रंगीत पेन्सिल्स - "Leaves"

Submitted by वर्षा on 27 September, 2013 - 12:03

ही कुठलीतरी वनस्पती मागच्या वर्षी येऊर नेचर ट्रेलमध्ये पाहिली होती. काळे ठिपके म्हणजे किड्यांनी खाल्लेला भाग आहे Happy पण त्या किड्यांनी इतकी मस्त कुरतडली होती ती पानं की Proud ती एकंदरीत मस्त दिसत होती. मग मी लगेच फोटो काढला.
7" x 9", 200 gm2 फॅब्रिआनो अ‍ॅसिड फ्री पेपरवर नुकत्याच घेतलेल्या Derwent Artists पेन्सिल्सने बेसवर्क करुन नंतर Prismacolor लेयर्स चढवले. काळी बॅकग्राऊंडसाठी फक्त Prismacolor वापरल्या.

आधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - "गोट्या (Marbles)": http://www.maayboli.com/node/44442
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560
रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!: http://www.maayboli.com/node/40436

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुरेख!

किड्यांनी खाल्लेल्या भागाच्या कडांचा थ्रीडी इफेक्ट जबरजस्त!

पाल्हाळ अजीबात नाही. नवी माहिती मिळाली. रवी परांजपे, गोपाळ नांदुरकर, राहुल देशपांडे या चित्रकारांची नावं तुमच्यामुळे कळली.

धन्यवाद!
मृण्मयी, वरील तिन्ही चित्रकारांची ज्योत्स्ना प्रकाशनने प्रकाशित केलेली ग्रॅफाईट्/चारकोल, कलर पेन्सिल्स, पेस्टल्स क्रेयॉन्स या माध्यमातील अत्यंत सुंदर पुस्तके उपलब्ध आहेत. इंग्रजी आणि मराठी दोन्हीत आहेत. यापैकी गोपाळ नांदुरकर यांना मी मुद्दाम पुण्याला जाऊन भेटले. कलर पेन्सिल्सच काय पण इंक या माध्यमातील त्यांची अप्रतिम चित्रेदेखील बघायला मिळाली.

sahiye!!!!

भारी:)

वर्षा, तुला जमेल तशी तू काम करत असलेल्या ह्या माध्यमाबद्दल माहिती देत जा. तुझं हे चित्रं फेसबुकवर किंवा इथेही परत परत येऊन बघतेय Happy

थँक्यू ऑल! मामी माझ्या आवडत्या आर्टीस्टचं नाव अल्योना निकल्सन (किंवा निकेल्सेन) आहे. उच्चार चुकला असू शकेल.
मृण्मयी, हो हीच ती पुस्तकं.

वर्षा, रंगीत पेन्सिल्स म्हणजे नक्की कोणत्या? माझ्याकडे लेकीच्या शाळेतून मागच्या दोन वर्षात परत आलेल्या बर्‍याच रंगीत पेन्सिल्स आहेत पण त्या कागदावर उमटताना थोड्या तेलकट/ फेंट उमटतात. असे का? किंवा कागद विशिष्ट प्रकारचा वापरावा का? तुमची चित्रे बघुन एक तरी चित्र काढावे वाटू लागले आहे.
कृपया मार्गदर्शन करा!!!

वत्सला, एकतर त्या पेन्सिल्स जुन्या झाल्या असतील (माझ्या काही पेन्सिल्स न वापरल्या गेल्याने चक्क खराब झाल्या) किंवा त्या वॅक्स बेस्ड लहान मुलांसाठी असतात त्या प्राथमिक वापरासाठी बनवलेल्या पेन्सिल्स असतील. आपल्याकडे फन्स्कूल की अशाच काहीतरी ब्रँडच्या पेन्सिल्स अशाच आहेत. शार्पनर किंवा नाईफने चांगली टोक काढून, कट करुन, प्रेशर देऊन कागदावर घासून पहा. तरीही फिकट असतील तर त्या वापरु नका.

तुम्ही कुठे आहात? तुमच्याकडे फॅबर कॅसल ब्रँडच्या पेन्सिल्स मिळाताहेत का पहा. त्या चांगल्या आहेत.चोवीस शेड्स घेतल्या तर छान. पण त्यामध्ये पांढर्‍या रंगाची पेन्सिल आहे का ते बघा. इथे का माहित नाही पण फॅबर कॅसलच्या संचात पांढरा रंगच नसतो!

कागद साधारण दिडशे किंवा जास्तच थीकनेसचा असावा. स्केचबुक विभागात वेगवेगळ्या ब्रँड्जची पॅड्स दिसली तर त्यावर थीकनेस, अ‍ॅसिड-फ्री असल्यास तसे आणि तो कुठल्या मिडीयमसाठी वापरता येईल ते दिलेले असते. अमेरिकेत स्टोनहेन्ज नावाचा पेपर आर्टीस्ट्समध्ये लोकप्रिय आहे. तो मिळाला तर छानच. मला इथे तो उपलब्ध नाही त्यामुळे फॅब्रिआनो हा इटालियन कागद मी वापरते.

धन्यवाद वर्षा!
तुम्ही वर सांगितलेल्या फॅबर कॅसलच्या पेन्सिल्स इथे (ऑस्ट्रेलिया)मिळतील. त्या आणते. माझ्याकडे ज्या आहेत त्या फॅ कॅ च्याच आहेत पण जुन्या झाल्या आहेत. टोके काढून पण फेंटच उमटताहेत.

वा मस्त ! फारच सुंदर आहे . पहिल्यांदा पहिले तेव्हा फोटोच वाटला . तुमची सगळीच चित्रे छान आहेत .

थँक्स अन्विता, पाषाणभेद.
कंसराज तिचं कलर पेन्सिल पेंटींग बायबल भन्नाट पुस्तक आहे.

वत्सला, तुम्ही ऑस्ट्रेलियात आहात म्हणूनः http://www.colouredpencils.com.au/about/
Happy

वर्षा,

भन्नाट आहे हे चित्र.. खरच विश्वास बसत नव्हता की फोटो नसून चित्र आहे म्हणून.. Happy

वेगवेगळी माध्यमं आणि कलाकार ( चित्रकार) ह्यांची इथे चर्चा चाललीच आहे म्हणून सांगावेसे वाटते.. इथे बेळगावात एक शिरिष देशपांडे म्हणून चित्रकार रहातात. कदाचित कोणी ओळखतही असेल त्यांना पण त्यांची सगळी नवीन चित्र बहुत करून कॅनव्हस वर चक्क बॉल पॉइंट पेन ने केलेली असतात.. विचार करा की बॉल पेन मध्ये उपलब्ध असणार्‍या लाल, निळ्या, हिरव्या, काळ्या, क्वचित गुलाबी व जांभळ्या रंगांमधून हे ते कसे साधत असतील ? मी त्यांना एकदाच भेटले आहे पण चित्र पाहून एवढी फॅन झाले आहे..
सद्ध्या पटकन मिळाली ती पहिलीच लिन्क देत आहे..

http://fineartamerica.com/profiles/shirish-deshpande.html?tab=artwork

वर्षी सुप्पार्ब सुप्पर्ब!!!!!!!!! फारच अप्रतिम कला!!! जोडीला इतकी छान माहिती सांगितलीस , थांकु गं..

मी पण फॅबर कॅसल ची सुपर फॅन आहे.. दुसरा सुपर फेव ब्रँड म्हंजे ,' caran d' ache (swiss made) supracolor soft aquarelle च्या 40 शेड्स मधे मिळणार्‍या वॉटर सोल्युबल पेंसिंल्स!! यात पांढरी शेड ही खूप सुंदर आहे.चित्र रंगवल्यावर ओला ब्रश फिरवल्यास वॉटर कलर चा इफेक्ट येतो.. शेडिंग करता जबरदस्त आहेत या पेंसिली.. ऊप्स.. फारच अवांतर झालं ..

सोनचाफा अगदी अगदी शिरीष देशपांडे यांची चित्रे तर अगदी भन्नाट आहेत. त्यांची चित्रे पाहुन तर मी त्यांची पंखा झाले आहे. ते बॉलपेन वापरुन अप्रतिम चित्रे काढतात. तसेच त्यांची इतर माध्यमातील चित्रे देखील खुप सुरेख आहेत.

वत्सला फॅबर कॅसल पेन्सिलींमध्ये देखील खुप विविधता आहे. त्यात स्टुडंट ग्रेड ते प्रोफेश्नल ग्रेड मध्ये पेन्सिली मिळतात. फॅबर कॅसलचे स्वतःचे आउटलेट असेल तिथे सर्व प्रकार, आकार बघायला मिळतात किंवा तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर देखील चांगली माहीती मिळेल.

रंगीत पेन्सिल्स हे माध्यम देखील चित्रकलेसाठी खुप उत्तम आहे. काही उत्तम चित्रकारांनी फक्त हेच माध्यम वापरुन खुप सुंदर मास्टरपिस बनविले आहेत. यातील प्रसिद्ध व उत्तम क्वालिटी असणारे ब्रॅण्ड आहेत Prisma, Faber Castell, Derwent , Lyra

Pages