळखीत पुण्यातील खात्रीशीर स्त्री वकील असेल तर सान्गाल का?

दुसरा प्रश्न असा की घर आर सी सी आहे. जी +१ (ग्राउन्ड +१) बान्धकामाल परवानगी आहे. तेवढ बान्धकाम झालेल आहे. एफ एस आय शिल्लक नाही. मग ही वरती जे बान्धकाम करेल ते अनधिकृत नाही का होणार? बर समजा तेही झाल तरीकमित कमी खर्चात व खालच्या मजल्यावर कमीत कमी लोड येइल असे बान्धकाम करण्यासाठी काय करावे?

याबद्द्ल कृपया जाणकारान्नी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एफ एस आय नसताना बांधकाम का करता ? ते अनधिकृतच ठरेल. पुढे मागे त्या कारणासाठी भावाने हरकत घेतली नाही तरी सरकार हरकत घेईल.
आहे त्या परिस्थितीत, एक बेडरुम तिला वापरता येईल कि. गुंतवणूकच करायची असेल तर दुसरे घर बघा.

माफ करा, त्यान्च खालच घर ४ रुमच म्हटल तरी बेडरुम एकच आहे. मध्यभागी एका छोट्या रुमइतक्या ओपन पॅसेजमधे डायनिन्ग टेबल होता तो काढुन तिथे सध्या ती, तिची आई, आणि तिचा मुलगा असे झोपतात.
गुन्तवणुकीपेक्षा तिला आता निवार्याची गरज आहे कारण तिच्या लहान भावाचही लग्न झालय.
वरती एक रुम, किचन बान्धुन पत्रा टाकला तर नाही चालणार का?

एफ एस आय शिल्लक नाही. मग ही वरती जे बान्धकाम करेल ते अनधिकृत नाही का होणार? >> हो अनाधिकृतच होईल.

भावांच्या हिश्श्यात वाटणी हवी असल्यास म्युच्युअल अंडरस्टँडींगने घराची सद्याची किंमत भागीले ३ असे पैसे घेऊन दुसरीकडे स्वतःचे घर घेतलेले कधीही चांगले.

चटईक्षेत्र परवाना नसल्यास बांधकाम करणे गैर.

भावांच्या हिश्श्यात वाटणी हवी असल्यास म्युच्युअल अंडरस्टँडींगने घराची सद्याची किंमत भागीले ३ असे पैसे घेऊन दुसरीकडे स्वतःचे घर घेतलेले कधीही चांगले.>>>>>>मला नाही वाटत, असे पैसे तिचे भाऊ देतील. कारण आता भाव फार वाढ्लेत.

धन्यवाद मित्र-मैत्रीणिन्नो! Happy
काल तिला हे सर्व समजावल.
त्यान्च्या एरियात खुप जणान्नी २ मजल्याची पर्वानगी असताना पाच्-पाच मजले चढवलेत अस ती म्हणते. काहीन्नी तर बाहेरील भिन्तीसुद्धा एका विटेच्या केल्यात. कॉर्पोरेशनकडुन वाढीव एफ एस आय आज-उद्या मिळेल या आशेवर दोन रुम बान्धायला काय हरकत आहे अस विचारत होती.

त्यान्च्या एरियात खुप जणान्नी २ मजल्याची पर्वानगी असताना पाच्-पाच मजले चढवलेत अस ती म्हणते. काहीन्नी तर बाहेरील भिन्तीसुद्धा एका विटेच्या केल्यात. कॉर्पोरेशनकडुन वाढीव एफ एस आय आज-उद्या मिळेल या आशेवर दोन रुम बान्धायला काय हरकत आहे अस विचारत होती.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

ही मोठ्यांची कामे पाडायला वेळ लागेल, कारण ते पैसे खाउ घालतील, पण तसं तुमच्या मैत्रीणीला शक्य दिसत नाही. सो, बेस्ट कायद्यानुसार वागणे.

कायदा पैसेवाल्यांना उशीरा दणका देतो, तर कमी पैसेवाल्यांना लौकर. Sad

विजय अनुमोदन.
तुमच्या मैत्रिणीने इतरत्र स्वतंत्र घर घेणंच इष्ट ठरेल. पण बाकीचे मुद्दे ही आहेतच. एकटं मूलाला घेऊन राहणं. शिवाय सर्व घरातल्या लोकांपासून दूर. हा विचार मला किंचित अस्वस्थ करून गेला. पण भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहता वेगळं घर घेऊन राहणं योग्य. शेवटी घरं वेगळी झाली तरी जिव्हाळा कमी होत नाही.

<१४००० रु. प्रतिमहा इतक्या कमाईत दोघांचा खर्च वजा करता पूण्यात चांगले घर विकत येईलसे वाटत नाही.जर आले तर ते चांगल्या वस्तीत नसणार<< हम्म, बरोबर आहे तुमचं सातीताई.
<<ही वाढिव बेडरूम लिगली आपली कधीच होणार नाही हे समजून चालावे पहिल्यापासून.<<
माझ्या माहितीप्रमाणे सरकार अस घरात जर कोणी रहात असेल तर बेघर करत नाही/ बान्धकाम पाडत नाही. बाकी जाणकार सान्गतीलच.
सरकारच सोडुन देउ पण कमीत कमी ते स्ट्रक्चर आहे तोपर्यंत तरी तिच्या ताब्यात रहाव सासाठी लिगली काही कराव लागेल ना?
म्हणजे जोपर्यन्त लहान भावात निभावतय तोपर्य्न्त राहील. त्या दोन रुम भाड्याने देइल. तेवढे महिने तरी तिला कर्जाचा हप्ता इ. फेडण्याकरता वापरता येइल आणि नन्तर पुढे- मागे पटल नाहीच तर ती आणि तिचा मुलगा तिथे जाउन राहतील.

या वाढीव बांधकामासाठी मनपा वगैरेची परवानगी लागेल ना? ती परवानगी नसेल तर मनपाचे अधिकारी बांधकाम चालू केल्याकेल्या हजर होतात. (पण हात ओले की जातात ही. Happy )
या लोकांना मॅनेज करायची तरी तयारी असावी.

एफ एस आय कसा काढतात?
प्लॉट ३५X५५= १९२५ स्क्वे.फु. आहे. टोटल बान्धकाम १२०० स्क्वे. फु. झालय आतापर्य्न्त!

गमभन, बरोब्बर.

याज्ञी, हे मात्रं चुकीचं.
भावात निभावणं कठिण होणायची वेळ येण्याआधीच प्रेमाने वेगळं व्हावं.

दक्षिणा , दीप्स धन्यवाद.

आजूबाजुला अशी बरीच उदाहरणे आहेत.

FSI म्हणजे floor space index. म्हणजे भूखंडाच्या क्षेत्रफळाच्या किती पट बांधकाम करू शकतात याची इंडेक्स. त्या आकाराच्या भूखंडाचा शहरी भागात बहुतेक १ (किमान) एफेसाय असावा, म्हणजे, अजून ७०० चौ फू बांधकाम होईल असे वाटते. स्थानिक लोक योग्य माहिती देतीलच.

also, खालच्या मजल्यावर ८०० चौ फू काम आहे, आणि त्यात एकच बेडरूम? साधारणपणे तेव्हढ्या जागेत २BHK ची घर असतात.

मित्रांनो, तुमचं कितीही खरं असलं तरी शक्यतो असे (कायदेशीर नसणारे) सल्ले उघडपणे देत जाऊ नका. आगंतुक सल्ला. Happy

<माझ्या माहितीप्रमाणे सरकार अस घरात जर कोणी रहात असेल तर बेघर करत नाही/ बान्धकाम पाडत नाही>

तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही का? कँपाकोला कंपाउंडची बातमी होते. पण अशा असंख्य प्रकरणांची होत नाही.

बर परत तिच्या आईच्या नावावर करुन मग तिघान्चे हिस्से केले तर आता पुन्न्हा घराची सध्याची किम्मत काढुन तेवढ्या किमतीच्या काही टक्के 'नावावर करण्यासाठी' भरावे लागतात अस त्यान्ना कुणीतरी सागितल.
>> माझ्यामते ही माहिती चुकीची आहे.
जर आईवडिलांच्या पश्चात घराची वाटणी झाली तरी सध्या तरी डेथ टॅक्स नाही आहे. आणि जर एक दोन टक्के रक्कम तिघांना मिळुन भरावी लागली तरी ती प्रत्येकी एखाद्या लाखापेक्षा जास्त नसणार. शिवाय त्यावेळी तिचा हिस्सा तिचे भाउ (कदाचित) विकत देखिल घेतील आणि ती रक्कम + ती तिसरा माळा बांधण्यासाठी वापरणारी रक्कम यातुन तिला स्वतःचे घर नक्कीच घेता येइल. खाली जर ८०० स्क्वेअर फुट जागा असेल तर अत्यंत कमी खर्चात एखाद्या खोलीची बेडरुम नक्की करता येइल.
ती एकटी पालक आहे तिच्या वाट्याचा हिस्सा वडिलांनी द्यायला हवाच ना. दुसर्या भावांना नावावर करताना थोडाफार खर्च येइल म्हणुन असे न करणे चुकीचे आहे.
तिचे भाउ आपल्या बोलण्यावरुन समंजस वाटतात म्हणुन यातुन मार्ग नक्कीच निघेल असा विश्वास वाटतो.
वरचा मजला बांधायला मोठ्या भावाने खर्च केला होता म्हणुन ती रक्कम हवी तर दोघांनी हळु हळु चुकती करावी.
अजुन एक प्रश्ण (ही रक्कम चुकवण्यासाठी सासर कडुन काहिच मदत होणार नाही का?)

तुम्ही वकील नक्कीच बघा!

घर त्याच्या नावावर आहे>>>> घर व प्लॉट वडील भावाच्या नावावर असताना मुळात वर खोली
वकीलाने घराच्या मजल्याची विभागणी करता येत नसल्याचे स्पष्ट सान्गीतले. म्हणजे खालचा मजला तिच्या लहान भावाला, वरचा मजला मोठ्याचा अस करता येणार नाही. त्यान्च्या म्हणण्याप्रमाणे जमिनीची विभागणी करावी लागेल.. >> हे कायद्यानुसार बरोबर आहे.पण व्यवहारात होणारे नाही.

बर परत तिच्या आईच्या नावावर करुन मग तिघान्चे हिस्से केले तर आता पुन्न्हा घराची सध्याची किम्मत काढुन तेवढ् हे अव्यवहार्य आहे.समजा की आईच्या नावावर घर केले तर तिच्या पश्चातच ३ हिस्से होतील.

त्यापेक्षा आज भाऊ चांगले आहेत. तेव्हा जागा विकत घेताना पैशाची थोडीफार मदत त्यांच्याकडून होऊ शकेल.
वकीलाचा खर्च तिला झेपणारा आहे का ? नपेक्षा नाती तुटतील व आधार जाईल.
भावात निभावणं कठिण होणायची वेळ येण्याआधीच प्रेमाने वेगळं व्हावं. हे केव्हाही खरयं!

परत तिच्या आईच्या नावावर करुन मग आईच्या पश्चात तिघान्चे हिस्से केले तर आता पुन्न्हा घराची सध्याची किम्मत काढुन तेवढ् हे अव्यवहार्य आहे.

>> का? घर तिघांच्या नावावर असेल, ट्रस्ट असतात तसे, (फारतर मोठा भावाला त्याने केलेया बांधकामाच्या खर्चाच्या बदल्यात वरची उर्वरीत ४०० स्क्वेर फुट जागा ट्रस्टमध्ये बाल्कनी म्हणुन देउन टाकावी) यामुळे तिला कायदेशीर संरक्षणही मिळेल.
भावाच्या चांगुलपणावर (तिचा हक्क तिला मिळणे यात खरे तर काही चांगुलपणा नाही) रहावे लागणार नाही. मुलगा पण तोपर्यंत कमवता झाला असेल. घराची किंमत १ कोटी समजा. तरी १-२ टक्के रक्कम कर स्वरुपी द्यावी लागली (अशी लागते हे मला माहित नाही) तरी दीड लाख तिघांत म्हणजे ५०००० प्रत्येकी देणे अव्यवहार्य अजिबात नाही.
______________________________________________

त्यापेक्षा आज भाऊ चांगले आहेत. तेव्हा जागा विकत घेताना पैशाची थोडीफार मदत त्यांच्याकडून होऊ शकेल.
>> हे विधान जास्त अव्यवहार्य आहे. जर वर ५०००० खर्च करणे भावांच्या जीवावर येत असेल तर ६०० स्क्वेअर फुट घर (तिच्या हक्काची जागा) देण्यासाठी ३० लाख ते द्यायला कसे तयार होतील? जर तसे ते होणार असतील तर मात्र नक्कीच करावे.

---------------------------------------------------------------------------------

मला घरात भांडणे लावायची नाहित तरीपण
१) वडिलांनी बांधलेल्या घरात ४ रुम असताना, तिने आई आणि अनाथ मुलाबरोबर पॅसेजमध्ये झोपावे हेच मला पटले नाही. पहिल्यांदा एखाद्या रुमची बेडरुम करुन घ्यावी. मुल असलेल्या स्त्रीला जागा असेल तर स्वतःची छोटी का असेना खोली हवीच.
२) तिच्या आईच्या नावावर जागा केल्याने फक्त तिलाच नव्हे तर तिच्या आईला पण वडिलांच्या पश्चात आधार असेल. हे तिच्या आईच्या द्रुष्टीने पण व्यवहार्य आहे.
३) सासरकडुन पण काही मदत होइल का? तिथे पण नवर्याच्या वडिलोपार्जित इस्टेटीचा तिच्या वाटचा भाग तिने 'चांगुलपणा' वर सोडु नये.

तिच्या आईच्या नावावर करुन मग आईच्या पश्चात तिघान्चे हिस्से केले तर आता पुन्न्हा घराची किम्मत>>>>> मुळातच घर व प्लॉट वडील भावाच्या नावावर आहे. अशावेळी ह़़क्कसोडपत्र तयार करण्यास दोन्ही भाऊ तयार होतील का? समजा अगदी झालेच तयार. तरी हक्कसोड्पत्र करण्यास व आईचे नाव
कागदपत्रांवर चढविणे यात खर्च व बरीच यातायात आहे.या गोष्टीला भरपूर वेळ लागू शकतो.
----------------------------------------
त्यापेक्षा आज भाऊ चांगले आहेत. तेव्हा जागा विकत घेताना पैशाची थोडीफार मदत त्यांच्याकडून होऊ शकेल. दुसरीकडे १५-२० लाख खर्चण्याऐवजी ती तिथेच वरती ३रा मजल्यावर बान्धकाम करायच म्हण्तेय. याला मोठ्या भावाने परवानगी सुद्धा दिली आहे (घर त्याच्या नावावर आहे).>>>> लेखात म्हटल्याप्रमाणे वरकरणी तरी भाऊ समंजस वाटतो.त्यामुळे पैशाची थोडीफार मदत ते करु
शकतील असे म्हटले आहे. वडिलानी खालचा मजला बांधला. वरच मजला मोठ्या भावाने बांधला.अशावेळी ३० लाख मागणे चुकीचे तर आहेच.पण देणार्‍याला एकरकमी जमेल का हे पण पहायला हवेच.तिचा हाती येणारा पगार १४००० असताना तिला वरती बांधकाम करणे झेपेल का?
--------------------------------------------
बर परत तिच्या आईच्या नावावर करुन मग तिघान्चे हिस्से केले तर आता पुन्न्हा घराची सध्याची किम्मत काढुन तेवढ्या किमतीच्या काही टक्के 'नावावर करण्यासाठी' भरावे लागतात अस त्यान्ना कुणीतरी सागितल. >>>>>> राहत्या घराचे व प्लॉट हक्कसोड्पत्र करण्यास व आईचे नाव कागदपत्रांवर चढविण्यास घराच्या किमतीच्या काही टक्के द्यावे लागत नाही. वडील भावाच्या नावावर सर्व काही असल्याने
त्याची लेखी संमती (रजिस्ट्रेशन केलेली)या सर्व गोष्टींना असणे महत्वाचे ठरते.
----------------------------------------------
तसेच तिच्या सासरच्या वाडवडिलोपार्जित इस्टेटीत तिचा + मुलाचा केव्हाही अधिकार असेलच.
जागा विकताना हिची N.O.C. लागेल.
------------------------------------
वरचे देशमुख व सिमंतिनी यांचे प्रतिसाद चांगले आहेत.

मला वाटते की जर परिस्थिती ठीक-ठाक असेल तर आत्ता हा विषय वाढवण्याची गरज नाही. हक्काचा निवारा हवा ह्या मध्यमवर्गीय विचारसरणीला काही काल बाजूला ठेवून इतर काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा: १. स्वतःचा पगार वाढेल अशी कौशल्ये शिकणे ज्यातून तिला स्वतःला घरातून बाहेर पडावे लागले तरी निभाव लागेल. पगार ४०-५० हजार असेल तर भाऊ सुद्धा कशाला नाही मायेने वागवणार?
२. मुलाच्या शिक्षणाचे पैसे.
३. रिटायर झाल्यावर आर्थिक तरतूद (फंड वगैरे)
४. शांत जगण्यासाठी केवळ हक्काचा निवारा आवश्यक नाही तर तिथे ती राहू शकेल अशी माणसे ही आजूबाजूला हवीत. नाहीतर आत्ता भावांपासून वेगळे म्हणून झगडा नंतर मुलाला वेगळे घर हवे म्हणून झगडा. त्यापेक्षा मुलगा चांगल्या जागी शिकायला गेल्यावर हिने स्वतःसाठी चांगला पार्टनर/सहचर शोधावा.
५. ह्या सगळ्या गोंधळात सहजा सहजी एखादे चांगेल घर दृष्टीस पडले तर घ्यावे नाही तर मग निवांत काय ते भाऊ-घर-मजला -इ इ भानगडीत पडावे. पण आता त्यापायी वेळ घालवण्यापेक्षा चांगले काही कौशल्य शिकावे.

मुलाला आईकडे माहेरी ठेवून हिला होस्टेल वर ही राहता येइल. मुलांचे व मामाचे बाँडिन्ग होवू शकेल प्रोप्रटी साठी नाती तोडू नयेत. नंतर घर घेता येइल मामा व आजी मिळ्णार नाही. बाकी करीअर वर लक्ष द्यावे व
आर्थिक सबलिकरण होण्यावर फोकस ठेवावा. सीमंतिनी यांच्या पोस्ट प्रमाणे.

सिमन्तीनी ताई, तिच वय आता ४५ आहे. ती ऑलरेडी पोस्ट ग्रॅजुयेट आहे. पण त्या शिक्षणाचा नोकरीत काहीएक उपयोग झाला नाही. मुलगा लहान असल्याने जवळपासची नोकरी शोधता शोधता ऑफीसचा अनुभव जास्त झाला. त्यामुळे आताही एका खाजगी नोकरीत ऑफीस साम्भाळते. पुढे तिला अजुन काय शिकता येइल? आणि आता मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमवायचे की स्वतःवरच लावायचे?

<<जर एक दोन टक्के रक्कम तिघांना मिळुन भरावी लागली तरी ती प्रत्येकी एखाद्या लाखापेक्षा जास्त नसणार<< कठीण आहे. कोणताही भाऊ पैसे देणार नाही. 'तिला मोठ्या भावाने फक्त वर बान्धायची परवानगी दिली आहे'. तो स्वतः पैसा, वेळ, अशी काही मदत करणार नाही. अगदी बान्धायच म्हटल तरी परिस्थीती अशी आहे की तीच्याकडे साठलेले एखादी लाख रुपये आणि बहिणीच्या नवर्याकडुन सोसायटीच कर्ज काढुन मिळतील ते, असेच वापरुन घर बान्धता येइल. लहान भाउ अजुन चान्गला आहे, पण शेवटी त्यालाही त्याचा नविन सन्सार आहे.

<<खालच्या मजल्यावर ८०० चौ फू काम आहे, आणि त्यात एकच बेडरूम? साधारणपणे तेव्हढ्या जागेत २BHK ची घर असतात.<<

त्यान्च्या घराचा प्लॅन साधारणतः असा येइल.

home.JPG
मधल्या पॅसेजवजा रुममधे ती व तिचा मुलगा खाली झोपतात. बाजुला 'मदर' लिहिलेल्य ठीकाणी आईचा बेड आहे. दोन्ही बाजुला कमानी अस्ल्याने पार्टीशन टाकुनही खुप कमी जागा उरते. एक बेड सुद्धा बसणार नाही इतकी कमी.

<< म्हणजे, अजून ७०० चौ फू बांधकाम होईल असे वाटते. स्थानिक लोक योग्य माहिती देतीलच.<<
तस असेल तर वरती अजुन बान्धता येइल का? आणि त्यासाठी कॉर्पोरेशनची परवानगी लागेल ना?

<< म्हणजे, अजून ७०० चौ फू बांधकाम होईल असे वाटते. स्थानिक लोक योग्य माहिती देतीलच.<<
तस असेल तर वरती अजुन बान्धता येइल का? आणि त्यासाठी कॉर्पोरेशनची परवानगी लागेल ना? >>> जर त्या भागाचा एफएसाआय १ असेल तर अजून बांधकामासाठी परवानगी मिळेल. सहसा शहरामध्ये एफएसाअय १ असतो, गावठाण भागात २ असतो तर शहराच्या बाहेरच्या काही भागांसाठी अजून वेगळा असतो.
तुम्हाला आधी महानगरपालिकेमध्ये त्या भागासाठी किती एफएसआय मंजूर आहे हे बघावं लागेल.

खरा प्रश्न FSI चा आहे की G+2 बांधकामाला परवानगीचा आहे ते बघा. मला तरी असे वाटते की FSI शिल्लक असावा (महा/नगरपालिका/ग्रापं मध्ये चौकशी करावी), पण G+2 ची परवानगी नसावी (ही देखिल चौकशी तिथेच... अर्थात ही चौकशी झालेली असावी, पण २००० चौ फू वर फक्त १२०० चौफू चे बांधकाम हे जरा कमी वाटते).
जर तसे असेल तर +१ वर जी उर्वरीत ४०० चौफू जागा आहे त्यात २ रूम्स निघू शकत नाहित का? तसे होत नसेल तर मग G+2 ची परवानगी आहे का हा प्रश्न उपस्थित होतो.

वरच्या झालेल्या बांधकामाचा आराखडा जमल्यास इथे टाकावा.

आणि मला वाटते तुर्तास बांधकाम (त्यांच्या स्वतःच्या) नावावर असावे, इ गोष्टींवर फार विचार करू नये. पुढची १५-२० वर्षे तरी त्या घरात या गोष्टीमुळे काही त्रास होईल असे वाटत नाही.

Pages