Submitted by निनाद on 3 October, 2013 - 00:16
ही गझल गाणार कोण आहे?
शब्दास उर्मटपणाचा टोन आहे
कवींना बसायला खुर्ची
येथे विडंबनकारांना गोण आहे!
पाहिले तरी धडकलो
हा एरियाच अॅक्सिडेंट प्रोन आहे
किंचाळतो कधीचा मी
त्याच्या कानात हेड-फोन आहे
घर सुरेख बांधले त्याने
त्याचे स्वस्तात होम-लोन आहे
ट ला ट जोडलेली काव्ये
याला आवरणार कोण आहे?
काव्याचा हा एकलव्य
संपादकात कोठे द्रोण आहे?
(गोण = खाली बसायला टाकलेले पोते)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
(No subject)
किंचाळतो कधीचा मी<<<
किंचाळतो कधीचा मी<<<
(No subject)
ट ला ट जोडलेली काव्ये याला
ट ला ट जोडलेली काव्ये
याला आवरणार कोण आहे?
>>>>
माझ्याबद्दल लिहिलयं का ?
:p
बाकी गझलेबद्दल तज्ञ सांगतीलच.
keep writing.
छान. या विभागापासून दूर
छान.
या विभागापासून दूर राहावे
हा तर नो एन्ट्री झोन आहे.
माझ्याबद्दल लिहिलयं का ? जय,
माझ्याबद्दल लिहिलयं का ?
जय, तसे नाही! आपण बिन्धास्त लिहावे. मी ही जमेल तसे लिहित राहीन. फिदीफिदी
मिलिंदा भर आवडली आहे... फिदीफिदी
इतके दिवस दूरच होतो आता अॅटॅक आला आहे.
खूपच छान
खूपच छान
(No subject)