आपण सर्वजण किती ढोंगी, खोटारडे आणि दुटप्पी वागणारे आहोत याचा अश्लील गाण्यांना टीव्हीवर बंदी घालण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. "मुन्नी बदनाम हुई", "शीला कि जवानी" , "हलकट जवानी" अशी काही उत्तान व बीभत्स गाणी टीव्हीवर दाखवू नयेत अशी सेन्सॉर बोर्डाने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात प्रक्षोभक जाहिराती व स्त्री-देहाचे भडक दर्शन घडवण्यात टीव्हीने आता इतकी पुढची पायरी गाठली आहे कि अशा गाण्यातली अश्लीलता त्यापुढे अगदीच मवाळ ठरेल.

एकीकडे चित्रपटात उत्कट प्रेमाचा आविष्कार दाखवणाऱ्या चुंबनाही बंदी आहे. परंतु अत्यंत सूचक लैंगिकता आणि वासनेचा धगधगता आविष्कार याचे मात्र वावडे नाही. पुरुषांच्या अंतर्वस्त्राच्या जाहिराती, "डीओडरंट", "पुरुष शक्तिवर्धक औषधे" या आणि अशाच वस्तूंच्या मार्केटिंगसाठी स्त्री मॉडेल्सचा मर्यादहीन वापर केला जातो त्याचे काय? अमेरिकन संस्कृतीचे अनुकरण करायला हरकत नाही पण त्यासाठी सगळीच "सिस्टीम" तशी बनवावी लागेल. आपण सोपा मार्ग काढून फक्त वासनांध कामुकतेचे प्रदर्शन घडवत आहोत. त्यामुळे पाश्चिमात्यांचे मुक्त अनिर्बंध समाजजीवनही नाही आणि सभ्य भारतीय संस्कृतीही नाही अशा एका भ्रष्ट, बांडगुळासारख्या उपऱ्या जगण्यातच आपण विकृत आनंद घेत आहोत.
गुंड, गुन्हेगार लोक "बिग बॉस" सारख्या कार्यक्रमात मिरवत आहेत, देणग्या देवून धनिक लोक प्रतिष्ठा विकत घेत आहेत, त्यांचे कौतुकाचे सोहळे वृत्तपत्रात - टीव्हीवर रंगत आहेत हाही अश्लीलतेचाच भाग नाही का? आपल्या केजी - नर्सरीतल्या मुलींना तोकड्या कपड्यात नाचताना पाहून टाळ्या पिटणाऱ्या आधुनिक माता, अंगातले जमेल तेवढे कपडे काढून पुरुषांच्या वखवखलेल्या नजरांना खाद्य पुरवणाऱ्या मादक नृत्यांगना आणि हे सर्व प्रकार हताशपणे पहात बसलेले ज्येष्ठ नागरिक हे सर्वचजण या पापाचे भागीदार आहेत.
अश्लील आयटम सॉंगवर बंदी घातल्यामुळे सर्व आलबेल होईल असा आशावाद बाळगणे म्हणजे कोंबडा झाकण्यासारखे आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचे आणि नैतिकतेचे उन्ह रणरणत असताना दोन - चार गाण्यांवर बंदी आणून सभ्यतेची सावली समाजाला मिळणार नाही.
[मूळ लेख: कट्टा ऑनलाईन:]
मी शंभर टक्के सांगतो, की
मी शंभर टक्के सांगतो, की पुरुषांच्या मानसिकतेवर शाब्दिक चाबूक ओढण्यात पारंगत झालेल्या येथील स्त्रिया स्वतःच्या घरात आपल्या मुलीला मात्र 'बाळा जपून राहा हं' असेच शिकवत असतील.
असे करणे चूक तर नाहीच आहे. पण ते कबूल न करता येथील काहीजणांना झोडपत राहणे हे चूक आहे. इतकेच!
लोकहो, बेफिकीर यांनी दिलेल्या
लोकहो,
बेफिकीर यांनी दिलेल्या लेखाचा रोख साधारणत: मान्य आहे. मात्र खालील भाग खटकला :
>> पुरुषांनी धर्मग्रंथ लिहून त्यातून स्त्रियांची योनिशूचिता आणि पातिव्रत्य याचे स्तोम मांडण्यात आले. ते
>> मोडणाऱ्या स्त्रियांना शिक्षा सांगण्यात आल्या. त्यातून पुढे पुरुषाला झुकते माप देणारी संस्कृती उदयाला येऊन
>> आपल्या समाजात पुरुषांसाठी नवस व त्याचे कौतुकसोहळे स्त्रियांनी करण्याच्या परंपरा निर्माण करून पुरुषाला
>> संस्कृतीने अधिकच श्रेष्ठ पदावर बसविले.
नक्की कोणत्या ग्रंथात (पारंपारिक हिंदू वा मुस्लिम वा यहुदी वा ख्रिस्ती) योनिशुचितेचं स्तोम माजवण्यात आलं आहे याचा संदर्भ हवा होता.
पतीचं व्रत हिरीरीने चालवते ती खरी पतिव्रता. उदा. : जिजाबाई, ताराबाई, शारदादेवी (श्रीरामकृष्ण परमहंसांच्या पत्नी), बाबा आमटे यांच्या पत्नी (मंदाकिनी?), डॉक्टर राणी बंग, सुधा मूर्ती, ... (यादी लांबलचक). स्तोम माजवण्याजोगं पातिव्रत्य म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? बहुधा पतीची अंधसेवा म्हणायचं होतं. तर पतीची आंधळ्यासारखी सेवा करावी असं कुठल्या ग्रंथात लिहिलं आहे याचाही संदर्भ हवा होता.
आ.न.,
-गा.पै.
बेफिकीर यांनी दिलेल्या लेखाचा
बेफिकीर यांनी दिलेल्या लेखाचा रोख साधारणत: मान्य आहे. मात्र खालील भाग खटकला : <<<
तो लेख मी दिलेला नाही. लोकसत्तात आलेला तो लेख धिरज कुलकर्णींनी येथे दिलेला आहे.
पुरुषांना मानसिक तर
पुरुषांना मानसिक तर स्त्रीयांना शारीरिक शिक्षण हे एक उत्तर असावं असं वाटते. नुस्तीच मलमपट्टी करुन भागणार नाही.
नुस्ती विचारशक्ति वापरायची
नुस्ती विचारशक्ति वापरायची ठरवले, तर वाट्टेल त्याचे "स्वातन्त्र्य" मागितले जाउ शकते
पण माणूस हा मुळात जनावर आहे हे मान्य असेल, तर त्याचे पशुवत नरमादी संदर्भातील नराचे संभाव्य वर्तनापासून संरक्षण होण्यासाठी जे काय करणे भाग असेल, ते करावे लागेल.
इत्का सरळ साधा हिशेब आहे हा!
बेफिकीरजी, लगे रहो.
अनुमोदन. ट्रक अन्गावर येत असेल तर.... वगैरे अनेक उदाहरणे/विषयमाण्डणी करता.
गापै, लगे रहो.
अजुन इथे "आले संस्कृतीरक्षक", "पालथेघडे" वगैरे दुगाण्या झाडल्या गेल्या नाहियेत, त्या झाडल्या गेल्या की बिच्चार्या कट्टाऑनलाईन आयडीचा हा धागा कृतकृत्य होईल.
चेतलं, चेतलं ! मी कुठल्याच
चेतलं, चेतलं !
मी कुठल्याच टीमकडून नाही. जे बरोबर असंल तिकडं मुक्काम. अपक्ष आमदारासारखं
गापै तुमचं शंकानिरसन म्हणजे
गापै
तुमचं शंकानिरसन म्हणजे हा धागा पण १०० कोटी क्लबमधे जाणार. वेगळाच काढा कि धागा. त्यात तुम्हाला माहीत असलेल्या सगळ्या ग्रंथांची नावं लिहा आणि कुठल्या ग्रंथात योनीशुचितेचं महत्व ठसवलेलं नाही ते दाखवा.
जसं रामायणात सीतेची अग्निपरीक्षा, वनवास आणि धरणीप्रवेश.
महाभारतात कुंतीचं पहिलं मूल नदीत सोडणे.
पार्वतीच्या मुलाबद्दल शंका घेऊन त्याचं शीर उडवणे.. इ. इ.
बायबल मधे काय आहे कल्पना नाही. बघायला पाहीजे. पण Caesar's wife must be above suspicion ही म्हण काय सांगते ? सीझरच्या दुस-या बायकोचे Pompei चे Publius Clodius याच्याबरोबर संबंध असल्याच्या अफवेने त्याने तिला काडीमोड दिला. हे म्हणजे रामायणातल्या धोब्यासारखंच नाही का ?
पशुवत नरमादी संदर्भातील नराचे
पशुवत नरमादी संदर्भातील नराचे संभाव्य वर्तनापासून
<<
म्हणजे नक्की काय?
(जौद्या. स्पष्टीकरण आधी देऊन झालंय. उडवलं.)
**
वगैरे दुगाण्या झाडल्या गेल्या नाहियेत
पांडित्यपूर्ण विधाने आहेत दोन्ही.
<<
भल्तीच आवड दिसतेय प्राणीशास्त्राची
माबो वर हा विषय अनेक वेळा
माबो वर हा विषय अनेक वेळा वेगवेगळ्या नावाने/बाफ स्वरूपाने डोके वर काढतो...:) जुन्या हितगु़ज आर्काईव्ह मधे (२०००-२००८) अक्षरशः टना च्या वजनात यावर वेगवेगळ्या बाफ वर 'चर्चा' आहेत.. गुलमोहर पासून ते आजची नविन मायबोलीवर सर्वत्र याबद्दल कित्येक वेळा चर्चा झाली आहे. अगदी कुंकू लावण्यापासून ते मुळात विवाहच कशासाठी ते समलिंगी संबंध ई. ई. सर्व एकात एक गुंतलेले विषय यावर ढीगाने पोस्टी पाडल्या गेल्या आहेत. बहुतांचा शेवट मनूवादी वि. सो कॉल्ड आधुनिकतावादी, भारत वि. अमेरिका, हिंदू वि. ईतर धर्म, स्त्री वि. पुरूष, एक आयडी वि. दुसरी, ई. ई. नेमेहीच्या मार्गाने होतो.. अन्यथा कधी कधी मग एकंदरीत राळ व रगाडा सर्व 'सीमापार' झाला की अॅडमिन येऊन टाळे ठोकतात.
मग पुन्हा नविन बाफ ची वाट पहायची... निमित्त काहीही असू शकते!
पण, प्रश्ण व समस्या अजूनही त्याच आहेत, किंबहुना त्यांचं प्रमाण अनेक पटीने वाढलं आहे. (पटीत वाढलेली लोकसंख्या, पर्यायाने तरुण पिढी, आणि पटीत वाढलेले मिडीया चॅनल्स, एक्स्पोजर, ई. देखिल लक्षात येण्याजोगं आहे..)
लोकसत्तामधिल लेखातील बर्याच गोष्टी व कारणमिमांसा एकूणात पटण्यासारखी आहे. मुळात आपल्याकडे, विवाह व विवाहसंस्थेस त्यातील अभिप्रेत ईतर सर्व गोष्टींपेक्षा, सेक्स चा 'अधिकृत परवाना' म्हणूनच अधिक महत्व दिले गेल्यानेच खरे तर अशा व संबंधित अनेक ईतर समस्या ऊद्भवल्या आहेत असे मला वाटते. (पुरूषांचे कामवासना दमन या अनुशंगाने वर लेखात लिहीलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने हे लिहीत आहे.) अन्यथा, स्त्रीयांवरील ईतर अत्त्याचार हे बहुत करून 'पुरूष प्रधान' संस्कृतीच्या व त्यावर मिडीयाने (यात सर्व आले- छापिल, वक्तव्ये, चित्रपट, ई.. ई..) चुकीच्या पध्दतीने मंडलेल्या प्रचाराचा/प्रसाराचा/धंदेवाईक पणाचा परीपाक आहेत. अर्थात एक समाज म्हणून आपण ते खपवून घेतो हाही आपलाच दोष. एकीकडे स्त्री अत्त्याचार विरोधात भाषणे ठोकणे, मेणबत्त्या लावणे, दुसरीकडे मुन्नी व शीला च्या तालावर आपल्या वखवखलेपणाचा आनंद लुटणे- हा विरोधाभास आपल्या आचार विचारात ठासून भरलेला आहे आणि आपापल्या स्वार्थासाठी तो सर्व माध्यमे वापरून घेत आहेत. हे गणीत आपणच बनवलं आहे हे ध्यानात घ्यायल हवं.
'आयटम' साँग्स ही चित्रपटाची बहुतांशी धंदेवाईक गरज झाली आहे यातच बरच काही आलं. टाळी एका हाताने वाजत नाही, तसेच ईथे या बाबतीत चित्रपटाच्या माध्यमातून टाळी देणारे हात चारच असतील पण त्यांवर टाळ्या देणारे हात करोडो आहेत, याचं ऊत्तर्दायीत्व अर्थातच करोडोंवर आहे. आणि हीच ती वैयक्तीक मानसिकता मग समाज मानसिकता बनून गणेशोत्सवातील हिडीस नाच ई. च्या स्वरूपाने समोर येते. तो धागा थंड पडून आता हा पेटला आहे, हेही त्याचेच द्योतक नाही का?
धिरज कांबळे ह्यांना एक उत्तम
धिरज कांबळे ह्यांना एक उत्तम लेखाचा दुवा इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
योग ह्यांच्या >>> मुळात आपल्याकडे, विवाह व विवाहसंस्थेस त्यातील अभिप्रेत ईतर सर्व गोष्टींपेक्षा, सेक्स चा 'अधिकृत परवाना' म्हणूनच अधिक महत्व दिले गेल्यानेच खरे तर अशा व संबंधित अनेक ईतर समस्या ऊद्भवल्या आहेत असे मला वाटते. >>> ह्या वाक्याला संपूर्ण सहमती.
मूळ समस्येला हात न घालता आपण वरवरच्या चर्चा करत आहोत (आपण म्हणजे एकूण समाज).
<<माबो वर हा विषय अनेक वेळा
<<माबो वर हा विषय अनेक वेळा वेगवेगळ्या नावाने/बाफ स्वरूपाने डोके वर काढतो...स्मित जुन्या हितगु़ज आर्काईव्ह मधे (२०००-२००८) अक्षरशः टना च्या वजनात यावर वेगवेगळ्या बाफ वर 'चर्चा' आहेत.मग एकंदरीत राळ व रगाडा सर्व 'सीमापार' झाला की अॅडमिन येऊन टाळे ठोकतात. स्मित मग पुन्हा नविन बाफ ची वाट पहायची...>> +१११११
>>>> योग ह्यांच्या >>> मुळात
>>>> योग ह्यांच्या >>> मुळात आपल्याकडे, विवाह व विवाहसंस्थेस त्यातील अभिप्रेत ईतर सर्व गोष्टींपेक्षा, सेक्स चा 'अधिकृत परवाना' म्हणूनच अधिक महत्व दिले गेल्यानेच खरे तर अशा व संबंधित अनेक ईतर समस्या ऊद्भवल्या आहेत असे मला वाटते. >>> ह्या वाक्याला संपूर्ण सहमती. <<<<<
मी या वाक्याशी सम्पुर्णपणे असहमत आहे.
जर "अशी परवाना" पद्धती नको आहे, तर मग नेमके हवे काय आहे ते देखिल सुस्पष्ट पणे मान्डा की!
यात विवाहाव्यतिरिक्तच स्त्रीपुरुषांनी आपापल्या आवडीच्या समलिन्गी/विभिन्नलिन्गी व्यक्तिशी शरिरसंबंध ठेवायचे असे अभिप्रेत होते ना??
असे झाल्यानेही प्रश्न सुटणार आहेत का?
आपापल्या आवडीच्या त्या भिन्नलिन्गी व्यक्तिच्या इच्छेचे काय? तिच्या शरिरसंबंधाबाबतच्या परवानगीचे काय?
अन तिची परवानगी नसेल, तरी बळी तो कान पिळी या न्यायाने जो बळजोर, तोच शिरजोर बनुन भिन्नलिन्गी व्यक्तिवर जबरदस्ती करणार नाही कशावरून?
अन अशी शरिरसंबंधाची मागणी कशी करावी? त्याचे नितीनियम/फॉर्म्यालिटीज, काळवेळशब्द इत्यादिक काय असाव्यात?
उद्या असेच घडून येणार असेल, तर बॉलिवुडमधिल सर्वात फेमस नायक/नायिकेचे काय होईल? त्या व्यक्ति किती भिन्नलिन्गी/समलिन्गियांच्या आवडीच्या असतील? किती मागणी येईल, अन त्या कशी पुरवतील वा नकार देत बसतील?
उग्गाच शब्दाला शब्द जोडल्याप्रमाणे कैच्याकै तर्क करत बसायचे अन नस्ती भिक्कार तत्वे "व्यक्तिस्वातंत्र्याच्या" नावाखाली मान्डत रहायचे हे अमेरिकेत्/युरोपमध्ये शक्य असेल, मला नै वाटत भारतात शक्य होईल. असो.
>>>>> मूळ समस्येला हात न घालता आपण वरवरच्या चर्चा करत आहोत (आपण म्हणजे एकूण समाज). <<<<
कारण तुम्हाला तर आमचा हिन्दू धर्मच अमान्य अन बाकी धर्मांचे बाबतीत तुमचा सर्वधर्मसमभाव! तिथे काय बोलणार? 
अच्छा, जर तुला वरील वाक्य पटलय हे टण्या, तर मूळ समस्येच्या वरील वाक्यात सुचविलेल्या उपाययोजना तुझ्याकडून जरा विस्कटुन सान्गण्याचे अन कशा राबवाव्या, त्याचे साईड इफेक्ट्स काय हे सांगण्याचे कष्ट घेशील का? उगाच "मोघम" बोलणे नको.
एकदाच काय ते सिद्ध होऊन जाऊद्यात, की विवाहसंस्था/नातीगोती/समाज/मित्रपरिवार इत्यादिंचे बंधन घालून देणारे आपले पूर्वज एकतर सर्रास "मूर्ख/प्रतिगामी/मागास" तरी होते, वा त्यांनी जे सांगितले आहे तेच योग्य आहे. होऊन जौद्यात!
बाकी तुम्हा अन्निसवाल्यान्ना हिन्दूधर्मान्तर्गत देवाब्राह्मणाअग्निच्या साक्षिने होत असलेले विवाहविधी "हिन्दूधर्मातील कालबाह्य अडगळिच्या प्रथा व अंधश्रद्धाच" वाटत असले तरी त्याला माझा नाईलाज आहे
बायदिवे, योग अन टण्या, हिंदुस्थान (व जगात इतरत्रही) विवाहसंस्थेला सेक्स चा 'अधिकृत परवाना' म्हणून मान्यता आहे अन तसे ते नको असे आपण म्हणता, तर "सेक्स" बाबत अधिकृत परवान्याचे काय नियम / स्थिती असावी असे आपल्याला अभिप्रेत आहे ते जरा सांगाल का?
[हे बरहे, एरवी अमेरिकेच्या नावाने खडे फोडायचे, सेक्सचा विषय आला की मात्र तिकडील सेक्सस्वातंत्र्य देशात नाही म्हणून गळे काढायचे!
)
(हवं तर तुमच्या अभ्यासाकरता/तयारी करता अमेरिकन कायद्याच्या लिन्का देऊ का?
अनेकदा चर्चा होउनही पुन्हा हा
अनेकदा चर्चा होउनही पुन्हा हा विषय डोकं वर काढत असेल तर कुणाच्याच शंकांचंच दमन होत नसावं. इथल्या ऑनलाईन संभाषणात उत्तर देण्याऐवजी उत्तर खोडण्याला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळं तरबेज सदस्य स्वतःचं काही लिहीण्याऐवजी कोण मोठ्ठं मोठ्ठं लिहीतोय आणि मग त्यातलं वेचक, वेधक घेऊन झोडपतोय याच्या शोधात असतात. नाहीच मिळालं तर मग स्वतःच वाटेल ते अर्थ काढायचे किंवा एखाद्या वाक्याला सर्वकालीन अॅक्सेप्टेबल कोट लिहून जसं काही ते याच्याच विरोधात आहे असा आव आणायचा. आयडी निब्बर नसेल तर गडबडण्याची शक्यता जास्त. जर कोवळा (ऑनलाईन ) असेल तर अरे बापरे आपण या पूर्णसत्याच्या विरोधात लिहीलं कि काय या भीतीने गयावया करतो. कोण बरोबर आणि कोण चूक हे कळेनासं होतं, मग एखादा आयडी येतो, आताप्र्यंतच्या चर्चेशी संबंध नसल्याप्रमाणे पुन्हा एक अॅक्सेप्टेबल सत्य भाजून, फ्रायून, बेकून, ओव्हून सर्व करतो. मग त्याला काही प्लस वन मिळतात, काही मायनॉरिटीत जातात आणि संख्याबळ जिकडे असेल तिथे उडी मारून काही आयडी विरोधकांना झोडपण्यात मश्गूल होतात.
धागाकर्त्याची अवस्था मात्र बिगरी ते मॅट्रीक मधे म्हटल्याप्रमाणे पोरं काढायची आणि वाहणा-या प्रवाहात सोडून द्यायची. मग ते आणि मास्तर यांच्या नशिबाप्रमाणे नाव धक्क्याला लागायची किंवा गटांगळ्या खायची अशी होते.
खटखट्या, भारीच पोस्ट हां!
खटखट्या, भारीच पोस्ट हां! आवडली

पण बाबारे, झोडपायला तरी "स्वतःचा मजकुर" लिहावा लागतो ना?
अन अर्थ काढायचा तरी तशी प्रज्ञा हवीच ना?
की हल्ली कॉम्प्युटरमधे तसलेही काही प्रोग्रॅमबिग्रॅम निघालेत? दिला विषय की मिळाले टेक्स्ट!
ज्यांना कपडे घालायचे आहेत
ज्यांना कपडे घालायचे आहेत त्यांना घालू द्या आणि ज्यांना नागवे फिरायचे आहे त्यांना फिरू द्या ना. मग त्याची जबाबदारी हि तुम्हीच घ्या. इतरांवर चालढकल नको.
स्वानुभवातून सांगतोय विनयभंगाची तक्रार करणारी महिला कधी तोंडघशी पाडेल सांगता येत नाही. आपण मात्र पोलिस आणि आरोपी यांच्यामध्ये भरडून निघतो. यावर कडी म्हणजे आरोपी आणि तक्रारदार महिला चक्क लग्न करतात.
अवांतर: मुक्त लैंगिक संबध असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशात दर दोन मिनिटाला एक बलात्कार होतो आणि वर्षाला जवळपास २ लाखांच्या वर तक्रारींची नोंद होते. (स्त्रोत: आंतरजाल)
पण माणूस हा मुळात जनावर आहे
पण माणूस हा मुळात जनावर आहे हे मान्य असेल, तर त्याचे पशुवत नरमादी संदर्भातील नराचे संभाव्य वर्तनापासून संरक्षण होण्यासाठी जे काय करणे भाग असेल, ते करावे लागेल
उत्तम मुद्दा. फक्त जे काय करणे आहे त्याबद्दल अनेक मतभेद.
एक मार्ग म्हणजे गैरवर्तनाबद्दल मानव जातीच्या मनात भीति उत्पन्न करायची.
पूर्वी धर्म, परंपरा असे, त्याचा कंटाळा आला. मग कायदे केले. (जगातच, फक्त भारतात नाही).
पण माणसानी कायदे केले की त्याविरुद्ध इतर माणसे आपली अक्कल चालवणारच.
तर सध्या भीति हा मार्ग फारसा लागू होत नाही. आतज्याहीची भीति वाटावी असे काही उरलेच नाही.
.उग्गाच शब्दाला शब्द जोडल्याप्रमाणे कैच्याकै तर्क करत बसायचे अन नस्ती भिक्कार तत्वे "व्यक्तिस्वातंत्र्याच्या" नावाखाली मान्डत रहायचे हे अमेरिकेत्/युरोपमध्ये शक्य असेल, मला नै वाटत भारतात शक्य होईल. असो.
भारतात छानपैकी शक्य होतय. एक मायबोली नावाची साईट आहे, भारतातले अनेक लोक तिथे लिहीतात, तिथे पण हे चालते.
नाहीतरी जे मिळवण्या योग्य असेल ते मिळवायला कष्ट हे पडणारच. त्यासाठी सहनशक्ति लागते. या एव्हढ्या लिखाणातून कुणा विचारवंताला मार्ग सापडावा ही आशा आहे. कारण उपजत बुद्धि कमी पडत असेल तर अशी मदत घेतलीच पाहिजे.
मुळात प्रत्येकाच्या पोस्टला उत्तरं देण्याचा अट्टाहास का करतात त्या ? त्यांचं म्हणणं काय असेल ते मांडून मोकळं व्हायचं.
मी स्वतः पूर्वी असाच सतत मायबोलीवर काहीकाही (च) लिहीत असे. पण जरा अंतर्मुख होऊन विचार केला तेंव्हा मला असे कळले की मी लिहीतो याचे कारण खालील प्रमाणे आहे. तसेच इतरांचेहि असेल, त्यामुळे इतर कुणि असे केले तर मला राग येत नाही.
काय असते, कुणाच्या मनात काही प्रश्न अत्यंत ज्वलंत असतात. त्याबद्दल कितीहि बोलले तरी त्यांचे समाधान होत नाही. शिवाय मनातले विचार सुस्पष्ट रीत्या मांडणे सर्वांनाच शक्य नसते, पण विचार मात्र मनात गप बसू शकत नाहीत, त्यांना कुठेतरी वाट द्यावीच लागते. बरेचदा प्रयत्न केला तर कदाचित आपले म्हणणे कुणाला तरी कळेल अशी आशा असते. व्यासपीठ आहे तिथे लिहायचे स्वातंत्र्य आहे, तर जरा मनातली खळखळ मोकळी करावी असे वाटते. म्हणून लोक लिहीत सुटतात.
(तुमच्या)सुदैवाने माझ्या मनातले सगळे ज्वलंत प्रश्न काळाच्या वणव्यात जळून राख झाले आहेत. सुटलात तुम्ही.
धीर धरी धीर धरी.
धीर धरी धीर धरी. << ?? हे नवे
धीर धरी धीर धरी.
<<
??
हे नवे एण्डिंग काय आहे झक्की काका?
सध्या हटकेश्वर सबाटिकलवर गेलेत, की 'धीर धरी धीर धरी, लवकरच मी अजून पोस्टी मारी' अशी ती धमकीवजा चेतावणी आहे, धाग्याखाली क्रमशः लिहितात तशी?
***
पण माणूस हा मुळात जनावर आहे हे मान्य असेल, तर त्याचे पशुवत नरमादी संदर्भातील नराचे संभाव्य वर्तनापासून संरक्षण होण्यासाठी जे काय करणे भाग असेल, ते करावे लागेल
<<
कोणत्याही पशूं मधे नर मादी संबंध परस्परसंमतीविना होत नाहीत. प्राणी बलात्कार करीत नाहीत.
पण लिंबाजीराव म्हणतात 'नराचे संभाव्य वर्तनापासून संरक्षण' म्हणजे नरावर काही आफत येते असे म्हणायचे आहे का? जसे उदा. मधमाशीचा नर एकदा क्रीडा झाली की मरून पडतो. अनेक कीटकांत मादी क्रीडेनंतर नराला गट्टम करते इत्यादी???
पुरुषांच्या मानसिकतेवर
पुरुषांच्या मानसिकतेवर शाब्दिक चाबूक ओढण्यात पारंगत झालेल्या येथील स्त्रिया >>> - बेफी. हे बघितलंच नव्हतं

आज चाबूकस्वार कोण आहेत ?
@झक्की तुमचं उत्तर पाहीलं
@झक्की
मग फारच घुसमट झाली कि हा लोटा सरळ उभा राहतो. मग त्याच्यासारख्या लोट्याशी मैत्री करतो. पण मुळातच घरंगळणारा असल्याने पुन्हा मागे, पुढे, डावीउजवीकडे करत उताणा पडतोही आणि पाडतोही. यांचं काही खरं नसतं बघा. ते म्हणतात ना नया नया सलमान, दिन मे पांच बार काही तरी काही तरी...
तुमचं उत्तर पाहीलं आत्ता. तुमची मतं तुमच्याजवळ. त्यातलं लॉजिक भारी असतं. कुणाकुणाला झोंबतात त्या पोस्टी. पण तुम्ही स्वतःचं मत मांडता आणि मग काय असेल ते इतरांना उत्तरं देता. तुमचं मत हे झक्कींचं मत हे आयडी न पाहताही सांगता येतं इतकं ते ओरीजिनल असतं. आपलं मत मांडताना दुसरा चुकीचा असलाच पाहीजे असं तुम्ही कधी लिहील्याचं आठवत नाही. इथल्या चर्चांची रीत पाहून लिहीलय तसं. इतरांचेही वन लायनस, असंबद्ध प्रश्न, कोट यामुळे तसं लिहीलं होतं. हे सगळे तर आहेतच. आणखी एक जमात आहे. पाठीवर शाबासकी मिळण्याची वाट बघत असलेले. जोपर्यंत शाबासकी मिळत नाही तोपर्यंत काय मी बाजूला होत नाही वाले. हे कायम कुणाला तरी खूष ठेवायला लिहीत असतात. तो कुठलासा लोटा असतो ना इकडेही घरंगळतो, तिकडेही घरंगळतो तसे
प्रत्येकाची त-हा निराळी हो. माझी वर एक पोस्ट आहे गामाजीरावांसाठी. त्यातला मजकूर असंबद्ध कोट करून कुणी असं विचारू शकतं.
बायबल मधे काय आहे कल्पना नाही. बघायला पाहीजे. पण Caesar's wife must be above suspicion ही म्हण काय सांगते ? >>> हे बायबल मध्ये लिहीलंय ?
असली गंमतवाडी सगळी. मज्जा.
>>> कोणत्याही पशूं मधे नर
>>> कोणत्याही पशूं मधे नर मादी संबंध परस्परसंमतीविना होत नाहीत. प्राणी बलात्कार करीत नाहीत. <<<<<
इब्लिसराव, पन्चेद्रियातील डोळे कान ही इंद्रिये वापरुन निसर्गातील घडामोडींचे आकलन बुद्धिप्रामाण्यवादाने जरी केलेत तरी वरील विधान सरसकटरित्या तुम्ही केले नसतेत. असो.
हा विषय इतकाही तपशील वार चर्चिण्याची जागा नसल्याने तुम्हाला उदाहरणासहित स्पष्टीकरण देण्याचे टाळतो आहे, तसेही तुम्ही हुष्षार आहातच, तेव्हा माहिती करुन घ्यालच अशी आशा आहे.
बायदिवे, "बलात्कार" या शब्दाचा कीस काढताना, केवळ हिन्दी/इन्ग्रजी शिनेमातुन दाखवतात, तसा जोरजबरदस्तीचा बलात्कार इतकेच अभिप्रेत नसून, एखाद्या व्यक्तिस हरप्रकारे "कॉर्नर" करुन, अगतिक करुन, असहाय्य करुन, त्या असहाय्यतेचा/अगतिकतेचा फायदा उचलित केलेला शरिरसंबंध देखिल बलात्कारामधे मोडतो, तेव्हा सस्तन प्राणिजगतात, मादीस असहाय्य/अगतिक करण्याची नरांची पराकाष्ठा, व ते करतानाच अन्य नरास त्याचेबरोबर शारिरीक लढत (बौद्धिक नव्हे) देऊन त्यास परास्त करुन मादीपासून दूर ठेवण्याचे नरांचे प्रयत्न हे मानवी "बलात्कार" या शब्दाच्या व्याख्येतच मोडातात यावर तुम्हाला जरुर शन्का असू शकेल, मला नाही.
अगदी गावाकडे गायीम्हशी वगैरेन्ना माजावरील बैल/रेड्याकडे "दाखवुन" आणतात, तो देखिल नुस्ता बलात्कारच अस्तो असे नाही तर त्यात मानवी सहभागही असतो. कारण त्यात केवळ अन केवळ त्या त्या पशुंची "माजावर" आल्याची शारिरिक लक्षणे बघुन कृती ठरवली जाते, त्यात त्या त्या पशुंच्या आवडीनिवडीचा/मानसिक स्थितीचा कसलाही विचार केला जात नाही.
मुंबई सोडून जरा गावगन्ना फिरत चला, रानावनात जा, गेलाबाजार डिस्कव्हरी/हिस्ट्री/जिओग्राफिक सारखी च्यानेल्स पहा, निदान पंचेन्द्रियान्चेमार्फत तरी ज्ञानात बरीच भर पडेल.
]
[सहाव्वे इंद्रियाची अपेक्षा मी तुमचेबाबतीत करीत नाही हे सान्गणे नलगे
अभ्यास वाढवा. फक्त परस्पर
अभ्यास वाढवा. फक्त परस्पर संमती असते तिथे. शेती करता म्हणे तुम्ही?
<एखाद्या व्यक्तिस हरप्रकारे
<एखाद्या व्यक्तिस हरप्रकारे "कॉर्नर" करुन, अगतिक करुन, असहाय्य करुन, त्या असहाय्यतेचा/अगतिकतेचा फायदा उचलित केलेला शरिरसंबंध देखिल बलात्कारामधे मोडतो>
अॅरेंज्ड मॅरेजेस ज्यात मुलीची पसंती लक्षात घेण्याची गरज नसते, त्याबद्दल बोलताय का?
<एखाद्या व्यक्तिस हरप्रकारे
<एखाद्या व्यक्तिस हरप्रकारे "कॉर्नर" करुन, अगतिक करुन, असहाय्य करुन, त्या असहाय्यतेचा/अगतिकतेचा फायदा उचलित केलेला शरिरसंबंध देखिल बलात्कारामधे मोडतो> >>>> हेच आसुमल ने केले आहे.आणि करत असतो ..लिंबुभाउ,,... आता बोला ...:खोखो:
आपल्याच शब्दांमधे अडकलात का आता
कोणत्याही पशूं मधे नर मादी
कोणत्याही पशूं मधे नर मादी संबंध परस्परसंमतीविना होत नाहीत. प्राणी बलात्कार करीत नाहीत.>>
सिंहीणीशी संभोग करता यावा म्हणून तिची पिल्ले मारून टाकतो सिंह. आणि मग पिल्ले मारून टाकल्यावर दु:खी झालेल्या आणि पुन्हा आई होण्याच्या इच्छा असलेल्या असहाय्य सिंहीणीशी सिंह संभोग करतो.
हे डिस्कव्हरी/हिस्ट्री/जिओग्राफिक सारख्या च्यानलवर असंख्य वेळा दाखवलेले आहे.
मुंबई सोडून जरा गावगन्ना फिरत चला, रानावनात जा, गेलाबाजार डिस्कव्हरी/हिस्ट्री/जिओग्राफिक सारखी च्यानेल्स पहा, निदान पंचेन्द्रियान्चेमार्फत तरी ज्ञानात बरीच भर पडेल.>> अगदी बरोबर.
----
बाकी चालुद्या.
एखाद्या व्यक्तिस हरप्रकारे
एखाद्या व्यक्तिस हरप्रकारे "कॉर्नर" करुन, अगतिक करुन, असहाय्य करुन, त्या असहाय्यतेचा/अगतिकतेचा फायदा उचलित केलेला शरिरसंबंध देखिल बलात्कारामधे मोडतात>>>> अनुमोदन,
प्राण्यांमध्ये बलात्कार होत असतात.सस्तन प्राण्यांमध्ये बलात्कार ,समलैंगिकता दिसून येते.
हायला! ठोंब्यामधे जीव आला
हायला!
ठोंब्यामधे जीव आला वाटतं परत?
>>आणि मग पिल्ले मारून टाकल्यावर दु:खी झालेल्या आणि पुन्हा आई होण्याच्या इच्छा असलेल्या असहाय्य सिंहीणीशी सिंह संभोग करतो. <<
इच्छा आहे = संमती आहे.
शिव्हिण असहाय्य हे ज्ञान नवीनच आहे. सगळ्या शिकारी करू शकणारी अन त्या बश्या बैलाला आयते खाऊ घालणारी शिंव्हीण असहाय्य? ~ख्खिक~
असो. लै अभ्यासू लोकं भरली आहेत इथे.
मुंबई सोडून जरा गावगन्ना फिरत
मुंबई सोडून जरा गावगन्ना फिरत चला, रानावनात जा, गेलाबाजार डिस्कव्हरी/हिस्ट्री/जिओग्राफिक सारखी च्यानेल्स पहा, निदान पंचेन्द्रियान्चेमार्फत तरी ज्ञानात बरीच भर पडेल.>>
>>>> हेच आसुमल ने केले
>>>> हेच आसुमल ने केले आहे.आणि करत असतो ..लिंबुभाउ,,... आता बोला ... <<<<
केले आहे/करत असतो हे मिडीयाच्या प्रभावाने/अन्य कारणाने तुम्ही तुमचे बनवलेले मत आहे, माझे नाही.
त्याने तेच केले आहे वा नाही हा विषय न्यायप्रविष्ट आहे. अन उदयन, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही वा इथले इतरही माबोकर नक्कीच न्यायसंस्थेचे/न्यायाधिशांचे प्रवक्ते नाही आहात. तेव्हा धादान्त "केले आहे/करत असतो" असे "बलात्काराचा" गुन्हेगार ठरवुन आरोप करताना तुमच्या फक्त तोन्डाची वाफ (कीबोर्ड बडवायला बोटांचे श्रम) वाया जात असली, तरी ज्याचे वर आरोप केले जाताहेत त्याचे बरेच काही वाया जात असते याची काळजी तुम्ही घ्यालच. तेवढे सुविद्य तुम्ही (अन बाकीजणही) आहातच.
कोर्टाला पूज्य आसारामबापू गुन्हेगार की काय ते ठरवूद्यात, तो अधिकार तुमचा वा मिडीयाचा नाही. अन मला वाटते की हेच गापै देखिल त्यान्चे पोस्टींमधुन समजावुन सान्गु पहात आहेत.
ठोम्ब्या/धिरज, तथ्य समजुन घेऊन, दाखल्यासहित दिलेल्या अनुमोदनाबद्दल धन्यवाद.
. .काय युक्तीवाद .. हा विषय
.
.काय युक्तीवाद .. हा विषय न्यायप्रविष्ट आहे>>>> हे तुम्ही कधीपासुन बोलायला लागलात...शोभत नाही हो तुम्हाला...
>>>> अॅरेंज्ड मॅरेजेस ज्यात
>>>> अॅरेंज्ड मॅरेजेस ज्यात मुलीची पसंती लक्षात घेण्याची गरज नसते, त्याबद्दल बोलताय का? <<<
अजुन एक अत्यंत निसरडे अन खोडसाळ विधान भरतराव! विषयांतर आहे, पण....
तुमच्याकडे/तुमच्यात अॅरेंज्ड मॅरेजेस मधे मुलिची पसंती घेत नाहीत का? आमच्यात तरी घेतात बोवा.
पसंती घेत नसेल तर कोणत्या युगात्/विश्वात वावरताहात? विसावे सम्पुन एकविसावे शतक सुरु झालय ठाऊके ना?
मर्जीविरुद्ध लग्न झाले/केले तर तो गुन्हाच होतो, अल्पवयिन महिलेबरोबर संमतीने शरिरसंबंध ठेवले तरी तो गुन्हाच होतो.
पण तुम्हाला केवळ विवाहसंस्थेतील अॅरेंज्ड मॅरेजेस हेच उदाहरण आठवणार, नै का? असो.
तुमच्या असल्या शन्काकुशन्कान्ना उत्तर देऊन विषयांतर घडणे मला मंजुर नाही.
Pages