आई

Submitted by समीर चव्हाण on 23 September, 2013 - 13:32

आहे तरी न आहे निश्चल तरी प्रवाही
भरुनी रितेरितेपण माझ्यात काय नाही

आधार जीवनाचा, आधार जीवनाला
माझ्यात एक तान्हे, माझ्यात एक आई

मिटतात अंतरेही मिटते कधी न तृष्णा
डोळ्यांतली कधीतर देशील तू निळाई

इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही

जावे फिरून मागे मोहास सोडवाया
ठरवून पाहिले मी होते न फार काही

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(गझल) मस्त झाली एक्दम

माझ्यात एक तान्हे माझ्यात एक आई <<< ग्रेट ओळ
तश्या इतर ओळीही (व शेरही ) बेजोडच

संपूर्ण गझल आवडली.

आहे तरी न आहे निश्चल तरी प्रवाही
भरुनी रितेरितेपण माझ्यात काय नाही

मिटतात अंतरेही मिटते कधी न तृष्णा
डोळ्यांतली कधीतर देशील तू निळाई

इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही

हे शेर विशेष आवडले.

व्वा!!!! अप्रतिम शब्द!

'माझ्यात काय नाही' इथे थोडा अडखळलो.

आहे तरी न आहे निश्चल तरी प्रवाही
भरुनी रितेरितेपण माझ्यात काय नाही...व्वा..

माझ्यात एक तान्हे, माझ्यात एक आई....सुरेख ओळ

इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही...क्या बात है..

आवडली कविता..

सुंदर

आशयासाठी अख्खी कविता आवडली. Happy
----
इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही >>>> हे तर खासच! अगदी रिलेट होतंय... प्रत्येकालाच होत असेल.

इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही

जावे फिरून मागे मोहास सोडवाया
ठरवून पाहिले मी होते न फार काही<<< व्वा ! सुरेख ..