उर्मटपणाचा टोन आहे

Submitted by निनाद on 3 October, 2013 - 00:16

ही गझल गाणार कोण आहे?
शब्दास उर्मटपणाचा टोन आहे

कवींना बसायला खुर्ची
येथे विडंबनकारांना गोण आहे!

पाहिले तरी धडकलो
हा एरियाच अ‍ॅक्सिडेंट प्रोन आहे

किंचाळतो कधीचा मी
त्याच्या कानात हेड-फोन आहे

घर सुरेख बांधले त्याने
त्याचे स्वस्तात होम-लोन आहे

ट ला ट जोडलेली काव्ये
याला आवरणार कोण आहे?

काव्याचा हा एकलव्य
संपादकात कोठे द्रोण आहे?

(गोण = खाली बसायला टाकलेले पोते)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट ला ट जोडलेली काव्ये
याला आवरणार कोण आहे?

>>>>

माझ्याबद्दल लिहिलयं का ?
:p

बाकी गझलेबद्दल तज्ञ सांगतीलच.

Happy

keep writing.

माझ्याबद्दल लिहिलयं का ?
जय, तसे नाही! आपण बिन्धास्त लिहावे. Happy मी ही जमेल तसे लिहित राहीन. फिदीफिदी

मिलिंदा भर आवडली आहे... फिदीफिदी
इतके दिवस दूरच होतो आता अ‍ॅटॅक आला आहे. Wink