तेरी मेरी लव स्टोरी

Submitted by nishabagul on 26 September, 2013 - 06:20

“कही दबी दबी सी…कही छुपी छुपी सी….तेरी मेरी लव स्टोरी….कभी बारिशो में भीगी तो महक उठी….तेरी मेरी लव स्टोरी !!!”

सकाळी ऑफिसला जाताना अचानक तिचे लक्ष टीव्ही कडे गेले. स्टार प्लस वर एक नवीन सिरीयल सुरु होणार होती त्याच हे शीर्षक गीत होते. हे गाणे आणि त्या सिरीयलची जाहिरात तिला भयंकर आवडायची. तिने रिंगटोन पण याच गाण्याची ठेवली होती. एरव्ही “सिरीयल” या शब्दाने सुद्धा ती वैतागायची. पण “ऑफिसच्या कामाच्या गडबडीतून एकमेकांना दिलेली १० मिनिट” या concept मुळे ती या सिरीयल कडे आकर्षित झाली

घरातून निघणार एवढ्यात तिचा फोन वाजला. प्रचंड घाई असूनसुद्धा तिने फोन उचलला आणि पटकन पर्स घेऊन घराबाहेर पडली.

“Hello”

“Marry Me”

“Huh?”

“Will You Marry Me?”

“Yes Sweetheart, I will”

“Love You Jaan”

“Love You Too Honey”

रोज फोन केल्यावर संभाषणाची सुरुवात अशीच व्हायची. हा नित्यनियम रोज सुरु असला तरी त्यातील गोडवा थोडासुद्धा कमी व्हायचा नाही. तिने फोन उचलला कि तो प्रेमाने तिला प्रपोज करायचा. आणि ती पण लाजून होकार द्यायची.

दोघेपण IT Professional असल्याने एकमेकांना देण्यासाठी फारसा वेळ नसायचा त्यांचाकडे. ५ दिवस धावपळीत कामे आटोपायची. मग शनिवारी काही घरातील अथवा स्वत:ची कामे उरकायची आणि रविवार कुटुंबासाठी व आरामासाठी राखून ठेवायचा. तसे ते दर शनिवारी भेटायचे. पण गेले २ शनिवार त्यांना भेटणे जमलेच नाही. एका शनिवारी तिच्या घरी कोणीतरी नातेवाईक येणार होते. आणि दुसऱ्या शनिवारी त्याच्या ऑफिसची ट्रीप होती. त्यामुळे जवळपास १५ दिवस ते एकमेकांना भेटले नव्हते. मनात खूप इच्छा असूनही Busy Work Schedule मुले भावनांना आवर घालावा लागत होता. तशी ती बरीच संयमी होती पण तो तसा नव्हता. त्याला तिला बघितल्याशिवाय चैन पडत नसे.

सोमवारी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये ढीगभर कामे. ऑफिसला जाताना जणू नरकात जातोय की काय अस वाटायचं. त्यात मिटींग्स मुळे जाम वैताग यायचा. आज त्याचा काम करायचा मूड नव्हता. प्रचंड Pending Work असून सुद्धा तिची आठवण त्याला काही सुचू देत नव्हती. मनात सतत विचार येत होता की सगळा सोडून जावं आणि तिच्यासोबत शांत कुठेतरी जाऊन बसावे. सकाळी ९.३० पासून १ वाजेपर्यंत ५ वेळा फोन करूनसुद्धा त्याला एकटेपणा जाणवत होता.

परत एकदा फोन हाती घेऊन त्याने तिला फोन लावला

“जान…खूप Miss करतोय ग….सारख वाटतंय तुला भेटायला याव…पण हा Workload”

“मी समजू शकते…Love you Sweetheart….Missing you a lot”

“Miss you too my love”

ती त्याच्या भावना समजू शकत होती पण तिचा नाईलाज होता. सोमवार असल्यामुळे सुट्टीचा विचार पण तिच्या मनात येत नव्हता. उदास मनाने त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. Lunch Break झाला तसा तो उठला. अर्ध्या तासाच्या Lunch Break मध्ये जेवण आणि फोन Manage कराव लागायचं. त्याने जेवायला सुरुवात केली तेवढ्यात तिचा फोन आला.

“बोल”

“जेवलास का तू?”

“नाही. आता जेवायला सुरुवात केली”

“Ok जेवण कर आणि जेवण झाल्यावर लगेच मला फोन कर”

“का ग? काय झाले?”

“काही नाही”

“Any Problem?”

“सांगते… तू जेव बरं आधी”

“नाही…आधी सांग”

“अरे देवा…असा काही नाहीये तू जेवण कर मग सांगते नक्की”

“ठीक आहे…फोन करतो जेवणानंतर”

त्याचे जेवणात लक्ष लागत नव्हत. काय झाले असेल याचा विचार करत त्याने पटकन जेवण केला. आणि लगेच तिला फोन केला.

“बोल आता”

“जेवण झाले का?”

“हो झाले ग बाई…बोल लवकर”

“Ok….अरे १ छोटं काम होते तुझ्याकडे”

“बोल ना”

“माझी १ मैत्रीण तुझ्या ऑफिसजवळ आली आहे…Interview साठी”

“बर…मग??”

“तिला पत्ता सापडत नाहीये…Please तू जरा मदत कर ना तिला”

“Ok Give me her number. I will call her”

“अरे ती तुझ्या ऑफिसच्या बिल्डींगच्या Basement ला थांबली आहे. तू जा लवकर आधी ती ओळखेल तुला”

“कमाल आहे….Anyway what’s her name?”

“पूजा…आता जाशील का?”

“Ok ok…जातो Madam”

तो Basement ला आला तिथे कोणीच नव्हता. त्याने परत तिला फोन लावला आणि तो गेटच्या दिशेने चालू लागला. चालता चालता अचानक त्याने समोर बघितले आणि तो थबकला….समोर ती …एका हातात Dairy Milk आणि दुसऱ्या हातात गुलाबाचे फुल घेऊन उभी ….तो स्तब्ध झाला. ज्या हास्यावर तो जीव ओवाळून टाकायचा ते हास्य त्याच्या समोर होते. सकाळपासून जिची आठवण काढत होता तिला अचानक समोर बघून त्याला काहीच सुचत नव्हत. तो तिच्याकडे एकटक बघत बसला.
ती हसत त्याचाजवळ आली. आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली

“वेडाबाई तू कशी काय इकडे? तुला माझ्या ऑफिसचा पत्ता कुठून मिळाला? आणि तुझी ती मैत्रीण पूजा? ती कुठे आहे?”

“मला तुझी खूप आठवण आली म्हणून आले. ऑफिस काढले शोधून बरोबर. आणि कोणी पूजा वैगरे आली नाही. असच Surprise !!!”

“आणि तुझे ऑफिस?”

“सांगितले बरे वाटत नाहीये…घरी जाते म्हणून”

“I am really very Surprised. I can’t express my feelings…”

“Shhhhh” तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला.

त्याच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्याचा आनंदी चेहरा बघून तिच्या पण चेहऱ्यावर हसू उमटले. तिचा हात हातात घेऊन त्याने हातावर Kiss केले आणि म्हणाला,

“Cartoon, I love you very very much. Please Please Please Please Please marry me”

तिने पण लाजून होकार दिला

“Yes…I will”

तिने परत त्याला मिठी मारली आणि तेवढ्यात तिच्या फोन ची Ringtone वाजली…..

“कही दबी दबी सी…कही छुपी छुपी सी….तेरी मेरी लव स्टोरी….कभी बारिशो में भीगी तो महक उठी….तेरी मेरी लव स्टोरी !!!”

स्रोत : माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ निशा बागूल,

कथा बरी आहे..पण मनाला नाही भिडली....

त्याचे काय आहे ताई.मराठी कथेत इंग्रजीचा वापर अगदी फारच गरज असेल करावा.मराठीमध्ये इतके सुंदर आणि योग्य शब्द असतांना मुद्दाम इंग्रजीचा केलेला वापर मला तरी खटकला.

फारच गोड कथा आहे.

@jayant.phatak मला मराठी पर्यायी शब्द माहित असूनही मी मुद्दाम इंग्रजी शब्दांचा वापर केला. कारण आपल्या दैनंदिन जीवनात आपण हे शब्द सर्रास वापरतो . म्हणून कथा थोडी सहज आणि मजेशीर करण्याचा हा माझा प्रयत्न होता Happy

Pages