'खडे आलू' अर्थात बाळ्-बटाटे

Submitted by परदेसाई on 27 September, 2013 - 14:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो बाळ-बटाटे (नसल्यास बटाट्याच्या फोडी).. उकडून/सोलून.

चवीसाठी मीठ (साधारणपणे अर्धा टी-स्पून).
लाल तिखट / हळद / तीन चमचे धण्याची भुक्की / अर्धा चमचा चिंचेची पेस्ट

फोडणी साठी : हिंग मोहरी, तेल

क्रमवार पाककृती: 

मसाला एकत्र करून घ्या (मीठ, हळद, तिखट, धणे पावडर, चिंच).
उकडलेले बटाटे बाळ-बटाटे असतील तर त्याला दाभणाने टोचून घ्या.
(या ऐवजी बटाटे टोचून मिठासकट उकडले तर मीठ थोडे जास्त लागेल पण चांगलं मुरतं)
बटाट्याला मसाला फासून २० मिनिटं किंवा जास्त ठेवा.
फोडणी करून त्यावर हे मसाला फासलेले बटाटे चांगले परतून घ्या...

वाढणी/प्रमाण: 
३ / ४ माणसांसाठी.
अधिक टिपा: 

लहानपणी बर्‍याच वेळा खाल्लीय. पण कुठल्या प्रांतात होते ते माहीत नाही.. .. पण 'खडे-आलू' असं नांव तिच्याकडूनच ऐकलंय..
(कदाचित पुढच्या ए वे ए ठि ला आणता येईल..)

माहितीचा स्रोत: 
माहिती: आईकडून (ती नक्की कुणाकडून शिकली माहित नाही)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाणी अजिबात घालायचे नाही, पण बटाटे उकडण्यासाठी लागेल. किंवा मसाला अगदीच सुक्का झाला तर पाण्याचा एकादा 'फटका' द्यायचा म्हणजे थोडा चटणीसारखा होईल.. Lol

maayaboliiche he kaay naaTak aahe kaLat naahii. Receipe lihiitaanaa maraaThiit lihitaa aala.n paN aataa pratisaad kaahii kela.n tarii devanaagariit yet naahiiy.... Sad

maayaboliiche he kaay naaTak aahe kaLat naahii. Receipe lihiitaanaa maraaThiit lihitaa aala.n paN aataa pratisaad kaahii kela.n tarii devanaagariit yet naahiiy....>>>... हे सगळे IE-10 चे प्रताप आहेत... 'आग-कोल्ह्या'वर छान पैकी देवनागरी लेखन करता येतंय...
Happy